लिपिक पदासाठी अर्ज नमुना, शिपाई पदासाठी अर्ज नमुना, शिक्षक पदासाठी अर्ज नमुना, तसेच बँकेत नोकरीसाठी अर्ज कसा करावा यासाठी खाली सर्व अर्ज नमुने दिले आहेत.
लिपिक पदासाठी अर्ज नमुना
तुमचे नाव
पत्ता –
दिनांक –
प्रति,
अध्यक्ष/प्राचार्य/व्यवस्थापक,
संस्थचे नाव/शाळेचे नाव/कंपनीचे नाव
विषय: लिपिक पदासाठी अर्ज
आदरणीय सर/मैडम सादर नमस्कार, कालच्या वृत्तपत्रात आपल्या संस्थेची/शाळेची/कंपनीची जाहिरात वाचली. याद्वारे आपल्या संस्थेत/कंपनीत लिपिक पदाची पदे भरावयाची आहेत असे समजले. या विषयास अनुसरून मी या पदासाठी अर्ज करीत आहे.
मी २०१० साली (विद्यापीठाचे नाव) विद्यापीठातून माझे कला शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच मी महाराष्ट्र शासनाची टंकलेखनाची परीक्षा देखील उत्तीर्ण झालो आहे आणि माझ्याजवळ (संस्थेचे नाव) या संस्थेत/शाळेत/कंपनीत लिपिक पदाचा २ वर्षे कामाचा अनुभव देखील आहे.
तरी कृपया माझ्या अर्जाचा विचार करून मला आपल्या संस्थेत/शाळेत/कंपनीत काम करण्याची संधी द्याल अशी मी अपेक्षा करतो.
आपला विश्वासू
(तुमचे नाव)
सही
सोबत:
१) पदवी परीक्षेचे प्रमाणपत्र (झेरॉक्स) २) टंकलेखन परीक्षा प्रमाणपत्र (झेरॉक्स) ३) अनुभव प्रमाणपत्र
टीप: तुमच्या नावाचा आणि आपला विश्वासू हा कॉलम त्याच रेषेत पेजच्या उजव्या बाजूला लिहावा.
शिपाई पदासाठी अर्ज नमुना
तुमचे नाव
पत्ता –
दिनांक –
प्रति,
मा. मुख्याध्यापक,
शाळेचे नाव
शाळेचा पत्ता
विषय: शिपाई पदासाठी अर्ज
आदरणीय सर/मैडम सादर नमस्कार, मी (तुमचे नाव) आपल्या शाळेत शिपाई पदासाठी अर्ज करत आहे. माझे शिक्षण इयत्ता दहावी पर्यंत पूर्ण झाले आहे. मला शिपाई पदाच्या कामाचा 2 वर्षाचा अनुभव आहे. मला आपल्या शाळेत शिस्तबद्ध व निष्ठावान सेवा देण्याची इच्छा आहे. तरी कृपया माझ्या अर्जाचा विचार करून मला मुलाखतीसाठी संधी द्यावी हि विनंती.
आपला विश्वासू
(तुमचे नाव)
सही
सोबत: १) दहावी परीक्षेचे प्रमाणपत्र (झेरॉक्स)
२) अनुभव प्रमाणपत्र
टीप: तुमच्या नावाचा आणि आपला विश्वासू हा कॉलम त्याच रेषेत पेजच्या उजव्या बाजूला लिहावा.
शिक्षक पदासाठी अर्ज नमुना
तुमचे नाव
पत्ता –
दिनांक –
प्रति,
मा. मुख्याध्यापक,
शाळेचे नाव
शाळेचा पत्ता
विषय: शिक्षक पदासाठी अर्ज
आदरणीय सर/मैडम सादर नमस्कार,
आपल्या शाळेत शिक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत हि बातमी वृत्तपत्रामधून कळाली. त्यामुळे, मी शिक्षक पदासाठी अर्ज करत आहे. मी (विद्यापीठाचे नाव) विद्यापीठातून बी.ए. पदवी पूर्ण केली आहे. मी श्री राम बी.एड. कॉलेज सातारा येथून अध्यापनात बी.एड. पदवी देखील पूर्ण केली आहे. सावित्रीबाई फुले हायस्कूल सातारा येथून शिक्षक म्हणून मला २ वर्षांचा अनुभव आहे. तरी कृपया माझ्या अर्जाचा विचार करून मला मुलाखतीसाठी संधी द्यावी हि विनंती.
आपला विश्वासू
(तुमचे नाव)
सही
सोबत:
१) पदवी व अध्यापन परीक्षा प्रमाणपत्र (झेरॉक्स)
२) अनुभव प्रमाणपत्र
टीप: तुमच्या नावाचा आणि आपला विश्वासू हा कॉलम त्याच रेषेत पेजच्या उजव्या बाजूला लिहावा.
बँकेत नोकरीसाठी अर्ज कसा करावा
तुमचे नाव
पत्ता –
दिनांक –
प्रति,
मा. व्यवस्थापक,
बँकेचे नाव
बँक पत्ता
विषय: कॅशिअर/सहाय्यक/शिपाई पदासाठी अर्ज
आदरणीय सर/मैडम सादर नमस्कार मी (तुमचे पूर्ण नाव) आपल्या बँकेत कॅशिअर/सहाय्यक/शिपाई या पदासाठी अर्ज करत आहे. मी कॅशिअर/सहाय्यक/शिपाई या पदासाठी आवश्यक ती शैक्षणिक अहर्ता पूर्ण केली आहे. माझे शिक्षण B. COM. झाले आहे. सोबत मी MS-CIT, Tally हे दोन कम्प्यूटर कोर्स पूर्ण केले आहेत. तरी कृपया माझ्या अर्जाचा विचार करून मला मुलाखतीची संधी द्यावी हि विनंती.
आपला विश्वासू
(तुमचे नाव)
सही
सोबत: १) पदवी परीक्षा व संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र (झेरॉक्स)
टीप: तुमच्या नावाचा आणि आपला विश्वासू हा कॉलम त्याच रेषेत पेजच्या उजव्या बाजूला लिहावा.
अर्ज लिहण्यापूर्वी या काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत.
नोकरीसाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा
नोकरीसाठी जी जाहिरात दिलेली असते ती तुम्हाला काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे, कारण त्यात कंपनीला नोकरीसाठी अर्ज करणार्या उमेदवारकडून नेमके काय हवे आहे, त्यांच्या गरजा काय आहेत हे समजले जाते.
कोणती पात्रता हवी आहे, किती वर्षाचा अनुभवी व्यक्ति हवा आहे, उमेदवाराचे शिक्षण किती अपेक्षित आहे, या सर्व बाबी समजतात यावरून तुम्ही स्वत:चे परीक्षण करू शकता व त्या जॉब साठी अर्ज करावा का नाही हे ठरवू शकता.
नोकरीच्या जाहिरातीवरून तुमच्याकडे त्यांना जो अपेक्षित अनुभव आहे तो तुम्ही अर्जामध्ये नमूद करू शकता व अनावश्यक गोष्टी अर्जामधून वगळू शकता.
कंपनीतील योग्य व्यक्तिला उद्देशून अर्ज लिहा
जाहिरातीत ज्या व्यक्तिला उद्देशून अर्ज लिहण्यास सांगितला आहे त्याच व्यक्तिला उद्देशून नोकरी अर्ज लिहावा, उदाहरणार्थ काही नोकरीच्या जाहिरातींमध्ये मॅनेजरला उद्देशून अर्ज लिहण्यास सांगितला जातो किंवा हेड ऑफ डिपार्टमेंटला, शाळा असेल तर प्राचार्यांना, संस्था असेल तर अध्यक्षांना उद्देशून अर्ज लिहण्यास सांगितला जातो, अशा वेळी त्याच व्यक्तीच्या नावे अर्ज लिहून सादर करावा.
आपले म्हणणे थोडक्यात मांडा
कंपनीचे मॅनेजर व भरती करणारे recruiters हे लोक नेहमी त्यांच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो, अशावेळी अर्जात फक्त महत्वाच्या बाबींचा उल्लेख करावा.
ग्रामरच्या चुका टाळा
अर्ज लिहताना भाषेतील चुका टाळा, स्पेलिंग, वाक्यरचना, विरामचिन्हे यांचा योग्य ठिकाणी योग्य वापर करा. तसेच अर्ज पूर्ण लिहून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा वाचून घ्या.
