हॉटेलसाठी उत्तम नाव कसे निवडाल | How to choose a best name for a hotel

अन्न हा घटक मानवाच्या अन्न वस्त्र निवारा यापैकी एक मुलभूत घटक आहे. याच धरतीवर हॉटेल व्यवसाय हे क्षेत्र भरभराटीस आले.

आज आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात हॉटेल व्यवसायातून दिवसाला लाखो करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. हॉटेल हे व्यवसाय बऱ्याच तरुणांच्या करिअरला दिशा देणारे व्यवसाय ठरत आहेत.

आज अनेक सुशिक्षित तरुणांनी हॉटेल व्यवसाय सुरु करून लाखो रुपये कमवले आहेत व अनेक शिक्षित अशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

जर आपणही हॉटेल व्यवसाय नव्याने सुरु करू पाहत असाल, किंवा तुम्हाला तुमच्या हॉटेलचे नाव बदलायचे असल्यास आम्ही खाली शेअर केलेल्या यादीमधून एखादे नाव तुमच्या व्यवसायाला सुचवू शकता,

तसेच या लेखामध्ये आम्ही हॉटेल व्यवसायाला नाव ठरवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स देखील दिलेल्या आहेत त्यांच्या आधारे तुम्ही एखादे नवीन नाव तयार करू शकता.

स्थानिक यात्रेतून नाव शोधा

गावाच्या व तालुक्याच्या ठिकाणी सुरु असलेल्या यात्रेतून हॉटेलच्या नावांचा शोध घ्यावा. यात्रा म्हटले कि जिकडे तिकडे भेळीची गाडे, चायनीज सेंटरचे गाडे, आईसक्रीमचे गाडे, मिठाईवाले, चिरमुरेवाले, वडापाववाले यांचे स्टॉल व दुकाने पाहायला मिळतात.

कारण गर्दी म्हटलं कि चवीच्या पदार्थावर ताव मारणारे लोक आलेच. मग त्यात महिला असतील, लहान मुले असतील किंवा पुरुषमंडळी असेल.

यात्रेतील गर्दीमुळे व्यावसायिक मोठ्या संख्येने यात्रेत आपले स्टॉल लावतात, यात्रेतील अशा विविध स्टॉलवरच्या नावांच्या पाट्या पाहून तुमच्या लक्षात येईल कि वेगवेगळे खाद्य पदार्थ विकणाऱ्या हॉटेलला नावे कशा प्रकारची दिली जातात.

मसालेदार खाद्य पदार्थ विकणाऱ्या हॉटेलची नावे एकदम स्पायसी कडक असतात. Ice-cream पार्लरची नावे त्यांच्या स्टॉलला शोभतील अशी कुल असतात.

शाकाहारी हॉटेल व मांसाहारी हॉटेलचे नाव

सगळीकडे आपल्याला शक्यतो तीन प्रकारची हॉटेल्स पाहायाला मिळतात. एक शुद्ध शाकाहारी स्पेशल हॉटेल, दुसरे मांसाहारी स्पेशल हॉटेल व तिसरे हॉटेल असे असते ज्याठिकाणी मांसाहारी व शाकाहारी अशी दोन प्रकारची जेवण मिळते.

शाकाहारी हॉटेलचे नाव देताना थोडी काळजी घ्यावी लागते, शाकाहारी हॉटेलचे नाव हे धार्मिक असावे, पवित्र स्थळाचे नाव अशा हॉटेल्सना द्यावे, किंवा तुमच्या परिसरातील देवाचे नाव द्यावे. शाकाहारी हॉटेलचे नाव हे भडकाऊ नसावे, सात्विक शुद्ध आहाराला शोभेल असे असावे.

देवा धर्माच्या नावांशी ग्राहकांचे भावनिक नाते जोडले गेले आहे. बहुतांश शाकाहारी जेवण करणारे ग्राहक हे वारकरी भक्त, म्हणजेच देवाची पूजा आरती करणारे असतात. म्हणून असे शाकाहारी ग्राहक फक्त शाकाहारी जेवण मिळणाऱ्या हॉटेलमध्येच जेवण करण्यास जातात.

मांसाहारी जेवण करणारे हे चंचल स्वभावाचे, तामसी वृत्तीचे असतात, यातील बरेच लोक आपल्या कुटुंबासोबत बाहेर हॉटेलमध्ये मांसाहारी जेवण करायला जातात, तर अशा ग्राहकांसाठी हॉटेलमध्ये जेवणाची स्वतंत्र सोय असायला हवी.

थोडक्यात सांगायाचे झाले तर मांसाहार करणारे ग्राहक हे तरुण वर्गातील विद्यार्थी व राजकारणी कार्यकर्ते असतील तर असे लोक मार्केटमधील बदलत्या ट्रेंडनुसार, नव्या जीवनशैलीनुसार, राहणे खाणे पसंत करतात तर अशा लोकांचे राहणीमान लक्षात घेऊन हॉटेलचे नाव देखील नवीन ट्रेंडचे फेशनेबल असायला हवे.

तुम्ही तुमच्या मांसाहार हॉटेलला मांसाहार चालणाऱ्या देवाची नावे देखील देऊ शकता, उदाहरणार्थ हॉटेल भांडगाव जत्रा, हॉटेल स्पेशल आरेवाडी जेवण इत्यादी.

असे काही नाही कि वरील नावेच मांसाहारी व शाकाहारी हॉटेलला द्यावीत. तुम्ही कॉमन नावे देखील तुमच्या हॉटेलला देऊ शकता. उदाहरणार्थ अक्षय हॉटेल, पुष्पा हॉटेल, मोदी ढाबा इत्यादी.

हा पण अशी कॉमन नावे देताना, विचार करायचा झाल तर अशा नावांची हॉटेल्स अनेक आहेत, त्यामळे नाव जितके एकमेव असेल तितके ते चांगले, नाहितर एकाच गावात एका नावांची दहा हॉटेल्स असायला नकोत.

स्नॅक सेंटरसाठी नाव कोणते द्यावे

Snacks centre म्हणजे कमी जागेत उभारलेले, कमी भांडवलात उभारलेले हॉटेल होय. Snacks centre शक्यतो कॉर्नर, शाळा, बसस्टेन्ड, चौक अशा ठिकाणी सुरू झालेली असतात.

Snacks center मधील पदार्थांवर ताव मारणारे हे जास्त करून कॉमन तरुण तरुणी असतात. अशी तरुणाई नव्या जमान्यानुसार जगत असते, त्यामुळे अशा Snacks center साठी इंग्रजी नावे फार चांगली सूट होतात. अशा नावांचे तरुणांना चांगले आकर्षण असते.

उदाहरणार्थ A1 Snacks centre, Choice snacks centre, Happy snack centre, Love snacks centre इत्यादी.

सकाळचा नाश्ता सेंटरसाठी नाव

नाश्ता म्हटलं कि सकाळ आणि सकाळ म्हटलं कि देव, आरती, पूजा या धार्मिक क्रिया आल्याच त्यामुळे या क्रीयांशी संबधित नाव सकाळच्या नाश्ता सेंटरला द्यायला काहीच हरकत नाही.

नाश्ता सेंटर हे सकाळी अकरा बारा पर्यंत सर्वात जास्त चालते, त्यामुळे सकाळ हि सर्वात जास्त फ्रेश असते व अल्हाददायक असते त्यामुळे नाश्ता सेंटर, फ्रेश फूड असे शब्द तुम्ही तुमच्या निश्चित केलेल्या मूळ शब्दाशी जोडू शकता.

उदाहरणार्थ पूजा नाश्ता सेंटर, आरती फ्रेश फूड आणि जोशी मोर्निंग फूड इत्यादी.

Examples of Hotel Names in Marathi

महाराष्ट्रीयन मराठी हॉटेलची नावे कशी असतात याबद्दल मार्गदर्शनपर काही हॉटेलच्या नावांची माहिती दिली आहे, यावरून विविध प्रकारचे खाद्य पदार्थ विकणाऱ्या हॉटेलची नावे कशी असतात हे तुमच्या लक्षात येईल. खाली मांसाहारी, शाकाहारी व इतर खाद्य पदार्थ विकणाऱ्या होटेलची नावे यांची देखील यादी दिली आहे.

1. शाकाहारी हॉटेलची नावे (Examples)

  • हॉटेल देवाचं घर
  • विठ्ठल हॉटेल
  • द्वारकामाई हॉटेल
  • भक्ती हॉटेल
  • साधना हॉटेल
  • हॉटेल परमार्थ
  • विठाई हॉटेल
  • हॉटेल सुगंध
  • हॉटेल बासरी
  • ईश्वर छाया हॉटेल
  • आशीर्वाद हॉटेल

2. मांसाहारी हॉटेलची नावे (Examples)

  • हॉटेल भांडगाव जत्रा
  • राजयोग हॉटेल
  • दरबार हॉटेल
  • मावळा हॉटेल
  • दादाज हॉटेल
  • दुर्ग हॉटेल
  • शिंदे वस्त्र हॉटेल
  • हॉटेल शाही दरबार
  • दावत हॉटेल
  • हॉटेल रानपार्टी
  • हॉटेल आबा हॉटेल
  • महाराष्ट्रीयन चव हॉटेल
  • हॉटेल मांसाहारी जंक्शन

Conclusion (निष्कर्ष)

तुमचा हॉटेल व्यवसाय मार्केटमध्ये स्थिर करण्यासाठी तुम्ही तयार करत असलेल्या खाद्यपदार्थांच्या चवी बरोबर हॉटेलचे नाव देखील तितकेच आकर्षक व दमदार असायला हवे.

हॉटेलसाठी नाव निवडणे इतके सोपे नाही कारण एकदा निवडलेले नाव हे पुन्हा बदलता येत नाही, त्यासाठी ते विचार करून ठरवणे खूप महत्वाचे आहे.

तुम्ही तुमच्या हॉटेलचे नाव निवडताना स्थानिक घटक, संस्कृती, ठिकाण यांचा विचार करून जितके एकमेव नाव निवडाल तितके ते अनेक वर्षे ग्राहकांच्या मनात राहील. हॉटेलचे नाव ठरवताना तुम्ही ते नाव पारंपारिक, अथवा आधुनिक देखील ठरवू शकता.

Spread the love

Leave a Comment