वाहतूक व्यवसाय: जोपर्यंत पृथ्वीवर लोक आहेत, उद्योगधंदे आहेत आणि व्यापार आहेत तोपर्यंत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालूच राहणार आहे. ट्रक, वाहने, विमान आणि रेल्वे या सर्वांशिवाय मानव वस्तीचा विकास होऊच शकत नाही.
शेतमालाची ने आण करणे, मानव उपयोगी वस्तूंची वाहतूक करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे, खाण्यापिण्याच्या वस्तू देश-विदेशात पाठवणे मागवणे, औषध गोळ्या मागवणे या कामासाठी ट्रान्सपोर्टची रिप्लेसमेंट करता येऊच शकत नाही.
आज ट्रान्सपोर्ट क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे, लाखो लोक या क्षेत्राशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जोडले गेले आहेत. भारताच्या आर्थिक विकासात या ट्रान्सपोर्ट क्षेत्राचा मोठा वाटा आहे.
राज्यांतर्गत वाहतूक कि देशांतर्गत वाहतूक?

या दोन्ही राज्यांतर्गत आणि देशांतर्गत वाहतुकीसाठी तुमच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. जर राज्याबाहेर वाहतूक करणार असाल तर तुमच्याकडे नॅशनल परमिट असणे आवश्यक आहे.
देशांतर्गत कुठेही व राज्यात वाहतूक सेवा पुरवताना गाडीचा विमा उतरवलेला असावा सोबत ड्रायव्हिंग लायसन्स व इतर वाहन संबंधित कागदपत्रे सोबत असणे आवश्यक असते. वाहतूक नियंत्रण विभागाने मागणी केल्यास सादर करावी लागतात.
तसेच वाहतूक पोलीस यंत्रणे कडून कोणतेही प्रकारचा दंड आकारला जाऊ नये याकरिता तुमच्याकडे आवश्यक वाहन संबंधित कागदपत्रे असावी, तसेच ती वेळोवेळी अपडेट केलेली असावी.
वाहतुकीचे महत्त्वाचे प्रकार
- एअर ट्रान्सपोर्ट
- वॉटर ट्रान्सपोर्ट आणि
- लँड ट्रान्सपोर्ट
एअर ट्रान्सपोर्ट मध्ये विमाने, हेलिकॉप्टर यांच्या साह्याने वाहतूक केली जाते.
वॉटर ट्रान्सपोर्टमध्ये मोठ-मोठी जहाजे, पाणबुडी यांच्या साह्याने वाहतूक केली जाते. यात रस्त्यावरून धावणाऱ्या सर्व वाहनांचा समावेश होतो.
ज्यामध्ये ट्रक, पिकअप, रिक्षा, बस आणि रुळावरून धावणाऱ्या रेल्वे यांचा समावेश होतो. आज या पोस्टमध्ये मुख्यत्वे आपण लँड ट्रान्सपोर्ट या सेक्टरमधील व्यवसायासबंधित बोलणार आहोत.
ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपणास खालील पैकी योग्य ट्रान्सपोर्ट बिजनेस मॉडेलची निवड करावी लागेल.
1. Logistics services provider लॉजिस्टिक्स सेवा पुरवठा
लॉजिस्टिक्स सेवा पुरवठा करून तुमचा व्यवसाय सुरू करणार आहात का?
2. Car on rent कार सेवा पुरवून तुमचा व्यवसाय सुरू करणार आहात का?
3. Goods carrier services मालवाहतूक व्यवसाय सुरू करणार आहात का?
तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या कामाच्या अनुभवानुसार वरीलपैकी कोणतेही बिझनेस मॉडेल निवडू शकता. वरील तिन्ही ट्रान्सपोर्टचे बिजनस मॉडेल चांगले काम करू शकतात व त्यातून होणारी कमाई देखील चांगली होते.
ज्यावेळी तुम्ही वरीलपैकी एखादा पर्याय निवडाल त्यावेळी तुम्हाला त्या बिजनेस मध्ये कोणत्या अडचणी येणार आहेत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत किंवा गुंतवणूक किती करावी लागणार लागेल या गोष्टींचा विचार करायला वेळ मिळतो.
हे वाचा:
फिरते व्यवसाय
ड्रॉपशिपिंग व्यवसाय मराठी
Car services कार सेवा

तुम्ही तुमची कार ओला, उबेर सारख्या प्लॅटफॉर्मवर नोंदवू शकता. अशा कंपन्यांकडून तुम्हाला मोबाईल ॲप दिले जाते. त्यावरून तुम्हाला ऑनलाईन बुकिंग केलेले प्रवासी भेटतात.
प्रवाशांनी बुक केलेल्या ट्रिप कंपनीकडे नोंदवल्या गेल्यानंतर त्या थेट तुमच्या मोबाईल ॲपमध्ये डिलिव्हर केल्या जातात.
तुम्हाला फक्त प्रवाशांच्या डेस्टिनेशनवर जाऊन त्यांना पिकअप करून प्रवाशांनी निर्धारित केलेल्या ठिकाणी पोहचवायचे असते. अँपमध्ये तुम्ही वाहन चालवलेले अंतर आणि तुमची दिवसाची कमाई तुमच्या ॲपवर दाखवली जाते.
किंवा तुम्ही दररोज स्वतः तुमची कार एक शहर ते दुसरे शहर अशा ठिकाणी प्रवासी वाहतूक करू शकता. उदाहरणार्थ बारामती ते पुणे, पुणे ते मुंबई, पंढरपूर ते पुणे, सातारा ते पुणे इत्यादी.
Ambulance services ॲम्बुलन्स सेवा
ॲम्बुलन्स वाहन खरेदी करून तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला लावू शकता. असे अनेक खाजगी दवाखाने आहेत जे स्वतः ॲम्बुलन्स सेवा न देता खाजगी ॲम्बुलन्स सेवा घेतात.
तुम्ही तुमची ॲम्बुलन्स अशा हॉस्पिटलला भाड्याने देऊन प्रत्येक महिन्याला आकर्षक कमाई करू शकता. किंवा तुम्ही सरकारी आरोग्य विभागात 108 मध्ये देखील तुमची ॲम्बुलन्स मासिक रेंटवर देऊ शकता.
Packers and movers पॅकर्स अँड मूव्हर्स
घरातील किंवा कार्यालयातील गरजेचे सामान शिफ्ट करणे. नोकरदार वर्ग ज्यावेळी नोकरी बदलतात त्यावेळी त्यांना नोकरीनिमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावे लागते किंवा एखादे ऑफिस एका शहरातून दुसरीकडे शिफ्ट होत असेल तर त्या कार्यालयातील आवश्यक साहित्य सुरक्षित शिफ्ट करावे लागते.
अशावेळी ऑफिसमधील किंवा घरातील साहित्य शिफ्ट करणे हा एक व्यवसाय होतो. यामध्ये नाजूक महागडे साहित्य बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून ते सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करणे महत्त्वाचे ठरते.
Tour services टूर सर्विस

भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात अनेक तीर्थ ठिकाणे, प्रसिद्ध मंदिरे, आहेत तसेच पाहण्यासारखी पर्यटन स्थळे आहेत.
दरवर्षी हजारो भाविक अशा धार्मिक ठिकाणांना भेटी देतात. स्थानिक पर्यटक, विदेशी पर्यटक पर्यटन स्थळांना भेटी देतात. तुम्ही या ठिकाणी अशा प्रवाशांना टार्गेट करून अशा स्थळांना प्रवाशांची ने आण करणे ही टूर्स सेवा पुरवू शकता.
Auto rikshaw ऑटो रिक्षा
मुंबई पुणे अशा अनेक मोठ्या महानगरांमध्ये तुम्हाला रिक्षा पाहायला मिळेल. ग्रामीण भागात देखील यांचा वापर वाढू लागला आहे.
अनेक स्थानिक नागरिक तसेच कामानिमित्त शहरात आलेले नागरिक सरकारी कार्यालय, दवाखाने व बँका यांना भेट देण्यासाठी रिक्षाचा वापर करतात.
महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक वर्ग मोठ्या प्रमाणात रिक्षाने प्रवास करतो. यासाठी तुम्हाला एक रिक्षा खरेदी करावी लागेल रिक्षाचे परमिट काढावे लागेल.
रिक्षा चालवणे हा व्यवसाय तुम्ही रिक्षा स्वतः चालवून करू शकता, किंवा ती रेंटवर देऊन वाहतूक व्यवसाय सुरू करू शकता.
शाळेतील मुलांना शाळेत सोडणे व घरी सोडणे, महिलांना कामगार यांना कंपनीत सोडणे व घरी आणणे, मजुरांची वाहतूक करणे अशी विविध कामे रिक्षा वाहुतुक व्यवसायातून करता येतात.
Goods transport vehicle मालवाहतूक वाहन
ग्रामीण भागांमध्ये शेतमालाची वाहतूक करणे, शेत उपयोगी यंत्रे व साधने यांची वाहतूक करण्याकरिता तीन चाकी टमटम, चार चाकी पिकप व ट्रॅक्टर यांचा वापर केला जातो. बांधकाम साहित्य, सिमेंट व वीट यांची वाहतूक करणेकरता पिकप ट्रॅक्टर यांचा वापर केला जातो.
तसेच छोटे लघुउद्योग यांना लागणारा कच्चामाल यांची वाहतूक करण्याकरता देखील अशा मालवाहतूक वाहनांचा वापर केला जातो. त्यामुळे मालवाहतूक सेवा पुरवणे सुद्धा ट्रान्सपोर्ट बिजनेस मधील महत्त्वाचा भाग ठरू शकतो.
ट्रान्सपोर्ट बिजनेससाठी आवश्यक कॅपिटल
वरीलपैकी कोणतेही बिझनेस मॉडेल असू द्या तुमच्याजवळ व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व व्यवसाय चालू ठेवण्यासाठी भांडवल असणे आवश्यक आहे.
यामध्ये वाहन खरेदी करणे, वाहन संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी फी भरणे, आरटीओ टॅक्स इत्यादीसाठी तुमच्याकडे आवश्यक पैसे असणे गरजेचे गरजेचे आहे.
तसेच वाहनाची देखभाल दुरुस्ती यांकरिता, इंधन यांकरिता देखील भांडवल खिशात खेळते भांडवल असणे गरजेचे आहे.
कोणते वाहन खरेदीसाठी किती पैसे लागणार आहेत हे तुम्हाला वाहनाच्या सध्याच्या किमतीवरून ठरवता येईल त्यासाठी तुम्हाला वाहन शोरूमला भेट द्यावी लागणार आहे.
ट्रान्सपोर्ट बिजनेस मधील रिस्क
तुमच्या वाहनाची शासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाते. रस्त्यावर वाहन चालवताना पोलीस, ट्राफिक पोलीस, आरटीओ, फॉरेस्ट डिपार्टमेंट या सर्व यंत्रणा कधीही तुमच्या वाहनाची तपासणी करू शकतात.
त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असावी, वाहनचालक मद्यपान केलेला नसावा, वाहन ओव्हरलोडींग नसावे, ट्राफिकच्या नियमानुसार वाहनातील सामान जास्त नसावे, प्रवासी जास्त नसावेत या सर्व बाबी पहाव्या.
तसेच वाहनांमध्ये शासनाने बंदी घातलेल्या बेकायदेशीर वस्तूंची वाहतूक करू नये. अन्यथा तुम्हाला फार मोठ्या शिक्षेला व दंडाला सामोरे जावे लागेल व तुमच्या ट्रान्सपोर्टचा व्यवसाय अडचणीत येऊ शकतो.
Conclusion (निष्कर्ष)
लोकसंख्यावाढीमुळे, व्यवसाय वाढीमुळे, वाहतूक व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. प्रवासी वाहतूक वाढली आहे.
खाण्यापिण्याच्या वस्तूंची वाहतूक करावी लागत असल्यामुळे ट्रान्स्पोर्ट व्यवसाय चांगला वाढीस लागला आहे. Driving ची आवड ज्यांना आहे अशा लोकांकरिता ट्रान्स्पोर्ट व्यवसाय चांगला पर्याय आहे.
FAQ
कोणता वाहतूक व्यवसाय सर्वात फायदेशीर आहे?
कार सेवा, मालवाहतूक वाहन, ऑटो रिक्षा हे वाहतूक व्यवसाय फायदेशीर आहेत.
वाहतूक सेवांचे फायदे काय आहेत?
वाहतूक सेवांमुळे शेतमालाची, घरगुती उपयोगी वस्तूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहूतक करता येते. व्यापार वाढीला चालना मिळते. वाहतूक सेवांमुळे कामे जलद गतीने होतात व श्रम वाचते.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.