ग्राहक शोधण्याचे १० मार्ग | How to find Customers in Marathi

ग्राहक चालत येत नाहीत ते मिळवावे लागतात. त्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. ग्राहक मिळवण्यासाठी, ग्राहक कसे वाढवावे यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स व स्ट्रॅटेजीचा वापर करावा लागतो.

वेगवेगळ्या प्लेटफॉर्म्सचा वापर करावा लागतो. जनरली मार्केट मधील मोठमोठे बँड ग्राहक मिळवण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करतात ते आपण याठिकाणी पाहूया.

ग्राहक शोधण्याचे मार्ग पाहण्यापूर्वी ग्राहक म्हणजे काय, ग्राहक कोणाला म्हणतात हे जाणून घेऊया.

ग्राहक म्हणजे काय व्याख्या

1. वस्तू किंवा सेवेच्या बदल्यात पैसे देणारा व्यक्ती ग्राहक असतो. 2. वस्तू किंवा सेवा खरेदी करणारा व्यक्ती ग्राहक होय.

1. वापरकर्ता-अनुकूल वेबसाइट बनवा Make a user-friendly website

वापरकर्ता-अनुकूल वेबसाइट बनवा

ग्राहकांना तुमच्यापर्यंत, तुमच्या उत्पादनापर्यंत पोहचण्याचा हा एक online मार्ग आहे. त्यासाठी सध्याच्या digital काळात तुमच्या व्यवसायाचीवेबसाईट असणे अत्यंत गरजेचे आहे.

तुमच्या कंपनीच्या वस्तू online डिस्प्ले करण्यासाठी तुमच्याकडे एक world class वेबसाईट असणे आवश्यक आहे. तुमची वेबसाईट user-friendly असायला हवी. ज्यावेळी विजीटर तुमच्या वेबसाईटवर येईल तेव्हा त्याला वेबसाईट neat आणि clean दिसायला हवी.

वेबसाईटवर प्रदर्शित केलेल्या वस्तूंचे थोडक्यात introduction व description दिलेले असायला हवे. तसेच तुमची उत्पादने ग्राहकांच्या कोणत्या समस्येवर solution देतात याबद्दलची माहिती product पेजवर द्यायला हवी. ज्यामुळे ग्राहक convert होण्यास मदत होईल.

Call to action, shop now, learn more सारखे बटनस असायला हवेत. जेणेकरून ग्राहकांना वस्तूंची समाधानकारक माहिती मिळवता येईल.

जर तुमच्या व्यवसायात वेगवेगळ्या क्षेत्रातील निरनिराळे products तयार होत असतील तर वेबसाईटवर तशा categories तयार कराव्यात. आणि त्या त्या कॅटेगरीमध्ये ते ते product अड्ड करावेत.

उदाहणार्थ जर तुमच्याकडे शेतीसंबधित वस्तू आणि घरगुती वस्तू असे products तयार होत असतील तर शेतीसंबधित वस्तूसाठी Agri products, घरगुती वस्तूंसाठी home products या categories बनवाव्यात. तुमच्या व्यवसायाची वेबसाईट तयार करणाऱ्या वेबसाईट डेव्हलपरला तुम्ही तशा सूचना देऊन वेबसाईट बनवून घेउ शकता. 

2. सोशल मीडियाची उपस्थिती Social media presence

सोशल मीडियाची उपस्थिती

Facebook, Instagram, YouTube व linkedin सारख्या प्लॅटफॉर्म्सवर तुमचे प्रोफेशनल व्यावसायिक खाते असायला हवीत. त्यावर फक्त आणि फक्त व्यवसाया संबंधित पोस्ट, फोटो, व्हिडिओज अपलोड केलेले असावेत.

अशा सोशल मीडियाच्या सर्व अकाउंट्‍सवरून कॉमेडी, मनोरंजन या विषयांना अजिबात थारा नसावा. असे सर्व व्यर्थ कन्टेन्ट त्वरित डिलीट करायला हवे.

ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा सोशल मीडिया एक उत्तम व जलद मार्ग आहे. महिला, पुरुष व विद्यार्थी आजकाल बऱ्याचशा दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू ऑनलाइन मागवतात.

आजचा तरुण वर्ग आपल्या दिवसाच्या चोवीस तासातील सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर खर्च करतो. त्यामुळे तुम्ही व्यावसायिक म्हणून सोशल मीडियावर सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. तुमच्या व्यवसायांच्या सर्व अपडेट्स सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचवाव्यात.

या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे फेसबुक, गुगल, यूट्यूब आणि Instagram या प्लॅटफॉर्मचे सर्च इंजन त्यांच्या प्लॅटफॉर्मवर active असणाऱ्या creators चे कंटेंट इतर विजिटर्सना सतत रेकमेंड करत असते, त्यामुळे तुमचे नवीन  फॉलोवर्स/सबस्क्राईब वाढतात. त्यासाठी सोशल मीडियावर तुमचा प्रेझेन्स असायला हवा.

3. Word of mouth strategy

तुमचा व्यवसाय ज्या क्षेत्रातील आहे त्या क्षेत्रात काम करणारे बरेच एजंट तुम्हाला पाहायला मिळतील. अशा एजंट सोबत मीटिंग करून तुमची उत्पादने त्यांच्या नेटवर्कमधील लोकांना रेफर करण्यासाठी बोलू शकता.

जर एजंटने तुम्हाला ग्राहक मिळवून दिले तर तुम्ही त्यांना ठराविक कमिशन द्यावे. जर तुम्हाला लवकर ग्राहक हवे असतील तर एजंट्सला आकर्षक कमिशन द्या मग बघा असे एजंट ग्राहकांना इम्प्रेस करून तुमच्या दुकानात घेऊन येतील.

जुन्या ग्राहकांना फोन करा हवे तर प्रत्यक्ष भेटा आणि त्यांना तुमच्या वस्तूंचा आलेला अनुभव विचारा.

मग त्यांना एक विनंती करा कि सर जसा तुम्हाला फायदा झाला तसा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना फायदा व्हावा असे तुम्हाला वाटते का? साहजिकच यावर ग्राहक उत्तर देईल, “का नाही सर, फायदा झालेला चांगलाच आहे!” मग त्यांच्या नातेवाईकांना तुमच्या वस्तू रेफर करायला विनंती करा.

हवे तर त्यांच्या मित्रांचे नातेवाईकांची संपर्क क्रमांक घ्या आणि त्यांना कॉल करून तुमच्या वस्तूंची माहिती द्या.

4. स्थानिक कार्यक्रमांद्वारे Through local events

जिल्हास्तरावर तालुकास्तरावर आयोजित केलेल्या प्रदर्शनांमध्ये सहभागी व्हा. प्रदर्शनांमध्ये, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हा ग्राहक शोधण्याचा चांगला मार्ग आहे.

अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या वस्तूंची जाहिरात करता येते. नवीन लोकांशी ओळखी वाढतात नेटवर्क वाढते पुढे याच ओळखीचे व्यवहारात रुपांतर होते. त्यामुळे अशा इव्हेंट्समध्ये नक्की भाग घ्यावा.

5. स्थानिक पातळीवर वर्तमानपत्रांद्वारे जाहिरात करा Advertise locally through newspapers

वर्तमानपत्रांद्वारे जाहिरात

स्थानिक प्रसिद्ध वर्तमानपत्रे, मासिके यामध्ये उत्पादनांची जाहिरात करावी. आज आपल्याकडे सकाळ, पुढारी, पुण्यनगरी, ऍग्रोवन अशी बरीच प्रसिद्ध वर्तमानपत्रे येतात.

या वर्तमानपत्रे वाचकांची संख्या देखील मोठी आहे. अशा वर्तमानपत्रांमध्ये उत्पादनांच्या वैशिष्ट्यसह जाहिरात प्रसिद्ध करणे स्थानिक ग्राहक मिळवण्याचा चांगला पर्याय ठरू शकतो.

6. रेफरल योजना Referral schemes

जास्तीत जास्त ग्राहकांना खेचून आणण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. मार्केटमध्ये असे बरेचसे ॲप्स आहेत, इकॉम वेबसाईट्स आहेत, तसेच इलेक्ट्रॉनिक्स store आहेत जे रेफरल प्रोग्रॅम चालवतात.

यामध्ये जुन्या ग्राहकांना नवीन ग्राहक मिळवून दिल्याबद्दल कमिशन पे केले जाते. ते कमिशन पाच टक्के दहा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असते.

जास्त सेल्स आल्यामुळे कंपनीला कमिशन द्यायला परवडते. तुमच्या ग्राहकांना रेफरल स्कीम समजावून सांगा, आणि जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न करा.

7. प्रभावकांशी भागीदारी करा Make partnerships with influencers

सोशल मीडिया इन्फ़्लुएनसरशी कॉन्टॅक्ट करा. त्यांना तुमच्या वस्तू व्हिडिओजच्या माध्यमातून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर प्रमोट करायला सांगा. यामुळे तुमच्या वस्तूंची जाहिरात त्यांच्या फॉलोवर्स पर्यंत पोहोचेल.

लोक उगाच कोणालाही फॉलो करत नाहीत, त्यांचे कंटेंट त्यांना आवडते त्यांचा त्यांच्यावर विश्वास असतो म्हणून ते त्यांना फॉलो करतात. यामुळे तुमच्या वस्तू खरेदी होण्याचे चान्सेस वाढतात.

8. घरोघरी भेट देणे Door to door visiting

दारोदारी जाऊन ग्राहकापर्यंत पोहोचणे. ही पद्धत सर्वच व्यवसायांना लागू होते असे नाही परंतु क्लासेससाठी विद्यार्थी शोधणे, शेती औषधी बियाणे विक्रीसाठी शेताच्या बांधावर जाऊन पोहोचणे अशा प्रकारच्या व्यवसायासाठी प्रभावी ठरते. घरगुती लागणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू, कपडे घरोघरी जाऊन विकता येतात.

9. तत्सम व्यवसायाला भेट देणे Visiting similar business

तुमच्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या इतर व्यवसायिकांशी भेटणे. तुम्ही तुमच्या व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या इतर छोट्या मोठ्या व्यवसायिकांना वस्तु विक्रीसाठी भेट देऊ शकता.

10. तुमचे ग्राहक वर्तन समजून घ्या Understand your consumer behavior

अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे ग्राहक तुमच्या वस्तू विकत घेणे पसंत करतो. त्यांना तुम्ही केलेली वस्तूंची जाहिरात प्रभावित करते का? त्यांना तुमच्या वस्तूंची गुणवत्ता आवडते का? तुमच्या वस्तूंच्या किमती कमी आहेत म्हणून ते खरेदी करतात का? या गोष्टी तुम्ही तपासायला पाहिजेत. यातून बाहेर निघालेल्या गोष्टींची तुम्ही कुठेतरी नोंद करून ठेवावी.

तुम्ही तयार केलेल्या वस्तूंचा आणि ग्राहकांचा भावनिक संबंध आहे का हे सुद्धा तपासावे. यातून जो निष्कर्ष बाहेर येईल त्यावर भर देऊन काम करावे म्हणजे विक्री जास्त वाढेल व नवीन ग्राहक देखील वाढतील.

काही वेळा आपली उत्पादने गुणवत्तापूर्ण व कमी किमतीची असतात तसेच आपण मार्केटिंग सुद्धा चांगली करतो परंतु हवा तसा सेल्स मिळत नाही.

पण जर अचानक सेल्स वाढला तर तो कशामुळे वाढला आपल्या कोणत्या स्ट्रॅटेजीमुळे वाढला हे शोधावे व त्या गोष्टीवर आणखी चांगले काम करावे.

Conclusion (निष्कर्ष)

ग्राहक शोधण्याचे परंपरागत तसेच आधुनिक मार्ग आहेत. ग्राहक शोधताना या दोन्ही मार्गाचा अवलंब करावा लागतो. तरच ग्राहक शोधण्यात आपण यशस्वी ठरू शकतो.

स्थानिक कार्यक्रमांद्वारे, Word of mouth strategy, घरोघरी भेट देणे, प्रभावकांशी भागीदारी करणे, तत्सम व्यवसायाला भेट देणे हे काही ग्राहक शोधण्याचे प्रभावी मार्ग आहेत.

Spread the love

Leave a Comment