Diwali Business Ideas in Marathi for Students Students | दिवाळीत करता येणारे जबरदस्त व्यवसाय

दिवाळी जवळ आली कि बऱ्याच लोकांना व्यवसायाच्या संध्या उपलब्ध होतात. अनेक लोकांच्या हाताला काम मिळते.

विद्यार्थ्यांना तर दिवाळीत 10 ते 15 दिवस सुट्टी असते. विद्यार्थी या सुट्टीच्या दिवसात खालील दिलेले कोणतेही व्यवसाय सुरु करून चांगले पैसे कमवू शकतात.

हे व्यवसाय कोणताही एकटा विद्यार्थी सुरु करू शकतो अथवा एक दोन मित्र सोबत येऊन व्यवसाय सुरु करू शकतात. दिवाळीत करता येणाऱ्या या व्यवसायातून विद्यार्थ्यांना त्यांचा पॉकेट मनी मिळवता येईल.

Profitable Diwali business ideas in Marathi for students

आम्ही जी खाली दिवाळीत करता येणाऱ्या व्यवसायांची यादी दिली आहे ते सर्व व्यवसाय सिजनेबल आहेत. दिवाळी संपली कि त्यांची मागणी कमी होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या व्यवसाय कल्पनांचा विचार फक्त दिवाळी पुरता करावा.

1. फटाका स्टॉल

फटाका स्टॉल

दिवाळी आली कि फटाक्यांची आतषबाजी आलीच. दिवाळीत फटाक्यांवर खूप खर्च केला जातो. दिवाळीत विद्यार्थ्यांना १० ते १५ दिवस सुट्टी असते त्यामुळे या सुट्टीत त्यांना पूर्णवेळ काम करून चांगली कमाई करता येईल.

रस्त्याच्या दुतर्फा किंवा मेन मार्केटमध्ये कुठेही फटाका स्टॉल उभा करता येतो. पुणेच्या फटाका मार्केटमध्ये होलसेल दरात फटाका मिळतील.

फटाका स्टॉल चालवण्यासाठी Fire Cracker Selling Licence हवे असते. जवळच्या CSC केंद्रात या परवान्यासाठी अर्ज करता येतो.

2. मातीच्या पणत्या, दिवे विकणे

दिवाळीमध्ये घरोघरी दिवे लावले जातात. घराच्या उंबऱ्यात, घराच्या अंगणात मातीचे दिवे, पणत्या लावल्या जातात. हे दिवे घराची शोभा आणखी वाढवतात.

कुंभाराकडून होलसेलमध्ये दिवे व पणत्या विकत घेऊन विद्यार्थांना मोकळ्या वेळेत विकता येतील. Online दिवे सुद्धा मागवता येतील.  

3. घर सजावटीचे साहित्य विकणे

घराला लावले जाणारे तोरण, विजेच्या माळा आणि विजेवर चालणारे रंगबेरंगी दिवे असे साहित्य दिवाळीत मोठ्या प्रमणात विकले जाते. दिवाळीत इलेक्ट्रिक दुकाने विजेवर चालणाऱ्या सजावटीच्या साहित्याने गच्च भरून जातात.

हे साहित्य पुणे, बारामती सारख्या मार्केट मध्ये खूप स्वस्त मिळते. तिथून विकत आणायचे आणि लोकल मार्केटमध्ये जास्त किमतीत विकायचे.  

4. दिवाळीचा फराळ विकणे

दिवाळी म्हटलं कि खरी मज्जा येते ती दिवाळीचा फराळ खायला. मग लाडू, करंज्या असे खाउचे पदार्थ घरोघरी बनवले जातात.

काही कुटुंबे असे पदार्थ बनवण्याचा त्रास अजिबात नको म्हणतात. त्यामुळे त्यांच्यासमोर फक्त तयार दिवाळीचा फराळ विकत आणणे हा पर्याय उरतो.

मग काय व्यावसायिकांसाठी हि व्यवसाय संधीच आहे. दिवाळीत रस्त्यावर, बेकरीत असे बरेच दिवाळीचे खाद्य पदार्थ विक्रीस ठेवलेले पाहायला मिळतात. विद्यार्थ्यानी असे पदार्थ आपल्या घरातील महिलांकडून बनवून आणायचे आणि स्टॉल लावून विकायचे.

5. होम क्लिनिंग सर्विस

होम क्लिनिंग सर्विस

दिवाळीत श्रीमंत लोक घर साफ सफाई करायला काढतात. स्थानिक साफ सफाई करणाऱ्या लोकांना ते आपल्या घराचे साफ सफाईचे काम देतात.

या कामातून साफ सफाई करणारे कामगार चांगले पैसे मिळवतात. विद्यार्थ्यांना हे काम अवघड जाणार नाही. दोन ते चार विद्यार्थी एकत्र येऊन काम करू शकतील.

अशा कामासाठी लोकांची भेट घेऊन साफ सफाईचे काम मिळवू शकतात.

6. कार वाशिंग सर्विस

घराच्या साफ सफाई बरोबर घरातील छोट्या मोठ्या चार चाकी गाड्या देखील धुण्यास काढल्या जातात. विद्यार्थी घरोघरी जाऊन लोकांच्या चार चाकी गाड्या धुण्याचे काम करू शकतात.

गाडी धुण्यासाठी लागणारा ब्रश, वाशिंग पावडर, कपडा व इतर साहित्य दुचाकी वर टाकून गाड्या धुण्याचा बिजनेस करता येऊ शकतो.

या कामाच्या बदल्यात चांगले पैसे देखील मिळतील. रोज सकाळी दारोदारी जाऊन गाड्या धुण्याचे काम करता येईल. फक्त सकाळी ते दुपारपर्यंत हा व्यवसाय करता येऊ शकतो. दुपारनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी फ्री होता येईल.

7. पेढे तयार करून विकणे

दिवाळीत नवीन गाड्यांचे पूजन केले जाते आणि या गाड्यांच्या पुजानावेळी तोंड गोड करण्यासाठी पेढे वाटले जातात. विद्यार्थ्यांना घरच्या घरी पेढे तयार करून मार्केटमध्ये विकता येतील.

मार्केटमधून दुध साखर विकत आणून पेढे घरीच तयार करायचे आणि बेकरीपेक्षा कमी दरात विकायचे.

8. घराचे रंगकाम करणे

दिवाळी येण्यापूर्वी अनेक लोक आपल्या घरांना रंग देतात. रंगकाम करणे सोपे आहे. विद्यार्थी अशा कामाबाबत घर मालकाशी विचारणा करू शकतात.

जर विद्यार्थांना रंग काम करता येत नसेल तर ते रंगकाम करणारे रंगारीकडून काम करून घेऊ शकतात. रंगकाम करणाऱ्यांना त्यांची दिवसाची मजुरी द्यायची आणि बाकीचे पैसे कमिशन मिळणारे कमिशन असणार आहे.

9. फुलांचे हार तयार करणे

फुलांचे हार तयार करणे

दिवाळीत घरातील देवांच्या फोटोंना फुलांचे हार घातले जातात. चारचाकी दुचाकी गाड्यांना धूतल्यानंतर हार घातले जातात. विध्यार्थाना रस्त्याच्या मुख्य चौकात उभा राहून हार विकता येतील.

मार्केटमधून स्वस्त दरात विविध जातींची फुले विकत आणायची आणि त्यांपासून सुंदर हार तयार करायचे. आणि असे हार विकून पॉकेटमनी कमवायचा.

10. पूजेचे साहित्य विकणे

जरवर्षी दिवाळीत घरातील देवतांची पूजा केली जाते. घरात सुगंधी अगरबत्ती व धूप लावला जातो.

दिवाळीच्या पहिल्या दुसऱ्या अंघोळीला घरातील पुरुष मंडळीला बहिण, आई, पत्नीकडून ओवाळले जाते.

दिवाळीच्या ओवाळणीला कुंक, खडीसाखर, कापूर, पणती व मेणबत्या खरेदी केल्या जातात. घरात लागणारे पूजेचे साहित्य विकून विद्यार्थी चांगले अर्थार्जन करू शकतात.  

11. आकाश कंदील विकणे

आकाश कंदील विकणे

आकाश कंदील तर तुम्ही सर्वांनी पाहिले असतीलच. आकाश कंदील घरावर लटकावले जातात. आकाश कंदील बनवणे खूप सोपे आहे.

कोणताही विद्यार्थी थोडीशी मेहनत घेऊन आकाश कंदील बनवायला शिकु शकतो. युट्युबवर असे कितीतरी व्हिडीओ आहेत ज्यात सोप्या पद्धतीने आकाश कंदील बनवायला शिकवले जातात.

रंगबेरंगी कागद, कात्री व गम इत्यादी साहित्य एकत्र करून दिवाळीत हा व्यवसाय सुरु करता येईल.

Conclusion (निष्कर्ष)

वरील सर्व व्यवसाय दिवाळीत कमी दिवसात जास्त पैसा कमवून देणारे व्यवसाय आहेत. त्यामुळे दिवाळीत जर तुम्ही वरीलपैकी एखादा व्यवसाय सुरु करणार असाल तर त्या व्यवसायांना ग्राहक भरपूर असणार आहेत.

या दिवाळी व्यवसाय कल्पना तुमच्या विध्यार्थी मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही दिवाळीत चार पैसे कमवण्याची संधी मिळेल.

Spread the love

Leave a Comment