Import Export चा व्यवसाय म्हटलं कि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसमोर मोठ-मोठे कंटेनर, बाहेरच्या देशातील लोक, करोड रुपये भांडवल, बंदरे, विमाने असे चित्र समोर उभा राहते.
परंतु सध्या इंटरनेटच्या जमान्यात Import Exportचा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे करोडो रुपये भांडवल असणे गरजेचे नाही. अगदी वीस ते पन्नास हजार रुपयात कोणीही हा व्यवसाय करू शकतो.
Import Export चा व्यवसाय महाराष्ट्रात हळूहळू आपले पाय पसरू लागला आहे. गुजरात सारख्या राज्यात किंवा इतर प्रगत राज्यात तुम्हाला प्रत्येक दहा वीस घरामागे एक Exportर बघायला मिळेल. परंतु महाराष्ट्रात या व्यवसायाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.
तुम्हाला ऑफिस टाकायची गरज नाही, घरातून हा आयात निर्यात व्यापार मराठी करता येतो. कंपनी रजिस्टर करण्याची गरज नाही proprietorship नोंदवून देखील आपण हा व्यवसाय चालू करू शकता.

आयात म्हणजे काय
परदेशातील वस्तू, माल देशात आणणे याला आयात असे म्हणतात. आयात व्यवसायात परदेशातील वस्तू, माल आपल्या देशात मागवून त्यावर प्रक्रिया करून अथवा आहे त्या स्वरुपात देशातील स्थानिक बाजारपेठेत विकल्या जातात.
निर्यात म्हणजे काय
देशात तयार होणाऱ्या वस्तू, माल परदेशात पाठवणे याला निर्यात असे म्हणतात. आपल्या देशात तयार होणारा माल, वस्तू परदेशातील मागणीदाराला विकला जातो.
हा व्यवसाय कोण करू शकतो
ज्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ते या व्यवसायात उतरू शकतात. जर त्यांना Export करायचं माहिती नसेल तर ते तयार केलेला माल परदेशात एक्स्पोर्ट करू शकतात.
जर कोणी freelancer, students, businessmen किंवा housewife असतील अशा व्यक्ती देखील कमी भांडवलात Export इम्पोर्टच्या व्यवसायात उतरू शकतात. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची किंवा वयाची अट नाही.
जर कोणी होलसेलर असेल तर ते देखील आपले प्रॉडक्ट्स परदेशात Export करू शकतात.
1 लाख ते 5 लाख रुपये भांडवल
एक लाख ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान ज्यांच्याकडे भांडवल आहे अशा व्यक्तीं छोटे प्रॉडक्ट इम्पोर्ट करून स्थानिक मार्केटमध्ये विकू शकतात.
20 ते 50 हजार भांडवल
ज्यांच्याकडे वीस ते पन्नास हजार रुपयेच्या आत भांडवल असेल अशा व्यक्ती amazon, flipkart व ebay सारख्या इकॉम वेबसाईटवर प्रॉडक्ट्स विकू शकतात.
Merchant trader मर्चंट ट्रेडर

पन्नास हजार ते एक लाख रुपये तुमच्या जवळ असतील तर तुम्ही मर्चंट ट्रेडर म्हणून काम करू शकता. ज्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट नाही, ज्यांच स्वतःच product नाही अशी व्यक्ती दुसऱ्या मॅन्युफॅक्चररकडून प्रॉडक्ट मागवून तिसऱ्या व्यक्तीला विकू शकते. अशा व्यक्तीला आपण मर्चंट ट्रेडर असे म्हणतो.
Right product for export एक्स्पोर्टसाठी योग्य प्रॉडक्टची निवड करा
Export व्यवसायात ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे, कारण मार्केटमध्ये मागणी असलेल्या वस्तूंच एक्स्पोर्ट केल्या पाहिजेत.
तुमच्याकडे शेती भरपूर आहे म्हणून तुम्हाला शेतातील माल Export करायचा आहे किंवा नातेवाईक, मित्र तुम्हाला स्वस्तमध्ये माल देत आहेत म्हणून Export करायचा आहे तर मित्रांनो असे चालणार नाही कारण तुम्हाला मार्केटमध्ये मागणी असलेल्याच वस्तू एक्स्पोर्ट कराव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला market analysis करावे लागेल.
इंडियन ट्रेड पोर्टल या वेबसाईटवर इंडियातून ट्रेड होणाऱ्या वस्तू विषयी माहिती मिळेल व या पोर्टलवरून तुम्ही एका योग्य प्रॉडक्टची Export साठी निवड करू शकता.
Register your company तुमची कंपनी नोदवा
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःच्या व्यवसायाची नोंद करावी लागणार आहे. कोणत्याही बेसिक प्री-मायसेसच्या आधारे तुम्ही हा इम्पोर्ट Export बिजनेस स्टार्ट करू शकता.
तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार व्यवसायाची नोंद, Proprietorship, LLP किंवा private limited यापैकी एक करू शकता. जर तुमच्याकडे ऑफिस नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या नावावर कंपनी रजिस्टर करू शकता.
Documents कोणती कागदपत्रे लागतील
- व्यवसाय सुरू करण्यापूर्वी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
- Import Export code कोड तुम्हाला गव्हर्मेंटच्या dgft.gov.in या संकेतस्थळावर मिळून जाईल.
- Pan card हे तुम्हाला कोणत्याही सीएकडे मिळून जाईल.
- GST registration जीएसटी नोंदणी
- Current bank account चालू बँक खाते
- Authorized dealer code डीलर कोड हे सर्टिफिकेट तुम्हाला बँकेतून घ्यावे लागेल.
- RCMC certificate आरसीएमसी सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र Exportचा व्यवसाय करण्यासाठी लागणार आहे.
Export साठी भारत देशात वेगवेगळ्या उत्पादनासाठी वेगवेगळे बोर्ड तयार केले गेले आहेत. उदाहरणार्थ मसाले निर्यातीकरता SPICES BOARD आहे.
- शेती उत्पादने निर्यातकरिता APEDA आहे.
- चहा निर्याती करिता TEABOARD आहे.
- इंजिनिअरिंग उत्पादने Export साठी EEPC BOARD बोर्ड आहे.
अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्पादन Export साठी वेगवेगळे बोर्ड काम करतात. जो प्रॉडक्ट तुम्ही एक्स्पोर्ट करणार आहात, त्यासंबंधीत बोर्ड एथॉरिटीचे तुम्हाला आरसीएमसी प्रमाणपत्र लागणार आहे.
Export business ideas

Export साठी तुम्हाला अशा वस्तूंची निवड करावी लागणार आहे, जे देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच त्यांना परदेशात भरपूर मागणी असावी. म्हणजे या ठिकाणी दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत एक उपलब्धता आणि दुसरी परदेशात असणारी मागणी.
Garments गारमेंट्स
आपला भारत देश मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन करत आला आहे. आपला भारत देश गेली अनेक दशके परदेशात कापूस निर्यात करत आला आहे.
गारमेंट्समध्ये तुम्ही जर कापूस निर्यातीचा विचार करत असाल, तर तुम्हाला फार कमी नफ्यावर समाधान मानावे लागेल. अधिक नफा मिळवण्यासाठी गारमेंट्समधील फिनिशिड प्रॉडक्ट्स Export करा.
फिनिशिड प्रॉडक्टवर मार्जिन अधिक मिळते त्याचे कारण असे कि अशा वस्तूंमध्ये व्हॅल्यू ॲड झालेली असते,
त्यामुळे मार्केटमध्ये त्याची किंमत देखील अधिक मिळते. गारमेंट्समध्ये तुम्ही तयार कापड, ड्रेस मटेरियल, तयार कपडे असे प्रॉडक्ट्स Export करू शकता.
Non-wearable products
परदेशात बेडशीट, कर्टेन्स आणि नॅपकिन्स सारखे नॉन वेअरेबल प्रॉडक्ट Export करता येतात. अमेरिका, युरोप देशात या वस्तूंना प्रचंड मागणी आहे.
flavoured honey चवदार मध
परदेशात भारतातून मोठ्या प्रमाणात मध Export होतो. मधाला परदेशात चांगली मागणी आहे. भारत देशात मध नैसर्गिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे तो परदेशात एक्स्पोर्ट पाठवला जातो.
आजकाल परदेशात flavoured honey ला जास्त मागणी आहे. नैसर्गिक शुद्ध फ्लेवर्ड मध मिळवण्यासाठी वेगवेगळ्या फुलांच्या लागवड परिसरात मधुमक्षीपालन केले जाते.
उदाहरणार्थ जर rose flavoured honey मिळवण्यासाठी गुलाब शेतीमध्ये मधुमक्षीपालन केले जाते. उदाहरणार्थ जर गुलाब फ्लेवरचा मध मिळवायचा असेल तर गुलाब शेतीमध्ये मधुमक्षीपालन केले जाते.
तुम्ही जर नैसर्गिकरित्या शुद्ध मिळवलेला मध Export साठी निवडला तर तो परदेशी मार्केटमध्ये स्थिर राहील. कारण परदेशात नैसर्गिकरित्या शुद्ध मध फार कमी मिळतो.
आयुर्वेदिक उत्पादने
भारत देशाला फार वर्षापासून आयुर्वेदिक उत्पादनांचा वारसा आहे आणि ग्रंथांमध्ये, साहित्यांमध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचा उल्लेख आढळतो. त्यामुळे आयुर्वेदिक उत्पादने मिळण्याचे एकमेव स्त्रोत भारत देश मानला जातो.
ज्यामध्ये अश्वगंधा, शतावरी, तुलसी व ब्राह्मी अशा आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश होतो. पश्चिमी देशात अशा औषधी वनस्पतींना मोठी मागणी आहे.
अशी अनेक आयुर्वेदिक उत्पादने तुम्ही कच्च्या स्वरूपात किंवा प्रक्रिया केलेली उत्पादने पश्चिमी देशात Export करू शकता.
Export बिजनेससाठी आवश्यक प्रशिक्षण
प्रॉडक्ट निवडण्यापासून या इंडस्ट्री मधील सर्व प्रक्रिया ही सिस्टीम ओरिएंटेड आहेत.
प्रॉडक्ट तयार होण्यापासून, त्याचे पॅकेजिंग होण्यापासून, प्रॉडक्ट लोडिंगवेळी त्याचे डॉक्युमेंट्स तयार होतात व पुढे तो माल शिपमध्ये लोड केला जातो व शेवटी तो ज्या देशात विकला जाणार आहेत त्या देशातील पोर्टवर उतरवला जातो.
ही एक एक्स्पोर्टची प्रक्रिया आहे ही पूर्ण प्रक्रिया तुम्हाला शिकावी लागणार आहे.
जर तुम्ही तरुण असाल. जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल, तर तुम्ही Export बिजनेस चालवणाऱ्या फर्ममध्ये दोन ते तीन वर्ष नोकरी करा.
तुमच्या आयुष्यातील ही दोन तीन वर्षे तुमच्या एक्स्पोर्ट बिझनेससाठी फार महत्वपूर्ण ठरणार आहेत.
अशा फर्ममध्ये काम केल्यामुळे तुम्हाला Export व्यवसायाचे ओव्हरऑल स्ट्रक्चर लक्षात येईल व या इंडस्ट्रीतील बारकावे तुमच्या लक्षात येतील.
Export साठी ग्राहक कसा शोधावा
Product Export करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा buyer कोण आहे हा अगोदर शोधता आलं पाहिजे. समजा तुम्हाला मसाले Export करायचे आहेत किंवा गारमेंटस Export करायचे आहेत.
तर त्यासाठी तुम्हाला परदेशातील होलसेलर, डीलर आणि सुपर मार्केटर्स कोण आहेत हे शोधावे लागतील.
आता तुम्हाला होलसेलर, डीलर आणि सुपर मार्केटर आहे यांची यादी मिळवायची आहे. यांची यादी मिळवण्यासाठी तुम्हाला देश विदेशातील एक्झिबिशनमध्ये सहभागी व्हायचं आहे.
या ठिकाणी तुम्हाला बायरची यादी सहज मिळेल. तसेच B2B वेबसाईटवर देखील बायरची यादी मिळेल.
जर तुम्हाला देशातच प्रॉडक्ट विकायचे असतील तर तुम्ही प्रत्यक्ष होलसेलर, डीलर किंवा सुपर मार्केटर यांच्याकडे डीलसाठी भेट देऊ शकता.
जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित केलेली कृषी प्रदर्शनात सहभाग घेऊन बायरची यादी काढू शकता. तुम्हाला गुगलवर देखील बायरची यादी मिळेल.
मुंबई दिल्ली यांसारख्या शहरात, अमेरिका यांसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये मोठमोठे ट्रेड फेअर्सच आयोजन केले जाते. अशा ट्रेड फेअरमध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊन तुमच्या Export बिजनेससाठी ग्राहक शोधू शकता.
Conclusion (निष्कर्ष)
परदेशातून आयात केलेल्या वस्तू स्वदेशात विकणे किंवा देशात तयार होणाऱ्या वस्तू परदेशात पाठवणे हा व्यवसाय जास्त पैसा मिळवून देणारा व्यवसाय ठरत आहे.
यालाच इम्पोर्ट इक्स्पोर्टचा व्यवसाय म्हटले जाते. या व्यवसायात अनेक संधी आहेत. हा व्यवसाय असा आहे या व्यवसायाला कोणतेही लिमिट नाही तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहून हा व्यवसाय सुरु करू शकता.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.