रेशीम उद्योगांत चीन नंतर भारत देशाचा क्रमांक लागतो. या व्यवसायातून रोजगार व चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत आहेत.
या उद्योगाचा विकास व्हावा, वाढ व्हावी या हेतूने भारत सरकार देखील अशा उद्योगांना अनुदान व सर्वोत्परी मदत करत आहे.
अल्पभूधारक शेतकरी देखील या व्यवसायात सकारात्मकता दाखवत आहेत. सध्या महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा रेशीम उद्योगाचा केंद्रबिंदू बनू पाहत आहे.
रेशीम उद्योगात दोन महत्वाचे घटक आहेत. पहिला घटक तुती पाला आणि दुसरा घटक रेशीम अळी होय. रेशीम उद्योगात तुती पाला दर्जेदार असावा.
हा तुती पाला शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने वाढवावा. त्यासाठी जमिनीची चांगली मशागत करावी, खत पाणी वेळेवर आवश्यक प्रमाणात द्यावे. रेशीम उद्योगात तुती पाल्याबरोबर रेशीम अळी सदृढ व निरोगी असावी.
तुती लागवड कधी करतात
साधारणपणे जून ते जुलै मध्ये तुती लागवड केली जाते.
रेशीम उद्योगासाठी लोकप्रिय वाण
- कनास
- व्ही १
- व्ही २४
- एस १६३५
- एस ३६
रेशीम उद्योगासाठी हे वाण फार प्रसिद्ध आहेत. व्ही १ हे वाण महाराष्ट्रातील वातावरणामध्ये लागवडी करिता उपयोगी मानले जाते.
तुतीचे रोप कुठे मिळेल
तुती रोपांसाठी जे अगोदरच रेशीम शेती करत आहेत त्यांच्याकडून तुम्ही लागवडीकरिता तुती कांड्या आणू शकता किंवा तुती लागवड करणाऱ्या कोणत्याही आग्रो फार्ममध्ये तुम्हाला तुती कांडी मिळेल.
तुती लागवडीकरिता किती जमीन क्षेत्र असायला हवे
कमीत कमी एक ते दीड एकर जमीन क्षेत्र असले तरी तुम्ही तुती लागवड करू शकता. या जमीन क्षेत्रातून मिळणारा तुती पाला 200 अंडी पुंजसाठी पुरेसा आहे. तुमच्याकडे एक ते दीड एकर क्षेत्र असेल तर तुम्ही रेशीम उद्योग अगदी सहज सुरु करू शकता.
तुतीच्या रोपांची लागवड केल्यानंतर तीन ते साडेतीन महिन्यात अळ्यांना खाण्या योग्य पाला तयार होतो.
तुती लागवडीवेळी दोन रोपांमध्ये जवळपास दीड ते दोन फुट अंतर असायला हवे. कारण रोपे मोठी झाल्यानंतर ती एकमेकांना खेटनार नाहीत, तसेच दोन्ही रोपांना वाढीस आवश्यक पुरेसे अंतर मिळेल.
तुतीच्या रोपांची लागवड केल्यानंतर सुरुवातीला रोपांची पाने वाळतात व नंतर नवीन पाने तयार होण्यास सुरुवात होते.
रेशीम उद्योगासाठी लागणारे अंडीपुंज कुठे मिळेल
तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याच्या जिल्हा रेशीम कार्यालयातून खरेदी करता येतील किंवा जवळपास असलेल्या कोणत्याही चॉकी सेंटरमध्ये विकत मिळतील.
रेशीम उद्योग शेड रचना
शेडची रुंदी कमीत कमी २५ फीट व लांबी ५० फीट आवश्यक आहे.
शेड उभे झाल्यांनतर शेडच्या भोवती ग्रीन नेट मारावी. ही ग्रीन नेट शेडमधील तापमान व आद्रता मेंटेन ठेवण्याचे काम करते. ग्रीन नेटमुळे सूर्याची उष्णता व हानिकारक सूर्यप्रकाश आतमध्ये प्रवेश करत नाही.
शेडमधील rack, जर तुमचे शेड 60 फुटाचे असेल तर rack ४० फुट लांब व 5 फुट रुंद असावे. शेडमधील दोन्ही rack मधील अंतर एका व्यक्तीला सहज फिरून पाला टाकता येईल इतेक अंतर rack च्या दोन्ही बाजूंनी असावे.
शेडचे छप्पर तयार करताना वरचा पत्रा सिमेंटचा वापरावा लोखंडी वापरू नये. सिमेंटचा पत्रा उन्हाळ्यात थंड राहतो तर लोखंडी जास्त उष्णता फेकतो. शेडमध्ये अळ्यांना वातावरण चांगले मिळावे याकरता शेडच्या आजूबाजूला झाडे लावावीत.
शेडमधील rack चे कप्पे कमीत कमी 4 ते 5 बनवावेत यामुळे कमी उंचीच्या लोकांना देखील अळ्यांना पाला टाकण्यास अडचण येणार नाही व शेडमध्ये हवा खेळती राहील.
शेड बांधणीसाठी खर्च किती येतो
या ठिकाणी उदाहरण म्हणून आपण 26/50 चे शेड घेऊया. या शेडसाठी लागणारे लोखंडी अँगल, पाईप, सिमेंट व कारागिराची मजुरी पकडून जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च येतो.
एक एकर तुती शेतीसाठी किती रोपे लावावीत
एक एकर क्षेत्रामध्ये तुती लागवडीकरिता जवळपास ५ हजार रोपे लागणार आहेत.
तुती रोपांची वाढ जवळपास 5 ते ६ फुट झाल्यानंतर batch घेतली जाते. तुती रोपांची लागवड केल्यानंतर रोपे अळ्यांना खाण्यायोग्य होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणजे तुती लागवडी नंतरची batch तीन महिन्यानंतर घेता येते व त्यानंतरच्या batches महिन्याला एक batch घेता येते. एक एकर तुती लागवड क्षेत्रात वर्षात जवळपास 5 बॅच निघतात.
100 अंडी पुंजला किती उत्पन्न मिळते
चांगले नियोजन केल्यास शंभर अंडी पुंजमागे 75 ते 80 किलो कोश निघतो. जर तुमचा कोश चांगला असेल तर 600 रुपये किलो दर मिळतो. या ठिकाणी गणित केल्यास 75 किलो कोशाचे 45 हजार रुपये उत्पन्न मिळते.
200 अंडी पुंज क्षमतेच्या शेड मधून किती कोश मिळतात
शेडमध्ये 200 अंडी पुंज असतील तर 130 ते 150 किलो पर्यंत किंवा जास्तीत जास्त 160 ते 170 किलो पर्यंत कोष निघतात. हॅचिंग झाल्यानंतर कोश तयार होण्यास जवळपास 32 दिवस लागतात. म्हणजे एक महिना लागतो.
मिळणारे उत्पन्न
एक एकर क्षेत्रामधून वर्षाला खर्च जाऊन ५० ते 60 हजार निवळ नफा मिळतो. एकदा लागवड केल्यानंतर दहा ते पंधरा वर्षापर्यत रेशीम शेती करू शकतो व लाखो रुपये उत्पन्न मिळवू शकतो.
रेशीम उद्योगातील धोके
काही वेळा अळ्या कोश तयार करण्याच्या अवस्थेत जात नाहीत त्यामुळे रेशीम व्यवसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागते. अशावेळी जिवंत अळ्या शेतकऱ्यांवर फेकून देण्याची वेळ येते.
अळ्यांना शेडमधील वातावरण मेंटेन न झाल्यामुळे किंवा पुरेसा पाला न मिळाल्यामुळे कोश पोचट बनू शकतात.
उष्णता वाढल्यास अळ्या पाला कमी खातात व याचा परिणाम कोष कमी लेअरचे तयार होतात. यासाठी उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी.
रेशीम उद्योगातील महत्वाच्या बाबी
चॉकी शेडवर येण्याअगोदर शेड पूर्णपणे disinfectant केलेले असावे. शेडमधल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. जेणेकरून उघड्यावर पडलेल्या कचऱ्यावर microorganism, virus डेव्हलप होणार नाही व अळी आल्यावर ते अळीवर आक्रमण करणार नाहीत.
Conclusion (निष्कर्ष)
रेशीम उद्योग सुरु करण्यापूर्वी या व्यवसायातील बारकावे अभ्यासल्यास निश्चितच हा व्यवसाय शेतकऱ्यांना वरदान ठरू शकतो.
अनेक शेतकरी रेशीम उद्योग करून सधन झाल्याचे पाहायला मिळते. फक्त एकदाच शेडवर गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर येणारा खर्च फक्त अळ्या व तुती लागवडीवर करावा लागणार आहे आणि हा खर्च कमी असणार आहे.
शासनाकडे प्रकरण केल्यास तुम्हाला तुमची गुंतवणूक सुद्धा परत मिळणार आहे. त्यामुळे रेशीम उद्योग नक्कीच अर्थाजन करण्याच्या उद्देशाने फायद्याचा ठरणार आहे.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.