याठिकाणी आपण ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय, गावात कोणता व्यवसाय करावा, गावात करण्यासारखे गावात चालणारे व्यवसाय कोणते आहेत ते पाहूया जेणेकरून तरुणांना गावात चालणारे बिजनेस शोधताना कोणतीही अडचण येणार नाही.
1. RO water plant चालू करणे
ग्रामीण भागात सुद्धा पिण्यायोग्य स्वच्छ पाणी फार कमी उपलब्ध होते. त्यामुळे RO प्लांट व्यवसायाची ग्रामीण भागात गरज जाणवते.
या व्यवसायाच्या उभारणीसाठी कमीत कमी चार लाख रुपये भांडवलाची आवश्यकता आहे. नफ्याचे म्हणाल तर दररोज 1000 ते 5000 च्या दरम्यान कमाई होऊ शकते.
2. माठ बनवण्याचा व्यवसाय
उन्हाळ्यात थंड पाणी कोणाला पिऊ वाटत नाही. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी थंड होण्याकरता पाणी माठात साठवले जाते.
माठ बनवताना बनवता येणाऱ्या कारागिराला कामावर ठेवून त्याच्याकडून माठ तयार करून घ्यायचे व ते लोकवस्तीत विकायचे. माठ तयार करण्यासाठी आवश्यक माती, यंत्रे खरेदी करून फार कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो.
3. लाकडी दरवाजे चौकट तयार करण्याचा व्यवसाय
घरे बांधणीसाठी लाकडी दरवाजांचा व चौकटीचा वापर केला जातो. लाकडी दरवाजे मजबूत व टिकाऊ असतात त्यामुळे मोठ मोठ्या बंगल्यांना, इमारतींच्या मुख्य प्रवेशद्वाराला लाकडी दरवाजे बसवले जातात.
लाकडी दरवाजे तयार करणे हे एक उत्तम कौशल्य आहे या व्यवसायात उतरण्यापूर्वी तुम्हाला हे कौशल्य शिकावे लागेल. जर तुम्हाला हे कौशल्य शिकायचे नसेल तर लाकडी वस्तू तयार करणारे कारागीर कामावर ठेवून व्यवसाय सुरू करता येईल.
4. सलूनचा व्यवसाय
कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. सलून व्यवसाय अलीकडे सर्व समाजातील लोक करू लागले आहेत. सध्या कोणताही व्यवसाय कोणत्याही समाजाच्या मालकी हक्काचा राहिलेला नाही. कोणीही कोणताही व्यवसाय करू शकतो.
सलून व्यवसाय तुम्ही दोन प्रकारे करू शकता. एक स्वतः प्रशिक्षण घेता येते किंवा कारागीर दुकानात कामावर ठेवून व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. दररोजची कमाई 2000 इतकी होऊ शकते. भांडवल दोन ते तीन लाख रुपये पुरेसे आहे.
5. मजूर पुरवठा करणे
हा एक शून्य गुंतवणूक व्यवसाय आहे. यामध्ये तुम्हाला बांधकामाच्या मजुरीसाठी व इतर मजुरीच्या कामासाठी कामगार पुरवायचे आहेत.
सुरुवातीला कामगारांचे संघटन करायचे आहे दररोज मिळणाऱ्या कामाच्या त्यांना सूचना द्यायच्या आहेत. एकत्र केलेले मजूर दिवसाच्या ठरलेल्या मजुरीवर कामाला पुरवायचे आहेत.
समजा तुमच्याकडे 20 काम कामगार असतील तर एका कामगारांना मागे 50 रुपये जरी मिळाले तरी वीस कामगारामागे 1000 रुपये दररोजची कमाई होते.
6. चिकनचे दुकान
आजकाल चिकन खाणे कोणाला आवडत नाही. दिवसेंदिवस बोकडाचे महाग होत जाणारे मांस सर्व सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नाही. अशा सर्वसामान्य लोकांच्या पुढे चिकन हा अगदी स्वस्त पर्याय असतो.
मग काय चिकन घेताना लोक एक किलोच्या वर चिकन घेतात आणि दाबून खातात. चिकन हा विषय सध्यातरी मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगला आहे.
चिकन पासून विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. चिकन सूप असेल, चिकन फ्राय असेल, चिकन मसाला असेल, चिकन करी असेल, चिकन बिर्याणी असेल असे अनेक पदार्थ चिकन पासून बनवले जातात.
त्यामुळे लहान मुलांपासून थोर व्यक्तिपर्यंत सर्वजण चिकनचे चाहते आहेत. हा व्यवसाय कुठेही चालू शकतो. छोटेसे पत्र्याचे दुकान टाकून तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकता.
बॉयलर कोंबडी उत्पादन करणार्या कंपनीशी करार करून त्यांच्याकडून बॉयलर कोंबड्या विकत घेऊन हा चिकन शॉपचा धंदा सुरू करता येतो.
सुरूवातीला तुम्ही तुमच्या आसपास बॉयलर कोंबडी पालन करणार्या व्यवसायिकाकडून कमी बॉयलर कोंबड्या खरेदी करून हा धंदा सुरू करू शकता.
आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला जर हा व्यवसाय स्वता करताना लाज वाटत असेल तर तुम्ही एखादा बिहारी किंवा युपीवाला माणूस दुकानात कामाला ठेऊ शकता.
कमाईच म्हणालं तर कमाई जबरदस्त होईल कारण स्वस्त मिळणारे चिकन हे सर्वांना खायला आवडते.
7. पंक्चरचे दुकान

दुचाकी ही काळाची गरज आहे. शेतकर्यापासून ते नोकरदारापर्यंत सर्वजण दुचाकीचा वापर करतात. शेतकरी भाजीपाला, वैरण, दूध, धान्य इत्यादि पदार्थ दुचाकीवर टाकून वाहून आणतो, तर नोकरदार नोकरीच्या ठिकाण ते घर पोहचण्यासाठी दुचाकीचा वापर करतो.
दुचाकीच्या रोजच्या वापरामुळे ती कधी पंक्चर तर कधी टायर मधली हवा जात असते. अशावेळी दुचाकी टायरचा पंक्चर काढण्यासाठी टायर मधली हवा भरण्यासाठी जवळच्या पंक्चर दुकानात घेऊन जावी लागते.
तुम्ही तर तुमच्या आसपास असणार्या टायर पंक्चरच्या दुकानात दुचाकींची असलेली गर्दी नक्की पाहिली असेल. यावरून त्यांचा दररोजचा किती धंदा होत असेल हे तुमच्या लक्षात आले असेलच.
टायर जर ट्यूबलेस असेल तर एका पंक्चरचे 70 रुपये घेतात.
आणि टायर जर ट्यूबचा असेल तर एका पंक्चरचे 50 रुपये घेतात. आता सगळ्याच गाड्यांना ट्यूबलेस टायर आहेत, त्यामुळे जर एका गाडीचे दोन पंक्चर काढले तर तुम्हाला 140 रुपये मिळतील.
आणि दिवसात 10 गाड्यांचे पंक्चर काढले तर दोन पंक्चर प्रत्येकी जर पकडले तर 10×70 म्हणजे 700 रुपये तुमची दिवसाची कमाई होते.
8. गॅस शेगडी दुरूस्ती करणे

तुम्हाला घरोघरी गॅस शेगडी पाहायला मिळेल, गॅसवर दररोज स्वयंपाक करावा लागत असल्यामुळे गॅसमध्ये पाणी जाऊन, गॅस पाईप, गॅस नळी, सतत खराब होत असते. कधी कधी रेग्युलेटर सुद्धा खराब होतो.
गॅसच्या सतत वापरामुळे किंवा गॅसच्या चुकीच्या वापर पद्धतीमुळे गॅस सारखा दुरुस्त करावा लागतो. ग्रामीण भागातील महिला गॅस खराब झाल्यावर शहरात दुरूस्तीसाठी घेऊन जातात त्यामुळे त्यांचा महत्वाचा वेळ व पैसा देखील खर्च होतो.
जर अशा महिलांना गॅस दुरूस्तीचे दुकान जर त्यांच्याच गावात किंवा शेजारच्या गावात मिळाले तर त्या कशाला शहरात गॅस शेगडी दुरूस्तीसाठी घेऊन जातील. त्या त्यांच्याच गावातील गॅस दुरूस्ती दुकानातून गॅस दुरुस्त करून घेतील.
गॅस शेगडीची नुसती सर्विसिंग जरी करायची झाली तरी गॅस दुरुस्तीवाले एका गॅस शेगडी सर्विसिंगसाठी दीडशे रुपये घेतात. तुम्ही दहा शेगड्या जरी दुरुस्त केल्या तर तुमची दिवसाची कमाई 1500 रुपये होऊ शकते.
Conclusion (निष्कर्ष)
ग्रामीण भागातील बरेचसे व्यवसाय हे शेतीवर अवलंबून आहेत. अलीकडे ग्रामीण भागातील शेतकरी देखील तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करत असल्यामुळे त्यांना शेतीवर आधारित ग्रामीण भागातील व्यवसायांचे महत्व समजले आहेत.
आम्ही वरती दिलेले ग्रामीण भागातील व्यवसाय हे नक्कीच शेतकरी व शेतमजुर अथवा शेतकरी पुत्र असू द्या या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतील अशी आशा आहे.
ज्या तरुणांना शहरातील नोकरीमध्ये रस नाही असे तरुण देखील ग्रामीण भागात राहून आपली व्यावसायिक वाटचाल सुरू ठेऊ शकतात.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.