सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यामुळे लोक महागडे सोन्याचे दागिने खरेदी न करता इमिटेशन ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी खरेदी करत आहेत.
लग्न समारंभाला महिला अविवाहित मुली इमिटेशन ज्वेलरी परिधान करणे जास्त पसंत करत आहेत. महिलांमध्ये आर्टिफिशल ज्वेलरीची क्रेज पाहता कोणीही हा व्यवसाय सुरू केला तर तो चालणार आहे.
भारतामध्ये आर्टिफिशल ज्वेलरीचे मार्केट मोठ्या तेजनी वाढत चालले आहे, त्यामुळे तुम्ही ज्वेलरी व्यवसाय सुरू करून यात सहभागी होऊ शकता.

ज्वेलरी व्यवसायांचे प्रकार Types of Jewellery Businesses
- Jewellery Wholesalers
- Jewellery Retailers
- Jewellery Manufacturing
होलसेल विक्रेते, रिटेल विक्रेते आणि ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग करण्यापूर्वी तुम्हाला होलसेल विक्रेते, रिटेल विक्रेते किंवा मॅन्युफॅक्चरिंग यापैकी एक निवड करावी लागणार आहे.
होलसेल मध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल सुद्धा त्या पटीत लागणार आहे, आणि जर रिटेल मध्ये व्यवसाय सुरू करणार असाल तर कमी भांडवल लागणार आहे.
होलसेलर म्हणून विक्री करण्यासाठी दुकानात माल पॅक करण्यासाठी माल निवडण्यासाठी कामगार लागणार आहेत. रिटेलर म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी कामगारांची अजिबात आवश्यकता नाही तुम्ही एकटे देखील हा व्यवसाय चालू ठेवू शकता.
ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग Jewellery Manufacturing

व्यवसायासाठी तयार ज्वेलरी तर होलसेलरकडे मिळतेच, परंतु मार्केटमध्ये असेही काही होलसेलर आहेत जे ज्वेलरीसाठी लागणारा कच्चा माल विकतात.
तुम्ही अशा होलसेलर कडून कच्चामाल व ज्वेलरी तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊ शकता. ज्वेलरीमॅन्युफॅक्चरिंगमध्ये फक्त तुम्हाला कच्चामाल जोडून ज्वेलरी आयटम पुढे होलसेलरला, रिटेलरला किंवा प्रत्यक्ष ग्राहकांना विकायचे आहेत.
ज्वेलरी व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेच लाखो रुपयांचा माल खरेदी करू नका. कारण या बिजनेस मध्ये ट्रेंड आणि फॅशन सारखी बदलत राहते.
त्यामुळे तुमचा शिल्लक राहिलेला stock येणाऱ्या काळात तसाच पडून राहील. आउटडेटड झालेली ज्वेलरी कोणीही खरेदी करणार नाही, त्यासाठी सुरुवातीला कमी पैशात थोडा माल खरेदी करावा पहिला माल संपला कि नवीन खरेदी करावा.
हा व्यवसाय जर तुम्ही घरातून चालू करणार असाल तर सुरुवातीला कमी महिला तुमच्याकडे येतील, पण हळूहळू महिलांना जसे माहित पडेल, तशी तुमच्याकडे येणाऱ्या महिलांची संख्या देखील वाढेल.
बाजारात व यात्रेत छोटासा स्टॉल लावून देखील ज्वेलरी आयटमची विक्री करता येते. ऑनलाइन पद्धतीने ज्वेलरीची विक्री करण्यासाठी तुम्हाला माल खरेदी केलेल्या होलसेलर कडून ज्वेलरी आयटमचे फोटो मागवायचे आहेत, आणि ते तुमच्या इंस्टाग्राम फेसबुक आयडीवर किमतीसह अपलोड करून जाहिरात करावी लागणार आहे.
तुम्ही व्हाट्सअपवर ग्रुप मध्ये देखील ज्वेलरीचे फोटो शेअर करू शकता. तुम्ही स्वतः ज्वेलरी आयटमचे फोटो क्लिक करून शेअर करू शकता.
ज्वेलरीची कॅटेगरी निवडा Select your jewellery items
सध्या नेकलेस, पेंडंट, बँगल्स, फिंगर रिंग अशा अनेक कॅटेगरीज आहेत तुम्ही यातील ठराविक केटेगरी निवडून त्यावर काम करू शकता अथवा या सर्व कॅटेगिरी वर काम करू शकता.
उदाहरणार्थ फक्त पायल तर पायलच विक्री करणे, फक्त गळ्यातील तर गळ्यातील ज्वेलरीची विक्री करणे किंवा फक्त कानातील ज्वेलरीची वक्री करणे अशी एखाद्या कॅटेगरीची निवड करावी.
या व्यवसायात तुम्हाला खरोखरच जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला तुमची niche/category निवडावी लागणार आहे.
म्हणजे तुम्ही फक्त गोल्ड ज्वेलरी विकणार आहात कि सिल्वर ज्वेलरी विकणार आहात. तुमच्या व्यवसायाचा niche हाच पुढे तुमच्या व्यवसायाचे ब्रँडिंग ठरवण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
niche ठरवल्यानंतर मार्केटमध्ये तुमची गोल्ड ज्वेलरी विक्रेते किंवा सिल्वर ज्वेलरी विक्रेते अशी ओळख होणार आहे. त्यासाठी niche ठरवा.
ज्वेलरी व्यवसायासाठी भांडवल Capital for Jewellery Business
ज्वेलरी व्यवसाय कमीत कमी भांडवलात सुरू करायचा असेल तर फक्त दहा हजार ते पाच हजार रुपये या व्यवसायासाठी पुरेसे आहेत.
कोणीही सर्वसामान्य महिला किंवा पुरुष हा व्यवसाय सुरू करू शकतो, त्यासाठी लाखो रुपये भांडवलाची आवश्यकता नाही.
कोणतीही महिला आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून पार्ट टाइम हा व्यवसाय करू शकते किंवा फुल टाईम देखील हा व्यवसाय सुरू ठेवू शकते.
ज्वेलरी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मार्केट रिसर्च करा. Market research
ज्वेलरी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या परिसरातील ज्वेलरी होलसेल दुकाने व रिटेल दुकानात जाऊन ज्वेलरी क्षेत्रात कोणता ट्रेंड चालला आहे, ज्वेलरीची कोणती फॅशन लोकप्रिय आहे व वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीच्या किमती काय आहेत या सर्व गोष्टी तपासाव्या लागतील.
दुकानाला भेटी देताना तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. वस्तूंचे भाव विचारून घ्यायचे आहेत. फक्त एकाच दुकानात जाऊन वस्तूंच्या किमती विचारल्यानंतर लगेचच तिथे माल विकत घ्यायचा नाही.
तुम्हाला मार्केटमधील इतर तीन ते चार दुकानांना भेट द्यायची आहे. त्या दुकानांमध्ये सुद्धा चौकशी करायची आहे.
अशा रिसर्च मधून कमी भावात माल देणाऱ्या दुकानांची नावे आपोआप समोर येतील. मग तुम्हाला परवडेल त्या दुकानातून माल खरेदी करा.
हे झाले स्थानिक मार्केट रिसर्च पण जर तुम्हाला याहीपेक्षाही स्थानिक मार्केट मध्ये माल हवा असेल तर मुंबई, दिल्ली सदर बाजार, गुजरात मधील राजकोट शहरातून किंवा हैदराबाद शहरात जाऊन माल खरेदी करावा.
ज्वेलरी मटेरियल कुठून विकत घ्यावा jewellery material source
मुंबई, पुणे, सुरत व अहमदाबाद यांसारख्या मोठ्या शहरात होलसेल ज्वेलरी साहित्य विकणारे विक्रेते आहेत तुम्ही त्यांच्याकडून अगदी होलसेल भावात बल्कमध्ये ज्वेलरी आयटम्स विकत घेऊ शकता.
अशा मोठमोठ्या होलसेल स्टोअरमध्ये तुम्हाला अगदी स्वस्थ दरात ज्वेलरी मिळेल. त्यासाठी तुम्हाला मोठ्या शहरातील ज्वेलरी मार्केटमध्ये जावं लागेल.
योग्य ज्वेलरी होलसेलर कसा निवडावा Choose the right jewellery wholesaler
या व्यवसायात सुरुवातीला चांगला होलसेलर शोधावा लागेल. जो फार कमी भावात ज्वेलरी तुम्हाला देईल. कमी भावात ज्वेलरी खरेदी केल्यामुळे तुम्हाला पुढे विक्रीतून मिळणारा प्रॉफिट अधिक मिळतो.
जगापेक्षा जास्त दरात जर कोणता होलसेलर तुम्हाला ज्वेलरी देऊ पाहत असेल, तर अशा होलसेलर कडून चुकूनही आपल्याला माल घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. नाहीतर सगळ्याच्या सगळ्या तुमचा व्यवसाय खराब होऊ शकतो.
ज्वेलरीच्या किमती कशा सेट कराव्यात set jewellery prices
ज्वेलरी शॉप मधील आयटमच्या किमती जर योग्य दरात नसतील तर ग्राहक वस्तूंच्या किमती ऐकून आल्या पावली परत जाण्याची शक्यता असते.
ग्राहकांना दुकानातील ज्वेलरी आयटम्स योग्य भावात मिळाली नाही तर तो तुमच्या दुकानात पुन्हा पाय ठेवणार नाही. त्यासाठी तुम्हाला ग्राहक दुकानात आल्यावर परत माघारी जाऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील.
आपण आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना रेगुलर ग्राहक बनवले पाहिजे. कारण रेगुलर ग्राहकांमुळेच दुकानाची प्रगती होत असते.
ज्वेलरी आयटमच्या किमती निर्धारित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या एरियातील ज्वेलरी दुकानांतील वस्तूंच्या किमती चेक कराव्या लागतील.
काही वेळा मार्केटमधील ज्वेलरी आयटमच्या वस्तूंच्या किमती माहित नसल्यामुळे दुकानदार वस्तूंवर जास्त मार्जिन लावून विकतो, त्यामुळे ग्राहक पुन्हा दुकानात येत नाही.
तर काही वेळा दुकानात कमी मार्जिन लावून वस्तू विकल्यामुळे दुकानदाराला तोटा सहन करावा लागतो. त्यासाठी ज्वेलरी आयटम्स विकण्यापूर्वी त्यांच्या मार्केटमधील किमती तपासून पहाव्यात.
ज्वेलरीची विक्री कशी करावी How to sell jewellery items
जर तुमच्याकडे स्वतःचे गाळा असेल किंवा भांडवल भरपूर असेल तर तुम्ही दुकान टाकून हा व्यवसाय करू शकता.
जर तुमच्याकडे भांडवल कमी असेल आणि हा व्यवसाय तुम्हाला ट्राय करायचा आहे तर मग ज्वेलरी ऑनलाइन पद्धतीने सेल करू शकता अथवा स्वतःच्या घरातून व्यवसाय चालू करू शकता.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.