सर्वात कमी जागेत व सर्वात कमी खर्चात केला जाणारा व्यवसाय कोणता असेल तर तो म्हणजे देशी कोंबडी पालन होय.
शेती ही नेहमी तोट्यात करावी लागत असल्यामुळे अलीकडे अनेक शेतकरी देशी कोंबडी पालन करत असल्याचे चित्र आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळते.
देशी कोंबडी ही स्थानिक वातावरणाशी जुळवून घेणारी असते, त्यामुळे ती काटक तर कमी आजारी पडते. देशी कोंबडी आजूबाजूच्या परिसरात असलेला पाला, गवत, कीटक, अळ्या खाऊन आपले पोट भरते.
त्यामुळे तिच्या खाद्यावर होणारा खर्च देखील अल्प असतो. देशी कोंबडी मांस उत्पादनाबरोबर अंडी उत्पादन सुद्धा भरपूर देते.
देशी कोंबडी ही दुहेरी उत्पादन देणारी आहे, त्यामुळे शेतकरीच नव्हे तर शेतमजुर देखील हा व्यवसाय अतिशय काळजीपूर्वक करत आहेत.
शेतकरी मित्रांनो आज आपण देशी कोंबडी पालन कमी खर्चात व कमी जागेत कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
देशी कोंबड्यांची पिल्ले कुठे मिळतील
देशी कोंबड्यांची पिल्ले पाहिजे असतील तर ती तुम्हाला स्वता कोंबड्या अंड्यावर बसवून तयार करता येतील. किंवा तुम्ही तुमच्या आसपास गावरान कोंबडी पालन करणार्या व्यवसायिकाकडून देशी कोंबडीचे पिल्ले विकत घेऊ शकता.
देशी कोंबडी पालनातून मिळणारे उत्पन्न
या व्यवसायातून कोंबडी पालन करणारे व्यावसायिक महिना भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. काही व्यवसायिकांनी तर द्राक्षे बागा मोडून आपल्या शेतात देशी कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला आहेत आणि ते सहा महिन्याला दोन लाख रुपये इतके उत्पन्न मिळवत आहेत.
देशी कोंबडी पालनातून मिळणारे उत्पन्न हे तुम्ही पालन करणार्या कोंबड्यावर अवलंबून आहे. जितक्या अधिक कोंबड्या तुमच्या शेड मध्ये असतील तितके अधिक तुमचे उत्पन्न राहणार आहे.
आणि विशेष म्हणजे कोंबडी ही दुहेरी उत्पन्न देणारी असल्यामुळे तुम्हाला अंडी विक्रीतुन व मांस विक्रीतुन देखील चांगले उत्पन्न मिळणार आहे.
जर तुम्ही अंडी विकणार असाल तर तुम्हाला एका अंड्याला १० रुपये मिळतील, आणि जर तुम्ही पिल्ले काढून विकणार असाल तर तुम्हाला एका पिल्लाला ३० रुपये मिळतील आणि तेच पिल्लू जर तुम्ही मोठे करून विकले तर तुम्हाला एका कोंबडी विक्री मागे ४०० रुपये मिळतील.
या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून घेऊया जर तुमच्याकडे १०० कोंबड्या असतील तर त्यातील कमीत कमी ८० कोंबड्या तर दररोज अंडी देतात.
म्हणजे ८० गुणिले १० बरोबर ८०० रुपये म्हणजे तुमची दिवसाची कमाई ८०० रुपये होते. महिन्याचे गणित केले तर महिन्याचे उत्पन्न २४ हजार रुपये मिळते.
किती देशी कोंबड्यांचे पालन करावे
किती कोंबड्यांचे देशी कोंबडी पालन फायद्याचे असते तर ते तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेवर, तुमच्याजवळ असलेल्या भांडवलावर अवलंबून आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला या धंद्याविषयी किती ज्ञान आहे यावर देखील अवलंबून आहे.
तुमच्याकडे जर मोकळा परिसर असेल, आवश्यक भांडवल, पुरेसे ज्ञान आणि आवश्यक मनुष्यबळ असेल तर तुम्ही तुम्हाला शक्य तितिक्या कोंबड्यांचे पालन करू शकता.
मी तर म्हणतो तुम्ही सुरूवातीला ५० ते १०० कोंबड्यांचे देशी कोंबडी पालन करा त्यातून चांगला अनुभव घ्या, कोंबड्याना दिले जाणारे लसीकरण, त्यांचा आहार, त्यांना जडणारे आजार, बाजारपेठ याविषयी अगोदर संपूर्ण माहिती घ्या आणि ज्यावेळी तुम्हाला या व्यवसायाविषयी सखोल माहिती मिळेल त्यावेळी तुम्ही कितीही देशी कोंबड्यांचे पालन करू शकता.
गावरान कोंबडीच्या पिल्लांचे आरोग्य कसे संभाळाल
कोंबडी पालन या व्यवसायातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे पिल्लांचे योग्य वेळी, योग्य पद्धतीने लसीकरण करून घेणे होय.
तुमच्या फार्मचे यश हे जवळ जवळ तुम्ही घेतलेल्या फार्मच्या आरोग्यविषयक काळजीवर असते. जर लसीकरण हे योग्य वेळी केले तर जवळ जवळ तुमचा फार्म हा तोट्यात जाण्यापासून वाचू शकतो. आणि जर लसीकरण नाही केले गेले तर तुमचा फार्म तोट्यात जाण्याची शक्यता असते.
कोंबड्यांचे शेड वेळेवर साफ करून घ्यावे. कोंबडी किंवा पिल्ले आजारी पडल्यास त्वरित पशू वैदयास दाखवावे. शेड मध्ये कोंबड्याना स्वच्छ पाणी पुरवठा कसा देता येईल याकडे देखील लक्ष द्यावे.
थंडी मध्ये पिल्लांना थंडी लागू नये याकरिता शेडच्या भोवताली जाडसर कापड बांधावे, आतमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी विजेचे ब्लब लावावेत.
उन्हाळ्यात देखील पिल्लांचे गर्मीपासून सरंक्षण करावे. शेडमध्ये कोणतेही वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी प्रवेश करणार नाहीत याची काळजी घ्यावी, त्याकरिता छोटे छिद्रे असलेली जाळी शेड भोवती लावावी.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुभव आवश्यक आहे का?
हे पहा मित्रांनो व्यवसाय कोणता ही असो तो सुरू करण्यापूर्वी थोडा फार का होईना त्या व्यवसायाचा अनुभव आवश्यक असतो. अगदी काहीच अनुभव नसताना जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू पाहत असाल तर तुम्हाला नुकसानीला सामोरे जावे लागेल.
कारण कोंबडी पालन हा एक नाजुक व्यवसाय समजला जातो. त्यामुळे या व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही इतर व्यावसायिकांचे सल्ले व त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी.
शक्य झाल्यास अधिकृत प्रशिक्षण देणार्या संस्थेतून प्रशिक्षण घेतले तरी ते उत्तमच आहे.
महत्वाचे म्हणजे सुरूवातीला फार कमी पिल्ले बसवून हा व्यवसाय सुरू करावा व मोठ्या स्वरुपात व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनुभव घ्यावा.
कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य
कोंबडी व्यवसायातील सर्वात महत्वाचा व खर्चाचा कोणता भाग असेल तर तो म्हणजे कोंबडीला लागणारे खाद्य. मित्रांनो कोंबडी पालन या व्यवसायात कोंबड्यांच्या खाद्यावर जवळ जवळ 90 टक्के खर्च येतो त्यामुळे कोंबडी पालन हा व्यवसाय लोकांना परवडत नाही.
कोंबडी पालन व्यवसायामध्ये आपण जर हाच खर्च कमी करू शकलो तर नक्कीच आपल्याला हा व्यवसाय भरपूर नफा देईल. त्यासाठी आपणाला हा कोंबड्यांच्या खाद्यावर होणारा खर्च कसा कमी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
कोंबड्याना स्वस्त खाद्य उपलब्ध असलेले पर्याय जर आपण पाहिले तर आपण त्यांना आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांनी फेकून दिलेला भाजीपाला घरी आणून खायला घालू शकतो. तसेच आपण त्यांना शेड बाहेर देखील काही वेळ सोडू शकतो.
कोंबडी जितकी जास्त तिच्या खुराड्यातून बाहेर राहील तितकी जास्त ती तुमच्या खाद्यावर होणारा खर्च कमी करेल कारण कोंबडी जितका वेळ बाहेर फिरते तितका वेळ ती किडया, मुंग्या, अळ्या, गवत, फेकून दिलेले अन्न आणि खराब झालेला भाजीपाला खाऊन आपले पोट भरत असते.
खाद्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी तुम्ही शेवग्याची झाडे सुद्धा लावू शकता, कारण कोंबड्या शेवग्याचा पाला खाणे जास्त पसंत करतात, यातून कोंबड्यांच्या शरीराला पोषक घटक देखील मिळतात व उन्हाळ्यात त्यांना सावली देखील मिळते.
लहान पिल्लांची काळजी कशी घ्याल?
अंड्यासाठी कोंबडी बसवल्यानंतर कोंबडीने पूर्ण दिवस घेतल्यानंतर अंडी स्वतच्या हाताने फोडून पिल्ले काढायची नाहीत, अंड्याना अजिबात स्पर्श करायचा नाही तर पिल्लांची वाढ पूर्ण झाल्यानंतर पिल्ले आपोआप अंड्यातून बाहेर पडतात.
देशी कोंबडींच्या पिल्लांसाठी कोणत्याही प्रकारच्या लसीकरणाची गरज नसते. परंतु तुम्ही कोणताही रोग होऊ नये म्हणून पशूवैदयाच्या सल्ल्याने लसीकरण करू शकता.
थंडीच्या दिवसात पिल्लांना तुम्ही बांबुचा विणलेला डालागा त्या खाली ठेऊ शकता आणखी शेडमध्ये उष्णता टिकवून ठेवण्यासाठी विजेचा बल्ब लावू शकता.
कोंबड्यांसाठी लागणारे शेड
मानवाला ज्याप्रमाणे निवार्याची आवश्यकता असते त्याप्रमाणे पक्षांना देखील निवार्याची गरज असते. कोंबड्यांचे उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये ऊन, थंडी व पाऊस यांपासून संरक्षण व्हावे याकरिता शेड बांधणे खूप गरजेचे असते.
कोंबड्याना लागणारे शेड हे साधे किंवा पक्के देखील बांधता येते. साधे म्हटले तर तुम्ही तुमच्या शेतात असणारे बांबू, लाकडे, गवत व पालापाचोळा यांपासुन देखील अगदी मजबूत व चांगले शेड बांधू शकता अश्या पालापाचोळ्याच्या शेडला अजिबात खर्च येत नाही.
असे शेड तुम्ही गावातील एखाद्या चांगल्या शेतकर्याच्या मदतीने एका दिवसात उभा करू शकता. शेड जर पक्के बांधायचे झाले तर त्यासाठी लागणारा खर्च देखील खूप येतो, मग त्यामध्ये सिमेंट असेल, विटा असतील, लोखंडी अॅंगल असतील आणि छतासाठी लागणारे पत्रे देखील असतील.
बांधकाम कामगारांची मजुरी सुद्धा याठिकाणी अधिक होते त्यामुळे पक्के शेड बांधण्यासाठी खूप खर्च येतो. मी तर म्हणतो तुम्ही जर शून्यातून कोणताही अनुभव नसताना हा व्यवसाय सुरू करत असाल तर साधे शेड बांधा आणि पुढे जसे यश मिळत जाईल तसे नियोजन करा.
Conclusion (निष्कर्ष)
देशी कोंबडी पालन हा व्यवसाय या व्यवसायात नवीन येणार्यांसाठी तर उत्तम आहेच आणि ज्यांना अनुभव आहे त्यांना सुद्धा फार चांगला आहे.
कारण या व्यवसायात पक्षांची मर कमी होते व ह्या देशी कोंबड्या फारश्या आजारी पडत नाहीत, त्या गवत, अळ्या, भाजीपाला खाऊन तग धरू शकतात. त्यामुळे हा व्यवसाय कमी नुकसान देणारा आहे.