असे 11 गुण यशस्वी उद्योजक बनू पाहणाऱ्या प्रत्येक उद्योजकाकडे असावेत

यशस्वी उद्योजक होणे हे प्रत्येक व्यावसायिकांचे स्वप्न असते. उद्योगात यशस्वी होण्याकरिता अंगी काही गुण असणे आवश्यक असतात.

हे अंगी असलेले गुणच व्यवसायात येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, व्यवसायात येणारे अडथळे दूर करण्यासाठी ताकत देतात. काही गुण हे जन्मत:च असतात तर काही गुण आपणास मिळवावे लागतात.

यशस्वी उद्योजक होण्याकरिता अंगी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे हे आपण जाणून घेऊया.

1. निर्णय क्षमता Decision making ability

यशस्वी उद्योजक जर बनायचं असेल तर निर्णय क्षमता असणे गरजेचे आहे. व्यावसायिकाकडे हा गुण असणे गरजेचे आहे. जर हा गुण जवळ नसेल तर व्यवसायात यश मिळवणे फार कठीण जाऊ शकते. व्यावसायिकाला योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे.

एक चुकीचा घेतलेला निर्णय व्यवसायाचे फार मोठे नुकसान करू शकतो. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता विकसित केल्यास उद्योगाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही.

2. नेतृत्वगुण leadership qualities

पाण्यात नौका चालवणारा नावाडीच नौका कोणत्या दिशेला घेऊन जायची हे ठरवत असतो. त्याप्रमाणे व्यवसायात व्यवसाय हाकणारा लीडरच असतो.

कोणत्याही उद्योगात यशस्वी होण्यासाठी नेतृत्व गुण असायला हवा. नेतृत्व गुण तुमच्यात धाडस निर्माण करत असतो.

व्यवसायात चांगल्या योजना, कल्पना, घेतलेले निर्णय यांची अंमलबजावणी करता आली पाहिजे. टीमला मार्गदर्शन करता आले पाहिजे. हे केवळ नेतृत्वगुण अंगी असल्यामुळेच शक्य होते.

3. सकारात्मक राहणे Stay positive

सकारात्मकता व्यावसायिकाला यशाच्या दिशेने घेऊन जाते. व्यवसायात व्यावसायिकाकडे जर सकारात्मकता असेल तर सर्व गोष्टी सकारात्मक घडत जातात.

प्रत्येक ठिकाणी सकारात्मकता असायला हवी यातूनच आपल्या कर्मचारी लोकांना प्रोत्साहन मिळते. या सकारात्मकतेमुळेच अनेक व्यवसाय यशस्वी होत आहेत.

4. आत्मविश्वास असावा Be confident

व्यावसायिकाचा स्वत:च्या व्यवसायावर व स्वत:च्या व्यवसाय कल्पनेवर विश्वास असावा. जर स्वत:चाच विश्वास नसेल तर ग्राहक, मार्केट तुम्ही तयार केलेल्या वस्तूंवर व तुमच्यावर विश्वास ठेवायला सहसा तयार होणार नाही. त्यामुळे व्यवसाय सुरु करण्यापुर्वी व व्यवसाय सुरु केल्यानंतर आपल्या उद्योगावर विश्वास ठेवावा.

5. आर्थिक जागरूकता असायला हवी  financial awareness

व्यवसाय सुरु करण्यापूर्वी किंवा व्यवसाय सुरु झाल्यांनतर आपल्याकडे किती भांडवल, खेळते भांडवल किती आहे, याची जाणीव असावी.

म्हणजे कोणत्या ठिकाणी किती पैसे खर्च करावे याचे गणित समजते. पैशाची जाण असल्यामुळे व्यर्थ पैसा खर्च होत नाही. योग्य त्या ठिकाणीच पैसा लावला जातो.

6. प्रभावी संभाषण कौशल्य Effective communication skills

व्यवसायात उत्तम प्रभावी संभाषण कौशल्याला फार महत्व आहे. व्यावसायीक नवीन नाती जोडणे, ग्राहक जोडणे, व्यवसायात पार्टनरशिपसाठी बोलणी करणे अशा अनेक कामात संभाषण कौशल्य फार महत्वाची भूमिका बजावते.

7. जोखीम घेण्याची क्षमता Ability to take risks

काही वेळा व्यवसायात जोखीम घेणे खूप चांगला परतावा देते. कधी कधी व्यवसायात जोखीम घेऊन पैसे गुंतवावे लागतात.

व्यवसायासाठी जमीन खरेदी करणे, विक्री बद्दल शंका असताना देखील मोठ्या प्रमाणात माल खरेदी करणे, अशा अनेक जोखीम व्यवसायात घ्याव्या लागतात. त्यासाठी व्यवसायिकाच्या अंगी जोखीम घेण्याची क्षमता असावी.

8. नवीन शिकण्याची ओढ

जुने परंपरागत ज्ञान व कौशल्य व्यावसायिकाला काळाच्या ओघात बुडवून टाकते. त्यामुळे व्यावसायिकाने बदलत्या काळानुसार आपले कौशल्य सुधारावे.

नवीन ज्ञान आत्मसात करावे. त्यासाठी नवीन शिकण्याची सतत ओढ असायला हवी. मोठ मोठ्या वक्त्याचे सेमिनार अटेंड करावेत. व्यावसायिक पुस्तके वाचावीत. असे अनेक मार्ग आहेत ज्या मधून नवीन काहीतरी शिकायला मिळू शकते.

9. कष्ट घेण्याची तयारी hardworking

व्यवसाय म्हटल की बौद्धिक त्रास आलाच, शारीरिक कसरत आलीच. काही कार्यालयीन कामामुळे बराच वेळ लॅपटॉप समोर बसावे लागते.

व्यवसायाचे मार्केटिंग व इतर कामासाठी बाहेर पडावे लागते. अशावेळी स्वत: मेहनत घेण्याची तयारी असावी लागते.

10. लवचिकपणा असावा

व्यवसायात येणाऱ्या चढ उतारांना न घाबरता सामोरे जाण्याची तयार असावी. व्यवसायात कधी यश तर कधी अपयश येत असते. अशावेळी प्रेरणा न गमावता पुन्हा त्याच जोमाने उभा राहण्याची तयारी ठेवावी. हार न पत्करता चुका सुधारून पुन्हा लढावे.

11. दूरदृष्टी foresight

काय केल्यानंतर पुढे काय होऊ शकते. याचे आकलन करता यावे. पुढे भेडसावणाऱ्या समस्येवर अगोदरच तोडगा काढून ठेवावा.

काही व्यवसाय सिजनेबल असतात त्यामुळे ऑफ सीजनमध्ये व्यवसाय कसा तग धरेल यासाठी अगोदरच व्यवस्था करावी. महागाई, किमती वाढ व कर वाढ यांपासून वाचण्यासाठी योजना तयार ठेवाव्यात. नवीन पर्याय शोधावेत.

Conclusion (निष्कर्ष)

एक यशस्वी उद्योजक बनण्याकरिता नेतृत्वगुण, निर्णय क्षमता, टीम तयार करणे, सकारात्मक राहणे, लवचिकपणा, प्रभावी संभाषण कौशल्य असे अनेक गुण असावे लागतात.

या सर्व गुणांमुळेच व्यावसायिकाचे व्यक्तिमत्व प्रभावी बनते व व्यवसाय पुढे नेण्याची सर्व क्षमता त्याच्या अंगी तयार होते.

हे असे गुण आहेत जे व्यावसायिकाला व्यवसायात येणारे अडथळे दूर करण्यासाठी, नवीन आव्हाने स्वीकारण्याची ताकत देतात.  

Spread the love

Leave a Comment