घरगुती खानावळ व्यवसाय माहिती, Tiffin Service Business in Marathi

आजकालची लाइफ ही खूप धावपळीची बनली आहे. प्रत्येक जण आपल्या कामात इतका व्यस्त आहे कि त्याला जेवण बनवण्यासाठी वेळच नाही.

मग तो किंवा ती जॉब करत असेल, कॉलेज करत असेल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल. मार्केटमध्ये तुम्हाला असे अनेक लोक मिळतील जे शिक्षणासाठी घराबाहेर पडले आहेत, नोकरी निम्मीत घराबाहेर पडले आहेत.

घर सोडून दूर राहणार्‍या लोकांना घरचे जेवण मिळत नाही ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी असते, आणि हीच त्यांची कमजोरी तुमच्यासाठी “tiffin service business in Marathi” एक सुवर्ण संधी ठरू शकते.

खानावळ व्यवसाय ग्राहक

आपले ग्राहक कोण आहेत हे शोधणे खूप सोपे आहे. जसे कि तुम्ही ज्या एरियात आहात त्या एरियात कोणत्या लोकांची संख्या अधिक आहे जर तुमच्या परिसरात स्कूल, कॉलेज असतील तर विद्यार्थ्यांना टिफिन सेवा देऊ शकता. जर तुम्ही midc परिसरात राहत असाल तर जॉब वर जाणार्‍या लोकांना तुमचे ग्राहक बनवू शकता.

तुम्ही तुमच्या परिसरात बाहेरून आलेल्या लोकांना आपले ग्राहक बनवू शकता.

तुम्हाला टिफिन सर्विस अशा ठिकाणी सुरू करायची आहे ज्या ठिकाणी तुमचा ग्राहक वर्ग उपलब्ध असेल. जर तुम्ही कॉलेज परिसरात राहत असला तर त्याच परिसरात किंवा इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळेत जेवणाचे डब्बे पोहचवता येतील अशा परिसरात टिफिन सर्विस सुरू करायची आहे.

जर तुमचा ग्राहक हे कंपनीतील कामगार असतील तर तुम्हाला त्याच परिसरात त्यांना सहज डब्बे देता येतील अशा ठिकाणी सेवा सुरू करायची आहे.

या बिजनेसमध्ये लोकेशनचे इतके महत्व नाही. जर तुमचे ग्राहक तुमच्याकडे येऊन जेवण करणार असतील तर लोकेशन ग्राहकांना जवळ पडेल अशाच ठिकाणी असावे. आणि जर तुम्ही स्वत: जाऊन डब्बे पोहचवणार असाल तर अगदी तुम्ही तुमच्या घरातून देखील हा टिफिन सेवा व्यवसाय सुरू करू शकता.

Tiffin Service साठी आवश्यक साधने

जर तुम्ही घरून डब्बे देत असाल तर तुमच्याकडे जेवण पॅक करण्यासाठी चांगल्या दर्जाचे डब्बे असावेत. गॅस कनेक्शन हवे, जेवण बनवण्यासाठी चांगली भांडी असावीत. डब्बे घरपोच करण्यासाठी टू व्हीलर पाहिजे.

आणि जर तुम्ही हॉटेल सुरू करून हॉटेलमधून टिफिन सर्विस देत असाल तर ग्राहकांना बसून जेवण्यासाठी टेबल, खुर्च्या, हात धुण्याची, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागेल.

मित्रांनो जर तुम्ही हा व्यवसाय स्वत:च्या घरातून सुरू करू इच्छित असाल तर कमीत कमी दहा ते वीस हजार रुपये या व्यवसायासाठी पुरेसे आहेत. कारण या व्यवसायासाठी लागणारे साहित्य हे अगोदरच तुमच्या किचन मध्ये उपलब्ध असते. उदाहरणार्थ भांडी, गॅस कनेक्शन, खुर्च्या इत्यादि.

शॉप उघडून जर टिफीन सर्विस सुरू करणार असाल तर दुकानासाठी डिपॉजिट, टेबल, खुर्च्या, पाण्याचे जार, मग, हँड वॉश बेसिन, वेटर यांसाठी जास्त पैसे लागतील.

भांडवल किती लागेल हे तुमच्या व्यवसायाच्या विस्तारावर अवलंबून आहे. 

कोणत्याही हॉटेल व्यवसायात सर्वात महत्वाचे पदार्थांची चव, गुणवत्ता, आणि स्वच्छता महत्वाची असते.

जितकी चांगली खाद्य पदार्थांची चव तुम्ही तुमच्या ग्राहकांना द्याल तितके अधिक संख्येने तुमचे ग्राहक वाढतील. या धंद्यात वेळेत जेवण घरपोच केल्यास ग्राहक नेहमी खुश राहतात आणि आणखी ग्राहक तुम्हाला आणून देतात.

तसेच तुम्हाला तुमच्या व्यवसायाची थोडीफार मार्केटिंग सुद्धा करावी लागेल. शाळा परिसर, कॉलेज परिसर, कंपनी परिसर अशा ठिकाणी डिजिटल फ्लेक्स लावून, भिंतीवर जाहिराती लावून तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता.          

तुम्ही तयार केलेल्या जेवणाला जर उत्तम चव असेल आणि तुमचे जेवण हे स्वच्छ असेल तर तुमचे ग्राहकच तुमच्या व्यवसायाची जाहिरात करतील.

त्यामुळे तुम्हाला जेवणाची चव ही एक सारखी ठेवता आली पाहिजे.

टिफिन बॉक्स आकर्षक कसा बनवाल

टिफिन आकर्षक कसा बनवायचा म्हणजे तुम्हाला तुमच्या टिफिन मध्ये दररोज नवीन जेवणाचा मेनू द्यावा लागेल. आठवड्याचे जर 7 दिवस असतील तर तुम्हाला दररोज नवीन भाजी द्यावी लागेल.

तसेच जर रविवारी मांसाहार करणार्‍या ग्राहकांना मांसाहारी जेवण द्यावे लागेल. मांसाहारी लोकांना तुम्ही अंडी किंवा मटण देऊ शकता. आणि जे शाकाहारी जेवण करतात त्यांना पनीरची भाजी, किंवा इतर स्वादिष्ट जेवण द्यायचे आहे.

त्याच बरोबर तुम्हाला सणासुदीच्या वेळी देखील इतर गोड जेवण तुमच्या ग्राहकांना द्यायचे आहे. म्हणजे ग्राहकांना तुमची टिफिन सेवा ही घरच्यासारखी वाटली पाहिजे.

सणाच्यावेळी तुम्ही ग्राहकांना पूरण पोळी हे जेवण देऊ शकता. यापेक्षा ही जर तुम्हाला तुमचा टिफिन अधिक आकर्षक व स्वादिष्ट बनवायचा असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये इतर टिफिन सेवा देणार्‍या व्यवसायिकांचा टिफिन उघडून पहावा लागेल.

यात तुम्ही एका टिफिनमध्ये किती रोटया असतात, भाजीचे प्रमाण किती असते, सुकी भाजी किती असते, भात किती दिला जातो हे तपासू शकता यावरून तुम्हाला तुमचा टिफिन कसा भरायचा याचा अंदाज येईल.

मित्रांनो तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे कि लोकांना आजकाल स्वस्त मध्ये रुचकर जेवण हवे असते. त्यांच्या खिशाला परवडेल असे जेवण हवे असते.

त्यामुळे तुम्ही किमान तुमचा व्यवसाय थोडा जुना होईपर्यन्त, लोकांना तुमच्या व्यवसायाबद्दल माहीत होईपर्यंत टिफिनची किमंत ही इतर टिफिन सर्विस देणार्‍या व्यवसायिकांच्या टिफिन पेक्षा थोडी कमीच असायला हवी.

जर तुमचा स्पर्धक हा 50 रुपये प्रति टिफिन घेत असेल तर तुम्ही लोकांना प्रति टिफिन 40 ते 45 रुपये चार्ज केला पाहिजे. जास्तीत जास्त ग्राहकांना तुमच्याकडे आकर्षित करण्याची ही उत्तम टेकनिक आहे.

महिला वर्गामध्ये प्रचंड क्रेज असलेला हा जबरदस्त व्यवसाय आहे. महिलांना त्यांच्या घरी राहून घरातील सर्व कामे पाहून करता येण्यासारखा हा टिफिन व्यवसाय आहे. अगदी स्वत:च्या घरातून तुम्ही हा व्यवसाय खूप कमी भांडवलात सुरु करता येतो.

जर तुम्ही एक महिला असाल आणि तुम्हाला तुमच्या घरात राहून एखादा व्यवसाय करायचा असेल तर हि तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. घरातील सदस्यांची मदत घेऊन हा टिफिन व्यवसाय खूप सोप्या पद्धतीने सुरु करता येऊ शकतो.

Spread the love

Leave a Comment