नमस्कार मित्रांनो आज आपण विविध सरकारी कार्यालयांमध्ये परवानगी मिळवण्यासाठी, एखादे काम पूर्णत्वास नेण्यासाठी संबधित विभागातील प्रमुखांना विनंती अर्ज कसा लिहायचा ते पाहणार आहोत.
सर्वप्रथम अर्जाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये दिनांक नमूद करायची आहे. यानंतर अर्ज नमुन्यामध्ये दाखवल्याप्रमाणे अर्जाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या विभागात अर्ज करायचा आहे त्या विभाग प्रमुखांच्या पदाचा उल्लेख करायचा आहे.
१. ग्रामपंचायत मराठी विनंती अर्ज कसा लिहावा नमुना
दिनांक / /२०२५
प्रति,
मा. सरपंच/ग्रामसेवक,
मु. पो. ………………
ता. ………….जि. ……….
विषय: ग्रामपंचायत हद्दीत क्रिकेटचे सामने भरवण्याबाबत परवानगी
अर्जदार: संपूर्ण नाव
पत्ता: अर्जदाराचा पत्ता
महोदय,
वरील विषयास अनुसरून अर्ज करतो कि मी आपल्या ग्रामपंचायत हद्दीत वरील पत्यावर राहत आहे. दिनांक ————–ते दिनांक—————पर्यंत ————-दिवस ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणच्या मोकळ्या जागेत आम्ही क्रिकेटचे सामने भरवणार आहोत. तसेच परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची हमी आम्ही देतो. तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. तरी सदर गावठाण जागा वापरण्यास परवानगी द्यावी हि विनंती.
आपला/आपली नम्र
सही:- ———–
नाव:- ———–
२. नोकरी मराठी विनंती अर्ज कसा लिहावा नमुना
दिनांक / /२०२५
प्रति,
मा. व्यवस्थापक,
कंपनीचे नाव………………
पत्ता………………………
विषय: नोकरी मिळणेबाबत
अर्जदार: संपूर्ण नाव
पत्ता: अर्जदाराचा पत्ता
महोदय,
वरील विषयास अनुसरून अर्ज करतो कि मी कला शाखेचा पदवीधर आहे. तसेच माझा संगणक बेसिक कोर्स देखील पूर्ण झाला आहे. मी यापूर्वी ————-या कंपनीत ————-या पदावर——–वर्षे काम केले आहे. कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा आणि नम्रता हे सर्व गुण माझ्याकडे आहेत. त्यामुळे कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे. आपल्या कंपनीत माझ्या शैक्षणिक पात्रतेला योग्य असे काम असल्यास माझ्या अर्जाचा विचार केला जावा हि विनंती.
आपला/आपली नम्र
सही:- ———–
नाव:- ———–
३. शाळेच्या शुल्क माफीसाठी विनंती अर्ज
दिनांक / /२०२५
प्रति,
मा. मुख्याध्यापक,
शाळेचे नाव ………………
पत्ता………………………
विषय: शाळेच्या शुल्क माफीसाठी विनंती अर्ज
अर्जदार: संपूर्ण नाव
पत्ता: अर्जदाराचा पत्ता
महोदय,
मी आपल्या शाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. माझे वडील एका कपड्याच्या दुकानात काम करतात. त्यांचा पगार खूप कमी आहे. आम्ही तिघे भावंडे आहोत. घरखर्च व आम्हा सर्व भावंडाचा शाळेचा खर्च माझ्या वडिलांच्या पगारातून भागत नाही. त्यामुळे माझ्या वडिलांना माझ्या शाळेची फी भरणे शक्य होणार नाही. माझी आपणास नम्र विनंती आहे कि आमच्या या हलाखीच्या परिस्थितीचा विचार करून माझी या वर्षीची शाळेची फी आपण माफ करावी हि विनंती.
आपला/आपली नम्र
सही:- ———–
नाव:- ———–
४. बस सुरु करण्यासाठी एसटी नियंत्रण अधिकाऱ्यास विनंती अर्ज
दिनांक / /२०२५
प्रति,
मा. बस सेवा नियंत्रण अधिकारी,
—————————-बस डेपो
पत्ता———————————
विषय: नियमित बस सुरु करण्याबाबत विनंती अर्ज
अर्जदार: संपूर्ण नाव
पत्ता: अर्जदाराचा पत्ता
महोदय,
वरील विषयास अनुसरून अर्ज करतो कि मी ————-या गावचा रहिवाशी असून मी माझ्या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रयत शिक्षण संस्थेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकतो. परन्तु माझ्या गावातून माझ्या शाळेपर्यंत एक हि बस जात नाही. त्यामुळे मला शाळेत जाता येत नाही. तरी आपण कृपया या मार्गावर बस सेवा सुरु करता येईल का याचा विचार करावा. माझ्याबरोबर माझ्या गावातील अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना बस सुरु नसल्यामुळे शाळेत जाता येत नाही.
आपला/आपली नम्र
सही:- ———–
नाव:- ———–
५. वाढदिवसानिम्मित डीजे वाजवण्याच्या परवानगीसाठी विनंती अर्ज
दिनांक / /२०२५
प्रति,
मा. पोलिस उपनिरीक्षक,
———– पोलीस स्टेशन,
पत्ता__________________
विषय: वाढदिवसानिम्मित डीजे वाजवण्याच्या परवानगीसाठी विनंती अर्ज
अर्जदार: संपूर्ण नाव
पत्ता: अर्जदाराचा पत्ता
महोदय,
वरील विषयास अनुसरून अर्ज करतो कि मी ————-या गावचा रहिवाशी असून मी माझ्या वाढदिवसानिम्मित छोट्याश्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिम्मिताने डीजे मागवला आहे. मी आपणास हमी देतो कि मी व माझ्या मित्रांकडून परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेईन. डीजेच्या आवाजाचा नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेईन. तसेच आपण ठरवून दिलेल्या वेळेत डीजे व कार्यक्रम बंद करेन. तरी आपण वाढदिवसानिम्मित डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी हि विनंती.
आपला/आपली नम्र
सही:- ———–
नाव:- ———–
निष्कर्ष
वरील विनंती अर्ज नमुन्यांवरून विनंती अर्ज कसा लिहावा हे तुमच्या लक्षात आले असेलच.