सध्या जास्त पैसा कोणत्या व्यवसायात आहे तर तो आहे लहान व्यवसायात. लहान व्यवसायाला जागा कमी लागते, पैसा कमी लागतो आणि माणसे देखील कमी लागतात म्हणजे फक्त एक माणूस असा व्यवसाय चालू ठेवण्यास पुरेसा असतो. म्हणजे लहान व्यवसायासाठी सर्व गोष्टी अनुकूल असतात.
आज आपण खाली काही अशाच लहान व्यवसायाबाबत माहिती घेणार आहोत जे तुम्हाला भरगोस यश मिळवून देतील.
1. फूड ट्रक सुरू करा

हा सध्याचा खूप ट्रेंडिंगला चालणारा व्यवसाय आहे. फूड ट्रक म्हणजे असे एक वाहन असते जे सुधारित करून त्यात खाण्याचे पदार्थ विकले जातात. हा फूड ट्रक कुठे ही हलवता येतो आणि संध्याकाळी परत घरी घेऊन जाता येतो.
फूड ट्रक तयार करण्यासाठी तुम्ही कोणतेही वाहन निवडू शकता, जास्तकरून छोटे टम टम म्हणजे थ्री व्हीलरचा वापर केला जातो,
जर तुमच्याकडे जुने टम टम किंवा छोटा पीकअप असेल तर तुम्ही त्याच्या पाठीमागच्या बाजूला किचनचा आकार देऊन, त्यात फास्ट फूड तयार करून रस्त्यावर विकू शकता.
2. सीझनमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ विकणे
तुम्ही पाहिले असेल प्रत्येक सीझनमध्ये काही पदार्थ आवडीने खाल्ले जातात, जसे उन्हाळ्यात लोणचे, आइसक्रीम, कलिंगड, फळे, ऊसाचा रस, फळांचा रस, नारळाचे पाणी इत्यादि. .
तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात विस्तवावर भाजलेली मक्याची कणसे, भाजलेले शेंगदाने, तळलेले भजी, फ्राय केलेले मंचुरियन, असे विविध पदार्थ वेगवेगळ्या ऋतूमध्ये खाल्ले जातात.
याठिकाणी तुम्ही देखील असे पदार्थ घरी तयार करून किंवा ग्राहकांसमोर तयार करून त्यांना विकू शकता. ही व्यवसायाची आयडिया एक सीजनेबला असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक ऋतुत चांगला पैसा मिळवता येईल.
असे वेगवेगळ्या ऋतूमध्ये आवडीने खाणार्या लोकांचे नेटवर्क खूप मोठे आहे त्यामुळे तुम्हाला या व्यवसायाची कुठेही जाहिरात करावी लागणार नाही. स्वता ग्राहक तुम्हाला शोधत येतील असे हे छोटे व्यवसाय आहेत.
3. सीझनमध्ये वापरल्या जाणार्या वस्तु विकणे
पावसाळ्यात छत्र्या, रेनकोट, शूज, बॅटरी, जास्त विकले जातात. उन्हाळ्यात टोपी, चश्मा, वजनाने कमी कपडे इत्यादि तर हिवाळ्यात स्वेटर, मोजे, जॅकेट, घोंगडी, जर्किंग असे अनेक आयटम विकले जातात.
लोक सुद्धा अशा वस्तु खरेदी करतात कारण लोकांना त्या गरजेच्या असतात. जर तुमच्या ही मनात असा एखादा व्यवसाय करायची इच्छा असेल ज्यात कमाई भरपूर व खूप थोडे भांडवल लावावे लागत असेल तर नक्कीच ही व्यवसाय कल्पना तुमच्यासाठी पैसे कमावण्याचा चांगला मार्ग होऊ शकतो.
4. बेकरीचे पदार्थ तयार करून विका

यामध्ये तुम्ही पाव, ब्रेड, केक, बटर आणि बिस्किट यांसारखे सकाळच्या नाश्त्यासाठी लागणारे पदार्थ घरी तयार करून बाजारात विकू शकता, अथवा स्वत:ची बेकरी सुरू करून देखील विकू शकता.
जर तुमची स्वत:ची बेकरी नसेल तर तुम्ही तुमच्या ओळखीच्या बेकरीवाल्याकडे तुमचे बनवलले पदार्थ विक्रीसाठी ठेऊ शकता. बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व साहित्य तुम्हाला तुमच्या आसपासच्या शहरातून घ्यावे लागेल.
5. जुन्या दुचाकी गाड्या खरेदी विक्रीचा धंदा करणे
आजकाल लोकांना नवीन दुचाकी घ्यायचे झाले तर ती लाखाच्या पुढे जाते. नवीन दुचाकी वर खूप मोठा टॅक्स द्यावा लागतो तसेच दुचाकीचा विमा सुद्धा उतरवावा लागतो,
त्यामुळे लोक सध्या नवीन दुचाकी न विकत घेता जुन्या दुचाकी गाड्या विकत घेणे जास्त पसंत करू लागले आहेत.
जुन्या दुचाकी गाड्या खरेदी विक्रीचे मार्केट सुद्धा अलीकडे खूप वाढले आहे. हा व्यवसाय अगदी बिन भांडवली आहे आणि यात मिळणारे कमिशन सुद्धा भरपूर आहे. यात तुम्ही एका दुचाकी खरेदी विक्री मागे एका मजुराचा दहा दिवसांचा पगार मिळवू शकता.
म्हणजे तुम्ही महिन्यातून फक्त तीन दुचाकींचा जरी व्यवहार केला तर तुम्ही नुसते बाहेर फिरून कंपनीत मिळणारा महिन्याचा पगार कमवू शकता.
यात तुम्हाला फक्त तुमच्या ज्या लोकांच्या जुन्या गाड्या विकायच्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्या गाड्या त्यांना विकण्यासाठी मदत करू शकता.
तुम्हाला फक्त ग्राहक शोधायचे आहेत. जर एखादया व्यक्तीची दुचाकी जर 30 हजार रुपयाला विकायची असेल तर तुम्ही तिची किमंत वाढवून पुढे 35 हजार रुपयेला विकू शकता म्हणजे याठिकाणी तुमचे कमिशन 5 हजार रुपये तयार होते.
6. स्वत:चे बर्थडे कॅफे सुरू करा

तुम्ही मार्केट मध्ये कॅफे पाहिले असेल ज्यात कोल्ड कॉफी, केक, आइसक्रीम खायला मिळते. तसेच वाढदिवस साजरी करण्यासाठी हॉल सुद्धा बूक करता येतो. हॉलमध्ये वाढदिवस डेकोरेशन सुद्धा करून मिळते.
यासाठी थोडे भांडवल नक्की लागते, जर तुमचा स्वत:चा फ्लॅट किंवा हॉल असले तर मग जागेची काही अडचण नाही पण ज्यांच्याकडे नाही ते लोक भाड्याने हॉल घेऊन सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता.
कॅफेमध्ये तुम्ही इतर तुमच्या व्यवसायाशी संबधित साहित्य विक्रीसाठी ठेऊ शकता, जसे वाढदिवस डेकोरेशनचे साहित्य, बलुन्स, वाढदिवस फोटोग्राफी सेवा आणि रेडिमेड केक इत्यादि.
7. सुकट बोंबिल विकणे
आपल्या सोसायटीत सुकट बोंबिल खाणार्या लोकांची संख्या खूप अधिक आहे. तुम्ही जर थोडे लक्ष दिले तर तुम्हाला शेजारच्या घरातून सुकुट बोंबिल भाजलेला वास येईल, इतके लोक सुकट बोंबिलची भाजी आवडीने खातात. आठवडी बाजारात तर सुकट बोंबिल खूप लोक विकत घेतात.
मोठ मोठ्या शहरांमध्ये तर सुकट बोंबिल विकणारे अनेक छोटे मोठे स्टॉल तुम्हाला पाहायला मिळतील. हल्ली ग्रामीण भागात देखील सुकट, खारे मासे, बोंबिल खूप खरेदी केले जातात.
बाजारात तर सुकट बोंबिल विक्रेत्यांची वेगळी पंगत पाहायला मिळते. या धंध्यासाठी खूप कमी भांडवल लागते, तसेच जागा देखील खूप कमी लागते.
तुम्ही कुठे ही रस्त्याच्या बाजूला संध्याकाळाच्या वेळी सुकट बोंबिल विकायला बसू शकता. या व्यवसायातून एक चांगला रोजगार प्राप्त होऊ शकतो.
8. घरात लागणार्या उपयोगी वस्तु विकणे
लाकडी गाड्यावर चिमटे, पळपट, बेलणे, कंगवा, सांडशी, चमचे, टोपले, सुपली, झाडू, गॅस पेटवायचा लायटर, हुक इत्यादि किचनमध्ये लागणार्या किंवा दैनंदिन जीवनात उपयोगी पडणार्या वस्तु, जसे पाकीट, पर्स, पाणी बॉटल अशा अनेक वस्तु तुम्ही लाकडी गाड्यावर सुशोभित करून विकू शकता.
यात तुम्हाला प्रत्येक वस्तु मागे ठराविक मार्जिन मिळेल.
9. मोबाइलची गोरीला ग्लास विकणे
मोबाईल जुना असो अथवा नवीन प्रत्येकजण आपल्या मोबाइलला ग्लास बसवून घेतो. मोबाइल जरी पडला तरी त्याचा डिस्प्ले जाऊ नये किंवा डिसप्लेवर कोणत्याही प्रकारची स्क्रॅच येऊ नये याकरिता मोबाइलच्या डिस्प्ले वर गोरीला ग्लास बसवून घेतली जाते.
गोरीला ग्लास 40 ते 50 रुपयाला विकली जाते. गोरीला ग्लास होलसेल दरात 20 ते 30 रुपयाला मिळते, तुम्ही ती पुढे 40 किंवा 50 रुपयाला विकू शकता. म्हणजे एका ग्लास बसवण्या मागे तुमचे 10 ते 20 रुपये बनतील.
तुम्ही दिवसाला 30 ग्लास जरी बसवल्या तरी तुमचे दिवसाचे 600 रुपये कुठे गेले नाहीत, म्हणजे महिन्याची तुमची कमाई 18 हजार रुपये होते, इतका नफा या धंद्यात आहे.
यासाठी काही नाही फक्त एक टू व्हीलर आणि गोरीला ग्लास ठेवण्यासाठी एक प्लास्टिकचा बॉक्स हवा आहे. तुम्ही कुठे ही गर्दीच्या ठिकाणी टू व्हीलर मधल्या स्टँडवर उभा करून हा धंदा सुरू करू शकता.
Conclusion (निष्कर्ष)
लहान व्यवसायांचे स्वरूप जरी लहान असले तरी या व्यवसायांमध्ये असणारी क्षमता मोठ्या व्यवसायांच्या तुलनेत अधिक आहे.
लहान व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे कमी असते तसेच जागा देखील लहान व्यवसायांसाठी कमी लागते. त्यामुळे हे व्यवसाय अल्प काळात चांगले यश देतात.