दुग्ध व्यवसाय माहिती | How to Start Dairy Farm Business in Marathi

आपला देश पशुधनसंपन्न म्हणून जगात ओळखला जातो. देशात दूध देणाऱ्या पशूंना पोषक वातावरण व मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असल्यामुळे दूध डेअरी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

भारत देशात दूध व्यवसायाच्या वाढीचा वेग वार्षिक सरासरी आठ ते नऊ टक्के एवढा गतिमान नोंदवला गेला आहे.

चला तर मग यशस्वीरित्या दुध व्यवसाय कसा करावा, दूध डेअरी व्यवसाय याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

दुग्ध व्यवसाय

दूध व्यवसायासाठी आवश्यक यंत्र खरेदी

दूध व्यवसायासाठी काही आवश्यक यंत्रांची खरेदी करावी लागणार आहे. या यंत्रांच्या मदतीने दूध व्यवसाय केल्यास खर्च, कष्ट व वेळ यांची बचत होणार आहे.

चारा कुटी यंत्र जनावरांना दिला जाणारा चारा बारीक करण्यासाठी वापर केला जातो. चारा कुट्टी यंत्राची किंमत १३५०० ते २५००० हजारापर्यंत आहे.

1 ते 3 एचपी पर्यंतच्या चारा कुट्टी यंत्राची किंमत १३५०० पासून सुरू होते. तर 3 ते 5 एचपी पर्यंतच्या चाराकुट्टी यंत्राची किंमत 25000 पर्यंत पाहायला मिळते.

मार्केटमध्ये यापेक्षाही कमी किमतीची चारा कुटी यंत्रे उपलब्ध आहेत, त्यासाठी तुम्हाला स्थानिक इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये चौकशी करावी लागेल.

दूध दोहन यंत्र

दूध दोहन यंत्र

दूध काढण्याची मशीन या यंत्राच्या साह्याने दुभत्या जनावरांचे दूध काढले जाते. दूध दोहन यंत्राची किंमत 22 हजार पासून 47 हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळते.

या किमती यंत्राच्या दूध काढण्याच्या क्षमतेवरून व चांगल्या गुणवत्तेवरून निर्धारित केलेल्या असतात.

संगणक

दुभत्या जनावरांना आवश्यक असणारे पशुखाद्य खरेदी वरचा खर्च, दररोज उपलब्ध होणारे दूध, जनावरांच्या औषधांवरचा खर्च, मिळणारे उत्पन्न यांच्या नोंदी ठेवण्यासाठी संगणकाची मदत होते.

संगणकावर स्टोअर केलेला हा महत्वपूर्ण डाटा दूध व्यवसायिकांना दूध व्यवसायाच्या नियोजनामध्ये उपयोगी ठरतो. या डाटामुळे आवश्यकते बदल व्यवसायाच्या नियोजनामध्ये करता येतात.

दुध उत्पादनासाठी वापरली जाणारी जनावरे

महाराष्ट्रात दूध उत्पादक प्रदेशात दूध मिळवण्यासाठी मुख्यत्वे संकरित गाय, म्हैस या जनावरांची निवड केली जाते.

कालवड संगोपन

कालवड संगोपन

गोठ्यात जन्मलेल्या कालवडी दूध उत्पादकास त्यांच्या विक्रीतून आर्थिक फायदा देतात. कालवडीची झपाट्याने वाढ होण्याकरता त्यांच्याकडे विशेष वैयक्तिक लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.

कालवडींची वाढ होण्याकरता त्या वेळेत माजावर येण्याकरिता त्यांचे उत्कृष्ट संगोपन करण्यात यावे व त्यांना शास्त्रीय आहार द्यावा.

आहार व्यवस्थापन

डायट मॅनेजमेंट आपण चांगली दूध उत्पादन क्षमतेची जनावरे विकत घेतो. चांगल्या जातीची जनावरे विकत घेतो परंतु जर जनावरांना दिला जाणारा आहार हा चांगल्या दर्जाचा नसेल तर जनावरे दूध कमी देतात.

चांगले आहार व्यवस्थापन नसल्यामुळे जनावरे वेळेत गाभण जात नाहीत. जनावरांचा भाकड काळ वाढतो आणि दुधाची गुणवत्ता ढासळते. दुधातील फॅट कमी जास्त होत राहते.

जनावरांच्या शारीरिक वाढीसाठी तसेच दूध वाढीसाठी उत्कृष्ट दर्जाचा चारा देणे अतिशय महत्त्वाचे आहे.

जनावरांना त्यांच्या आहारातून खालील अन्नघटक मिळणे आवश्यक आहेत.

कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स आणि विटामिन्स.

ऊर्जा प्रथिने स्निग्ध पदार्थ खनिजे आणि जीवनसत्वे मिळणे आवश्यक असते.

दूध व्यवसायात कोणती जनावरे फायदेशीर ठरतात

अनेक दूध उत्पादक जनावरांचे चांगल्या प्रकारे संगोपन जतन केल्यास एक अपेक्षित फायदा व्हावा अशी आशा ठेवून असतो आणि सध्या जनावरांच्या पशुखाद्याचे दर वाढले आहेत.

चारा निर्मितीसाठी लागणारा खर्च देखील वाढला आहे. दूध व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या यंत्राच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे दररोज सरासरी 20 ते 25 लिटर दूध देणाऱ्या गायांची व 15 ते 18 लिटर दूध देणाऱ्या म्हशींचा संभाळ करणे फायद्याचे ठरते.

माजाच्या वेळीचे व्यवस्थापन

माजाचा कालावधी गाई व म्हैस यांच्यात जात, वय ऋतू अशा घटकांमुळे वेगवेगळा दिसून येतो. जनावरे माजाच्या वयात येण्याच्या काळात पशुपालकांनी सावधानता बाळगावी.

जनावरांच्या माजाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित पशुवैद्यास बोलावून जनावरांचे वय, आरोग्याची तपासणी करावी. त्यानंतर पशुवैद्याच्या सल्ल्याने भरून घ्यावीत.

शक्यतो माजाचा काळ वाया जाणार नाही याकडे दूध उत्पादकांनी लक्ष द्यावे. काही वेळा जनावरे माजावर येतात परंतु ती गाभण राहत नाहीत त्यामुळे अशा जनावरांना पुढील माज येण्याच्या काळापर्यंत तोट्यात सांभाळावे लागते.

आपण जर या व्यवसायात नवीन असाल तर पशुवैद्याच्या किंवा अनुभवी दूध उत्पादकांची मदत घ्यावी. जनावरे योग्य वेळी माजावर आल्यास ती योग्य वेळेवर गाभण राहिल्यास दूध व्यवसायात तोटा होत नाही.

या ठिकाणी त्याच्या चाऱ्यावर पशुखाद्यावर होणारा खर्च वाचतो. जनावरांचा माजावर येण्याचा काळ खूप महत्त्वाचा असतो.

हिरवा चारा, सुखा चारा, पशुखाद्य मिनरल मिक्स्चर

हिरव्या चाऱ्यामध्ये ऊर्जेचे प्रमाण अधिक असते. मका, ज्वारी, कडबा या वैरणीपासून ऊर्जा मिळते, तर गहू, भुसा या धान्यातून कार्बोहायड्रेट्स मिळतात.

जनावरांना प्रथिने देण्यासाठी आपणास जनावरांना पशुखाद्य द्यावे लागते. यामध्ये गोळी पेंड, खपरी पेंड यांसारख्या पशुखाद्याचा समावेश होतो.

मिनरल्स जनावरांना चाऱ्यातून किंवा मातीतून मिळत नाहीत त्यासाठी त्यांना बाजारात उपलब्ध असलेले मिनरल्स चाऱ्यातून द्यावे लागतात.

जनावरांना दिल्या जाणाऱ्या चोथ्यामध्ये सर्व अन्नघटक उपलब्ध असतात. जनावरांना दिवसातून दोन वेळा पोटभर चारा द्यावा, यामुळे ते मधील काळात रंवंथ करतात. रवंथ करायला वेळ मिळाल्यामुळे खालेला चारा पचन होतो व दूध उत्पादन वाढीस लागते.

आरोग्य व्यवस्थापन हेल्थ मॅनेजमेंट

जनावरांना चारा हा धारेच्या वेळेला किंवा धार काढल्यानंतर टाकला तर जनावर चारा खाण्यात गुंतते त्यामुळे ते एक ते दीड तास खाली बसत नाही, त्यामुळे अन्नदाहाचा धोका कमी होतो.

उत्कृष्ट आहार नियोजन

दूध उत्पादकाने फक्त दूध उत्पादनाकडे लक्ष न देता जनावरांच्या आरोग्यकडे चांगले लक्ष द्यावे. जनावरांचा माजाचा काळ, गर्भधारणेच्या काळ यामध्ये बारकाईने लक्ष द्यावे.

जनावर प्रसूतीच्या वेळी जनावरांची काळजी घ्यावी. जनावर गाभण राहिल्यानंतर गर्भाची वाढ व्यवस्थित होत आहे का किंवा झाली आहे का हे पशुवैद्याकडून तपासून घेणे गरजेचे आहे.

जर एखादे जनावर गाभण राहत नसेल तर त्या जनावराचे वंध्यत्व निवारण करण्यासाठी योग्य ते औषध उपचार करावेत.

जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मुक्त संचार गोठ्याची पद्धत वापरावी. गोठ्यात 24 तास स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय असावी. ओला चारा सुका चारा व मिटरल्स यांचे मिश्रण असलेला चारा द्यावा.

जंतांचे औषध पशुवैद्याच्या सल्ल्याने द्यावे. जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गोठ्याची दररोज साफसफाई करावी. प्रत्येक ऋतूमध्ये हवा, पाऊस, थंडी व ऊन या नैसर्गिक घटकांपासून जनावरांचे संरक्षण करावे.

जनावर महिन्यातून दोन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. पशुचिकित्सालयातून लसीकरण करून घ्यावे. या सर्व गोष्टींची वेळोवेळी काळजी घेतल्यास तुमचा दूध व्यवसाय नक्कीच फायदेशीर झाल्याशिवाय राहणार नाही.

Conclusion (निष्कर्ष)

दुध व दुधापासून तयार केलेल्या वस्तूंना देशात चांगली मागणी आहे. सकाळच्या सुरुवातीपासून ते अगदी संध्याकाळ पर्यंत मोठ्या प्रमाणात दुध आहारात वापरले जाते.

तसेच दुधापासून तयार केलेले पदार्थ देखील मोठ्या प्रमाणात खाण्यात वापरले जातात. दुधाची हि वाढती मागणी पाहता दुध व्यवसाय शेतकरी व मजूर वर्गाला चांगली कमाई करून देईल.  

Spread the love

Leave a Comment