
कामकाजात अडकलेले मालक Owners stuck in operations
मान्य आहे कि तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे न्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागणार आहे. परंतु तुमच्या व्यवसायातील सर्वच कामे जर तुम्ही एकटे करत असाल तर तुमचा व्यवसाय कधीच ग्रो होणार नाही.
कारण तुमचा महत्त्वाचा वेळ जर व्यवसायातील सर्व कामे पार पाडण्यात जात असेल तर तुमच्या मेंदूची क्षमता, तुमची शारीरिक ऊर्जा याच कामात संपून जाईल.
आणि तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी करावे लागणारे मार्केटिंग, लोकांच्या भेटी घेणे, मार्केट रिसर्च करणे, व्यवसाय वाढीसाठी नवीन योजना आखणे यासाठी वेळच मिळणार नाही. याचा परिणाम तुमचा व्यवसाय आहे त्याच ठिकाणी राहतो.
त्यासाठी लक्षात ठेवा तुम्ही कामगार नाही तर बिझनेसमॅन आहात, त्यामुळे सर्वच कामे एकट्याने करू नका. आवश्यक त्या ठिकाणी मजूर लावावेत. फक्त महत्त्वाची कामे स्वतः करा.
ब्रँड तयार न करणे Not building a brand
काही व्यवसायिकांना वाटते कि माझा व्यवसाय मोठा झाल्यानंतर मी तो ब्रँड बनवेन, परंतु हे चुकीचे आहे. तुम्हाला सुरुवातीपासूनच तुमच्या व्यवसायाचा लोकांमध्ये awareness तयार करावा लागणार आहे.
जोपर्यंत तुमचा व्यवसाय एक बँड बनत नाही तोपर्यंत लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढणार नाही. मार्केटमध्ये ग्राहकांचा ब्रँडेड वस्तू घेण्याकडे मोठा कल असतो.
मग त्यासाठी ते हवी ती किंमत द्यायला तयार होतात. सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमे असतील यांच्या मदतीने तुमच्या व्यवसायाची जाहिरात करायला चालू करा.
लोकांमध्ये जाऊन आमची उत्पादने कशी गुणवत्तापूर्ण व स्वस्त आहेत हे लोकांना समजावून सांगा. लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमचा ब्रँड तयार करणार नाही तोपर्यंत लोक तुमच्याकडे येणार नाहीत.
ग्राहकांच्या समस्या समजून न घेणे Not understanding customers’ problems

आवड आहे passion आहे म्हणून व्यवसाय चालवत असाल तर या ठिकाणी तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. कारण व्यवसाय इमोशन्सद्वारे चालत नाही.
तर व्यवसाय चालवण्यासाठी पैसा लागतो, आणि हा पैसा तुमच्याकडे केव्हा येणार आहे जेव्हा ग्राहक तुमच्या वस्तू खरेदी करतील. ग्राहक त्याच वस्तू खरेदी करतात ज्यांना त्या वस्तूंची गरज आहे.
ज्यांना त्यांच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन हवे आहे. त्यासाठी ग्राहकांच्या प्रोब्लेम्सवर सोलुशन देणाऱ्या वस्तू ग्राहकांना दिल्या तरच ते पैसे देणार आहेत.
सांगणे एवढेच कि ग्राहकांच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन देणाऱ्या वस्तू तयार करा. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत चला तरच तुमच्या व्यवसायात पैसा येणार आहे.
बदल आवश्यक न वाटणे They don’t think they have to change
काही व्यवसायिकांना आपल्या व्यवसायात काळानुसार बदल करावेत असे वाटत नाही. पैसा असून देखील असे व्यावसायिक जुन्या पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करतात.
आज घडीला बऱ्याच जुन्या नवीन व्यवसायकांनी व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचे प्रोडक्शन्स वाढले आहे. त्यांच्या वस्तूंची कॉलिटी सुधारले आहे.
वस्तूंमध्ये फिनिशिंग आले आहे. याचा परिणाम त्यांची मार्केटमध्ये मागणी वाढले आहे व मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीतून मिळालेला पैसा त्यांना व्यवसाय वाढीसाठी खर्च करता येऊ लागला आहे.
त्यासाठी व्यवसायिकांनी उत्तम कौशल्य असलेल्या कामगारांची भरती करावी. नव्या तंत्रज्ञानाचा प्रोडक्शनसाठी वापर करावा.
खरा मार्केटिंग प्लॅन नसणे Not having real marketing plan
एक चांगला प्रॉडक्ट असणे हा पहिला प्लॅन आहे. परंतु तुम्ही तुमचे प्रॉडक्ट लोकांसमोर कसे, केव्हा आणि किती वेळा प्रदर्शित करणार आहात हा दुसरा प्लॅन आहे.
मार्केटमध्ये ग्राहकांचे लक्ष खेचून घेण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहात ते तुम्हाला माहीत असायला हवे. त्यासाठी एक प्रॉपर मार्केट प्लॅन अगोदरच तयार असावा.
टीम मॅनेज न करणे Not managing a team

शरीराची सर्व कार्ये सुरळीतपणे चालू राहण्यासाठी ज्याप्रमाणे शरीरातील सर्व अवयवांची गरज असते. त्याचप्रमाणे एका व्यवसायाची सर्व कार्य व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी व्यवसायात sales, finance, marketing, purchasing, production आणि accounts विभागांची गरज असते.
व्यवसायात दर्जेदार उत्पादन निर्मितीसाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज असते हे लक्षात घेऊन कामगारांची भरती करावी. कामगारांना वेळेवर व आकर्षक पगार द्यावा.
शासनाच्या नियमांनुसार पीएफ पीएसआय या सर्व सुविधा द्याव्यात. चांगल्या सुविधांमुळे कामगार काम सोडून जाणार नाहीत. कामगार सतत काम सोडून जात असतील तर नव्याने भरती होणाऱ्या कामगारांच्या प्रशिक्षणावर पुन्हा खर्च करावा लागतो. त्यासाठी वेळ आणि पैसा देखील वाया जाणार आहे.
कामगारांना वेळोवेळी प्रशिक्षण देत राहावे. कंपनीची इमेज खराब होऊ नये याकरिता गैरवर्तन करणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकावे. वरील सर्व विभागातील कामगारांच्या कार्यांचा सतत आढावा घ्यावा.
एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे multitasking
ज्यावेळी तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करता त्यावेळी तुमची प्रत्येक कामात खूप थोडी प्रगती होते, आणि ज्यावेळी तुम्ही एकाच वेळी एकाच कामावर फोकस करता त्यावेळी तुमची प्रगती त्या कामात उल्ल्खेनीय होते.
ज्यावेळी आपण एकाच कामावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मेंदूच्या पूर्ण क्षमतेचा वापर होतो. याचा परिणाम अपेक्षित ध्येय साध्य होते.
पुरेसे भांडवल नसणे Not having enough capital
कोणताही व्यवसाय सुरु केल्यानंतर व्यवसायाच्या सुरुवातीला होणारी ग्रोथ ही थोडी स्लो असते. अशावेळी व्यवसायाला तारण्यासाठी जवळ पुरेसे भांडवल असणे आवश्यक असते.
बऱ्याच वेळा व्यवसायाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी व इतर कामांसाठी जवळ असलेल्या सर्व पैसा संपून जातो. परंतु कंपनीचा ज्यावेळी पडता काळ सुरू असतो, त्यावेळी व्यवसाय तारण्यासाठी जवळ पुरेसे भांडवल असावे.
ग्राहकांशी चांगले संबंध न राखणे Bad customer relations
तुमच्या दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे. मग तो कमी पैशाची वस्तू घ्यायला येऊ द्या अथवा महागडी वस्तू घ्यायला येऊ द्या किंवा नुसती चौकशी करायला येऊ द्या.
ग्राहक हा ग्राहक असतो. सर्व ग्राहकांना समान वागून द्या. तुमचे ग्राहकांशी वागणे नम्र असायला हवे. जर तुम्ही ग्राहकांशी उद्धटपणे वागाल तर तोच काय इतर लोकांना सुद्धा तुमच्या दुकानात येण्यापासून थांबवेल.
एक लक्षात असू द्या छोटा रुमाल विकत घेणारा ग्राहक कधी तुमच्या दुकानातून महागडी पैठणी घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. जर तुमच्या दुकानासमोर गर्दी असेल तर ग्राहकांना थोडा वेळ थांबण्यासाठी विनंती करावी.
ग्राहकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नये. ग्राहक दुकानात आल्याबरोबर त्यांचे आनंदाने प्रथम स्वागत करावे व काय हवे आहे हे नंतर विचारावे. ग्राहकांशी व्यवसायिक नव्हे तर थोडेसे भावनिक नाते सुद्धा जपणे या ठिकाणी महत्त्वाचे ठरते.
Conclusion (निष्कर्ष)
व्यवसायात काही चुका अशा असतात ज्या व्यवसाय अधोगतीला घेऊन जातात. त्यामुळे व्यवसायात व्यवसाय वाढीच्या मार्गात येणाऱ्या चुका नक्की टाळाव्यात. त्या चुका पुन्हा पुन्हा करू नयेत.
ब्रँड तयार न करणे, ग्राहकांच्या समस्या समजून न घेणे, बदल आवश्यक न वाटणे या काही अशा चुका आहेत ज्या व्यवसाय वाढीस अडथळा ठरत आहेत.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.