शून्य गुंतवणुकीत सुरु होणारे बिझनेस / Zero Investment Business Ideas In Marathi 2025.

आजच्या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी ५ भन्नाट बिझनेस आयडिया घेऊन आलोय. हे असे आयडिया आहेत की ज्यासाठी एक रुपयाचीही इन्व्हेस्टमेंट लागत नाही, तुम्ही या मधील काही व्यवसायात ऍडव्हान्स मध्ये पैसे घेऊन देखील चालू करू शकतात. हातात फारसा पैसा नसला तरी चालेल, पण या आयडियाने तुम्ही या महिन्यापासूनच हजारो रुपयांची कमाई करू शकता.
हे सगळे बिजनेस आयडिया बिगिनर-फ्रेंडली, सोपे आणि हटके आहेत. तुम्ही राहायला गावात असो किंवा शहरात, तुम्ही अगदी घरबसल्या सुरुवात करू शकता. आजकाल घरचा खर्च भागवण्यासाठी सर्वांना साईड इनकम खूप गरजेची झालीये. त्यासाठी आजच्या पोस्टमध्ये व्यवसाय आयडिया तुमच्यासाठी सोप्या भाषेत घेऊन आलो आहे.
आम्ही दिलेल्या व्यवसाय आयडियामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट नाही लागणार, मोठया ऑफिसची गरज नाही, फक्त मनापासून सुरुवात केली तर पोटापुरती आणि त्याहीपेक्षा जास्त कमाई यातून करता येईल, तर चला मग, जाणून घेऊया हे भन्नाट बिझनेस आयडिया.
🎨बिझनेस आयडिया नं. १ – घरगुती आर्ट & क्राफ्ट 🎭
बघा, साधारणपणे कुठलाही बिझनेस करायचं म्हटलं की आपल्याला काय करावं लागतं? तर होलसेलमध्ये माल विकत घ्यावा लागतो, तो मोठ्या प्रमाणात आणावा लागतो, मग थोड्या जास्त किमतीत विकावा लागतो. पण इथे जरा वेगळाच खेळ आहे, या बिजनेस आयडियात तुम्हाला काहीही विकत घ्यायचं नाही!
आपल्या भारतात हजारो टॅलेंटेड कलाकार आहेत, कुणी पेंटिंग करतं, कुणी वॉल हँगिंग बनवतं, कुणी होम डेकॉरचं काहीतरी हटके क्राफ्ट करतं. पण त्यांच्या आर्टचं प्रॉडक्टमध्ये रूपांतर करून त्याला बिझनेसमध्ये कसं बदलायचं हे अनेकांना माहीत नसतं. 👉 इथेच एंट्री घेते होममेड क्राफ्ट बिझनेस आयडिया.
होममेड क्राफ्ट बिझनेसमध्ये नेमकी काय करायचं?
1) तुमच्या आर्टचं, क्रिएशनचं एक इंस्टाग्राम अकाऊंट उघडा.
2) ज्या गोष्टी बनवता त्याचे फोटो, रील्स, व्हिडिओ चांगल्या प्रकारे टाका.
3) बिहाइंड द सीनसुद्धा ( आर्ट बनवताना) दाखवा, म्हणजे वस्तू तयार होताना कसा प्रोसेस असतो, असे विडिओ लवकर viral होतात, ते लोकांना खूप आवडतात.
4) असं केल्यावर तुमचं आर्ट फक्त आर्ट राहत नाही, तो एक प्रॉडक्ट बनतो आणि जोरदार विक्री सुरू होते.
🎁 DIY किट आयडिया
जर तुम्हाला हा बिझनेस आणखी हटके करायचा असेल तर DIY किट्स बनवा. उदा. मंडल आर्ट करत असाल तर “बिगिनर मंडला किट” तयार करा ज्यात पेन्सिल, कंपास, ब्लॅक पेन, बेसिक टेम्प्लेट्स, प्रिंटेड गाईड आणि छोटसं थँक यू नोट तुम्ही टाकून देऊ शकता.
यातून तीन कमाईचे मार्ग तयार होतात:
1) आर्ट पेज – फॉलोअर्स वाढले की इंस्टाग्रामवरून मोनेटायझेशन सुरू होऊ शकते.
2) आर्ट वर्क – कुणाला खरंच आवडलं तर तो थेट तुमच्याकडून विकत घेईल किंवा नवीन बनवायला कॉन्ट्रॅक्ट देईल.
3) DIY किट्स – रॉ मटेरियल पॅक करून विकता येईल, त्यामुळे तुमचा जास्त फायदा होऊ शकतो.
होममेड क्राफ्ट बिझनेस फायदे
1) या व्यवसायातुन तुमची स्वतःची चांगली कम्युनिटी तयार होते.
2) लोक फक्त खरेदी करत नाहीत तर तुमच्यासारखं शिकायलासुद्धा तयार होतात आणि मग तुमच्या किटची विक्री होते.
3) ऑनलाइन क्लासेस, वर्कशॉप्स घेऊन तुम्ही हे काम अजून मोठं करू शकता, त्यामुळे काही पैसे न गुंतवणूक करता महिन्याला तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.
4) तुमचा आर्ट फक्त छंद न राहता, खराखुरा कमाईचा सोर्स होतो.
👕 बिझनेस आयडिया नं. २ – थ्रिफ्ट बिझनेस (जुन्या वस्तू विकायचा धंदा)
थ्रिफ्ट बिझनेस हा धंदा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सेकंड हॅण्ड वस्तू विकायचा धंदा आहे. उदा. कपडे, बूट, पुस्तकं, घर सजावटीच्या वस्तू, फर्निचर… अशा गोष्टी ज्या कुणी एकदा वापरल्या पण आता गरज नाही म्हणून बाजूला ठेवल्या, दान दिल्या किंवा विकायला काढल्या जातात.
🛍️ थ्रिफ्ट म्हणजे काय?
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, या वस्तू तुम्ही अगदी कमी दरात विकत घ्या आणि पुढं चांगल्या प्राइसला विकून टाका.बाहेरच्या देशात हा धंदा फार कॉमन आहे. आपल्या भारतातसुद्धा आता तो झपाट्याने वाढतोय. २०२४ मध्ये भारतात सेकंड हॅण्ड कपड्यांचा बाजार तब्बल २९,००० कोटींचा होता आणि दरवर्षी वाढ १३% दराने होणार असं रिसर्च सांगतंय.
🌍 लोकांना का आवडतो हा धंदा?
आजकाल लोकांना सस्टेनेबल फॅशन आवडते. म्हणजे एक कपडा एकदाच वापरून फेकायचा नाही, तर धुऊन, स्वच्छ करून परत घालायचा, जेणं करून पर्यावरणाची हानी होणार नाही.
💡 थ्रिफ्ट बिजनेस कसा करायचा?
1) माल मिळवायचा :
- या व्यवसायाची सुरुवात तुम्ही लोकल एरियातल्या लोकांकडून करू शकता.
- जुन्या वस्तू तुम्ही नातेवाईक, मित्र यांच्याकडून घेऊ शकता.
- किंवा पर किलो दराने जुने कपडे विकणारे सेलर्स मिळतात, त्यांच्याकडून घेता येतील. (यूट्यूबवर सर्च केलं तरी होलसेल सेलर्स सापडतील.)
2) स्वच्छ करायचं:
- जे कपडे किंवा वस्तू विकत घ्याल ते नीट धुऊन, प्रेस करून अगदी नवीनसारखे बनवा.
- लोकांनी विकत घेताना वाटायला हवं की हे सेकंड हॅण्ड नाही, तर एकदम फ्रेश नवीन कपडे आहे.
3) ऑनलाइन विक्री:
- तुमच्या व्यवसायाला छान नाव देऊन, इंस्टाग्राम पेज किंवा वेबसाइट बनवा.
- वस्तूंचे फोटो काढून, रील्स करून अपलोड करा.
- फॉलोअर्स कमी असलेल्या मायक्रो-इन्फ्लुएंसरकडून प्रमोशन करून घ्या.
⚠️ एक लक्षात ठेवा.
या धंद्यात प्रत्येक वस्तू लिमिटेड असते.उदा. एखादा गुची ब्रँडचा टी-शर्ट आला तर तो फक्त एकच पिस असेल, त्याचे दुसरे साईझेस मिळणार नाहीत. त्यामुळे खरेदीदाराला ज्या साईझचा किंवा जशी वस्तू दिसते, तशीच विकत घ्यावी लागेल.
🤝 स्मार्ट मार्केटिंग
1) तुम्ही इन्फ्लुएंसरना पैसे देण्याऐवजी त्यांना काही डील ऑफर करू शकता.
2) “आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये कपडे देतो, त्याच्या बदल्यात तुम्ही आमच्यासाठी एक व्हिडिओ बनवा.” 
3) हा फंडा बरेच लोक वापरतात आणि त्यात प्रचंड फायदा होतो.
👉 थ्रिफ्ट बिझनेस म्हणजे असा धंदा ज्यात भांडवल कमी लागतं, पण लोकांना स्वस्तात भारी वस्तू मिळतात आणि तुम्हालाही चांगला नफा मिळून जाईल.
🍛 बिझनेस आयडिया नं. ३ – घरगुती स्नॅक्सचा धंदा.
भारतातले लोक प्रवास करताना खाण्यापिण्याशिवाय राहूच शकत नाहीत.बस असो, ट्रेन असो की फ्लाईट असो लोक ट्रॅव्हल करताना स्नॅक्सवर खूप पैसे खर्च करतात. हीच गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा घरगुती स्नॅक्स बिझनेस सुरू करू शकता.
🥨 काय करायचं?
तुम्हाला फक्त घरीच काही हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स बनवायचे ,जसे की पोहे, चिवडा, भजी, फरसाण, चिप्स वगैरे.हे स्नॅक्स नीट पॅक करून जवळच्या ट्रॅव्हल एजंट्सकडे तुम्ही विकू शकता.
🤝 घरगुती स्नॅक्सचा व्यवसाय कसा सुरू करायचा?
- तुमच्या परिसरातल्या ट्रॅव्हल एजन्सी किंवा एजंट्सशी संपर्क साधा.
- त्यांना तुमचं प्रॉडक्ट दाखवा आणि सांगा “जेव्हा कुणी ट्रिप बुक करायला येईल, तेव्हा माझे स्नॅक्स त्यांना दिसतील असं तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा.”
- विक्री झाल्यावर तुम्ही एजंटला थोडा टक्का नफा द्या, यामध्ये दोघांचाही फायदा होईल.
एजंटला वस्तू विकायची गरज नाही, फक्त टेबलावर ठेवायची. हवं तर तुम्ही स्नॅक्ससोबत एक लहान जाहिरात/होडिंगही ठेवू शकता.
📦 डिलिव्हरी आणि पॅकेजिंग
- तुम्हाला रोज डिलिव्हरी करण्याची काही गरज नाही, फक्त आठवड्यातून एकदा ताजा स्टॉक द्या.
- पॅकिंग अगदी साधं पण स्वच्छ ठेवा.
 प्रत्येक पॅकेटसोबत एक छोटंसं हाताने लिहिलेलं नोट ठेवा उदा. “Have a safe journey!” किंवा “Have a tasty journey!”
- ही छोटी गोष्ट दिसायला साधी आहे, पण यामुळे तुमचं प्रॉडक्ट लोकांच्या नेहमी लक्षात राहील.
🧑🍳 पर्सनल टच महत्त्वाचा
लोक नेहमी त्या दुकानात जातात जिथं दुकानदार गोड बोलतो, विचारपूस करतो. अगदी तसंच, तुम्ही जरी प्रत्यक्ष नसाल तरी तुमचा हँडरिटन नोट कस्टमरला पर्सनल टच देतो. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा तुमचे स्नॅक्स घ्यायला येतील.
👩👩👦 कुणासाठी योग्य?
हा बिझनेस खास करून घरातल्या महिलांसाठी किंवा कुकिंगची आवड असणाऱ्यांसाठी भारी आहे. तुम्ही तुमच्या आईसोबतही हा व्यवसाय सुरू करू शकता.
हळूहळू हा बिझनेस कसा वाढवायचा?
प्रवास एजंट्सशिवाय स्थानिक किराणा दुकानं,
स्टेशन जवळच्या हॉटेल्स,
आणि लहान कॅन्टीनमध्येही स्नॅक्स ठेवू शकता.
🪜 सुरुवात कशी करायची?
- सुरुवात अगदी साधी ठेवा.
- फक्त ४ एजंट्सकडे स्नॅक्स द्या.
- दोन ते तीन प्रकारचे स्नॅक्स बनवा.
- तुमच्या स्नॅक्सची टेस्ट भारी ठेवा,जी सर्वांच्या मनात घर करेल.
👉 प्रॉडक्ट चविष्ट असेल तर लोक वर्ड ऑफ माउथमुळे स्वतःच तुमचं नाव आणि प्रॉडक्ट पुढे नेतील.
🛍️ बिझनेस आयडिया नं. ४ – लोकल रिसेलिंग
हा धंदा खास करून लहान शहरं (टिअर २, टिअर ३ सिटीज्) आणि गावाकडच्या भागासाठी जबरदस्त आहे.सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या व्यवसायात तुम्हाला ना पैसे गुंतवायचे, ना कुठे बाहेर फिरायचं, ना जास्त वेळ द्यायचा.
📲 काय करायचं?
- मीशो सारख्या अॅप्सवर जाऊन स्वस्तात आणि ट्रेंडिंग प्रॉडक्ट्स निवडा, जसे की घरगुती वस्तू, फॅन्सी कानातली, फोन कव्हर्स, साड्या इत्यादी.
- हे प्रॉडक्ट्स डाऊनलोड करून त्यांचे फोटो तुमच्या WhatsApp Business वर डिजिटल कॅटलॉग बनवा.
- हा कॅटलॉग तुम्ही WhatsApp Status, लोकल ग्रुप्स, रिलेटिव्ह्ज किंवा फ्रेंड्सना डायरेक्ट मेसेज मधून दाखवू शकता.
💸 कमाई कशी होणार?
- समजा मीशोवर एखादी साडी 250 रुपयांची आहे, तर तुम्ही ती 399 ला विकू शकता.👉 म्हणजेच तुमचा नफा थेट तुमच्या हातात येईल.
- पॅकिंग आणि डिलिव्हरीचं काम प्रामुख्याने हे ऑनलाइन सेलिंग अॅप्स करतात. पण स्मार्टपणे तुम्ही स्वतःच्या नावाने पॅकिंग करून द्याल तर लोकांना वाटेल की तुम्हीच तो बिझनेस करत आहात.
⭐ विश्वास कसा वाढवायचा?
- जेव्हा कस्टमरकडून ऑर्डर मिळेल, तेव्हा त्यांचा रिव्ह्यू (feedback) नक्की घ्या.
- हा रिव्ह्यू तुम्ही WhatsApp Status वर टाकलात, तर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास अजून वाढतो.
🧑🎓 फायदे
- या व्यवसायातुन फक्त पैसेच नाही मिळत, तर तुम्ही कस्टमरशी बोलणं, नेगोशिएशन करणं, प्रॉडक्ट हँडल करणं शिकता.
- हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि लोकं तुम्हाला खरंच बिझनेसमन/बिझनेसवुमन म्हणून ओळखू लागतात.
🍱 बिझनेस आयडिया नं. ५ – टिफिन सर्विस
पोटाची भूक ही अशी गोष्ट आहे की तिची मागणी कधीच संपत नाही. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये (टिअर १, टिअर २ सिटीज्) जिथं लोकं शिकायला किंवा नोकरीसाठी गाव सोडून येतात, तिथं टिफिन सर्विसेसला खूप मोठी मागणी आहे. प्रत्येक मुलगा-मुलगी, नोकरदार किंवा स्टुडंट तुमच्यासाठी एक पोटेंशियल कस्टमर ठरू शकतो.
🏠 सुरुवात कशी करायची?
टिफिन सर्विस सुरू करायला तुम्हाला मोठा सेटअप लागत नाही. फक्त तुमच्याकडे बेसिक किचन असलं, काही भांडी असली आणि घरगुती, स्वच्छ आणि चविष्ट जेवण बनवायची आवड असली, तरी तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता. सुरुवातीला कमी लोकांना टिफिन पुरवलंत तरी चालेल आणि त्यांचाकडून तुम्ही ऍडव्हान्समध्ये पैसे घेऊ शकता.
सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या कामात तुम्ही तुमच्या आईची किंवा घरच्यांची मदत घेऊ शकता. वेगवेगळे पॅकेजेस तयार करून ग्राहकांना अनेक पर्याय देऊ शकता.
- उदा. फक्त एका वेळचं जेवण: महिन्याला ₹1500 ते ₹2000
- सकाळ + संध्याकाळ जेवण: महिन्याला ₹3000 च्या आसपास रेट ठेऊ शकता.
📢 मार्केटिंग कसं करायचं?
- तुमच्या घराजवळ पोस्टर्स लावा.
- WhatsApp ग्रुप्समध्ये मेनू शेअर करा.
- घराजवळील बॅचलर्स, स्टुडंट्स, नोकरदारांशी थेट बोला.
लक्षात ठेवा, सुरुवातीला तुम्ही लोकांना फ्री सॅम्पल देऊ शकता. त्यामुळे त्यांना तुमच्या जेवणाची चव आणि क्वालिटी दोन्ही चांगल्या प्रकारे समजेल.
⭐ तुमचं वेगळेपण कसे दाखवणार?
मोठ्या टिफिन सर्विसेसमध्ये बहुतेक वेळा क्वालिटी, हेल्थ आणि हायजिनकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण तुम्ही जर छोट्या लेव्हलवर सुरुवात केली, तर या तिन्ही गोष्टींवर खास लक्ष ठेवू शकता.ग्राहकांना सांगायला विसरू नका की 👇
- तुम्ही १००% घरगुती जेवण देत आहात.
- एक आठवड्यात एकही मेनू रिपीट होणार नाही.
- क्वालिटी आणि टेस्ट नेहमी चांगली राहील बदलणार नाही.
🚚 डिलिव्हरी कशी करायची?
सुरुवातीला तुम्ही स्वतः डिलिव्हरी करू शकता. नंतर ग्राहक वाढले की एक पार्ट टाइम डिलिव्हरी बॉय ठेवू शकता.
- WhatsApp ग्रुपमध्ये सकाळी मेसेज करा, “आज कोणाला टिफिन हवंय?”
- सकाळी ९ वाजेपर्यंत ऑर्डर्स घ्या.
- दुपारी १२ ते १ वाजता सर्वांना जेवण पोहोचवा.
📈 बिझनेस वाढवायचे मार्ग
- मेस मेंबरला स्पेशल संडे मील द्या.
- मिनी मील बॉक्सेस तयार करा.
- डायट टिफिन किंवा इव्हनिंग स्नॅक बॉक्स सुरू करा.
- एक कुक ठेवून वेगवेगळ्या भागात डिलिव्हरी झोन वाढवा.
या बिझनेसचा खरा गाभा म्हणजे रीपीट कस्टमर्स आहे. जर तुम्ही सातत्याने चांगलं आणि घरगुती जेवण दिलंत, त्यांचा फीडबॅक घेतलात आणि सुधारणा केलीत, तर हा बिझनेस अतिशय वेगाने वाढू शकतो.
🙌 शेवटचं सांगायचं झालं तर…
तर मित्रांनो, हे होते आपल्यासाठी पाच भन्नाट बिझनेस आयडियाज. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, कोणताही बिझनेस सोपा नसतो. मी तुम्हाला हे सगळं सोप्या भाषेत समजावलंय, त्यामुळे तुम्हाला ऐकायला हलकं वाटेल, पण प्रत्यक्षात कामाला लागलात की मेहनत, सातत्य आणि धीर लागणारच आहे.
हे बिझनेस आयडियाज जरी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू करता येत असले तरी मेहनतीला पर्याय नाही. सुरुवातीला नफा कमी असेल, ग्राहक कमी मिळतील, कधी नुकसान होईल तर निराशाही येईल. पण लक्षात ठेवा, बिझनेस हा शॉर्ट टर्म गेम नाही, हा लॉन्ग टर्म प्रोसेस आहे. जास्तीत जास्त संयम आणि जिद्द ही लागते.
जर तुम्हाला हा पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेयर करा. यातील अनेक आयडियाज तुम्ही तुमच्या आईसोबत किंवा घरच्यांसोबत मिळून सुरू करू शकता. म्हणूनच, ही पोस्ट तुमच्या घरच्यांना एकदा दाखवा आणि त्यांच्यासोबत नक्की डिस्कस करा की त्यांना हे आयडियाज कसे वाटतात. कदाचित उद्या तुमचं आणि त्यांचं एक छोटं स्वप्न मिळून एक मोठं यश बनू शकेल. 🚀