कापड दुकानासाठी नाव असे शोधा | How to Find a Marathi Name for a Cloth Shop

Clothes Shop साठी नाव शोधताय तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आज आम्ही या लेखात cloth शॉपसाठी काही नवीन नावे दिली आहेत तसेच cloth shop साठी कोणते नाव निवडायचे व कसे निवडायचे याबद्दल देखील मार्गदर्शन केले आहे.

Clothes shop name ideas in Marathi

क्लॉथ शॉपसाठी स्थानिक प्रसिद्ध नावे

प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक शहरात काही प्रसिद्ध मंदिरे, धार्मिक ठिकाणे, पवित्र स्थळे, किंवा नैसर्गिक ठिकाणे असतात तर अशा प्रसिद्ध नावांचा वापर करून क्लॉथ शॉपचे नाव एकमेव बनवता येउ शकते.

त्यासाठी सुरुवातीला अशा नावांचा वापर करावा व त्या पुढे cloth centre, fashion centre, cloth collection जोडू शकता.

उदाहरणार्थ, ज्याठिकाणी तुम्ही क्लॉथ शॉप उघडणार आहात त्या ठिकाणी जर सिद्धनाथाचे प्रसिद्ध मंदिर असेल तर तुम्ही तुमच्या शॉपचे नाव सिद्धनाथ क्लॉथ सेंटर, सिद्धनाथ फॅशन किंवा सिद्धनाथ क्लॉथ कलेक्शन अशी नावे देऊ शकता.

तुमचे शॉप सातारा या ठिकाणी open होणार असेल तर त्याठिकाणी प्रसिद्ध असेलेले अजिंक्यतारा या प्रसिद्ध ठिकाणाच्या नावाचा वापर क्लॉथ शॉपसाठी करता येऊ शकता. उदाहरणार्थ Ajinkyatara Cloth Centre किंवा Ajinkyatara Clothes Collection इत्यादी.

राजकारणातील व्यक्तीच्या नावावरून क्लॉथ शॉपसाठी नाव

तुम्ही राहत असलेल्या परिसरात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही शॉप उघडणार आहात त्याठिकाणी एखाद्या राजकीय व्यक्तीचे वर्चस्व असेल तर त्या राजकीय व्यक्तीचे नाव तुमच्या शॉपला देऊ शकता.

उदाहरणार्थ: आण्णा क्लॉथ कलेक्शन, भाऊ क्लॉथ सेंटर, अजित क्लॉथ सेंटर, शरद क्लॉथ सेंटर, अथवा उदयनराजे क्लॉथ सेंटर इत्यादी.

विशेष वयोगट, व्यक्ती, फॅशन, ट्रेंड या गोष्टी विचारात घेऊन शॉपसाठी नाव

Clothes shop name by fashion in Marathi

जर तुमचे शॉप हे स्पेशल महिला वर्गासाठी असेल म्हणजे शॉपमध्ये फक्त महिलांचे कपडे विकले जाणार असतील तर महिलांच्या नावारून क्लॉथ शॉपचे नाव देता येते. जसे अदिती क्लॉथ शॉप किंवा लक्ष्मि क्लॉथ शॉप इत्यादी.

तुमच्या घरातील आईचे नाव, लहान मुलीचे नाव किंवा लहान मुलाचे नाव यांचे नाव शॉपला देता येईल.

मार्केटमध्ये जर नवीन ट्रेंड असेल तर त्या ट्रेंडच्या अनुषंगाने देखील नाव देता येईल. उदाहरणार्थ दाजी क्लॉथ शॉप, पाटील क्लॉथ शॉप, कॉलर टाईट क्लॉथ शॉप किंवा रुबाब क्लॉथ शॉप इत्यादी.

Business name maker च्या मदतीने क्लॉथ शॉपचे नाव

गुगलवर businessnamemaker.com या वेबसाईट मदतीने तुम्ही एक जबरदस्त नाव तयार करू शकता, त्यासाठी तुम्हाला गुगल सर्च बारमध्ये Business name maker हा शब्द टाईप करायचा आहे.

त्यानंतर रिकाम्या सर्च बारमध्ये ज्याठिकाणी enter keyword असे लिहिले आहे त्या ठिकाणी cloth हा शब्द टाईप करून get started हा बटनवर क्लिक करायचे आहे.

मग पहा तुमच्यासमोर असंख्य क्लॉथ संबधित शब्द जनरेट होऊन येतील. मग काय त्यातील एक suitable शब्द उचलायचा आणि मागे पुढे नवीन शब्द add करून नवीन नाव तयार करायचे.

इतर दुकानांची नावे पाहून प्रेरणा घ्या

असे एक हि शहर सापडणार नाही ज्या ठिकाणी तुम्हाला कपड्याचे दुकान सापडणार नाही. अलीकडे अनेक नवीन कपड्याची दुकाने देखील तुम्हाला पाहायला मिळतील.

काही जुनी दुकाने देखील पाहायला मिळतील आणि काही नवीन देखील पाहायला मिळतील.

जुन्या कपड्याच्या दुकानांची नावे जरा पारंपारिक पाहायला मिळतील तर नवीन दुकानांची नावे थोडीशी अद्ययावत व ट्रेंडीगला असणारी असतील.

तर तुम्ही अशा नावांवरून प्रेरणा घेऊ शकता व तुमचे स्वत:चे नवीन नाव तयार करू शकता.

आडनावावरून क्लॉथ शॉपची नावे

मार्केटमध्ये अशी काही कपड्यांची दुकाने तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांची नावे आडनावावरून सुरु होतात. उदाहरणार्थ दोशी क्लॉथ सेंटर, माने क्लॉथ सेंटर किंवा शिंदे क्लॉथ सेंटर अशी नावे पाहायला मिळतील.

तर मग असे नाव तुमच्या क्लॉथ शॉपला देणे फार सोपे आहे. तुम्हाला फक्त तुमचे आडनाव अगोदर आणि त्यापुढे शॉपशी संबधित शब्द टाकून नाव तयार करायचे आहे.

वर्तमानपत्रातून कापड दुकानासाठी नाव शोधा

सकाळ, पुढारी, पुण्यनगरी अशा अनेक वर्तमानपत्रामध्ये पुरवण्या प्रसिद्ध केल्या जातात. यामध्ये सखी विशेषांक असतो तर सिनेक्षेत्रातील सेलिब्रेटी यांच्यावर अनेक लेख लिहिलेले आढळतात. अशा लेखांमध्ये महिलांविषयी, दैनंदिन जीवनातील ट्रेंड, फॅशन या विषयांवर भरपूर लिखाण आढळते.

तुम्ही अशा लेखांचे वाचन करून या लेखांमध्ये काही नवीन शब्द आढळतात का ते पहा. जर वर्तमानपत्रातून तुम्हाला असे एखादे नाव आढळले तर ते unique असण्याची शक्यता अधिक असते.

असे नाव जर तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये आढळले तर ते copyright free असते. हे नाव पुढे तुम्हे register देखील करू शकता.

नाव अंतिम करताना मित्रांशी, नातेवाईकांची मदत घ्या

जेव्हा तुम्ही तुमच्या क्लॉथ शॉपसाठी एखादे नाव सुनिश्चित करता तेव्हा ते तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना दाखवा, जर त्यात काही त्रुटी असतील किंवा नावाचा अर्थ जर वेगळा निघत असेल तर तसे स्पष्टीकरण तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून व मित्रांकडून मिळू शकते.

त्यामुळे नाव confirm करताना शक्यतो आपल्या व्यावसायिक मित्रांना जरूर दाखवावे.

Examples of Clothes Shop Name Ideas in Marathi

Clothes shop name ideas in Marathi  इंग्रजी अर्थ
एकमेव फॅशन सेंटरEkmev fashion center
फॅशनभूमीFashionbhumi
शाईन क्लॉथ सेंटरShine cloth center
सई फॅशन कॉर्नरSai fashion corner
ज्योती कापड दुकानJyoti kapad dukan
आपले कापड दुकानAaple kapad dukan
माई कापड दुकानMai kapad dukan
स्वरूप कापड दुकानSwarup kapad dukan
सुंदरी कापड दुकानSundari kapad dukan
जानकी कापड दुकानJanaki kapad dukan
मधुरा क्लॉथ सेंटरMadhura cloth center
शिंदे फॅशन स्टुडीओShinde fashion studio
काव्या फॅशन केअरKavya fashion care
मधुरा कापड दुकानMadhura kapad dukan
मयुरा कापड दुकानMayura kapad dukan
पार्वती टेक्सटाईलParvati textile
प्रीती फॅशन हबPriti fashion hub
अनुपा फॅशन हबAnupa fashion hub
अरुंधती स्टाईलArundhati style
सुनंदा गारमेंट्सSunanda garments
कुंदन होलसेल कापड दुकानKundan wholesale kapad dukan
किनार गारमेंट्सKinar garments
चमक कापड दुकानChamak kapad dukan
दर्शन गारमेंट्सDarshan garments
फॅशनपथFashion path
फॅशन दर्शनFashion darshan
सुरेख गारमेंट्सSurekh garments

Conclusion (निष्कर्ष)

Cloth shop साठी नाव मराठीत शोधणे खूप सोपे आहे, हे वरील माहितीवरून लक्षात आले असेलच. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही नाव तुमच्या cloth shop साठी देऊ शकता, फक्त ते unique  असायला हवे.

तुम्ही ज्या भागात cloth shop सुरु करणार आहात त्याठिकाणी त्या नावाचे दुसरे शॉप असता कामा नये.

आम्ही वरती दिलेल्या मुद्यांच्या आधारे तुम्ही cloth shop साठी नाव ठरवू शकता. जर तुम्ही वरील मुद्यांच्या आधारे cloth shop साठी नाव ठरवणार असाल तर ते नाव नक्कीच unique आणि क्लॉथ शॉपसाठी शोभणार ठरणार आहे.

Spread the love

Leave a Comment