साखर कारखाना संपूर्ण माहिती | How to Start Sugar Factory Busines in Marathi

साखर कारखाना संपूर्ण माहिती: साखर उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. साखर कारखान्यामुळे प्रत्यक्ष लाखो कामगारांना रोजगार तर मिळतोच, शिवाय साखरेच्या व्यापारातून उपलब्ध होणारा रोजगार वेगळाच आहे.

वाढत्या साखर कारखानदारीमुळे शासनाला उत्पादन शुल्काचा महसूल मिळतो. हा उत्पादन शुल्काचा महसूल प्रत्यक्ष शासनाच्या तिजोरीत जातो.

वाढती लोकसंख्या, साखरेची परदेशी निर्यात व व्यापार यामुळे गेल्या 50 वर्षात साखरेचे उत्पादन व साखरेचा उपभोग दहा पटीने वाढला आहे. तसेच साखरेच्या शिल्लक साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

चला तर मग साखर कारखाना संपूर्ण माहिती व साखर कशी तयार होते ते जाणून घेऊया.

साखर कारखाना माहिती

Table of Contents

साखरेची मागणी

जगात भारत देशाची largest sugar producing आणि sugar consuming country अशी ओळख आहे. साखरेचा उपयोग विविध खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.

तसेच मिठाई, चहा, शीतपेये आणि फार्मासिटिकल्स यांच्या निर्मितीमध्ये साखरेचा वापर केला जातो. साखरेचा वापर पाहता साखरेला भरपूर मागणी आहे, हे आपल्या लक्षात आले असेलच.

साखर कारखान्यासाठी आवश्यक जमीन

साधारणपणे साखर कारखाना उभारण्यासाठी पाच ते दहा एकर जमिनीची उपलब्धता असावी. जितकी जास्त जमीन तितका या व्यवसायाचा विस्तार करता येऊ शकतो.

जास्त जमीन उपलब्ध असल्यामुळे कारखान्यांच्या विविध विभागाचे विस्तारीकरण करता येते. यामध्ये शिल्लक जमिनीवर मजुरांसाठी वसाहत बांधणे, खराब यंत्रसामग्रीचा मोकळ्या जागेत साठा करणे, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी व कामगारांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे याकामांसाठी वापर करता येतो.

विविध कार्यक्रम पार पाडण्यासाठी स्वतंत्र हॉलची बांधणी करणे, मजुरांच्या अधिकाऱ्यांच्या जेवणासाठी कॅन्टीन बांधणे, अशा अनेक कामांसाठी शिल्लक जमिनीचा वापर करता येतो.

ठिकाणाची निवड करणे

साखर कारखाना स्थापन करण्यापूर्वी लोकेशनची निवड करणे फार महत्त्वाचे आहे. कारण साखर कारखान्याच्या यशामध्ये लोकेशनचा महत्त्वाचा वाटा आहे.

साखर कारखाना अशा परिसरात उभारावा ज्या परिसरात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असेल. कारखान्याच्या अवतीभवतीचा परिसर हा जर ऊस उत्पादक परिसर असेल तर कारखान्याला वेळेवर कच्चा माल उपलब्ध होतो.

वाहतुकीवर होणारा खर्च कमी येतो. वेळेत कच्च्या मालाची आवश्यक प्रमाणात गरज पूर्ण झाल्यामुळे कारखान्याच्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवता येते.

Infrastructure इन्फ्रास्ट्रक्चर

इन्फ्रास्ट्रक्चर

इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फॅक्टरीसाठी इमारतीचे बांधकाम करावे लागेल, यामध्ये प्रोडक्शनसाठी लागणारी यंत्रसामग्री सेट करणे, प्रोडक्शन विभाग, इंजिनिअरिंग विभाग, लोडिंग अनलोडिंग विभाग यांची निर्मिती करणे,

तयार झालेली उत्पादने यांची साठवणूक करण्यासाठी स्टोरेज विभागाची निर्मिती करणे इत्यादी बांधकामा संबंधित कामे देखील करावी लागणार आहेत.

इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्हाला कामगारांच्या फॅसिलिटीसाठी रेस्ट रूम व कॅन्टीन यांचा देखील सेटअप लावावा लागेल. कारखान्यातील वेस्ट मटेरियलची विल्हेवाट लावण्यासाठी ड्रेनेज चॅनेलची निर्मिती करावी लागणार आहे.

कारखान्यातील प्रोडक्शन मधून बाहेर फेकला जाणारा वेस्टीज माल व खराब पाणी यांची योग्य गटार पाईपद्वारे विल्हेवाट लावावी लागणार आहे.

Raw material कच्च्या मालाची गरज

कच्च्या मालाची गरज

तुम्ही किती उत्पादित साखरक्षमतेचा प्लांट उभारणार आहात यावर कारखान्याला किती कच्च्या मालाची आवश्यकता आहे हे अवलंबून असते.

साखर कारखान्यासाठी ऊस पिक हा मुख्य कच्चामाल घटक आहे. साखर निर्मितीसाठी ताज्या आणि चांगल्या गुणवत्तेच्या उसाची आवश्यकता असते.

उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी दहा टन साखर निर्मिती कारखाना घेऊया. जर कारखान्याला 10 टन साखर निर्मिती करायची असेल तर जवळपास 100 ते 120 मॅट्रिक टन उसाची गरज पडते.

हे वाचा:
गुऱ्हाळ ऊद्योग माहिती मराठी

उपउत्पादने byproducts

साखर कारखान्यातून molasses, bagassePress mud इत्यादी उपवस्तूंची निर्मिती होते. याच उप वस्तूंचे पुढे बायो उत्पादने तयार करण्यासाठी वापर केला जातो.

बायो प्रोडक्ट molasses ची निर्मिती

साखर कारखान्यातील साखर उत्पादन प्रक्रियेतून molasses नावाचा बायो घटक तयार होतो. उसापासून molasses तयार होते व molasses पासून lactobacillus casei तयार होते व या lactobacillus casei पासून बायो इथेनॉल तयार केले जाते.

बगास bagasse

उसाचा रस काढून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या चोथ्याला bagasse असे म्हणतात. याचा वापर biomass briquettes तयार करण्यासाठी बायोडिझेल तयार करण्यासाठी, तसेच पेपर तयार करणारे कारखाने या bagasse चा वापर करतात.

त्यामुळे साखर कारखान्यातून फक्त साखर उत्पादित न होता इतर वेस्टेज पदार्थांपासून मानव उपयोगी घटकांची निर्मिती केली जाते. म्हणजेच कारखान्यातील वेस्टेज घटक विकून आर्थिक नफा मिळवता येतो.

मळी Press mud

प्रेसमड म्हणजे मळी होय, ज्यावेळी कारखान्यात साखरेची फिल्टरलायझेशन प्रक्रिया चालू होते त्यावेळी एक वेस्टेज पदार्थ बाहेर येतो त्याला मळी म्हणतात.

आता ही मळी शेतीसाठी खत म्हणून वापरली जाते. या मळीचा वापर शेत जमिनीत केल्यामुळे पिकांची वाढ व विकास चांगला होतो. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात मळीची खरेदी करतात.

खत तयार करणारे कारखाने मळी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात व त्यावर प्रक्रिया करून विक्री योग्य खत तयार करतात. या ठिकाणी molasses press mud यांच्या विक्रीतून अतिरिक्त पैसा मिळवता येतो.

साखर उद्योगासाठी आवश्यक परवाने

साखर उद्योग सुरू करताना तुम्हाला एक कंपनी रजिस्टर करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल.

फॅक्टरी रजिस्ट्रेशन करावे लागेल, जीएसटी रजिस्ट्रेशन करावे लागेल, तसेच फॅक्टरी लेआउटचा प्लॅन देखील मंजूर करून घ्यावा लागेल.

लेबर लॉच्या कायद्यानुसार कामगारांसाठी ESIC,  PF  सेवा प्रदान कराव्या लागतील. तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातकडून सिट सिट प्रमाणपत्र घ्यावे लागेल. लघु आणि मध्यम उद्योग या शासकीय विभागात कारखान्याची नोंद करावी लागेल.

साखर कशी तयार होते

साखर कशी तयार होते

साखर तयार होण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत, त्या पुढे दिल्या आहेत. साखर तयार होण्यासाठी ऊसाला कोणत्या प्रक्रियांमधून जावे लागते हे खालील मुद्यांवरून तुमच्या लक्षात येईलच.

ऊस तोडणी

सर्वात आधी ऊस शेतातून कारखान्यात आणला जातो. कारखान्यात आणल्यावर गेटवर ऊसाचे वजन केले जाते. ऊसाचे वजन केल्यानंतर तो अनलोड करण्यासाठी ऊसाची गाडी अनलोडर जवळ जाते.

क्रेनच्या मदतीने ऊस सरकत्या बेल्टवर ठेवला जातो. पुढे तो ऊस कटरमध्ये जाऊन त्याचे पाच पाच फुटाचे तुकडे केले जातात.

ऊस स्वच्छ करणे

यानंतर तुटलेले ऊसाचे तुकडे यंत्राच्या मदतीने गरम पाण्याने धुतले जातात. गरम पाण्याने ऊस धुतल्यामुळे त्यावर असलेले कीटक, घाण, माती निघून जाते.

रस काढणे व तपासणे

ऊस स्वच्छ धुवून झाल्यांनतर तो पुढे क्रशर मशीनमध्ये पाठवला जातो. क्रशर मशीनमध्ये ऊसाचा रस वेगळा केला जातो आणि भुसा एका बाजूला केला जातो.

नंतर काढून झालेला रस कारखान्यातील प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठवला जातो. रसामध्ये कोणतेही विषारी घटक आहेत का हे तपासले जाते.

रस उकळवणे व शुद्ध करणे

तपासणी करून झाल्यानंतर रस उकळवण्याकरिता पाठवला जातो. रसाला जवळ जवळ ७५ सेलसिअंस तापमानापर्यंत तापवले जाते. त्यांनतर रस शुद्ध करण्यासाठी त्यात चुना व सल्फर डायऑक्साइड मिसळले जाते.

रसातील पाणी काढणे व पाक तयार करणे

पुढे शुद्ध केलेला रस पाईपलाईनद्वारे एका कुकरसारख्या बाष्पीभवन मशीनमध्ये पुन्हा गरम करतात, या मशीनमुळे रसातील पाणी वाफेद्वारे बाहेर फेकले जाते व घट्ट पाक तयार होतो.

जोपर्यंत हा पाक साखरेयोग्य होत नाही तोपर्यंत त्याला गरम करतात. तयार झालेला पाक हा काळपट रंगाचा असतो त्यामुळे पाकातून साखर वेगळी करण्यासाठी हा पाक सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये घुसळला जातो व एका बाजूला साखर वेगळी होते व एका बाजूला मळकट घाण निघते ज्याला आपण मळी असे म्हणतो.

साखर तयार करणे

तयार झालेली साखर हि सुरुवातीला ओलसर असते त्यामुळे तिला गरम करून कोरडी केली जाते व बारीक मोठ्या चाळणीतून चाळूली जाते. तयार साखर गोणीत भरून विक्रीस पाठवली जाते.

साखर उद्योगातील प्रमुख प्रश्न

साखर उद्योगाच्या प्रगतीत खालील प्रमुख अडथळे येतात. कारखाना सुरु करण्यापूर्वी जर या बाबींचा विचार केला तर, नक्कीच साखर उद्योगात यश संपादन करता येईल.

कारखान्याची जागा चुकीची असणे

कारखाने बाजारपेठेपासून दूर असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो. कच्च्या मालाची वाहतूक खूप दूर अंतरावर होत असल्यामुळे मालाच्या खरेदीवर जास्त पैसे द्यावे लागतात.

वेळेवर ऊस पुरवठा न होणे

पाणी कमी असल्यामुळे, पाऊस अनिश्चित असल्यामुळे बऱ्याच भागात ऊस लागवड वेळेवर होत नाही. परिणामी कमी उत्पादन मिळते व साखर कारखान्यांना ऊस पुरवठा वेळेवर होत नाही.

स्वतःच्या मालकीची शेती नसणे

कारखान्यांची स्वतःच्या मालकीची शेती नसल्यामुळे ऊसाची कमतरता भरून काढता येत नाही. यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनांची वाट पहावी लागते.

ऊस वेळेवर न मिळाल्यामुळे पुरवठा खंडित होऊन याचा परिणाम साखरेच्या गुणवत्तेवर होतो.

साखरेचे वाढते दर

शेतकऱ्यांची आंदोलने, वाहतूक खर्च अशा अनेक कारणामुळे साखरेच्या किमतीत वाढ होते.

भारत देशात साखरेची किंमत वाढल्यामुळे तयार झालेली साखर परदेशात निर्यात करताना अडचणी निर्माण होतात.

ऊप वस्तूंचे उत्पादन न होणे

साखर उद्योगात bagasse व molasses  यांच्यापासून मोठ्या प्रमाणात अल्कोहोल, कागद व पुठ्ठा इत्यादी आवश्यक वस्तूंचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होत नाही ही एक मोठी समस्या मांडली जाते.

साखर कारखाना सुरू करण्यापूर्वी तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे, यामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये साखरेला मागणी किती आहे हे पाहणे.

ज्या परिसरात साखर कारखाना उभारणार आहात त्या भागात कच्च्या मालाची उपलब्ध होईल का, वाहतुकीसाठी रस्ते कसे आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे.

वीज पुरवठा व्यवस्था, पाणीपुरवठा व्यवस्था आणि मनुष्यबळाची उपलब्धता या घटकांचा देखील अभ्यास करावा लागणार आहे.

Conclusion (निष्कर्ष)

साखर कारखाना, साखर उद्योग सुरु करणे हे आता फक्त श्रीमंत घराण्यातील लोकांचा व्यवसाय राहिला नाही तर अगदी कोणताही सर्वसामान्य व्यक्ती हा साखर निर्मिती उद्योग सुरु करू शकतो.

त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात अनुदान व प्रशिक्षण देत आहे.

योग्य प्रशिक्षण व शासकीय अनुदानाविषयी माहिती असल्यास कोणताही व्यक्ती साखर निर्मिती उद्योग सुरु करू शकतो.

FAQ

महाराष्ट्रातील सर्वात मोठा साखर कारखाना

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना.

साखर कशापासून तयार होते?

साखर ऊसाच्या रसापासून तयार होते.

महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?

महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यात आहेत. 

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता होता?

प्रवरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड.

Leave a Comment