प्रत्येक ऋतूमध्ये चालणारा Cold storage Business, सरकार सुद्धा करतय मदत

भाजीपाला आणि फळे उत्पादनामध्ये भारत देश हा जगातील सर्वात मोठा देश आहे. दरवर्षी आपल्या देशात लाखो टन मेट्रिकमध्ये भाजीपाला व फळे यांचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी 5 टक्के ते 16 टक्के शेतमाल खराब होतो.

हा शेतमाल खराब होऊ नये याकरिता Cold storage ची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सध्या कोल्ड स्टोरेज बिजनेसला खूप मोठी मागणी आहे.

शेतमालावर फक्त प्रक्रिया करणे इतकीच गरज नसून तो शेतमाल आहे त्या परिस्थतीत टिकवणे ही सुद्धा  महत्वाची गरज आहे आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी कोल्डस्टोरेज हा प्रकल्प पुढे येतो.

आपण जेव्हा मार्केटमधून पालेभाज्या व फळे विकत घरी आणतो तेव्हा त्या एक ते दोन दिवस टिकतात व त्यानंतर त्या खराब होतात.

जर फळे आणि भाजीपाला कोल्ड स्टोरेज मध्ये विशिष्ट तापमानाखाली ठेवला तर त्यांचे जीवन वाढवता येते.

Cold storage म्हणजे काय

कोल्ड स्टोरेज एक अशी जागा आहे, ज्या ठिकाणी मांस, मासे, दूध, दुग्धजन्यपदार्थ, फळे आणि पालेभाज्या एका विशिष्ट तापमानाखाली ठेवल्या जातात.

कोल्ड स्टोरेजमध्ये राखल्या गेलेल्या विशिष्ट तापमानामुळे फळे आणि पालेभाज्यांचे जीवन वाढते, फळे आणि पालेभाज्या अधिक काळ टिकवता येतात.

Cold storage चे महत्व

आपल्या देशात फळे आणि भाजीपाला यांचे वेगवेगळ्या ऋतुमध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

वेगवेगळ्या ऋतूमध्ये पिकवलेला भाजीपाला व फळे मार्केटमध्ये भरपूर उपलब्ध होतात, मार्केटमध्ये यांची संख्या वाढल्यामुळे फळे व भाजीपाल्यांच्या किमंती देखील कमी होतात यामुळे शेतकर्‍यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागतो. हे होणारे नुकसान जर टाळायचे असेल तर आपल्या समोर कोल्ड स्टोरेज हाच पर्याय उरतो.

भाजीपाला व फळे यांना विशिष्ट तापमान व आर्द्रता न मिळाल्यामुळे तो लवकर खराब होतो, यामुळे जे शेतकर्‍याचे नुकसान होत आहे ते नुकसान शेतकर्‍यांनी जर कोल्ड स्टोरेज तयार केले तर नक्कीच होणार नाही.

शेतकरी भाजीपाला व फळे लवकर खराब होतात या भीतीमुळे कमी किमतीत विकतो यामुळे त्याचे खूप सारे नुकसान होते काही वेळा त्याचा झालेला खर्च सुद्धा त्याला परत मिळत नाही.

त्यामुळे आजच्या काळात Cold storage हे शेतकर्‍यासाठी व व्यवसायिकांसाठी एक वरदान ठरत आहे.

कोल्ड स्टोरेज सुरू करण्यापूर्वी

कोल्ड स्टोरेज सुरू करण्यापूर्वी या प्रश्नांचा विचार केला जावा जसे कि जर मला कोल्ड स्टोरेज सुरू करायचे आहे तर ते किती क्षमतेचे सुरू करायचे आहे.

जर मला कोल्ड स्टोरेज सुरू करायचे आहे तर ते कोणत्या उत्पादनांसाठी सुरू करायचे आहे. जर मला कोल्ड स्टोरेज सुरू करायचे आहे तर ते कोणत्या ठिकाणी सुरू करायचे आहे आणि माझ्याजवळ कोल्ड स्टोरेज सुरू करण्यासाठी किती जागा उपलब्ध आहे या सर्व प्रश्नांवरून तुम्हाला या व्यवसायासाठी किती बजेट लागेल हे ठरवता येईल.

कोल्ड स्टोरेज मधील प्रक्रिया

कोल्ड स्टोरेजमध्ये अनेक चेंबर्स तयार केलेले असतात त्यांना चेंबर्स 1, चेंबर्स 2, चेंबर्स 3 अशी नावे दिलेली असतात. प्रत्येक चेंबरमध्ये वेगवेगळा आयटम स्टोर केला जातो त्या चेंबरमध्ये आयटमला आवश्यक असणारे तापमान सेट केलेले असते. म्हणजेच प्रत्येक चेंबरमधील तापमान वेगवेगळे असते.

ज्यावेळी भाजीपाला व फळे निवडून व्यवस्थित बोरींमध्ये भरून तयार केला जातो त्यावेळी तो फोर्क लिफ्ट यंत्राच्या मदतीने चेंबरपर्यंत पोहचवला जातो. पुढे वेगवेगळ्या भाजीपाल्यांना व फळांना विशिष्ट तापमान सेट केलेल्या तापमानाखाली ठेवले जाते.

प्रत्येक चेंबरमधील तापमान हे सेंसर द्वारे कंट्रोल केले जाते, त्यामुळे तापमान कमी किंवा अधिक होत नाही, जितके ते चेंबरमध्ये आवश्यक आहे तितकेच ते सेन्सरद्वारे पुरवले जाते.

कोल्ड स्टोरेजमधील तांत्रिक बाबी मोबाइल अप्प द्वारे सुद्धा नियंत्रणात ठेवतात येतात, जसे टेंपरेचर सेट करणे, हयुमिडिटी सेट करणे, चेंबरमध्ये प्रॉडक्ट अॅड करणे, सिस्टमला सूचना देणे, तसेच स्टोरेज प्रणाली मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याच्या सूचना देखील तुम्हाला अप्पमध्ये दिल्या जातात.

यानंतर ज्यावेळी एखाद्या प्रॉडक्टचा मार्केटमध्ये तुटवडा असतो त्यावेळी तो प्रॉडक्ट कोल्डस्टोरेजमधून बाहेर काढला जातो व मार्केटमध्ये विक्रीस पाठवला जातो. अशावेळी तो मार्केटमध्ये खूप मोठ्या किमतीत विकला जातो.

या बिजनेसमध्ये नफा कसा होतो

उदाहरणार्थ जर तुम्ही कांद्याच्या सीझनमध्ये 50 हजार रुपये किमतीचा 10 रुपये प्रति किलो दराने 50 क्विंटल कांदा विकत घेतला आणि तो ज्यावेळी कांद्याचे दर वाढलेले असतात त्यावेळी मार्केटमध्ये आणला तर तोच कांदा 40 रुपये प्रति किलो दराने विकला गेला तर याठिकाणी तुमच्या हातात 2 लाख रुपये येणार आहेत. म्हणजे भांडवल 50 हजार रुपये वजा केले तर तुमचा नफा हा जवळ जवळ 1.5 लाख रुपये असणार आहे.

कोल्ड स्टोरेजमध्ये उत्पादने किती काळ ठेवतात येतात

कोल्ड स्टोरेजमध्ये उत्पादने 6 महीने, आठ महीने किंवा त्यापेक्षा अधिक वर्षभर स्टोअर करता येतात आणि जेव्हा मार्केटमध्ये त्यांचा तुटवडा असेल तेव्हा चांगल्या किमतीत विकता येतात.

कोल्ड स्टोरेजमध्ये कोणती उत्पादने स्टोअर करता येतात

कोल्ड स्टोरेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, विविध फळे, डेअरी उत्पादने, मसाले, मासे व मांस स्टोअर करता येते.

Single product कोल्ड स्टोरेज/Multi product कोल्ड स्टोरेज

तुम्ही सिंगल प्रॉडक्ट कोल्ड स्टोरेजवर काम करणार असाल तर तुम्हाला लागणारे भांडवल सुद्धा कमी असेल कारण तुम्हाला फक्त एक प्रॉडक्ट स्टोअर करण्यासाठी कोल्डस्टोरेज मध्ये एकच चेंबर तयार करावे लागणार आहे त्यासाठी कामगार कमी लागतील व विजेची बचत सुद्धा होणार आहे. 

जर तुम्ही फक्त बटाटा किंवा कांदा या उत्पादनांसाठी कोल्ड स्टोरेज सुरू करणार असाल तर ते Single product कोल्ड स्टोरेज असणार आहे.

जर तुम्ही विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी कोल्ड स्टोरेज सुरू करणार असाल तर ते multi product कोल्ड स्टोरेज असणार आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये विविध चेंबर्स तयार करावे लागतात, जसे चेंबर 1 चेंबर 2 चेंबर 3 इत्यादि.

वेगवेगळी उत्पादने स्टोर करण्यासाठी वेगवेगळे तापमान व आद्रता तयार करावी लागणार आहे त्यासाठी चेंबरची संख्या देखील वाढणार आहे.

अशा multi कोल्डस्टोरेज मध्ये तांत्रिक देखभाल करण्यासाठी, मालाची फोर्कलिफ्टच्या मदतीने वाहतूक करण्यासाठी, माल सॉर्ट करण्यासाठी कामगारांची संख्या देखील वाढणार आहे. असे Multi product कोल्ड स्टोरेज तयार करण्यासाठी भरपूर खर्च येतो. सर्वसामान्य शेतकर्‍यांना Multi product कोल्ड स्टोरेज परवडण्यासारखे नसते.

Solar cold storage

विजेवर होणारा खर्च थांबवण्यासाठी व विजेची बचत करण्यासाठी solar cold storage ही प्रणाली पुढे आली आहे. solar cold storage हे सोलार पॅनल चलित असते. सोलार पॅनल सिस्टम मार्फत सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेचे विजेत रूपांतर केले जाते आणि ती पुढे कोल्ड स्टोरेज सिस्टम चालवण्यासाठी वापरली जाते.

काही सोलार कोल्ड स्टोरेज असे आहेत ज्यांना 36 तास जरी सूर्यप्रकाश नाही मिळाला तरी ते 36 तास विना सूर्यप्रकाशाचे चालू शकतात. सोलार कोल्ड स्टोरेज देखील विजेवर चालणार्‍या स्वयंचलित कोल्ड स्टोरेजप्रमाणे ऑटोमॅटिक काम करतात.

यामध्ये आवश्यकतेनुसार आतील तापमान स्थिर राखणे, आद्रता स्थिर राखणे या बाबींचा समावेश होतो. solar cold storage मध्ये विजेची पूर्णपणे बचत होते त्यामुळे ग्रामीण भागतील अनेक शेतकरी या solar cold storage प्रणाली कडे आकर्षित झालेले आपणास पाहायला मिळतात.

Leave a Comment