जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी Dic Business List Marathi

jilha udyog kendra business list: ग्रामीण भागातील व निमशहरी भागातील अति लहान उद्योगांना अर्थ पुरवठा करून त्यांचा विकास करणे व जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी करता येईल याकडे लक्ष देणे, हा जिल्हा उद्योग केंद्र निर्मितीमागचा मुख्य उद्देश आहे.

जिल्हा उद्योग केंद्र हे उद्योजकांना शासनाची सर्व आर्थिक मदत व आवश्यक परवाने मिळवून देण्याचे महत्वाचे काम करते.

जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी

महाराष्ट्र जिल्हा उद्योग केंद्रा अंतर्गत पंत प्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) ही मुख्य योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत खालील उद्योगांना मंजूरी दिली जाते.

सर्व प्रकारचे फूड प्रॉडक्टस  Food products

वेफर्स तयार करणे, मिठाई तयार करणे, चिरमुरे तयार करणे, बेकरी खाद्य पदार्थ तयार करणे.

सर्व प्रकारचे इंजिनियरिंग प्रॉडक्टस  Engineering products

इमारत आणि बांधकाम क्षेत्रातील यांत्रिक उपकरणे, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उपकरणे व साहित्य हाताळणी उपकरणे निर्मिती करणे.

सर्व प्रकारचे पशू खाद्य  Animal feed

दुधाळ जनावरे व इतर पाळीव प्राण्यांचे पोषक खाद्य निर्मिती करणे.

अग्रो प्रॉसेसिंग उत्पादने  Agro processing products

तेल निर्मिती उद्योग, साखर निर्मिती, बेसन पीठ तयार करणे, कडधान्यांवर प्रक्रिया करणे, दुग्ध जन्यपदार्थ निर्मिती करणे इत्यादि.

लेदर प्रॉडक्टस Leather products

लेदरचे शूज तयार करणे, लेदर बॅग तयार करणे, लेदर पासून शोभेच्या वस्तु तयार करणे इत्यादि.

लाकडी उत्पादने Wooden products

लाकडापासून बेड, सोफा, कॉट, टेबल, खुर्ची, दरवाजे, खिडक्या व इतर उपयोगी लाकडी साहित्य तयार करणे.

सर्व प्रकारची फार्मा उत्पादने Pharma products

फार्मा उत्पादने निर्मिती करणे.

सर्व प्रकारची पेपर उत्पादने  Paper products

पत्रावळी तयार करणे, चहाचे कप तयार करणे इत्यादि.

इलेक्ट्रिक प्रॉडक्टस Electric products

पक्कड, लेवल ट्यूब, टेस्टर, फिश टेप, वायर स्ट्रिपर, मल्टीमिटर, मेझरिंग टेप इत्यादि इलेक्ट्रिक क्षेत्रात उपयोगी पडणारी इलेक्ट्रिक उत्पादने निर्मिती करणे.

सर्व प्रकारची प्लॅस्टिक उत्पादने  Plastic products

घरगुती उपयोगी प्लॅस्टिकच्या वस्तु टोपली, बकेट, मग, जार, घमेले निर्मिती करणे.

केमिकल उत्पादने Chemical products

विविध धातूची भांडी धुण्याचे, कपडे धुण्याचे, फ्लोर साफ करण्याचे, ग्लास व टॉयलेट क्लीन करण्याचे केमिकल प्रॉडक्टस तयार करणे इत्यादि.  

आयुर्वेदिक उत्पादने Ayurvedic products

विविध प्रकारच्या आयुर्वेदीक वनस्पतिपासून आयुर्वेदिक उत्पादने तयार करणे. शतावरी, तुळस, नीम, हळद, अडुळसा, आवळा, कोरफड, गोखरू व इतर विविध प्रकारच्या आयुर्वेदीक वनस्पतीपासून आयुर्वेदीक उत्पादने, आयुर्वेदीक तेल तयार करणे.

रबर प्रॉडक्टस Rubber products

रबरचे हातमोजे, गादी, शूजचे सोल, फुगे व रबर बॅंडस तयार करणे. 

कॉस्मेटिक उत्पादने Cosmetic products

विविध प्रकारची सौंदर्य उत्पादने निर्मिती करणे.

टेक्सटाइल प्रॉडक्ट Textile products

धागा, चादर, बेड कवर इत्यादि वस्तु तयार करणे.

अरोमा ऑइल निर्मिती करणे Aroma oil production

निलगिरी, लॅव्हेंडर, लेमन ग्रास, संत्रा, पेपरमिंट, चहाचे झाड यांपासून ऑइल तयार करणे.

सेवा उद्योग Service industry list

मोबाइल दुरूस्ती

फोटोग्राफी

टू व्हीलर व फोर व्हीलर दुरूस्ती

डटिंग व पेंटिंग

चप्पल दुरूस्ती

प्रिंटिंग, डीटीपी वर्क, आयटी वर्क

कम्प्युटर दुरूस्ती

घरगुती इलेक्ट्रिक उपकरणे दुरूस्ती

फोटो फ्रेम तयार करणे

सायकल दुरूस्ती

पेस्टिंग, साफ-सफाई

ग्लास वर्क

CSC सेंटर

झेरॉक्स सेंटर

ब्युटि पार्लर

टेलरिंग

सूचना: या लेखामध्ये प्रकाशित करण्यात आलेली माहिती हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे प्रकाशित करण्यात आलेली आहे.

हि शासनाची कोणतीही अधिकृत वेबसाईट नाही, त्यामुळे न्यूनतम व अधिकृत माहितीकरिता तुमच्या जिल्हा उद्योग केंद्राला भेट द्या. अथवा जिल्हा उद्योगकेंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

निष्कर्ष

वर दिलेल्या जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी मध्ये समाविष्ट केलेले उद्योग पंत प्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवले जातात हे तर तुमच्या लक्षात आले असेलच.

जर तुम्हाला वरील यादीतील एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सुद्धा जिल्हा उद्योग केंद्राची मदत घेऊन तुमचा उत्पादन व्यवसाय किंवा सेवा व्यवसाय सुरू करू शकता त्यासाठी तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्र संपूर्ण मार्गदर्शन करेल.

Leave a Comment