बचत गट व्यवसाय यादी: मार्केटमध्ये सर्वाधिक डिमांड असलेले बचत गट व्यवसाय

आपल्या महाराष्ट्रात अनेक महिला बचत गट आहेत, बर्‍याच महिला बचत गटांना बचत गट सुरू असताना कोणता व्यवसाय करावा हा प्रश्न पडलेला असतो.

बचत गटातील महिलांनी कोणत्या प्रकारचा व्यवसाय करावा, ज्यामध्ये त्या कमी वेळेत कमी कष्टात लवकर यशस्वी होतील.

या पोस्टमध्ये आम्ही महिला बचत गटांना सुरू करता येणारी बचत गट व्यवसाय यादी आणली आहे. या यादीतील कोणत्याही व्यवसायावर परिपूर्ण ज्ञान घेऊन काम केल्यास त्या लवकर यशस्वी होतील.

चला तर मग कोणते आहेत ते व्यवसाय पाहूया.

फरसाणा तयार करणे

फरसाणा हा पदार्थ घरोघरी आवडीने खाल्ला जातो. हॉटेल असेल किंवा मोठे रेस्टोरंट असेल प्रत्येक ठिकाणी याला खूप मोठी मागणी असते.

बचत गटातील महिला एकत्र येऊन फरसाणा तयार करण्याचा व्यवसाय अगदी जोमात सुरू करू शकतात. फरसाणा तळन्यासाठी लोखंडी कढई, तेल, झारणी, वजन काटा इत्यादि थोड्या साहित्यातून हा व्यवसाय सुरू करता येतो.

कुल्फी तयार करणे

कुल्फी म्हटलं की तोंडाला पाणी येते. उन्हाळ्यामध्ये कुल्फीला भरपूर मागणी असते. शहरापासून खेड्यापाड्यात याची खूप विक्री होते. जास्तकरून मलाई कुल्फी खूप विकली जाते.

बचत गटाच्या महिला कुल्फी बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन कुल्फी बनवण्याचा प्लांट उभा करू शकतात. हा एक सीजनेबल व्यवसाय असल्यामुळे फक्त उन्हाळ्यामध्ये यातून भरपूर पैसा कमावता येऊ शकतो.

पापड तयार करणे

रुचकर जेवण म्हटलं की सोबतीला तोंडाला चव आणणारे पापड असतातच. शाकाहारी हॉटेल मध्ये तर पापडाला मोठी मागणी असते, शिवाय श्रीमंत घरातील लोक जेवणाबरोबर पापड आवडीने खातात.

घरातील लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना पापड आवडतात, त्यामुळे हा व्यवसाय वर्षातील बारा महीने चालणारा व्यवसाय आहे. बचत गटातील सर्व महिलांना पापड बनवता येतात, त्यामुळे फक्त मार्केटिंगचे थोडेफार ज्ञान घेतल्यास या व्यवसायात बचत गटातील महिला यशस्वी होऊ शकतात.

तूप तयार करणे

तूप हा भारतीय जेवणाचा महत्वाचा घटक आहे. प्रत्येक गोड पदार्थ बनवताना तुपाचा वापर केला जातो. तसेच मिठाई असेल, पोळी असेल, तुपातील मटन असेल, तुपातील भाजी असेल असे अनेक पदार्थ बनवताना तुपाचा वापर केला जातो. सणसुदीला तर तुपाचे डब्बे लोक खरेदी करतात.

त्यामुळे महिलांना तूप तयार करून स्वतच्या उद्योगाचे लेबल लावून तूप विकता येऊ शकते. तूप तयार करण्यासाठी लागणारे दूध हे आपल्या आसपासच्या दूध डेअरीतुन किंवा दूध व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍याकडून विकत घेता येते. त्यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी कच्चा मालाची अजिबात अडचण येत नाही.

Leave a Comment