आई वडिलांच्या नावावरून घराचे नाव हवं आहे तर मग जास्त शोध न घेता हा लेख संपूर्ण वाचा तुम्हाला तुमच्या आवडीचे नाव अर्थासहित मिळून जाईल.
नवीन घर बांधलय परंतु आई वडिलांच्या प्रेमाच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी घराला त्यांच्या नावावरून नाव देण एक चांगला निर्णय आहे.
आई वडिलांच्या नावावरून घराचे नाव ठेवणे म्हणजे त्यांच्या कष्टांचे चीज करणे, त्यांच्या मायेची सर्वांना आठवण करून दिल्यासारखी आहे.
आई वडिलांच्या नावावरून घराचे नाव यादी
1. आईची सावली निवास
2. मातृ वंदना
3. तात्यांचा आशीर्वाद
4. तीर्थ स्पर्श निवास (आई वडिलांचे चरण स्पर्श हेच मोठे तीर्थ असा अर्थ)
5. मांगल्य निवास (आई बाबांच्या कृपेने मंगल व पवित्र झालेले घर)
6. आठवण सदनिका (आई बाबांची आठवण असा अर्थ)
7. दादांचा आशीर्वाद
8. बालपण सदन (आई वडिलांच्या सहवासात गेलेले बालपण, बालपणातील घरांशी जोडलेल्या आठवणी)
9. भाऊंचा आशीर्वाद (बाबांना भाऊ असे म्हणत असतील तर हे नाव ठेऊ शकता)
10. आई बाबांची आठवण
11. चरणस्पर्श (आई बाबांचे चरणस्पर्श)
12. संस्कार सदन (आई बाबांनी केलेले संस्कार)
13. गुंफण निवास (नात्यांची गुंफण)
14. मातोश्री निवास (आई शब्दाला पर्यायी शब्द)
15. मायेचा स्पर्श (आई बाणाच्या मायेचा स्पर्श असा अर्थ)
16. आशीर्वाद भवन (आई बाबांचा आशिर्वाद)
17. मातृत्व निवास (आई वडिलांचे प्रेम)
18. मातृत्व सदन
19. आधार सदन (आई बाबांचा आधार, आई बाबांची कृपा)
20. आई बाबाचे घर
21. मातृ छाया (आईचे प्रेम, आईची माया)
22. प्रेम निवास (आई वडिलांचे प्रेम)
23. दर्शन निवास (दर्शन आई वडिलांचे)
24. माया सदन (आई वडिलांची माया)
25. स्वर्ग सदन (आई बाबांचे जिथे असते अस्तित्व त्या जागेला स्वर्ग असे म्हटले आहे)
26. पितृ छाया (वडिलांची सावली)
27. आदर्श निवास (आई वडिलांचे संस्कार, त्यांचा आशीर्वाद)
28. माउली (आई)
29. पांडुरंग निवास (याठिकाणी वडील हे पांडुरंगाचे रूप आहे)
30. रुक्मिणी निवास (रुक्मिणी हे आईचे दुसरे रूप)
31. आईच घरट
32. बाबांची कृपा (बाबांचा आशीर्वाद)
33. विश्वदर्शन निवास (ज्या घरात आई बाबांचे अस्तित्त्व आहे त्याठिकाणी विश्व दर्शन झाल्यासारखेचे आहे म्हणून त्या घराला विश्व दर्शन असे म्हटले जाऊ शकते.)
34. पाऊल सदन (आई वडिलांसोबत टाकलेले पाहिलं पाऊल)
35. आई बाबांची कृपा
36. आईचा आशीर्वाद
37. सावली निवास (आई वडिलांची माया/सावली)
38. सुंदर ते ध्यान निवास (साक्षात आई वडिलांचे दर्शन)
39. पांडुरंग रुक्मिणी निवास
(वडील व आई असा अर्थ, कारण या ठिकाणी आई वडील हे पांडुरंगासारखे आणि आई रुक्मिणी सारखी आहे.)
40. बाबांचा आशीर्वाद
41. दानतीर्थ निवास (ज्या ठिकाणी सर्व काही मिळते अशा घराला दानतीर्थ असे म्हटले आहे. )
42. आई बाबांचा आशीर्वाद
43. निवारा सदन (आई वडिलांचा आधार)
44. विरंगुळा निवास (आई वडिलांसोबत घालवलेले क्षण)
45. लक्ष्मि निवास (आई साक्षात लक्ष्मिचे रूप आहे)
46. कुबेर निवास (वडील हे आपल्या मुलांसाठी कुबेरासारखे श्रीमंत आहेत)
47. आधारवड सदन (आधार देणारे झाड)
48. आठवण निवास (आई वडिलांची आठवण)
49. हृदय मंदिर सदन (हृदय हेच मंदिर, ज्यात आई वडील विराजमान आहेत.)
50. ममता सदन (आईचे प्रेम)
51. आनंद निवास
52. माया सदन (आई वडिलांची माया देणारे घर)
53. वारी सदन (साक्षात परमेश्वररुपी आई वडिलांचे सदन)
54. पंढरी सदन (घर हेच पंढरी)
55. देव निवास (वडील म्हणेज देवच)
56. उभा विटेवरी निवास (विटेवरी उभा असलेल्या विठ्लाची साक्षात वडिलांशी तुलना केली गेली आहे)
निष्कर्ष
घराचे नाव देणे म्हणजे घराची ओळख जपण्यासारखे आहे. आणि जर तुम्ही घराला तुमच्या आई वडिलांचे नाव देत असाल तर त्याचा उद्देश तुमच्या आई वडिलांच्या आठवणी चार भिंतींच्या आत जपण्याचा आहे.
खरं तर, हा निर्णय तुमचा प्रेमळ स्वभाव आणि तुमचा परोपकारी स्वभाव दर्शवितो. तुमच्या आई वडिलांच्या वरील तुमचे प्रेम हे त्यातून दिसून येते.