मोर पक्षी माहिती मराठी: “नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच!” हे लोकप्रिय बालगीत तुम्ही नक्की ऐकले असेल. अगदी या बालगीताप्रमाणे मोर हा नाचणारा व सुंदर दिसणारा पक्षी आहे.
जगातील सर्वात सुंदर पक्षांपैकी एक सुंदर पक्षी म्हणून मोर पक्षाची ओळख आहे. मोर हा पक्षी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना आवडतो. त्याचा सुंदर पिसारा त्याचे सुंदर नृत्य माणसाला आकर्षित करते.
मोर पक्षाला पक्षांचा राजा असे म्हणतात. भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर पक्षाची ओळख आहे. पावसाळ्यात आकाशात काळे ढग दाटले की तो आनंदाने नाचू लागतो.
Information On Peacock In Marathi
1. मोर पक्षी सरस्वतीचे वाहन आहे.
2. नर पक्षाला मोर तर मादी पक्षाला लांडोर म्हटले जाते.
3. मोर पक्षाचे इंग्रजी नाव common peafowl असे आहे.
4. मोर पक्षाचे शास्त्रीय नाव Pavo cristatus आहे.
5. मोर पक्षाला Indian peafowl/blue peafowl असे हि म्हणतात.
6. भारतीय मोर पक्षाला निळा मोर या नावाने देखील संबोधले जाते.
7. मोर पक्षी भारताप्रमाणेच इतर देशात देखील आढळतो.
8. नर मोर पक्षाच्या शरीराचा आकार 90 ते 120 सेंटिमीटर असतो. तर मादी पक्षाच्या शरीराचा आकार 85 ते 87 सेंटीमीटर असतो.
9. नर पक्षाच्या शेपटीभोवती रंगीत पिसारा असतो. मादी पक्षांना तो नसतो.
10. चोचीचा आकार सरळ व चोच छोटी असते.
11. मोर पक्षी म्याओ! म्याओ! असा आवाज करतो.
12. मोरपक्षी धान्य, किडे, साप, सरडे व रानावनातील कोवळी पाने खाऊन आपले पोट भरतो.
13. मोर पक्षी झाडांच्या फांदीवर व जमिनीवर असतात.
14. मोर पक्षाचा विणीचा हंगाम जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यातील आहे.
15. मोर पक्षाची हत्या करणे किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करणं बेकायदेशीर आहे. असे कृत्य करणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई होते.
पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मोरखूप दिसायचे. पूर्वी पाऊसकाळ ही भरपूर असायचा. आकाशात काळे ढग दाटायचे त्यावेळी आम्हाला खूप मोर दिसायचे. अलीकडे वाढत्या सिमेंटच्या इमारतींमुळे हिरवे दिसणारे जंगल जंगलतोडीमुळे नष्ट झाले आहे. याचा परिणाम असा मोर पक्षी फार कमी दृष्टीस पडतात. एकतर त्यांनी स्थलांतर केल असावं. अथवा काही मोरांचा जंगलतोडीमुळे ऱ्हास झाला असावा. मोर नर पक्षी मादी पक्षाला आकर्षित करण्यासाठी आपला रंगीत पिसारा फुलवून नाचू लागतो.
लहान मुलांच्या गोष्टी, कथा व इतर बालसाहित्यामध्ये मोर पक्षाचे वर्णन आढळते. मोर पक्षाच सुंदर दिसणच मोर पक्षाला इतर पक्षाहून वेगळ ठरवत. पावसाळ्यातील त्याच सुंदर नृत्य कोणाला आवडणार नाही.