निव्वळ नफा देणारे 6 पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय, जॉबची गरज पडणार नाही

देशात महिला उद्योजकांची संख्या 20.4 टक्के आहे तर 79 टक्के पुरुष उद्योजकांची संख्या आहे. याठिकाणी व्यवसायात पुरुष महिलांच्या तुलनेत संख्येने सर्वात जास्त असल्याचे दिसून येते, यामध्ये सर्व प्रकारच्या व्यवसायांचा समावेश होतो. परंतु प्रश्न जेव्हा घरगुती व्यवसायांचा येतो तेव्हा मात्र महिलाच जास्त प्रमाणात घरगुती व्यवसाय करत असल्याचे दिसून येते.

केवळ महिलाच घरगुती व्यवसाय करण्यास उत्सुक असतात असे नाही तर आपल्या देशात असे अनेक पुरुष आहेत जे घरगुती व्यवसायातून आर्थिक प्रगती करत आहेत.

याठिकाणी आम्ही अशा काही पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत ज्याच्यावर काम करून कोणताही सुशिक्षित, अशिक्षित तरुण स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो, स्वत:चा एक startup सुरू करू शकतो.

१. online teaching work

ही एक सर्वात सामान्य व्यवसाय कल्पना आहे, पण यात खूप मोठे पोटेंशल आहे. आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात स्मार्टफोन आल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ लागला आहे.

आज मार्केटमध्ये vedatana, byjuss सारखे अनेक ऑनलाइन टिचिंग फ्लॅटफॉर्म आहेत जे अशा शिक्षकांच्या शोधात असतात जे त्यांच्या फ्लॅटफॉर्म वर विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यासाठी उत्सुक असतील.

याठिकाणी तुम्हाला स्वत:ला विद्यार्थी शोधावे लागणार नाहीत, कारण अशा कंपनीकडे अगोदरच खूप मोठा विद्यार्थी बेस असतो. तुम्हाला फक्त त्यांच्या प्लॅटफॉर्मवर साइनअप करून टिचिंग सुरू करायचे आहे. जर तुमचे एखादया विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तुमची त्या विषयावर चांगली पकड असेल तर तुम्ही त्या विषयाची निवड करू शकता.

२. पेपर प्लेट मेकिंग बिजनेस

हॉटेलमध्ये, लग्नामध्ये किंवा बर्थडे पार्टीमध्ये तसेच बेकरी मध्ये, मंदिरात प्रसाद वाटताना तुम्ही पेपर प्लेट नक्की पाहिल्या असतील. पेपर प्लेटला बाजारात खूप मोठी मागणी आहे. पेपर प्लेट हे एक use and thro प्रॉडक्ट आहे. ते धुवावे लागत नाही, त्याचा वापर झाला के ते डस्टबिन मध्ये टाकून द्यावे लागते.

पेपर प्लेट वापरायला खूप सोपे आणि सहज उपलब्ध होत असल्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायिकांचा बराच वेळ वाचतो त्यामुळे बर्‍याच ठिकाणी पेपर प्लेटचा वापर केला जातो. पेपर प्लेट मेकिंग बिजनेस तुम्ही तुमच्या घरातून सुरू करू शकता, त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर दुकान लावण्याची गरज पडणार नाही.

जर तुमच्या घरात मोकळी जागा किंवा वेगळी खोली असेल तर त्याठिकाणी पेपर बनवणारी मशीन बसवू शकता. या बिजनेससाठी तुम्हाला फक्त १ लाख रुपये भांडवल लागणार आहे. तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्केटमध्ये पेपर प्लेट बनवणारी मशीन सहज मिळेल.

मशीन मधून तयार केलेल्या पेपर प्लेट्ची तुम्हाला छोट्या मोठ्या दुकानदारांना व्होलसेल दरात विक्री करता येते. तुम्ही स्वत: त्याची जाहिरात करू शकता. जस जसे लोकांना तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती पडेल तसे लोक त्यांच्या गरजेनुसार तुमच्या घरी येऊन पेपर पेल्ट्स विकत घेऊन जातील.

३. फोटोग्राफी बिजनेस

फोटोग्राफीमध्ये तुमची आवड असेल, तुमच्याकडे फोटो काढण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही या व्यवसायातून घरबसल्या चांगली कमाई करू शकता. या बिजनेससाठी तुमच्याकडे चांगल्या कॅमेरा क्वालिटीचा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे किंवा तुम्ही एक चांगला ब्रॅंड कॅमेरा सुद्धा खरेदी करू शकता.

या बिजनेसमध्ये तुम्हाला निसर्गातील पक्षांची, बागेतील रोपट्यांची, फुलांची, फळांची किंवा निसर्गातील सौंदर्याचे फोटो काढायचे आहेत. तुम्ही टिपलेले सर्व फोटो तुम्हाला shutter stock, Getty Images, iStock Photo आणि Dreamstime सारख्या ऑनलाइन साइटवर विकता येतील. 

४. Online Trading करा

हा एक पुरुषांसाठी घरगुती कमाई करण्याचा उत्तम मार्ग आहे. तुम्ही Angel Broking, Upstox, Zerodha, आणि 5Paisa सारख्या प्लॅटफॉर्मवर स्वत:चे demat अकाऊंट उघडून इंडियन स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकची खरेदी करणे स्टॉक्सची विक्री करणे इत्यादि कामे करू शकता.

शेअर्सच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला चांगले प्रॉफिट मिळेल. मिळालेल्या प्रॉफिटमधून तुम्ही स्टॉक्समध्ये अधिक गुंतवणूक करू शकता आणि जास्तीत जास्त नफा मिळवू शकता.

५. ऑनलाइन लोगो, बॅनर तयार करणे

जर तुमच्याकडे चांगला स्मार्टफोन किंवा लॅपटॉप असेल तर तुम्ही घरबसल्या ग्राफिक डिझायनिंगचे काम करू शकता. तुम्ही ग्राहकांच्या वेबसाइटसाठी, दुकानासाठी ऑनलाइन स्टोअरसाठी लोगो, बॅनर बनवायचे काम करू शकता.

यामध्ये birthday चे बॅनर तयार करणे, invitation चे बॅनर तयार करणे, लग्नपत्रिका तयार करणे, लग्न बायोडाटा तयार करणे अशी अनेक कामे करता येतात. लोकांना तुम्ही तुमच्या सर्विसेस बद्दल व्हाटसप्प ग्रुप/इनस्टा पेजवर माहिती देऊ शकता आणि जास्तीत जास्त लोकांच्या orders घेऊ शकता.

लोगो व बॅनर कसा बनवायचा याचे अनेक विडियो यूट्यूबवर अपलोड झालेले आहेत. यातून तुम्हाला लोगो, बायोडाटा व बॅनर कसा बनवायचा याचे प्रशिक्षण घेता येईल.

६. fitness training द्या

फिटनेस ट्रेनिंग म्हणजे लोकांना वजन कसे कमी करायचे, वजन कसे वाढवायचे, फिट कसे राहायचे याचे प्रशिक्षण देणे होय. हे ट्रेनिंग द्यायला तुमचा योगा, फिटनेस, न्यूट्रिशन क्षेत्रातील कोर्स झालेला असावा.

मग तो Sports Nutrition, Yoga Instructor, किंवा Personal Trainer Certification चा कोर्स असेल तरी तो चालू शकतो. तुमच्याकडे जुडो कराटेचे कौशल्य असेल तर तुम्हाला कराटेचे वर्ग देखील भरवता येतील. हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी दहा ते वीस प्रशिक्षणार्थी बसतील इतकी मोकळी जागा असावी.

या बिजनेसमध्ये मासिक किंवा वार्षिक मेंबरशिप ऑफर करून प्रशिक्षणार्थीकडून चांगली रक्कम मिळवता येते. मिळालेल्या फी मधून तुम्हाला तुमचा उदरनिर्वाह करता येईल, तुमच्या बिजनेसचे नियोजन करता येईल.

Leave a Comment