मसाला व्यवसाय माहिती मार्गदर्शक: मसाल्याचा व्यवसाय कसा सुरू करावा

स्वयंपाक चमचमीत, रुचकर, चटकदार बनवणारा पदार्थ म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येतो तो पदार्थ म्हणजे भारतीय मसाले होय. आज संपूर्ण देशात आणि जगात भारतीय मसाल्यांना प्रचंड मागणी आहे.

मसाले हा पदार्थ प्रत्येक घरातील किचन मध्ये आढळतो. मसाले हा जेवण परिपूर्ण बनवणारा पदार्थ आहे.

तुम्ही जर मार्केटमध्ये बघायला गेलात तर भारतीय महिलांनी मसाला उद्योगात उत्तम कामगिरी केलेली आहे. काही महिला आपल्या घरात हा व्यवसाय करत असून परदेशात आपला मसाला विक्री करत आहेत, इतके ह्या व्यवसायात पोटेंशल आहे.

आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे बर्‍याच महिलांना घरी मसाला तयार करायला पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे बर्‍याच महिला रेडिमेड मसाले जेवणात वापरतात.

ज्यामध्ये अदरक लसूण पेस्ट, तिखट, धना पावडर, मिर्च मसाला, कांदा पेस्ट, रेडिमेड मॅगी मसाला व इतर आवश्यक मसाला यांचा समावेश होतो.

ग्राहकांची उपलब्धता

मसाला हा एक evergreen पदार्थ आहे, भारतीय बाजारपेठेत मसाल्यांना बारा महीने मागणी असते. प्रत्येक किचनमध्ये दररोज लागणारा हा पदार्थ आहे, त्यामुळे ग्राहक तुम्हाला शोधावे लागणार नाहीत तर ते आपोआप तुमच्याकडे येतील.

तुम्हाला फक्त थोडे दिवस तुमच्या व्यवसायांची लोकांना माहिती होईपर्यंत जाहिरात करावी लागेल. मसाल्यांची गुणवत्ता कायम ठेवल्यास ग्राहक तुमचाच ब्रॅंड पुन्हा पुन्हा विकत घेणे पसंत करतील.

मसाल्यांना असणारी मागणी

फूड इंडस्ट्रीमध्ये जसे रेस्टोरंटस, मोठ मोठे हॉटेल्स, घरगुती खानावळ, स्नॅक्स सेंटर अशा ठिकाणी मसाल्यांना प्रचंड मागणी आहे.

एकेवेळ तुम्ही तुमच्या घरातील किचनमध्ये फेरफटका मारून या म्हणजे तुमच्या लक्षात येईल कि अगदी सकाळचा नाश्ता बनवण्यापासून ते जेवण बनवे पर्यन्त आपण किती मसाले वापरतो ते. यावरून तुमच्या लक्षात येईल कि मसाला पदार्थांना मार्केटमध्ये किती मागणी आहे. 

जास्तीत जास्त ग्राहक कसे मिळवता येतील

मार्केटमध्ये मसाल्यांना ग्राहक मिळवणे इतके अवघड नाही. तुम्ही जर एक धोरण आखून काम कराल तर खूप कमी दिवसात तुम्ही तुमचा मसाला ब्रॅंड लोकांपर्यंत पोहचवाल. जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या परिसरात असलेली किराणा दुकाने यांच्याकडे जाऊन तुमचा मसाला विक्रीस ठेवण्यास त्यांना विनंती करायची आहे.

Masala Industry Outlook  

आज मार्केटमध्ये सुहाना मसाला, राजेश मसाला, एमटीआर मसाला, एमडीएच मसाले, बादशहा मसाले फक्त इतकेच नावाजलेले 20 टक्के ब्रॅंड आहेत, बाकी जवळ जवळ 80 टक्के मसाला विकणारे ब्रॅंड हे लोकल आहेत जे तुमच्या माझ्यासारखे लोक नव्याने स्टार्टअप सुरू करत आहेत.

रोज मार्केटमध्ये नवीन मसाला ब्रॅंड तयार होत आहेत. यावरून तुमच्या लक्षात आले असेलच कि मसाला उत्पादनांना मार्केटमध्ये किती मागणी आहे.

मसाला बिजनेस सुरू करण्यापूर्वी मार्केट रिसर्च करा

मार्केट रिसर्च करणे हा कोणत्याही बिजनेसमधील सर्वात महत्वाचा भाग असतो. मसाला बिजनेस सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुम्ही ज्या भागात मसाले विकणार आहत त्या भागातील लोक कोणते मसाले विकत घेतात हे पाहिले पाहिजे.

आसपासच्या दुकानात मसाल्यांची दररोज किती विक्री होते, लोकांना कशा प्रकारचे मसाले हवे आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे.

लोक रेग्युलर मसाले जास्त विकत घेतात कि खास प्रकारचे मसाले जास्त विकत घेतात हे पाहिले पाहिजे. रेग्युलर मसाले म्हणजे हळद, मिर्च पाऊडर, धना पाऊडर, अद्रक लसूण पेस्ट इत्यादि आणि खास मसाले म्हणजे छोले मसाला, पनीर मसाला, चिवडा मसाला, पाणीपुरी मसाला, मटन मसाला इत्यादि होय.

या दोन्ही पैकी कोणत्या कॅटेगरीच्या मसाल्यांची जास्त मागणी आहे यावर तुम्ही काम करू शकता आणि तशा प्रकारची मसाला उत्पादने बाजारात आणू शकता.

मसाला बिजनेससाठी आवश्यक भांडवल

मार्केट रिसर्च करून झाल्यावर महत्वाचा प्रश्न येतो तो बजेटचा आणि हे बजेट तुम्ही कोणत्या स्तरावर तुमचा व्यवसाय सुरू करणार आहात यावर अवलंबून असते.

तुम्ही तुमचा मसाला व्यवसाय खालील चार स्टेप्समध्ये सुरू करू शकता.

1. प्रॉडक्टस स्वत: मॅन्युफॅक्चरिंग करणे

यामध्ये तुम्ही स्वत: मसाला तयार करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री विकत घेऊन, जागा भाड्याने घेऊन स्वत:चे उत्पादन मार्केटमध्ये लॉंच करू शकता.

2. कॉंट्रॅक्ट बेसिसवर मॅन्युफॅक्चरिंग करणे

यामध्ये तुम्ही अगोदरच मार्केटमध्ये मसाला विकणार्‍या कंपनीशी कॉंट्रॅक्ट साइन करून त्यांना त्यांची मसाला उत्पादने बनवण्यास मदत करू शकता त्याबदल्यात ती कंपनी तुम्हाला तुमचा ठरलेला चार्ज देईल. यासाठी तुमच्याकडे सुद्धा सर्व मसाला मॅन्युफॅक्चरिंगची यंत्रे आवश्यक आहेत.

3. मसाला कंपनीची distributarship घेऊन

या पद्धतीत तुम्ही मार्केटमधील कोणत्याही नावाजलेल्या मसाला कंपनीची distributarship चालवायला घेऊ शकता. कंपनी तुम्हाला त्यांचा माल पुरवेल पुढे तो तुम्हाला wholsaler, retailer ला विकायचा असतो. यावर चांगले मार्जिनसुद्धा मिळते.

4. मिल मधून मसाला पाऊडर तयार करणे किंवा होलसेल दरात मसाला पाऊडर विकत घेणे.

या पर्यायात तुम्हाला कोणतीही यंत्रसामग्री खरेदी करावी लागणार नाही फक्त पॅकिंगची मशीन विकत घ्यावी लागले जी मसाला भरलेले पॅकेटस पॅक करेल.

या पॅक केलेल्या मसाला पॅकेटसवर तुम्ही तुमचा ब्रॅंड छापून, तुमच्या ब्रॅंडचे स्टीकर लावून मसाला उत्पादने बाजारात आणू शकता.

Leave a Comment