How to earn money from Amazon selling? | अमेझॉन सेलिंगमधून पैसे कसे कमवायचे?

Amazon Seller Complete Course 2025 / अमेझॉन वर सेलिंग कशी करावी ?

Amazon Seller Complete Course in marathi

2025 मध्ये जर तुम्हाला अमेझॉन India वर प्रॉडक्ट्स विकायला सुरुवात करायची असेल, तर ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे. इथे आपण A to Z Complete Amazon Selling बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. मागच्या काही वर्षांच्या e-commerce अनुभवातून आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे की अमेझॉनवर सेलिंग करण्याचे फायदे काय आहेत, नुकसान कुठे होऊ शकते, सेलर कसे बनता येईल, अमेझॉनचे commission, payment system आणि pricing कशी असते याबद्दल देखील सविस्तर माहिती दिली आहे.

आजच्या घडीला भारतामध्ये 14 लाखांपेक्षा जास्त विक्रेते अमेझॉनवर विक्री करत आहेत आणि believe me, अमेझॉन एक असं marketplace आहे जे इतर प्लॅटफॉर्मपेक्षा कमी returns, चांगले business analytics आणि एक proper business strategy बनवण्यासाठी परफेक्ट आहे. सेलर झाल्यावर तुम्हाला global selling, B2B selling आणि Amazon warehousing services चा लाभ घेता येईल. फक्त GST number आणि बँक अकाउंट असला की तुम्ही अमेझॉनवर तुमचा ऑनलाइन बिजनेस सुरू करू शकता.

सगळ्यात खास म्हणजे अमेझॉनचं advanced ad system आहे. तुम्ही तुमच्या ग्राहकांची आवड, जागा आणि छंदच्या बेस वर टार्गेट करू शकता. शिवाय Prime Day आणि Great Indian Festival सारखे मोठे events leverage करून तुमच्या ऑर्डर वाढवता येतात आणि एक चांगला ब्रँड अमेझॉनवर तयार करता येईल. आज अमेझॉन दररोज 6 million पेक्षा जास्त प्रॉडक्ट विकत आहे, आणि आता AI automation मुळे त्यांची विक्री आणि खरेदी दोन्ही झपाट्याने वाढतच चालली आहेत.

🚀 Amazon Seller Registration Process 2025 (अमेझॉन सेलर रजिस्ट्रेशन प्रोसेस मराठीत)

अमेझॉन वर सेलिंग कशी करावी

जर तुम्हालाही अमेझॉन सेलर व्हायचं असेल, तर सगळ्यात पहिला स्टेप आहे 👉 Onboarding / Seller Registration आहे. हा प्रोसेस step-by-step खाली दिला आहे:

1. Create Amazon Seller Account (अमेझॉन अकाउंट तयार करा)

  • सर्वात आधी “Sell on Amazon” गुगलवर सर्च करा, आणि पहिल्या लिंकवर क्लिक करा.
  • Create Amazon Account वर क्लिक करा.
  • इथे आपला First Name, Mobile Number आणि Strong Password टाका.
  • Mobile number वर आलेला OTP टाकून Verify करून घ्या.
  • कधी कधी छोटं Puzzle Solve करावं लागतं, ते फक्त Authentication साठी आहे.

2. Add Email & Two-Step Verification (ईमेल अ‍ॅड करा आणि टू-स्टेप व्हेरिफिकेशन)

  • पुढच्या स्टेपमध्ये Email ID द्या (ज्यावर तुम्ही Amazon कडून regular communication करू शकता).
  • नुकताच तयार केलेला Password वापरून Login करा.
  • Two-Step Verification enable करा → Amazon प्रत्येक वेळी लॉगिन करताना OTP मागेल.
  • यामुळे account हॅक होण्याची शक्यता जवळजवळ zero होऊन जाते.

3. GST Verification (जीएसटी व्हेरिफिकेशन)

  • अमेझॉनवर प्रॉडक्ट्स सेल करण्यासाठी GST नंबर बंधनकारक आहे.
  • जर GST नसेल, तर फक्त पुस्तकासारखी products तुम्ही सेल करू शकता.
  • GST details टाकताच system तुमचं डेटा auto-fetch करतो.
    GST PDF Upload करून Submit करा.
  • व्हेरिफिकेशनला थोडा वेळ लागतो, पण दरम्यान बाकी रजिस्ट्रेशन पुढे सुरू ठेवता येतं.

4. Store Name & Pickup Address (स्टोअर नेम आणि पिकअप अ‍ॅड्रेस)

  • अमेझॉनवर तुमच्या स्टोअरला नाव द्यावं लागतं → Personal name, Firm name किंवा तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता.
  • Pickup Address auto-fetch होतो (GST details वरून).
    हवं असल्यास New Address manually add करू शकता.
  • लक्षात ठेवा 👉 Pick-up address तोच द्या जिथून अमेझॉन तुमचे प्रॉडक्ट कलेक्ट करणार आहे म्हणजे डिलिव्हरीसाठी घेऊन जाणार आहे.

5. Choose Shipping Method (शिपिंग मेथड निवडा)

  • Amazon दोन पर्याय देतो:
    Self-Ship → तुम्ही तुमच्या पध्दतीने स्वतः ग्राहकाला प्रॉडक्ट पोहोचवाल.
  • Amazon Easy Ship / FBA → Amazon तुमचं प्रॉडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवेल.
  • 👉 सुरुवातीला बहुतेक Sellers Amazon shipping वापरतात कारण ते सोपं आणि professional आहे.

6. Shipping Fees Preference (शिपिंग फी प्रेफरन्स)

  • अमेझॉनडिलिव्हरीसाठी तीन प्रकारच्या shipping fees घेतो: Local, Regional, National.
  • तुमच्याकडे दोन पर्याय असतात:
    Customer कडून Delivery Charges घ्या
    किंवा Free Delivery द्या आणि charges Product Price मध्ये add करा.
  • 👉 Pro Tip: Product price मध्ये shipping cost add करून Customer ला Free Delivery देणं कधीही फायदेशीर ठरतं.

7. Bank Details (बँक डिटेल्स भरा)

  • तुमचं Bank Account Number, IFSC Code इत्यादी माहिती व्यवस्थीत भरा.
  • अमेझॉन त्याची verification करून घेईल.
  • Payments थेट या account मध्ये transfer होत जातील.

8. GST Slab Selection (जीएसटी स्लॅब निवडा)

  • प्रत्येक प्रॉडक्टचा GST Slab वेगळा आहे.
  • Amazon इथे काही करत नाही, पण record ठेवत असतो.
  • शेवटी GST filing तुम्हालाच करावी लागते.

9. Add Products (प्रॉडक्ट्स अ‍ॅड करा)

  • एकदा Seller Account तयार झाला की, तुम्ही तुमचे Products add करू शकता.
  • Product details भरून “Add Product & Start Selling” वर क्लिक करा.
  • तुमचं Seller Dashboard आता तयार झालेले दिसेल 🎉

10. Upload Digital Signature (डिजिटल सिग्नेचर अपलोड करा)

  • Seller Central मध्ये Settings → Account Info → Tax Information मध्ये जा.
  • इथे Upload Digital Signature चा ऑप्शन मिळतो.
  • पांढऱ्या पेपरवर केलेला Signature Scan करून अपलोड करा.
    Amazon तो Invoice वर दरवेळेस वापरणार आहे.
  • Upload केल्यानंतर system “Approved Successfully” दाखवेल.

✅ एवढं केलं की तुमचं Amazon Seller Registration process पूर्ण होतं. आता तुम्ही प्रॉडक्ट्स लिस्ट करून Selling सुरू करू शकता.

अमेझॉन फी स्ट्रक्चर आणि प्राइसिंग कॅल्क्युलेशन (Amazon Fee Structure & Pricing Calculation)

How to earn money from Amazon selling

1) रेव्हेन्यू/प्रॉफिट कॅल्क्युलेटर कसा वापरायचा (How to use the Revenue / Profit Calculator)

  • Seller Central मध्ये search बॉक्स मध्ये “Revenue Calculator” / FBA Calculator लिहा आणि ती लिंक उघडा.
  • आपण एखादा product शोधला किंवा त्याचे वजन, dimension, price, shipping cost टाकले, तर मग system तुम्हाला Amazon fees (referral, closing, fulfillment) आणि अंदाजे profit दाखवेल.

2) रेफरल फी / कमिशन म्हणजे काय (Referral Fee / Commission explained)

  • प्रत्येक प्रॉडक्ट विक्रीवर Amazon एक referral fee घेतो, ही तुमच्या product च्या selling price चे एक ठराविक टक्केवारी असते. (Formula: Item price × Referral %).
  • 2025 मध्ये अनेक categories मध्ये item price ≤ ₹300 साठी 0% referral fee असलेले exception आहेत, म्हणजे कमी किंमतीचे (eligible sub-categories) items वर referral fee 0 राहू शकते. पण ही category-specific आहे,ती seller central वर नेहमी चेक केली पाहिजे.

3) क्लोजिंग फी काय आहे (Closing Fee / Fixed fee)

Closing Fee हे product price range आणि fulfillment channel नुसार fixed fee असते (उदा. FC / Easy Ship / Self-Ship साठी वेगवेगळे).

सोप उदाहरण: Easy Ship मध्ये ₹0–300 रेंजसाठी fixed closing fee = ₹6 असू शकते; ₹301–500 साठी = ₹11 असू शकते ,परंतु exceptions category वर depend करतात.

4) वेट-हँडलिंग / शिपिंग फी (Weight-handling / Shipping Fee)

  • Amazon ची शिपिंग / weight-handling fees वजन + distance + fulfilment channel वरून ठरतात.
  • Official पेजवरून पाहता येते की शिपिंग fees “starts at Rs. 29 per item shipped” लिहतात आणि नंतर वजनानुसार वाढतात. त्यामुळे वजन कमी ठेवणं फायदेशीर आहे.

5) कॅन्सलेशन चार्जेस (Cancellation Charges)

  • Order cancel केल्यास seller ला cancellation चार्ज लागू होऊ शकतो:
  • If cancelled on or before Estimated Ship Date → 100% of referral fee charged; if cancelled after → 150% of referral fee charged (हे Seller Central च्या नियमानुसार लागू होते). त्यामुळे cancellation management महत्वाच आहे.

6) आणखीन Fees – टॅक्सेस व इतर (Other fees – Taxes etc.)

Fees वर applicable taxes (GST इ.) लागू होऊ शकतात, ही समजा तुम्हाला final accounting करताना add करावी लागेल. (Seller Central वर fees आणि tax rules तपासावेत).

7) प्राइसिंग सेट करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी (Practical Pricing & Strategy tips)

  1. तुमच्या category चा referral % आणि price-slab नक्की तपासा. (₹300 हा एक महत्त्वाचा ब्रेक-पॉईंट आहे,बर्‍याच categories मध्ये वेगळा व्यवहार आहे).
  2. shipping weight शक्यतो कमी ठेवा,कारण weight-handling charges वाढतात.
  3. काही वेळा ₹299 सारखी किंमत ठेवून तुम्ही थोड्या कमी fees मध्ये जाऊ शकता (0% referral काही categories मध्ये). पण हे category-specific आहे ,त्यामुळे decision घेण्यापूर्वी revenue calculator नक्की तपासा.

8) उदाहरण (Examples – step-by-step calculations)

  • खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये मी प्रसिद्ध Amazon fee-types वापरून गणित केले आहे पण तुमच्या वास्तविक category/weight/fulfillment नुसार result बदलणार आहे.
  • म्हणून प्रत्येक वेळी Seller Central Revenue Calculator वापरून final नंबर verify करा.

Example A – छोट्या किमतीचा प्रॉडक्ट (Sell price = ₹299)

  1. Assume: हा product त्या category मध्ये येतो जिथे ₹0–300 वर referral = 0%. (Amazon fee-tableप्रमाणे काही sub-categories मध्ये असं आहे).
  2. Closing fee (Easy Ship, ₹0–300) = ₹6.
  3. Estimated weight-handling / shipping (base start) = ₹29 (minimum base — weight नुसार वाढेल).
  4. Total Amazon fees = closing + shipping = ₹6 + ₹29 = ₹35.
    Net after-fees revenue = ₹299 − ₹35 = ₹264.
  5. जर तुम्ही product ₹100 मध्ये खरेदी केले असेल (purchase cost = ₹100), तर profit = ₹264 − ₹100 = ₹164.
  6. Step-by-step: 6 + 29 = 35 → 299 − 35 = 264 → 264 − 100 = 164.

Example B – मध्यम किमतीचा प्रॉडक्ट (Sell price = ₹500)

  1. Assume: तुमच्या category मध्ये ₹301–500 रेंजसाठी referral fee = 11% (हे category-specific आहे — check your category).
  2. Referral = 11% of ₹500 = ₹55. (500 × 0.11 = 55)
  3. Closing fee (Easy Ship, ₹301–500) = ₹11.
  4. Estimated shipping (base) = ₹29 (weight वरून वाढू शकते).
  5. Total Amazon fees = 55 + 11 + 29 = ₹95.
  6. Net after-fees revenue = ₹500 − ₹95 = ₹405.
  7. जर तुम्ही product ₹350 मध्ये खरेदी केले असेल, तर profit = ₹405 − ₹350 = ₹55.
  8. Step-by-step: 500×11% = 55 → 55 + 11 + 29 = 95 → 500 − 95 = 405 → 405 − 350 = 55.

9) कोणती काळजी घ्यावी

Amazon वर चांगला नफा काढायचा असेल तर

(a) category-wise referral % नक्की तपासा,
(b) price-slab ची रणनीती ठरवा (कधी ₹299 सारखी स्लॅब फायदेशीर असते)
(c) प्रॉडक्टचे वजन कमी ठेवा किंवा packaging optimize करा. आणि नेहमी Seller Central Revenue Calculator वापरून final confirm करा.

आपल्या प्रॉडक्टची प्राइसिंग कशी ठरवावी? (Amazon Pricing Strategy 2025)

Amazon वर सेलिंग करताना सर्वात मोठा प्रश्न असतो, “प्रॉडक्ट कितीला सेल करावा?”. कारण इथे फक्त खरेदी किंमत न बघता Amazon चे charges, packaging, shipping आणि misc खर्च हेसुद्धा पाहावे लागतात. चला आता step-by-step बघूया:

1) Cost of Goods (खरेदी किंमत)

सुरुवात होते product cost पासून. उदा. तुम्ही मार्केटमधून ₹100 ला टी-शर्ट bulk मध्ये आणलात, तर तुमची बेसिक cost = ₹100 असणार आहे.

2) Amazon Revenue Calculator चा वापर

  1. Amazon कडे एक Revenue Calculator आहे, ज्यात तुम्ही प्रॉडक्टची माहिती भरून अंदाजे profit margin किती होईल हे पाहू शकता.
  2. Search करा → ASIN नंबर टाकून तुम्ही product चं existing selling price, commission वगैरे पाहू शकता.
  3. Product dimensions (Length × Breadth × Height) आणि weight (उदा. 0.4 kg = 400 gram) टाका.
    Category निवडा (उदा. Baby Apparel, Electronics इ.) कारण referral fee category वर depend करते.

3) Selling Price Decide करणे

समजा तुम्ही तुमचं T-shirt ₹299 ला लिस्ट करायचं ठरवलं. शिपिंग चार्जेस ग्राहकांकडून घेऊ नका; ते price मध्येच adjust करा. (उदा. 299 मध्ये shipping include).

4) Amazon Fees (Referral + Closing Fee)

  1. Referral Fee: Category नुसार % मध्ये (उदा. Apparel वर ~6%).
  2. Closing Fee: Fixed ₹ per order (उदा. ₹9).
  3. 👉 299 च्या टी-शर्टवर referral fee साधारण ₹17.94 आणि closing fee ₹9 धरली जाणार आहे.

5) Fulfilment Cost (Packing + Shipping)

  1. Packing material (उदा. polybag, label, tape) = ₹5
  2. Shipping charge (national level धरून) = ₹77

6) Miscellaneous Cost (रिटर्न्स, Ads, Losses)

  1. बर्‍याच sellers ही cost विसरतात.
    Reverse shipping, returns, lost/damaged items, ads इत्यादीसाठी ~10% buffer धरावा.
  2. उदा. 299 चं product → ₹30 (misc. cost) धरून तुम्हाला चालावा लागेल.

7) Profit Calculation

👉 आता total cost calculation:

  1. Product cost = ₹100
  2. Referral + Closing Fee = ₹27
  3. Fulfilment cost = ₹82 (Packing + Shipping)
  4. Misc. cost = ₹30
  5. Tax on Fees = ₹4
  6. Total cost = ₹243 Selling Price = ₹299 ➡ Profit = ₹55.21 per unit (Net margin ~18%).

8) प्रॉडक्ट cost बदलल्यास

जर प्रॉडक्ट तुम्हाला ₹150 ला पडला, तर ₹299 ला विकल्यास profit कमी होऊन ₹5 उरेल.
त्यामुळे किंमत वाढवून ₹349 ठेवल्यास नफा ₹45 येईल.

9) FBM vs FBA Comparison

  1. FBM (Fulfilled by Merchant): स्वतःच्या warehouse मधून sell केल्यास profit जास्त (उदा. ₹55) होईल.
  2. FBA (Fulfilled by Amazon): Extra storage, packing, technology charges मुळे profit कमी (उदा. ₹34) होईल.

👉 त्यामुळे प्रॉडक्ट pricing करताना Amazon Fees + Fulfilment + Misc. खर्च add करूनच selling price ठरवत जा. नाहीतर initial profit दिसेल, पण returns आणि जाहिरातनंतर तुम्ही नुकसानमध्ये जाऊ शकता.

Amazon वर सेलिंग वाढवण्यासाठी 10 खास ट्रिक्स (Amazon Seller Growth Tips 2025)

अमेझॉनवर beginner असो किंवा advanced seller, काही बेसिक आणि काही advanced tricks वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय खूप वेगाने वाढवू शकता. चला एक-एक करून बघूया:

1) लिस्टिंग ऑप्टिमायझेशन (Listing SEO)

अमेझॉनवर search visibility मिळवण्यासाठी लिस्टिंग ऑप्टिमायझेशन सर्वात महत्वाचं आहे.

  1. Title: प्रॉडक्टचा USP, benefits आणि keywords टाका.
  2. Description: customer-friendly लिहा, copy-paste टाळा.
  3. Bullet Points: स्पष्ट आणि attractive ठेवा.
  4. Generic Keywords: योग्य search terms वापरा जेणेकरून product rank होऊ शकते.

2) इमेज ऑप्टिमायझेशन (Image Optimization)

  1. कस्टमर सर्वात आधी प्रॉडक्ट image बघतो.
    Primary image simple ठेवा (Amazon rulesनुसार).
  2. Secondary images मध्ये features, lifestyle shots दाखवा. 👉 Good images = जास्त clicks = जास्त conversions मिळू शकता.

3) A+ लिस्टिंग आणि ब्रँड स्टोरी (A+ Content & Brand Story)

  1. Private label seller असल्यास A+ content वापरा.
  2. Detailed images + product features द्या.
  3. तुमच्या ब्रँडची story share करा → customer ला emotionally connect करण्यासाठी ती महत्वाची आहे.

4) रेग्युलर लिस्टिंग्स (Regular Listings)

  1. Amazon नवीन लिस्टिंगला extra visibility देतो.
  2. महिन्याला एक तरी नवीन प्रॉडक्ट किंवा combo add करत राहा.
  3. जुन्या listings active ठेवण्यासाठी नियमित अपडेट करत रहा.

5) प्रॉडक्ट वेरिएशन्स (Product Variations)

  1. जास्त variations = जास्त conversion chances असतात.
  2. Color, size, design variations द्या.
    एकाच दुकानात variety असल्यास customers तिथेच buy करत असतात.

6) कॉम्बो लिस्टिंग्स (Combo Listings)

  1. तुमचे products combine करा:
    उदा. 4 T-shirts वेगवेगळे list करा → नंतर त्यांचे combos (2-pack, 3-pack, 4-pack) तयार करा.
  2. Combos = अधिक listings + जास्त visibility येईल.

7) सीझनल आणि फेस्टिवल कलेक्शन (Seasonal & Festival Strategy)

  1. India मध्ये sales = seasons + festivals.
    Prime Sale, Great Indian Festival, Christmas, Diwali सारख्या events target करा.
  2. तुमची category seasonal नसेल तरी gift products नक्की लिस्ट करू शकतात.

8) Competitive Pricing ठेवा

  1. प्रॉडक्टचं quality त्याच्या price ला justify करायला हवं.
  2. प्रॉडक्ट स्वतः use करा आणि value check करा.
  3. Overpriced असेल तर returns वाढतील.
  4. योग्य price ठेवल्यास चांगले reviews फास्ट मिळतात.

9) Pricing Method & Returns Handling

Price ठरवताना खालील factors consider करा.

  1. Referral Fee, Closing Fee
  2. Returns, refund charges
  3. Ads, promotions 👉 या खर्चाचा हिस्सा selling price मध्ये include करा, नाहीतर profit कमी होईल.

10) No to Mapping (Avoid Price War)

  1. Amazon वर आधीपासून listed product वर “mapping” करू नका.
  2. Price war मध्ये profit मार्जिन संपतो.
  3. Buy Now button सुद्धा competitor कडे जाईल. ✅ त्याऐवजी स्वतःचं Private Label Brand build करा, USP तयार करा आणि नवीन listing घ्या.

👉 या 10 tricks वापरून तुम्ही Amazon वर तुमचं business steadily grow करू शकता, smart listings, pricing strategy आणि brand building हीच key आहेत.

Amazon वर विक्री करण्याचे तोटे (Disadvantages of Selling on Amazon)

अमेझॉनवर सेलिंग करणे फायदेशीर आहेच, पण त्यासोबत काही challenges सुद्धा आहेत. चला बघूया:

1) कॉम्प्लिकेटेड सेलर डॅशबोर्ड (Complicated Seller Dashboard)

  1. Amazon Seller Dashboard सुरुवातीला समजायला थोडा अवघड वाटतो.
  2. Reports, inventory, returns, ads management हे सगळं navigate करणं beginner ला कठीण जाऊ शकतं.
    पण काही दिवस वापरल्यानंतर हळूहळू तुम्हाला त्याची सवय लागते.

2) अमेझॉनचं Step System (Growth Takes Time)

  1. नवीन सेलरसाठी सुरुवातीला growth slow असतो.
  2. Amazon वर brand visibility मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतो.
  3. जस जसे orders वाढतात, तसतसा trust आणि visibility आपोआप वाढते.

3) Professional Approach ची गरज (Need for Deep Learning)

  1. Amazon वर selling म्हणजे फक्त products टाकणं नाही.
  2. तुम्हाला SEO, pricing, ads, inventory management याबद्दल शिकावं लागेल.
  3. Without professional approach, तुम्हाला long-term success मिळणं अवघड आहे.

Final Words :-

ही पोस्ट तुमच्यासाठी एक मार्गदर्शन आहे, जी Amazon business सुरू करण्यामध्ये मदत करेल. जर तुम्हाला वाटलं ही माहिती उपयोगी आहे, तर share करा त्या मित्राबरोबर जे Amazon वर e-commerce सुरू करू इच्छितात.

Leave a Comment