Jute bags manufacturing बारदान पोती निर्मिती

धान्य कडधान्य तसेच इतर महत्वपूर्ण माल पॅकिंगसाठी बारदान पोत्यांचा वापर केला जातो. धान्यांचा व्यापार करणारे, पशुखाद्यांची विक्री करणारे यांच्या दुकानात बारदान पोती वापरली जातात.
बटाटा, कांदा इत्यादी कृषी उत्पादने भरून मार्केटमध्ये पाठवण्यासाठी बारदान पोत्यांचा वापर केला जातो. शेतकऱ्यांचा शेतमाल पॅकिंगसाठी अशा बारदान पोत्यांचा सर्रास वापर केला जातो.
या व्यवसायासाठी लागणारी मशीन इंडियामार्ट वर उपलब्ध आहे. छोट्या स्वरूपात जर हा व्यवसाय करायचा असेल तर कमीत कमी पाचशे स्क्वेअर फूट जागा लागेल.
Non-woven bags manufacturing कापडी पिशवी
कापडी पिशव्यांना कापड दुकानात, जनरल स्टोअर्स, भाजी मंडई आणि समारंभाच्या वेळी आहेर देण्यासाठी अशा बऱ्याच ठिकाणी कापड पिशव्यांचा वापर केला जातो.
शासनाच्या प्लास्टिक पिशवी बंदीमुळे कापडी पिशव्यांना चांगली मागणी आहे. स्थानिक बाजारपेठेत, मंडई मार्केटमध्ये अशा पिशव्यांची विक्री करता येते.
कापडी पिशवी तयार करणारी मशीन तुम्ही बारामती, पुणे यांसारख्या इंडस्ट्रियल एरिया मधून विकत घेऊ शकता, अथवा ही मशीन तुम्ही इंडियामार्ट वरून घरपोच मागवु शकता.
Notebook manufacturing नोटबुक मॅन्युफॅक्चरिंग
शाळा शासकीय खाजगी कार्यालयांमध्ये नोटबुक, रेकॉर्डबुक, रजिस्टर डायरी यांची गरज नेहमी असते. दैनंदिन कामाच्या नोंदी करणे, विद्यार्थ्यांना नोट्स लिहिणे या कामांसाठी नोटबुक रजिस्टर नेहमीच डिमांड मध्ये राहिले आहे.
या वस्तूंना वर्षभर मागणी असते. त्यामुळे या व्यवसायातून बारा महिने उत्पन्न मिळणार आहे.
हा उद्योग सुरू करण्यासाठी notebook cutting machine, edge squaring machine, nibbling machine या यंत्रांची गरज असते. या मशीनच्या किमती वेगवेगळ्या आहेत.
Cement bricks manufacturing सिमेंटच्या विटा तयार करणे

वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची, दुकानांची संख्या देखील वाढत आहे. दुकाने, जनावरांचे शेड, कार्यालय यांच्या बांधणीसाठी सिमेंटच्या विटांचा वापर होऊ लागला आहे.
मार्केटमध्ये सध्या सिमेंटच्या विटा तयार करणारे मॅन्युफॅक्चरर कमी आहेत.
सिमेंटच्या विटांची मागणी पाहता तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. या उद्योगासाठी लागणारी मशीन पन्नास हजार रुपयांपासून सुरू होते.
बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्या ठेकेदारांशी संपर्क साधून सिमेंटच्या विटांची विक्री वाढवता येईल.
हे वाचा:
import export business in Marathi
मातीच्या कुंड्या तयार करणे
गार्डनमध्ये व घरांची शोभा वाढवण्याकरिता घराच्या अंगणात विविध फुलांची रोपे लावली जातात. सावली देणाऱ्या झाडांची रोपे लावली जातात.
तर मग अशा रोपांना लावण्याकरता मातीच्या कुंड्यांचा वापर केला जातो. शहरात राहणाऱ्या महिला घराच्या बाल्कनीत फुलांची रोपे लावण्याकरता मातीच्या कुंड्यांची खरेदी करतात.
मातीच्या कुंड्या बनवण्याकरता बाजारात मातीच्या कुंड्या तयार करणारी मशीन मिळते. या व्यवसायात तयार कुंड्या ठेवण्यासाठी मोकळी जागा असायला हवी.
कुंड्या तयार करण्यासाठी लागणारी माती तुम्ही शेतकऱ्याकडून विकत घेऊ शकता. कुंड्या तयार करण्यासाठी सुपीक मातीची आवश्यकता लागणार आहे. कमीत कमी एक किंवा दोन कामगार हा व्यवसाय चालू ठेवू शकतात.
Slipping mattress manufacturing गादी तयार करणे
लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळेजण या प्रॉडक्टचा वापर करतात. 24 तासातले आठ ते नऊ तास आपण या प्रोडक्टचा वापर करत असतो. त्यामुळे मॅट्रेस या प्रॉडक्टला सारखी मागणी राहते.
लग्नाच्या काळात तर मॅट्रेसला भरपूर मागणी असते. गादीच्या विक्रीवर मिळणारे मार्जिन 30 ते 40 टक्के राहते. त्यामुळे महिना पन्नास हजार ते एक लाख रुपये या व्यवसायातून कमवता येणार आहेत.
स्लीपिंग मॅट्रेस बाजारात तुम्हाला चार प्रकारच्या पाहायला मिळतील. Cotton mattress, foam mattress, multilayer foam mattress, latex mattress या मॅट्रेस तयार करण्यासाठी तुम्हाला pu foam, memory foam, fabric cotton, thread इत्यादी प्रकारच्या कच्च्या मालाची आवश्यकता असणार आहे.
या उद्योगांसाठी Tape Edge Machine Mattress Sewing Machine गादीच्या चारी बाजू शिवण्यासाठी ही मशीन लागणार आहे. foam कट करण्यासाठी foam cutting machine लागणार आहे.
तसेच mattress vacuum compressor या मशीनची आवश्यकता मॅट्रेस पॅकिंगच्या वेळी छोटी करण्यासाठी केला जातो.
Leather belt, purse and pocket manufacturing लेदरची बेल्ट, पर्स, पॉकेट तयार करणे
लेदरचे बेल्ट पर्स व पॉकेट्स यांना देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा भरपूर मागणी आहे. जनरल स्टोअर्स, फॅशनस्टोरमध्ये आपणास लेदरच्या बऱ्याच वस्तू पाहायला मिळतात.
मार्केटमध्ये दोन प्रकारचे लेदर पाहायला मिळते. एक ओरिजिनल लेदर आणि दुसरे डुप्लिकेट लेदर. लेदरचे बेल्ट पर्स आणि पॉकेट तयार करण्यासाठी लेदरची शीट, लेदरचा धागा, चेन, बटन, हूक, डेकोरेटिव्ह आयटम्स हा कच्चा माल लागणार आहे.
मशीनचे म्हणाल तर लेदर शिलाई करणारी मशीन लागणार आहे. मग ती लेदर शिवणारी कोणतीही शिलाई मशीन चालणार आहे.
या सर्व लेदरच्या वस्तू तयार करण्यासाठी शिलाई काम जमायला हवे. जर तुम्हाला शिलाई काम जमत नसेल तर तुम्ही शिलाईचा कोर्स करू शकता किंवा शिलाई काम येणारा कामगार या कामासाठी नेमू शकता.
Sweet boxes manufacturing स्वीट बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग
सणसूद व शुभप्रसंगी वेळी मिठाई वाटली जाते. मिठाई रंगीबेरंगी आकर्षक बॉक्समध्ये पॅक केलेली असते. दिवाळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात पूर्ण देशातून स्वीटबॉक्सला मागणी असते.
मोठ्या शहरातील मिठाईच्या दुकानात अशा बॉक्सेसना वर्षभर मागणी राहते. कमी जागेत देखील हा उद्योग सुरू करता येतो.
या व्यवसायाला लागणारा कागदी पुट्टा तुम्ही ऑनलाईन किंवा थेट कंपनीतून मागवू शकता. हा कागदी पुठ्ठा तुम्हाला बारामती, एमआयडीसी, भोसरी एमआयडीसीतील पुठ्ठा तयार करणाऱ्या कंपनीतून मिळेल.
Kitchen scrubber manufacturing भांडी घासण्याचा स्क्रबर तयार करणे
घरातील भांडी घासण्यासाठी प्रत्येक घरातील किचनमध्ये स्क्रबरचा वापर केला जातो. स्क्रबरची आजकाल घरोघरी मागणी आहे.
पूर्वी महिला भांडी घासण्यासाठी नारळाच्या केसांचा व चुलीतील राखीचा वापर करत असत. परंतु हल्ली प्रत्येक घरात गॅस आल्यामुळे महिला भांडी घासण्यासाठी स्टील स्क्रबरचा वापर करत आहेत.
ग्रामीण भागात सुद्धा या स्क्रबरचा वापर वाढला आहे. या व्यवसायासाठी लागणारी मशीन ट्रेड इंडिया व इंडियामार्ट वर उपलब्ध आहे.
स्क्रबर बनवणाऱ्या यंत्राची किंमत दोन लाखापासून सुरू होते. यानंतर तुम्हाला तयार केलेले स्क्रबर पॅकिंग करण्यासाठी स्क्रबर पॅकिंग मशीन सुद्धा लागणार आहे.
स्क्रबर पॅकिंग मशीनची किंमत 70000 पासून सुरू होते. या व्यवसायासात स्क्रबर तयार करण्यासाठी हाय कॉलिटी स्टीलचा वापर केला जातो. तसेच स्क्रबर पॅक करण्यासाठी स्क्रबर पॅकिंग शीटचा वापर केला जातो.
Cow dung cake manufacturing शेणाच्या गौऱ्या तयार करणे
अन्न शिजवणे, कुंडीतील रोपांना खत म्हणून वापर, धार्मिक पूजा पाठावेळी अग्निप्रज्वलित करण्यासाठी शेणाच्या गौऱ्याचा वापर केला जातो.
गौर्यांना नवीन जमान्यात Cowdungcake असे म्हणतात. ग्रामीण भागात Cow dung cakes सहज उपलब्ध होतात.
ग्रामीण भागात यांना कोणीही विचारत नाही. परंतु मोठ्या शहरात व परदेशात या Cow dung cake ला मोठी मागणी आहे.
शहरात जनावरे सांभाळली जात नाहीत त्यामुळे त्यांना या शेणाच्या गौऱ्या ऑनलाइन मागवाव्या लागतात. हा व्यवसाय तुम्ही ग्रामीण भागात सुरू करू शकता.
या केक्स तयार करण्यासाठी लागणाऱ्या चांगल्या मशीनची किंमत पंचवीस हजार रुपये आहे. अमेझॉन व मिशोवर मशीन खूप कमी किमतीत उपलब्ध आहे.
शेणाच्या गौऱ्या तयार करून तुम्ही त्या मिशो, फ्लिपकार्ट सारख्या इकॉम साईटवर विकू शकता.
Dhoop stick manufacturing धूप स्टिक मेकिंग
घरात व मंदिरात पूजा पाठ करताना सुगंधीत धूप लावली जाते. रस्त्यावरची छोटे व्यवसायिक व दुकानदार आपल्या दुकानात सुगंधी धूप लावतात.
ही सुगंधी धूप सर्वांना आकर्षित करते. या सुगंधी धुपाची सणासुदीला तर चांगली मागणी राहते. परंतु व्यवसायिक लोक वर्षभर या धूपाची मागणी करतात.
त्यामुळे या व्यवसायाला चांगली मागणी आहे. धूप तयार करण्याच्या मशीनची किंमत ऑनलाईन मार्केटमध्ये 50 हजार इतकी आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना कमी भांडवलता हा व्यवसाय सुरू करता येतो.
Conclusion (निष्कर्ष)
मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय म्हटलं कि कच्च्या स्वरूपातील वस्तूंवर प्रक्रिया करून उपयोगी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय आहे. यामुळे या व्यवसायात मिळणारे मार्जिन सुद्धा अधिक मिळते. हे मिळणारे जास्त मार्जिन पाहता मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरु करणे फायद्याचे आहे.
FAQ
उत्पादन व्यवसाय म्हणजे काय?
उत्पादन व्यवसायात कच्च्या मालावर प्रक्रिया करून उपयोगी वस्तू बनवल्या जातात.
उत्पादन व्यवसाय म्हणजे कोणता व्यवसाय?
उत्पादन व्यवसाय म्हणजे वस्तू तयार करण्याचा व्यवसाय होय.
कोणता उत्पादन उद्योग सर्वात फायदेशीर आहे?
जीवनावश्यक वस्तू तयार करणारा कोणताही उत्पादन व्यवसाय फायदेशीर आहे.
उत्पादन उद्योग कसा चालतो?
उत्पादन व्यवसायात कच्चा माल खरेदी केला जातो व त्यावर यंत्रांच्या मदतीने प्रक्रिया करून उपयोगी वस्तू तयार केल्या जातात. या तयार वस्तू बाजारात विकून पैसे मिळवले जातात.
उत्पादकाने किती मार्जिन बनवावे?
5 ते 10 टक्के मार्जिन निरोगी मार्जिन समजले जाते.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.