leaving certificate application in marathi, शाळा सोडल्याचा दाखला pdf दिली आहे तसेच अर्ज कसा लिहावा मराठी शाळेचा आणि दाखला मागणी अर्ज कसा करायचा ते पाहूया.
पुढील शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा इतर शासकीय कामासाठी शाळा सोडल्याचा दाखला pdf मध्ये, दाखला मागणी अर्ज pdf मध्ये हवा आहे?
चला तर मग आज आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये leaving certificate application in marathi मध्ये कसे लिहले जाते ते पाहूया.
शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना
दाखला मागणी अर्ज
दि : / /2025
प्रति,
मा. मुख्याध्यापक/प्राचार्य,
———– माध्यमिक विद्यालय,
ता. ———–, जि. ———–,
विषय:- शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत
अर्जदार:- ———–
महोदय,
वरील विषयान्वये विनंती अर्ज करतो/करते कि, मी आपल्या शाळेत सन ———– ते ———– रोजी इयत्ता———–वी च्या वर्गात शिकत होतो/होते. मला माझ्या शैक्षणिक/निवडणूक/शासकीय/अन्य कारणासाठी शाळा सोडल्याचा दाखला हवा आहे. तरी शक्य तितक्या लवकर मला दाखला मिळावा ही आपणास नम्र विनंती.
आपला/आपली नम्र
सही:- ———–
नाव:- ———–
शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे काय
शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे school leaving certificate होय. शाळा सोडल्याचा दाखला हे एक असे प्रमाणपत्र आहे जे विद्यार्थ्यांना दुसर्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी दिले जाते.
शाळा सोडल्याचा दाखला का महत्वाचा आहे
विद्यार्थ्यांनो इतर शैक्षणिक कागदपत्रांपैकी शाळा सोडल्याचा दाखला हे सुद्धा एक अतिशय महत्वाचे कागदपत्र आहे. शाळेत प्रवेश मिळवताना, नोकरीसाठी अर्ज करताना व इतर कार्यालयीन कामाच्या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला मागितला जातो.
शाळा सोडल्याचा दाखला हा दुसर्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी, निवडणूक लढवण्यासाठी व इतर शासकीय कामासाठी आवश्यक असतो.
शाळा सोडल्याचा दाखला हा ज्या शाळेतून विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे त्या शाळेतून मिळतो. शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी ज्या शाळेतून आपण उत्तीर्ण झालो आहोत त्या शाळेत अर्ज द्यावा लागतो.
शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना/प्राचार्यांना अर्ज करावा लागतो.