फूड बिजनेससाठी टॅगलाइन | Crafting a Strong Tagline for Your Food Business in Marathi

टॅगलाइनची ओळख

व्यवसायातटॅगलाइनचे खुप सारे महत्व आहे. व्यवसायाच्या ब्रांडिंगमध्ये टॅगलाइन एक महत्वाचा रोल निभावते, त्यामुळे टॅगलाइन निवडताना तुमच्या ब्रांडशी म्हणजेच व्यवसायाशी match होणारी असायला हवी. टॅगलाइन विसंगत नसावी.

टॅगलाइन द्वारे तुमच्या व्यवसायाची रूपरेषा निश्चित होते. टॅगलाइन हा एक संदेश मानला जातो.

आज मार्केटमध्ये तुम्ही जितके ब्रांड पाहता त्या सर्व ब्रांडच्या नावाखाली एक टॅगलाइन तुम्हाला पाहायला मिळते. त्या टॅगलाइनमध्ये त्या कंपनीचा व्यवसाय नेमका काय आहे हे सूचित केलेले असते.

उदाहरणार्थ तुम्ही KFC ची tagline “Finger-Lickin’ Good”  वाचली असेल ज्याचा अर्थ “खूप स्वादिष्ट” असा होतो. KFC हा एक फूड ब्रांड आहे, त्यामुळे त्यांची हि tagline त्यांच्या व्यवसायाला match होते. Tagline तयार करताना या उदाहरणाचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

टॅगलाइन कशी असायला हवी

तुमच्या फूड बिजनेसची टॅगलाइन हि catchy, आठवणीत राहण्यासारखी, clear आणि short असायला हवी.

तुमच्या बिजनेसचा अंश त्या टॅगलाइनमध्ये असायला हवा.नाहीतर व्यवसाय फूड बिजनेसचा आणि टॅगलाइन स्पोर्ट बिजनेसची असे नसावे.

टॅगलाइन हि जास्त मोठ्या वाक्यात देखील नसावी, थोडक्यात गहन अर्थ सांगणारी, ग्राहकांना विचार करायला भाग पाडणारी असायला हवी.

टॅगलाइनचे प्रचलित प्रकार कोणते आहेत

आपण मार्केटमध्ये जितके ब्रांड बघतो, त्या प्रत्येक ब्रांडची tagline वेगवेगळी पाहायला मिळते. त्यांचे प्रकार आपण खाली थोडक्यात पाहूया.

Types of tagline for food business in Marathi

1. भावनात्क टॅगलाइन

अशा tagline मध्ये भावना आणि अनुभव शेअर केलेला असतो. उदाहरणार्थ Chat while eating म्हणजेच जेवण करत गप्पा, या tagline मध्ये मित्र मैत्रिणीसोबत गप्पा मारणे हा emotional touch देण्यात आला आहे.

2. वर्णनात्मक टॅगलाइन

यामध्ये प्रत्यक्ष कंपनीच्या सेवांचा किंवा उत्पादनांचा उल्लेख केलेला असतो. उदाहरणार्थ एखादा फळे विक्रीचा व्यवसाय असेल तर त्याची वर्णनात्मकटॅगलाइन ताजी फळे (fresh fruit) अशो होऊ शकते.

3. विनोदी टॅगलाइन

विनोदी टॅगलाइन म्हटल कि तुमच्या टॅगलाइनमध्ये humour येतो. उदाहरणार्थ जर तुमचा चहाचा व्यवसाय असेल तर त्याची टॅगलाइन विनोदी करायचं झाल तर your morning dose, tea is everything, tea for couple अशा होऊ शकतात.

4. कथा सांगणारी टॅगलाइन

अशा प्रकारच्या taglines तुमच्या व्यवसायाचे स्वरूप स्टोरी द्वारे स्पष्ट करतात. 

काही प्रसिद्ध फूड कंपन्यांच्या taglines

Burger King ची टॅगलाइन Be Your Way हि आहे याचा अर्थ आपल्या ध्येयाकडे मार्गस्त होणे असा होतो.

Pizza Hut ची टॅगलाइन No One Out pizzas the Hut हि आहे याचा अर्थ पिज्झा हटचा त्यांच्या गुणवत्तेवर संपूर्ण विश्वास आहे त्यामुळे कोणतेही इतर पिज्जा हट आमच्या पेक्षा उत्तम असू शकत नाही असा होतो.

Subway ची टॅगलाइन Eat Fresh चा अर्थ ताजे खा असा होतो.

KFC ची टॅगलाइन Finger Lickin’ Good चा अर्थ अतिशय स्वादिष्ट असा होतो.

व्यवसायाच्या लोगोमध्ये टॅगलाइनची भूमिका

आज तुम्ही जर पाहिलं तर काही व्यवसायाच्या लोगोमध्ये tagline लिहिलेली असते. ती लोगोच्या text size पेक्षा साईजने लहान असते. Tagline लोगोची शोभा वाढवते. Tagline हा कंपनीचा core message असल्यामुळे त्याचे लोगोमध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे.

Tagline ऑनलाईन कशी तयार करावी

गुगलवर तुम्हाला अनेक वेबसाईट मिळतील, online tools मिळतील ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या फूड बिजनेससाठी टॅगलाइन generate करू शकता.

सिम्पली तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि सर्च बार मध्ये free slogan makerटाईप करून सर्चवर क्लिक करायचं आहे. क्लीक केल्यानंतर तुमच्यासमोर Shopify ची लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करून पुढे जायचं आहे.

Shopify ची लिंक उघडल्यानंतर generate slogan या सर्च बॉक्समध्ये food, snacks किंवा tea असा फूड संबधित शब्द टाकून generate slogan या बटन वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर भरपूर taglines जनरेट होतील त्यातील कोणतीही एक tagline तुम्ही तुमच्या फूड बिजनेससाठी निवडू शकता.

तुमच्या फूड बिजनेससाठी काही taglines

खालील table मध्ये मराठी भाषेत काही taglines दिल्या आहेत तसेच त्याच्यासमोरील रकान्यात त्यांचे इंग्रजी अर्थ दिले आहेत.

या taglines पाहून फूड बिजनेससाठी taglines कशा तयार करायच्या हे तुमच्या लक्षात येईलच.   

Taglines मराठी  इंग्रजी अर्थ   
चवीचा बादशहाKing of taste
खाद्यगिरीFood
प्रश्न शेवटी चवीचाQuestion at the end of taste
स्वाद जिथे माणुसकी तिथेTaste where humanity is
सर्व वाटा येथेच थांबतातAll paths stop here
क्षणभर विश्रांतीA moment’s rest
चला खाऊयाLet’s eat
बेत जेवणाचाBet Jevanacha
जेवणवारीJevanwari
आधी पोटाबा मग विठोबाAgodar Potaba Mag Vithoba
चांगल्या कामाला उशीर कशालाWhy delay a good deed
मनभर प्रेम ताटभर जेवणHeartful love, a plateful of food
साजना शिजवले तुमच्यासाठीSajana cooked for you
चव जिभेवरचीTaste on the tongue
तत्पर जेवण, आनंदी भोजनReady food, happy food
घरचे जेवणHomemade food
चुलीवरचे जेवणMeal on the stove
आनंद भोजनHappy food
भोजनविश्वFood world
जेवण मित्रFood friends
आपल्यांसोबत मायेचा घासFood of love with us
जेवण मात्र निम्मित प्रेम मात्र कायमचेFood is temporary but love is forever
सर्व खव्वयांचे स्वागतAll eaters are welcome
चव म्हटलं कि आम्हीचTaste means we are
खास तांबडा रसा स्पेशलSpecial red curry
स्वादिष्ट जेवण हेच आमचे ध्येयDelicious food is our goal
आम्ही चवीकरWe are tasters
एकमेव देसी चवOnly desi taste
अस्सल गावरान चवीचा आनंदThe joy of authentic village taste
नवीन पिढीची पसंतThe new generation’s favorite
जेवण करत गप्पाChat while eating
जेवणासोबत गप्पाChat with food
सर्व नाती येथेच एकत्र येतातAll relatives come together here

Conclusion (निष्कर्ष)

वरील table मधून तुम्ही तुमच्या आवडीची tagline घेऊ शकता अथवा त्याच्या आधारे नवीन तयार करू शकता. गुगलवर उपलब्ध असलेल्या Online tools च्या मदतीने देखील generate करू शकता.

मार्केटमधील प्रसिद्ध फूड बिजनेसच्या tagline वाचून त्यांनी त्यांच्या tagline मध्ये काय add केले आहे, यावरून तुम्ही देखील तुमची tagline गेस करू शकता.

Spread the love

About Uday Waghmare

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.

View all posts by Uday Waghmare →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *