व्यवसाय सुरू करण्याची अनेक कारणे असू शकतात, काही लोकांना नोकरी करण्यात अजिबात रस नसतो, तर काही लोकांना इतरांच्या हाताखाली काम करू वाटत नाही, तर असेही काही लोक आहेत ज्यांच्याकडे एखादे कौशल्य आहे, पॅशन आहे आणि त्यांना त्या क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करायचा आहे.
मित्रांनो आपणही त्यापैकी एक आहात ज्यांना नऊ ते पाच नोकरी न करता स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करायचा आहे आणि खूप सारा पैसा व नाव मिळवायचे आहे.
तर चला मग आज आपण एक यशस्वी स्वतःचा व्यवसाय कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
Before starting a business व्यवसाय सुरू करण्यापूर्वी

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत असावे कि तुम्हाला कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे. तुमच्या मेंदूत कोणती कल्पना आहे ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे.
कधी कधी तुमच्या मेंदूत अशी देखील कल्पना असेल कि मी हा व्यवसाय सुरू करणार आहे जो मार्केमध्ये हा व्यवसाय कोणीही करत नाही, त्यामुळे मी हा व्यवसाय सुरू केला तर तो चांगला चालेल.
कारण माझ्या मेंदूतील व्यवसाय कल्पना मार्केटमध्ये कोणाकडेच नाही, तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चुकीचे ठरू शकता. कारण तुम्ही जर जगावेगळा व्यवसाय सुरु केला अशा नवीन व्यवसायाचा ग्राहक वर्ग मार्केटमध्ये अजिबात नसतो. त्यामुळे तुमचा नवीन व्यवसाय चालेल का नाही हे सांगता येत नाही.
सांगण्याचे तात्पर्य हेच कि तुम्ही असा व्यवसाय सुरू करावा ज्या वस्तूंना अगोदरच मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. अशा वस्तूंचे ग्राहक अगोदरच मार्केटमध्ये आहेत. असे व्यवसाय अपयशी होत नाहीत.
जर तुम्ही मार्केटमध्ये एखादा नवीन प्रॉडक्ट आणणार असाल तर तुम्हाला त्या प्रॉडक्टची चांगली जाहिरात करावी लागेल.
लोकांमध्ये तुमच्या वस्तूंची गरज निर्माण करावी लागेल, तुमच्या प्रॉडक्टचे महत्त्व समजून सांगावे लागेल, तरच तुमचा नवीन व्यवसाय चालेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी वरील गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा.
Finding business idea व्यवसाय कल्पना शोधा
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमचा interest कशात आहे तो शोधला पाहिजे. तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतात, तुमचे skill काय आहे, तुमची passion काय आहे हे अगोदर तुम्ही शोधले पाहिजे.
कारण तुमचा intrest ज्या क्षेत्रात असणार आहे, त्या क्षेत्रात तुम्ही जास्त काळ आवडीने काम करू शकता. आणि ठराविक क्षेत्रात आवड असल्यामुळे तुम्ही त्यात एक्सपर्ट सुद्धा असता.
Expertise, strength, passion आणि skill या गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात ती गोष्ट केव्हाही चांगली असते. मार्केटमध्ये चांगले रिझल्ट देणारी असते.
Understand market demand मार्केट मधील मागणी समजून घ्या

कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वीची ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे, कारण व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यवसायाला मार्केटमध्ये किती मागणी आहे हे तपासून पाहणे महत्त्वाचे ठरते.
तुम्ही सुरू करणार्या व्यवसायांना जर बाजारातपेठेत मागणीच नसेल तर तुमचा व्यवसाय अपयशी ठरण्याचे चान्सेस अधिक असू शकतात.
मार्केटमध्ये तुमचे ग्राहक कोण आहेत, तसेच वस्तूंना मागणी किती आहे, ती मागणी वर्षभर आहे का? सिजनेबल आहे. तसेच तुमच्या व्यवसायाचे कॉम्पिटिशन किती आहे या बाबी तपासून पहाव्यात.
या स्टेपमध्ये ही सर्व माहिती एकत्रित करून त्यानुसार निर्णय घ्यावा. मार्केटमधील ही माहिती तुम्ही प्रत्यक्ष मार्केटमध्ये फिरून गोळा करता येते अथवा सोशल मीडियावरून देखील माहिती गोळा करता येते.
हे वाचा:
How to find Customers in Marathi
Mistakes to Avoid in Business in Marathi
Find similar business and study them समान व्यवसाय शोधा आणि त्यांचा अभ्यास करा
समान व्यवसायांचा अभ्यास करा. तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात सेम तसेच मार्केटमध्ये असणाऱ्या व्यवसायांचा अभ्यास करा.
असे सिमिलर व्यवसाय मार्केटमध्ये कसे चालतात, त्यांच्याकडे ग्राहक येतात का ते व्यवसाय किती जुने आहेत. त्यांचे मासिक किंवा वार्षिक उत्पन्न किती आहे या गोष्टींचा अंदाज घ्या.
ते त्यांच्या व्यवसायाची जाहिरात कशा पद्धतीने करतात ते तपासा. अशा व्यवसायांना कच्चा माल कोण पुरवते या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करा. शक्य झाल्यास व्यवसाय मालकाशी संपर्क साधा.
Make a business plan for one-year एक वर्षाचा व्यवसाय प्लॅन बनवा
यानंतर तुमची पुढील स्टेप येते बिझनेस प्लॅन तयार करण्याची. बिझनेस प्लॅन तयार करताना तुम्हाला सुरुवातीला एका वर्षाचा बिजनेस प्लॅन तयार करायचा आहे.
यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येणार आहे. सुरुवातीला किती भांडवल लागणार आहे. व्यवसायाचे कार्य सुरू ठेवण्यासाठी वर्षभर कोणता व किती खर्च येणार आहे, याचे गणित करावे.
मग यामध्ये कामगाराचे पगार असतील, वीज बिल, पाणी बिल असेल जाहिरातीवर करावा लागणार खर्च असेल, याचा हिशोब करावा.
Necessary capital आवश्यक भांडवल
व्यवसाय सुरू करताना व्यवसायाच्या सेटअपसाठी किती भांडवल लागणार आहे ते तयार ठेवावे. गाळा दुकान यांचे डिपॉझिटसाठी पैसे, सुरुवातीला खरेदी कराव्या लागणाऱ्या मशिनरीज, कच्चामाल यांचे पैसे, तसेच व्यवसायातून जोपर्यंत नफा मिळत नाही तोपर्यंत गाळाभाडेसाठी कमीत कमी सहा महिने किंवा वर्षभर द्यावे लागणारे भाडे यांचे पैसे अगोदरच तयार ठेवावे किंवा तुम्ही मिळणाऱ्या नफ्यातून दुकान भाडे भरू शकता.
जर तुमचे स्वतःचे दुकान असेल तर मात्र भांडवल खूप कमी लागणार आहे.
भांडवल कुठून उभे कराल
नवीन व्यवसायाच्या प्रवासातील व्यवसाय सुरू करण्यापूर्वी डोक्यात येणारा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण व्यवसाय सुरू करण्याची इच्छा खूप आहे जवळ स्किल देखील आहे पण व्यवसायासाठी लागणारे भांडवल कुठून आणायचे हा प्रश्न पडतो.
खरे तर तुम्ही अशा व्यवसायाची निवड करावी ज्यासाठी भांडवल खूप कमी लागेल. बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला कर्ज फेडे पर्यंत बँकेच्या चकरा माराव्या लागतील कारण कधी कधी असे होते व्यवसाय जर अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद देत नसेल तर तो तोट्यात जाण्याची शक्यता असते. पण बँकेकडून घेतलेले कर्ज तर तुम्हाला फेडावे लागणार आहे.
जर कर्ज काढून व्यवसाय सुरू करणार असाल तर या गोष्टींची खात्री करा कि तुम्ही व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाशिवाय कर्ज फेडू शकता, अथवा जर तुमचा व्यवसाय तोट्यात गेला तर तुमची फॅमिली हे नुकसान एफोर्ड करू शकत नाही.
When to take a business loan व्यवसायासाठी कर्ज कधी घ्यावे

व्यवसायासाठी लोन तुम्ही व्यवसाय सुरू करताना लागणाऱ्या भांडवलासाठी घेऊ शकता, परंतु व्यवसाय तोट्यात गेल्यानंतर ते कर्ज फेडण्याची तुमची तयारी असावी.
यासाठी अतिरिक्त इन्कम सोर्स असावा. शक्यतो व्यवसायासाठी कर्ज घेताना ते तुमचा व्यवसाय वर्षभर स्थिर झाल्यानंतर थोडाफार नफा मिळू लागल्यानंतर घ्यावे.
म्हणजे व्यवसाय वाढीसाठी घेतलेले कर्ज फायदेशीर ठरते. असे कर्ज तुम्ही सहज फेडू शकता. व्यवसाय वाढीसाठी घेतलेल्या कर्जामध्ये रिस्क फार कमी राहते. व्यवसाय वाढीसाठी घेतलेले कर्ज तुम्ही वर वरच्या नफ्यातून फेडता येते.
Register your business तुमच्या व्यवसायाची नोंद करा
तुमचा व्यवसाय ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येत असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात करून घेणे गरजेचे आहे, आणि जर तुमचा व्यवसाय नगरपालिका कार्यक्षेत्रात येत असेल तर नगरपालिका कार्यलयात व्यवसायाची नोंद करण्यात यावी.
व्यवसायाची नोंद केल्यानंतर तुम्हाला स्थानिक प्रशासनाकडून संरक्षण व मदत मिळते. त्यामुळे व्यवसायाची नोंद करणे फार गरजेचे आहे.
स्थानिक प्रशासनाकडे तुमच्या व्यवसायाची नोंद दोन ते तीन दिवसात सहज होऊन जाते. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंद प्रायव्हेट लिमिटेड म्हणून करायची असेल तर त्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे.
Produce high quality products गुणवत्ता पूर्ण वस्तूंची निर्मिती करा
व्यवसायात उत्पादित होणारी वस्तू व्यवसायाचा आत्मा असते, कारण कंपनीसाठी लागणारा पैसा हा वस्तूच्या विक्रीतून आलेल्या पैशातूनच मिळत असते.
तुमच्या उत्पादनांची जास्तीत जास्त विक्री तुम्ही तयार केलेल्या वस्तूंचा टिकाऊपणा, दर्जा, आकर्षण यावर अवलंबून असते. त्यामुळे वस्तूंची गुणवत्ता जपताना कोणत्याही गोष्टींशी कॉम्प्रमाईज करू नका. एक दर्जेदार वस्तू तयार करण्यासाठी कष्ट घ्या.
Use technology for marketing मार्केटिंगसाठी तंत्रज्ञानाचा वापर करा
जितके मोठे नेटवर्क तितकी जास्त विक्री होऊ शकते, त्यासाठी मार्केटिंगचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत आपले उत्पादन पोहोचवा.
यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. तसेच डिजिटल मार्केटिंगच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या उत्पादनांची जाहिरात करून जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहचवा.
सोशल मीडियावर काम करणारे influencer यांच्याशी संपर्क करून जाहिराती करा. यामुळे फार कमी वेळेत लाखो ग्राहकापर्यंत पोहचता येते.
Conclusion (निष्कर्ष)
वरील माहितीच्या आधारे व्यवसाय सुरु करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत हे आपण पाहिलेच, तसेच व्यवसाय कल्पना निवडणे, मार्केट डिमांडचा शोध घेणे व भांडवल किती लागेल या सर्व गोष्टी अभ्यासल्या आहेत.
यावरून आपल्या लक्षात आले असेलच कि एक यशस्वी व्यवसाय कसा सुरु करावा व व्यवसाय सुरु करताना कोणत्या स्टेप्स पूर्ण कराव्यात.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.