भाजीपाला निर्जलीकरण व्यवसाय हा बिजनेस स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी असलेला व्यवसाय आहे. आजकाल अनेक तरुण या व्यवसायाकडे वळत असताना आपणास पाहायला मिळत आहेत.
ज्यावेळी शेतकरी हा शेतमाल पिकवून बाजारात विक्रीस आणतो त्यावेळेस त्याच्या शेतमालाची किंमत कवडी मोलाची होते, कारण त्यावेळी अनेक शेतकरी आपला माल बाजारात विक्रीस आणत असतो. त्यामुळे दर कमी मिळतो व याचा फायदा दलाला होतो.
ही शेतकर्याची होणारी पिळवणूक, शोषण कमी करायचे असेल तर विशेषता शेतकर्यांनी vegetable dehydration business कडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.
शेतकर्यांनी जर आपला भाजीपाला, औषधी वनस्पति इत्यादिवर dehydration ची प्रक्रिया करून बाजारात आणला तर निश्चितच त्यांच्या शेतमालाला चांगली किमंत मिळाल्याशिवाय राहणार नाही.
Vegetable Dehydration म्हणजे काय

या vegetable dehydration प्रोसेस मध्ये भाजीपाल्यातून पाणी काढून घेतले जाते, असे केल्याने dehydrate केलेल्या भाजीपाल्याची शेल्फ लाइफ वाढते. भाजीपाला निर्जलीकरण केला तरी त्याच्यातील मिनरल्स, पोषणतत्वे जशीच्या तशी राहतात.
Vegetable Dehydration चे फायदे
भाजीपाला निर्जलीकरण केला तर भाजीपाल्याची shelf life वाढते.
निर्जलीकरण केलेला भाजीपाला कोणत्याही सीजनमध्ये चांगल्या किमंतीत विकता येतो.
निर्जलीकरण केलेला भाजीपाला powder form मध्ये रूपांतरित करता येतो.
शेतमालाचा दर्जा व टिकाऊपणा वाढतो.
बर्याचश्या फूड इंडस्ट्रीजसाठी लागणारा कच्चा माल म्हणून देखील निर्जलीकरण केलेला भाजीपाला किंवा भाजीपाला पाऊडर यांना मोठी मागणी असते.
हा व्यवसाय दोन प्रकार करता येतो
हा बिजनेस करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय असतील एक भाजीपाला dehydrate करून त्याचे चिप्स तयार करून विकता येतो आणि दूसरा dehydrate केलेल्या भाजीपाल्याची पाऊडर बनवून मार्केटमध्ये विकता येते.
1. Raw Material Manufacturing
यामध्ये तुम्ही अनेक प्रकारचा भाजीपाला dehydrate करून त्याचे चिप्स तयार करून मार्केटमध्ये विकू शकता.
2. Vegetable Powder Manufacturing

यामध्ये तुम्ही चिंच पाऊडर, अद्रक पाऊडर, कांदा पाऊडर, टोमॅटो पाऊडर, लसूण पाऊडर अशा फॉर्म मध्ये मटेरियल विकू शकता.
वरील दोन्ही पर्याय तुमच्यासाठी फायद्याचे आहेत.
कच्च्या मालाची उपलब्धता
भारत हा देश कृषिप्रधान असल्यामुळे जवळजवळ 65 ते 70 टक्के लोक शेती व शेती आधारित उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्यांची संख्या देखील अधिक आहे.
तुम्हाला तुमच्या आसपासच्या परिसरातील शेतकर्याकडून बारा महीने भाजीपाला सहज उपलब्ध होऊ शकतो.
या उद्योगासाठी लागणारे भांडवल
हा उद्योग सुरू करण्यासाठी कमीत कमी 2 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 2 करोड रूपये इतका खर्च केला जाऊ शकतो. हे सर्वस्वी व्यवसायिकाच्या बजेटवर अवलंबून आहे.
जर तुम्हाला कमीत कमी एरिया म्हणजे गाव पातळीवर काम करायचे असेल तर भांडवल खूप कमी लागू शकते, तालुका आणि जिल्हा कवर करायचा असेल तर भांडवल सुद्धा त्या प्रमाणात लागेल आणि जर तुम्हाला संपूर्ण भारतात किंवा भारता बाहेर माल पाठवायचा असेल तर भांडवल सुद्धा त्याच पट्टीत मोठे लागेल.
या उद्योगामध्ये कोण कोणत्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करता येते?
कांदा, बटाटा, टोमॅटो, मेथी, कडीपत्ता, पालक, शेपू व इतर सर्व प्रकारच्या कोणत्याही भाजीपाल्यावर प्रक्रिया करता येते.
भाजीपाल्यावर निर्जलीकरनाची प्रक्रिया कशी केली जाते?

सर्वात अगोदर भाजीपाला हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला जातो. त्यानंतर त्याचे चॉपरच्या साह्याने छोटे छोटे काप केले जातात.
हे छोटे छोटे केलेले भाजीपाल्याचे तुकडे म्हणजेच काप ट्रे मध्ये व्यवस्थित ठेवले जातात आणि हे ट्रे पुन्हा dehydration मशीन मध्ये उष्णता देण्यासाठी ठेवले जातात.
मेथी, शेपू, पालक, यांसारख्या भाज्या ह्या तीन तासात मशीनमध्ये dehydrate होऊन रेडी होतात. तर टोमॅटो, बटाटा यांसारख्या भाजीपाल्याला dehydrate होण्यासाठी कमीत कमी 10 तास लागतात.
त्यानंतर मशीनमध्ये सुकवलेला भाजीपाला ग्राइंडर मशीनमध्ये बारीक करून त्याची पाउडर तयार करून वेगवेगळ्या पॅकेटसमध्ये पॅक करून मार्केटमध्ये चार पट दरात विकला जातो.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री
सर्वात अगोदर तुमच्याकडे भाजीपाला कट करण्यासाठी कट्टर मशीन/चॉपर असणे आवश्यक आहे, त्यानंतर भाजीपाला सुकवण्यासाठी dehydration मशीन असणे आवश्यक आहे.
dehydrate केलेल्या भाजीपाल्याची पाऊडर तयार करण्यासाठी ग्राइंडर मशीन सुद्धा असणे आवश्यक आहे.
तयार केलेली पाऊडर पॅक करण्यासाठी तुमच्या उद्योगाचे लेबल लावलेले रिकामे पाऊच/पॅकेटस/बरण्या सुद्धा लागतील. पाऊच/पॅकेटस पॅक करण्यासाठी पॅकिंग मशीन सुद्धा आवश्यक आहे.
भाजीपाल्याचे dehydration केल्यामुळे त्यातील पोषकतत्वे कमी होतात का
अजिबात नाही, भाजीपाल्याचे dehydration केलेतरी भाजीपाल्यात असणारे पोषक घटक हे जसेच्या तसे राहतात. भाजीपाल्याचा तोच रंग व तीच चव आपल्याला dehydration केलेल्या भाजीपाल्यात पाहायला मिळतो.
स्वस्तात कच्चा शेतमाल कसा मिळवता येईल
या उद्योगात सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला वर्षाचे बारा महीने भाजीपाला हा स्वस्त मिळणार नाही, तर भाजीपाल्याचे दर हे नेहमी बदलत राहतात त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला भाजीपाला हा स्वस्त मिळेल याची काही गॅरंटी नाही.
तर तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे ज्या ज्या वेळी तुम्हाला जो भाजीपाला खूप स्वस्त मिळेल त्यावेळी तो विकत घेऊन dehydrate करून ठेवावा लागेल. म्हणजे तुमची कच्च्या मालावर येणारी कॉस्ट कमी येईल.
स्वस्त दरात आणि बारा महीने भाजीपाला उपलब्ध होण्यासाठी तुम्ही काही शेतकर्यांना तुमच्या सोबत जोडू शकता.
त्यांना तुमच्या उद्योगाशी जोडून त्यांच्याकडून योग्य दरात भाजीपाला खरेदी करू शकता. म्हणजे ते इतर ठिकाणी भाजीपाला न विकता थेट तुमच्या कंपनीमध्ये आणून विकतील. आणि तुम्हाला हवा तो भाजीपाला लागवड करतील.
शेतकर्यांशी टाइप केल्याने उच्च दर्जाचा स्वच्छ भाजीपाला उपलब्ध होऊ शकतो.
या व्यवसायाला असणारी संधि
जर तुम्ही या व्यवसायात नवीन येऊ पाहत असाल तर नक्कीच तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल कि कधी कधी बाजारात भाजीपाला इतका स्वस्त मिळतो तर विनाकारण लोक dehydrate केलेला/पाऊडर केलेला भाजीपाला कोण विकत घेतील. तर मित्रांनो dehydrate केलेला/पाऊडर केलेला भाजीपाल्याला मार्केटमध्ये खूप मागणी आहे.
मसाला तयार करणार्या कंपन्या, रेडिमेड फूड बनवणार्या कंपन्या, आयुर्वेदिक औषधे तयार करणार्या कंपन्यांना dehydrate केलेल्या भाजीपाल्याची खूप गरज असते.
आजकाल ग्रामीण भागातच नव्हे तर शहरात सुद्धा नोकरी करणारे लोक, मोठ मोठ्या रेस्टोरंट मध्ये, समारंभामध्ये जास्त लोकांचे जेवण बनवण्यासाठी रेडीमेड भाजीपाला जसे टोमॅटो पाऊडर, कडीपत्ता पाऊडर, कांदा पाऊडरचा वापर सर्रास करतात.
परदेशात सुद्धा dehydrate केलेला/पाऊडर केलेला भाजीपाल्याला प्रचंड मागणी आहे.
या व्यवसायात सुरूवातीला येणार्या अडचणी
सुरूवातीला तुम्हाला या व्यवसायातील फारसे ज्ञान नसेल परंतु हळू हळू तुम्हाला यातील सर्व बारकावे माहीत होतील.
मशीनरी कशा ऑपरेट कराव्यात, माल कोणता व कसा निवडावा, यंत्राची निगा व देखभाल कशी घ्यावी या सर्व गोष्टी सुरूवातीला तुम्हाला माहीत नसतील परंतु जर तुम्ही याचे योग्य प्रशिक्षण घेतले असेल तर नक्कीच तुम्हाला फारसा त्रास होणार नाही.
तसे पाहिले तर कोणत्याही व्यवसायात पर्दापण केल्यानंतर सुरूवातीचे दोन वर्षे हे तुमच्यासाठी कठीण असतात त्यामुळे तुम्ही याठिकाणी खचून न जाता व्यवसायात येणार्या सर्व अडचणींना सामोरे गेले पाहिजे.
जोपर्यंत तुम्हाला मार्केट कळत नाही, जोपर्यंत धंद्यातील बारकावे तुमच्या लक्षात येत नाहीत तोपर्यंत तरी तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल.
Conclusion (निष्कर्ष)
vegetable dehydration बिजनेसमध्ये बर्याच टेक्नॉलजी आहेत, त्यामुळे एखाद्या प्रभावी टेक्नॉलजीचा वापर करून तुम्ही या धंद्यात आर्थिक स्थैर्य मिळवू शकता.
मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या व्हेजीटेबल dehydration प्रोजेक्टला भेट देऊन यात अधिक अनुभव मिळवता येईल.
वरील माहितीच्या आधारे vegetable dehydration बिजनेस काय आहे, त्यात किती पोटेंशल आहे, आणि तो कसा करावा या मुद्यांच्या आधारे दिलेली माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी ठरेल अशी आशा आहे.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.