व्यवसाय ध्येये | How to Set and Achieve Your Business Goals in Marathi

वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात गोल्स खूप महत्त्वाचे आहेत. गोल्स सेट करणे ज्याप्रमाणे एका सर्वसामान्य व्यक्ती करता महत्त्वाचे आहे तितकेच ते एका बिझनेसमॅनसाठी सुद्धा महत्त्वाचे आहे.

त्यामुळे फक्त व्यावसायिक यंत्रणा सेट करू नका तर त्यासोबत बिजनेस गोल्स देखील सेट करावेत.

तुमचे व्यवसाय ध्येय कसे निश्चित करावे?

खाली स्मार्ट गोल्स म्हणजे काय, स्पेसिफिक गोल्स म्हणजे काय, अचीवेबल गोल्स म्हणजे काय आणि वास्तवादी गोल्स म्हणजे काय या महत्वाच्या बाबीं स्पष्ट केल्या आहेत.   

1. तुमचे स्मार्ट ध्येये सेट करा Set your smart goal

प्रत्येक व्यक्तीकडे कष्ट करण्याची तयारी असते. बौद्धिक क्षमता देखील असते, वेळ सुद्धा भरपूर असतो परंतु जर त्याला त्याच्या आयुष्यात काय करायचे आहे कुठे जायचे आहे हे जर माहीत नसेल तर त्याच्या क्षमतेचा काय उपयोग. त्यासाठी व्यवसायात देखील निश्चित ध्येये ठरवलेली असावीत.

हे आपण एका उदाहरण समजून घेऊया जर एखाद्या व्यक्तीला मुंबईला जायचे असेल तर तो त्याला जाण्याची तारीख निश्चित करावी लागणार आहे, ट्रेनने प्रवास करायचा का बसने जायचे हे ठरवावे लागेल,

तसेच त्यासाठी त्याला सीट बुकिंग करावे लागेल, मुंबईला गेल्यानंतर तिथे काय काम करायचे हे प्लॅन करावे लागेल, यालाच तर गोल सेट करणे म्हणतात. बिजनेस गोल्स देखील अशीच सेट करावी लागतात.

2. तुमची विशिष्ट ध्येये निश्चित करा Set your specific goals

नुसते ध्येये सेट करणे महत्त्वाचे नाही तर चांगल्या परिणामांसाठी स्पेसिफिक गोल्स सेट करायला पाहिजेत. उदाहरणार्थ एखादा व्यावसायिक म्हणतो मला माझ्या व्यवसायाच्या अनेक शाखा उघडायच्या आहेत हे झाले फक्त गोल सेट करणे. परंतु किती शाखा उघडायच्या आहेत, हे शोधावे लागेल.

जर तो म्हणाला मी एका वर्षात माझ्या व्यवसायाच्या मोठमोठ्या शहरात दहा शाखा उघडणार आहे हे झाले स्पेसिफिक गोल.

ज्यावेळी आपण स्पेसिफिक गोल सेट करतो त्यावेळी आपण अगदी निशाणा साधत असतो. आपले कष्ट भरकट जात नाही.

3. साध्य करण्यायोग्य ध्येये निश्चित करा Set achievable goals

तुमची व्यावसायिक ध्येये प्राप्त करण्याजोगी असायला हवेत. उदाहरणार्थ एखाद्या लठ्ठ व्यक्तीचे वजन कमी करणे हे ध्येय आहे.

तर त्याचे सध्याचे वजन 78 किलो आहे व त्याला ते 72 किलो पर्यंत कमी करायचे आहे तर हे झाले achievable गोल. म्हणजे त्याने निश्चित केलेले ध्येय पटण्यासारखे आहे.

म्हणजे त्या व्यक्तीला इतके वजन कमी करणे शक्य होईल पण जर अशा 78 किलो वजनाच्या व्यक्तीला 40 किलो पर्यंत वजन कमी करायचे असेल तर ते achievable नाही.

म्हणजेच सांगण्याचा उद्देश हाच की व्यावसायिक ध्येये मिळवण्याजोगी असावी.

4. वास्तववादी व्यवसाय ध्येये Realistic business goals

व्यवसाय ध्येये वस्तुस्थितीला धरून असावीत. उगाच हवेत गोळ्या झाडणारी नसावीत. कोणी म्हणेल मी माझा व्यवसाय सुरू केला आहे व एकाच वर्षात मी करोडपती होणार आहे तर हे शक्य आहे का?

शक्य आहे परंतु त्यासाठी काही वर्षे लागतील, कष्ट घ्यावे लागतील, अपयशांना सामोरे जावे लागेल. म्हणून तुमची व्यवसाय ध्येये Realistic  असावी.

कमी वर्षात करोडो पैसा कमवणे लॉटरी थोडी आहे. हा व्यवसाय आहे त्यासाठी तुमचे 100% तुम्हाला द्यावे लागतील.

5. वेळेचे बंधन Time bound  

आपल्या व्यवसायीक गोल्सची time frame फिक्स ठेवावी. कोणती ध्येये कोणत्या वेळेत पूर्ण करायची हे निश्चित करावे, आणि त्याच period मध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

उदाहरणार्थ एखादे ध्येय पूर्ण करण्यासाठी एक वर्ष, दोन वर्षे किंवा पाच वर्षे असा कालावधी निश्चित करावा.  

तुमचे व्यवसाय ध्येय कसे साध्य करावे?

व्यवसायिक ध्येये कशी साध्य करावीत हे खालील मुद्यांच्या आधारे स्पष्ट केले आहे. व्यावसायिक ध्येये साध्य करताना कोणत्या स्टेप्स पूर्ण कराव्यात हे खाली दिलेल्या मुद्यांद्वारे स्पष्ट केले आहे.

1. ध्येये लिहून काढा Write down business goals

जेव्हा तुम्ही तुमची व्यावसायिक ध्येये वहीत लिहून ठेवता तेव्हा ती साध्य होण्याची शक्यता जास्त असते. ज्याप्रमाणे माणसाला स्मरण असते त्याप्रमाणे विस्मरण सुद्धा असते.

दिवसभरामध्ये माणसाच्या डोक्यात हजारो विचार येतात व जातात त्यामुळे तुमचे तुमच्या व्यावसायिक ध्येयाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.

त्यासाठी तुम्ही निश्चित केलेली ध्येये दररोज तुमच्या डोळ्यासमोर असायला हवीत.

तुम्ही ज्या वहीत बिझनेस गोल्स लिहिली आहेत ती वही दररोज किंवा आठवड्यातून एकदा उघडून पाहावी.

2. प्रगतीवर लक्ष ठेवा Monitor Progress

यामध्ये तुम्हाला प्रोग्रेसवर लक्ष ठेवायचे आहे. तुमची प्रगती तपासायची आहे. यामध्ये तुम्हाला नोटबुकमध्ये लिहिलेले गोल्स तुम्ही क्रमानुसार पूर्ण करत चालला आहात का ते पाहावे लागणार आहे.

तुम्ही गोल्स लिस्टमध्ये ज्या कामाला प्राधान्य दिले आहे, त्याची प्रोग्रेस कशी आहे हे मॉनिटर करावे.

जोपर्यंत तुम्ही तुमची स्पेसिफिक व्यावसायिक ध्येय सेट करत नाही तोपर्यंत ती साध्य करणे कठीण आहे.

एका संशोधनानुसार ध्येय निश्चित करणे हे गोल सेट करणे आणि सक्सेस मिळवणे या दोन्ही मधील डायरेक्ट करेक्शन आहे.

बिजनेस गोल सेट केल्यामुळे तुम्हाला ज्या दिशेने व्यावसायिक प्रवास करायचा आहे हे निश्चित होते.

3. ध्येये बदलू नका स्ट्रेटेजी बदला Don’t change the goal, change the strategy

गोल्स सेट केल्यास ती शक्यतो बदलू नयेत. जर तुम्हाला तुमची व्यवसाय ध्येय मिळवण्यासाठी खूप अडथळे येत असतील, सारखे अपयश येत असेल तर ध्येय न बदलता ध्येय मिळवण्याच्या पद्धती बदलून पाहाव्यात. कामगार बदलून पाहावेत, यंत्रे बदलून पहावीत किंवा मार्केटिंगच्या पद्धती बदलून पहाव्यात.

Conclusion (निष्कर्ष)

व्यावसायिक ध्येये सेट करणे आणि ती साध्य करणे याकरिता तुमच्याकडे एक धोरणात्मक योजना, कष्ट करण्याची तयारी आणि सातत्य असायला हवे.

तसेच ती मिळवण्याकरिता तुमच्या ध्येयावरून तुमचे लक्ष विचलित झाले नाही पाहिजे. ध्येये मिळवण्याकरिता दररोज प्रोग्रेस तपासावी लागणार आहे, यामुळे तुम्ही तुमची व्यावसायिक ध्येये मिळवण्याच्या track वर राहाल.

Spread the love

About Uday Waghmare

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.

View all posts by Uday Waghmare →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *