गुऱ्हाळ ऊद्योग माहिती मराठी | Gurhal Udyog Information in Marathi

हानिकारक साखरेला चांगला पर्याय म्हणून आता आहारात गुळाची निवड केली जात आहे. गुळ, सेंद्रिय गुळ यांमधून मिळणारे नैसर्गिक घटक पाहता ग्राहक साखरे ऐवजी गुळ खरेदीला पसंती देत आहेत.

चला तर मग गुळ उद्योगात ऊसाच्या रसापासून गुळ तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे आणि यशस्वीरित्या गुळ उद्योग कसा सुरु करायचा ते पाहूया.

गुऱ्हाळ म्हणजे काय?

गुऱ्हाळ म्हणजे काय?

ज्या ठिकाणी गुळ तयार करण्याची संपूर्ण प्रकिया पार पाडली जाते त्या ठिकाणाला, त्या सर्व यंत्रसामग्रीला गुऱ्हाळ असे म्हणतात.

गुऱ्हाळ उभ करण्यासाठी भांडवल

छोटे सिंगल भट्टीचे गुऱ्हाळ जर उभ करायचं असेल तर कमीत कमी 15 लाख रुपये भांडवल लागते.

15 लाखांमध्ये चांगल्या प्रकारच गुऱ्हाळ उभं राहत. यानंतर गुळाचे packing, मार्केटिंग, कामगारांचा पगार, ऊस खरेदी, ट्रान्सपोर्टचा खर्च हा वेगळा असणार आहे.

कच्च्या मालाची ऊपलब्धता

गुळ निर्मितीसाठी कच्चा माल ऊस पीक आहे. तुमच्याकडे जर स्वतःची ऊस शेती असेल तर तुम्हाला गुळ कारखान्यासाठी लागणारा कच्चामाल तुमच्याच शेतीतून मिळेल आणि जर तुमच्याकडे ऊस शेती नसेल तर तुम्ही तुमच्या परिसरातील ऊस ऊत्पादक शेतकऱ्याकडून ऊस विकत आणू शकता.

गुळ विक्रीकरिता बाजारपेठ

तयार माल मोठमोठ्या शहरांमध्ये विक्री करता पाठवला जातो. तसेच स्थानिक होलसेलर, रिटेल दुकानदार, ग्राहक प्रत्यक्ष गुळ कारखान्याला भेट देऊन गुळ खरेदी करतात.

गुळ विक्रीकरता गुळाच्या जाहिरातीवर जास्त खर्च करावा लागत नाही. माल दर्जेदार असेल तर स्वतः ग्राहकच जाहिरात करतात.

सेंद्रिय गुळ निर्मिती

सेंद्रिय गुळ निर्मिती

आता सगळीकडे सेंद्रिय गुळाचे वारे वाहत आहे. लोक केमिकल प्रक्रियेतून तयार केलेल्या गुळाऐवजी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला गुळ खाऊ लागले आहेत.

सेंद्रिय गुळ केमिकलच्या गुळापेक्षा थोडासा महाग असतो. परंतु सेंद्रिय गुळाला एक नैसर्गिक चव गंध असतो.

तसेच सेंद्रिय गूळ जीवनसत्वाने भरपूर असतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल, कृत्रिम रंग, फ्लेवर न वापरल्यामुळे तो आरोग्यास ऊत्तम मानला जातो. सेंद्रिय गुळाला मोठी मागणी असल्यामुळे सेंद्रिय गुळ विक्रीतून चांगला आर्थिक फायदा होतो.

भरपूर मागणी असलेले गुळाचे इतर प्रकार

गुळाचे इतर प्रकार

गुळाचे क्यूब, काकवी, गुळ पावडर, मसाला गुळ गुळाच्या अशा विविध पदार्थांना बाजारात प्रचंड मागणी आहे. या वेगवेगळ्या गुळाच्या प्रकारांचे दर सुद्धा वेगवेगळे आणि चांगले मिळतात.

गुळाचे क्यूब गुळ, गुळ पावडर व काकवी यांना गुळाच्या ढेपे पेक्षा चौपट किंमत मिळते, त्यामुळे ऊत्पन्न वाढते.

गुळ ऊद्योगासाठी मशीनरीज कुठे मिळतील?

काही ठिकाणी बरीच गुऱ्हाळे बंद पडलेली आहेत, त्या ठिकाणी गुऱ्हाळ ऊद्योगासाठी लागणारे बरेच जुने साहित्य काहिली, क्रशर कमी किमतीत मिळेल.

हानिकारक साखरेच्या तुलनेत गुळाचे महत्व सध्या वाढले आहे. लोक हानिकारक साखरेला चांगला पर्याय म्हणून आता आहारात गुळाची निवड करत आहेत.

गुळ, सेंद्रिय गूळ यांमधून मिळणारे नैसर्गिक घटक पाहता ग्राहक गुळ खरेदीला पसंती देत आहेत.

चला तर मग गुळ ऊद्योगात ऊसाच्या रसापासून गूळ तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि यशस्वीरित्या गुळ ऊद्योग कसा सुरु करायचा हे पाहूया.

हे वाचा:
साखर कारखाना संपूर्ण माहिती

पाचोटा वाळवण्यासाठी ड्रायर घ्यावा का नाही?

पाचोटा वाळवण्यासाठी ड्रायर घ्यावा का पाचोटा उन्हात वाळवावा? बाजारात कमीत कमी पैशात dryer जरी घ्यायल गेल तर तो १० ते १२ लाख रुपयापर्यंत मिळतो. तसेच त्याचे महिन्याचे वीज बिल सुद्धा भरावे लागणार आहे.

परंतु जर दोन ते तीन मजूर लावून उन्हात पाचोटा वाळवाल तर तुम्हाला वीज बिल द्यावे लागणार नाही,ड्रायरसाठी लागणारे भांडवल वाचेल.

फक्त तुम्हाला पाचोटा उन्हात वाळवण्यासाठी दोन ते तीन मजूर लागणार आहेत आणि त्यांचा पगार द्यावा लागणार आहे. यामध्ये तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.

गूळ कसा तयार होतो? Jaggery Making Process in Marathi

ऊसाच्या रसापासून गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये खाली दिलेल्या एकूण ७ स्टेप्स आहेत. गुळ तयार होण्यास या सर्व स्टेप्स मधून जावे लागते.

1. ऊसाची कापणी व रस काढणी

ऊसाची कापणी करून ऊस हा गुराळ घरामध्ये आणला जातो. त्यानंतर ऊस स्वच्छ करून त्याच्या मोळ्या बांधल्या जातात.

याच गुराळ घरामध्ये ऊसाचा रस काढला जातो. रस काढल्यानंतर गूळ तयार करण्याची प्रक्रिया चालू होते.

2. ऊसाचा चौथा (पाचट) व भट्टी

ऊसाचा रस काढल्यानंतर ऊसाचे पाचट वाळवण्यासाठी टाकले जाते. ऊसापासून काढलेला रस एका हौदामध्ये साठवला जातो आणि हा रस मोठ्या काहिलीमध्ये मोटरच्या साह्याने साठवला जातो.

त्यानंतर तो भट्टीवर ठेवलेल्या काहीलीमध्ये सोडला जातो आणि वाळलेले पाचट भट्टी पेटवण्यासाठी वापरले जाते.

भट्टी सुरू असताना तयार होणारा धूर बाहेर फेकण्यासाठी धूर चिमनीचा वापर होतो. ऊसाच्या रसातील घाण बाहेर काढण्यासाठी भेंडी पावडरचा वापर केला जातो.

ऊसाचा रस ऊकळू लागल्यानंतर मळी वर येऊ लागते. मोठ्या झारयाच्या साहाय्याने ही मळी बाजूला केली जाते.

ऊसाचा रस ऊकळत असताना एक व्यक्ती भट्टीत ऊसाचे पाचट टाकत राहतो, यामुळे भट्टी पेटती राहते व ऊसाचा रस ऊकळत राहतो.

3. रहाट यंत्र

ऊसाचा रस ऊकळत असताना तो काहिलीच्या बाहेर येऊ नये याकरिता त्यावर रहाट बसवलेले असते. हे रहाट एक व्यक्ती हँडल फिरवून गोल फिरवत असतो किंवा ते मोटरच्या साह्याने गोल फिरत राहते.

4. गुळाची तपासणी

जो व्यक्ती गुळ बनवतो त्याला गुळव्या असे म्हणतात. तो अधून मधून गुळाची तपासणी करत असतो. जेव्हा त्याला गूळ तयार झाल्याचे समजते तेव्हा तो पाकाची तार तपासतो.

5. गुळ तयार होण्यासाठी लागणारा वेळ

ऊसाचा रस भट्टीवर ठेवल्यानंतर गुळ तयार होण्यास जवळपास दीड ते दोन तास लागतात.

6. गुळाचा रस वाफ्यामध्ये ओतणी

गुळव्याला ज्यावेळी वाटतं कि गुळाचा रस गूळ तयार करण्यास योग्य झाला आहे, त्यावेळी तो रस कामगारांच्या मदतीने काहिली पुढे सरकावून गुळ गोठवणीच्या वाफ्यामध्ये ओतला जातो.

पुन्हा तो रस सहकाऱ्यांच्या मदतीने वाफ्यामध्ये गोठून गोठून घट्ट होण्यासाठी प्रयत्न केले जातात.

7. गुळाला आकार देणे

गुळाचा रस थोडासा घट्ट व थंड होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर तो एक किलो अर्धा किलो वजनाच्या बादलीमध्ये भरायला सुरुवात होते.

बादलीमध्ये गुळ भरताना ओले कापड बादलीत ठेवले जाते, त्यामुळे गुळाची ढेप बादली मधून काढण्यास मदत होते. गूळ बादलीला चिटकत नाही.

पुन्हा गुळाच्या ढेपा त्या बादलीतून बाहेर काढल्या जातात व पॅक करून मार्केटमध्ये विक्रीस पाठवल्या जातात. या ठिकाणी ऊसाच्या रसापासून गूळ तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया संपते.

किमान एक टन ऊस गाळल्यास त्यापासून 120 किलो गूळ निर्मिती होते.

Conclusion (निष्कर्ष)

गुळ उद्योगात लाखो रुपये कमवून देण्याचे सामर्थ्य आहे. अल्पभूधारक शेतकरी, होतकरू शेतकऱ्यांची मुले यांच्यासाठी गुळ उद्योग एक मोठी व्यवसाय संधी ठरू शकते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुळ उद्योग सुरु केल्यास निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.

FAQ

1 टन उसापासून किती गुळ तयार होतो?

किमान एक टन ऊस गाळल्यास त्यापासून 120 किलो गूळ निर्मिती होते.

गूळ कशापासून बनलेला असतो?

गुळ हा ऊसाच्या रसापासून बनलेला असतो.

कोणता गूळ सर्वात चांगला आहे?

सेंद्रिय गुळ सर्वात चांगला आहे.

गुऱ्हाळ म्हणजे काय?

ज्या ठिकाणी गुळ निर्मिती होते त्या ठिकाणाला, गुळ तयार करण्याच्या पद्धतीला गुऱ्हाळ असे म्हणतात.

Spread the love

Leave a Comment