जिल्हा उद्योग केंद्र व्यवसाय यादी | Profitable District Industry Business Ideas You Can Start Today

जिल्हा उद्योग केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत आहे. जिल्हा उद्योग केंद्र जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सेवा उद्योग व उत्पादक उद्योगांसाठी कर्ज पुरवठा करते.

उमेदवाराने जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये अर्थ सहाय्यासाठी अर्ज केल्यास जिल्हा उद्योग केंद्राद्वारे अशा उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून कर्ज प्रकरणे राष्ट्रीयकृत बँकाकडे मंजुरीसाठी पाठवली जातात.

जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत करता येणारे उत्पादक उद्योग व सेवा उद्योग यादी (विविध व्यवसाय लिस्ट मराठी).

उत्पादक उद्योग यादी

1. पेपर प्रॉडक्टस सेक्टर

या सेक्टर अंतर्गत येणार्‍या उद्योगांमध्ये पेपरचे ग्लास, पेपरच्या डिश, पेपरच्या पत्रावळी, चहाचे कप तयार केले जातात.

2. प्लॅस्टिक प्रॉडक्टस सेक्टर

या सेक्टरमध्ये प्लॅस्टिकच्या खुर्च्या, मग, जार, भरणी, बाटली व इतर घरगुती वापरातील किरकोळ साहित्यांची निर्मिती केली जाते.

3. फूड प्रॉडक्टस सेक्टर

यामध्ये डेअरी उत्पादने, धान्ये, cereals, proteins, मांस, अंडे, सीड्स, बेकरी उत्पादने, निरनिराळ्या प्रकारची पिठे, स्वीट्स बनवणे, packed foods, busicuits, चहा, कॉफी, विविध प्रकारची शीतपेये तयार करणे इत्यादि अन्न घटकांचा समावेश होतो.

4. इंजिनियरिंग प्रॉडक्टस सेक्टर

मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रॉडक्शनमध्ये वापरली जाणारी industrial यंत्रे यांची निर्मिती करणे, बांधकाम क्षेत्रात वापरली जाणारी यंत्रे, बांधकाम साहित्यांची निर्मिती आणि पॅकिंगसाठी लागणारी यंत्र सामग्री यांची निर्मिती करणे.

5. फार्मा प्रॉडक्टस सेक्टर

या सेक्टरमध्ये औषध निर्मिती करणे, तसेच वैद्यकीय क्षेत्रात लागणारी यंत्रे, उपकरणे यांची निर्मिती करणे, इत्यादि घटकांचा समावेश होतो.

6. रेडिमेड गार्मेंट्स प्रॉडक्टस सेक्टर

या क्षेत्रात पुरुषांची, महिलांची व लहान मुलांची रेडिमेड कपडे निर्मिती व विक्री या दोन्हींचा समावेश होतो. यामध्ये तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये वापरली जाणारी कपडे तयार करू शकता व तुमच्या outlet मध्ये विक्री करू शकता.

7. खाद्य तेल प्रॉडक्टस सेक्टर

लाकडी घाना तेल निर्मिती करणे, refined तेल निर्मिती करणे, या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य तेलांचे  उत्पादन घेता येते.

8. पशू खाद्य प्रॉडक्टस सेक्टर

दुभत्या जनावरांना दिले जाणारे पोषक खाद्य निर्मिती, मांस अंडी उत्पादन देणार्‍या पशूंच्या वाढीसाठी लागणारे खाद्य निर्मिती करणे यांचा समावेश होतो.

यामध्ये कोंबडी खाद्य, पशू खाद्य, गोळी पेंड, खपरी पेंड, शेंगदाणा पेंड, तसेच मका भरडा असेल अशा विविध पशू खाद्यांचा समावेश होतो.

9. अग्रों प्रोसेसिंग सेक्टर

शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग या सेक्टरमध्ये मोडतात. अॅग्रो प्रोसेसिंग उद्योगांमध्ये शेतात पिकणार्‍या शेतमालावर प्रक्रिया केली जाते, प्रक्रिया करून तयार केलेली उत्पादने बाजारात विक्रीस नेली जातात.  

10. लाकडी साहित्य प्रॉडक्टस सेक्टर

या सेक्टरमध्ये लाकडापासून बनवलेले टेबल, खुर्च्या, खेळणी, दरवाजे, खिडक्या, शिडी, कपाट अशा अनेक उपयोगी वस्तु बनवल्या जातात.

11. केमिकल प्रॉडक्टस सेक्टर

कपडे, भांडी स्वच्छ करण्याचे केमिकल निर्मिती करणे, बाथरूम, फरशी, ग्लास, इत्यादि साफ करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल निर्मिती करणे इत्यादि होय.

12. कॉस्मेटिक साहित्य प्रॉडक्टस सेक्टर

महिला, लहान मुले व पुरुषांसाठी वापरात येणारी सौंदर्यप्रसाधने निर्मिती करणे. फेसवॉश, सोप, लिपस्टिक, हेयर ऑइल, फेस पाऊडर, अशी विविध उत्पादने यांची निर्मिती केली जाते.

13. आयुर्वेद प्रॉडक्टस सेक्टर

यामध्ये आयुर्वेदिक औषध निर्मिती केली जाते, त्वचेसाठी वापरली जाणारी कॉस्मेटिक उत्पादने निर्मिती करणे, आयुर्वेदीक तेल निर्मिती करणे, ऊर्जा देणारी औषधे निर्मिती करणे इत्यादि.  

14. रबर प्रॉडक्टस सेक्टर

यामध्ये यंत्राचा बेल्ट, रबरची टाळी, रबरचे हातमोजे, रबरच्या केबल्स, वॉटर प्रूफ रबर, रबरचे फुगे, रबरचे बॉल, रबरची खेळणी अशी उत्पादने घेतली जातात.

15. इलेक्ट्रिकल प्रॉडक्टस सेक्टर

घरगुती व इंडस्ट्रियल वापरासाठी आवश्यक इलेक्ट्रिकल उपकरणे यांची निर्मिती केली जाते. जसे टेबल फॅन, सीलिंग फॅन, वायर, स्विच, कूलर, इस्त्री, टावर फॅन आणि शेगडी अशा विविध वस्तूंची निर्मिती केली जाते.

सेवा उद्योग यादी

1. मोबाइल दुरूस्ती

मोबाइल दुरूस्ती करणे, नवीन मोबाइल खरेदी विक्री करणे आणि mobile accesorries ची खरेदी विक्री करणे.

2. फोटोग्राफी

लग्नाचे विडियो शूटिंग करणे, फिल्मचे शूटिंग करणे, फोटो स्टुडिओ चालवणे.

3. सीएससी सेंटर

पॅन कार्ड, मतदान कार्डसाठी अर्ज करणे, विमा भरणे, लाइट बिल भरणे, ऑनलाइन सरकारी योजनांचे फॉर्म भरणे अशी विविध कामे करणे.

4. ब्युटि पार्लर

महिला मुलींसाठी मेकअप करण्याचे काम करणे, लग्नासाठी मेकअपच्या ऑर्डर स्वीकारणे.  

5. पादत्राणे दुरूस्ती

चप्पल दुरूस्ती करणे, चप्पल शॉप चालू करणे.

6. घरगुती उपकरणे दुरूस्ती

घरगुती इलेक्ट्रोनिक्सच्या वस्तु दुरूस्ती करणे, टीव्ही, एलईडी, फॅन, मिक्सर, फ्रीज, कूलर अशा अनेक घरगुती वापरच्या वस्तु दुरुस्त करणे.

7. फोटो फ्रेम तयार करणे

फोटोंसाठी लागणार्‍या फ्रेम्स तयार करणे, पेंटिंग, भिंतीवर लावणार्‍या फोटोंसाठी आवश्यक फ्रेम तयार करणे.

8. सायकल दुरूस्ती

लहान मुलांच्या, मोठ्या लोकांच्या सायकल दुरुस्तीचे काम करणे, यामध्ये सायकल पंक्चर काढून देणे व इतर दुरुस्तीची कामे करणे इत्यादि कामे तुम्ही करू शकता.

9. दुचाकी व चारचाकी दुरूस्ती

दुचाकी व चारचाकी गाड्यांचे स्पेअर पार्ट्स बदलणे, किरकोळ दुरुस्तीची कामे करणे, हवा भरणे, wheel alignment करणे.

10. पेंटिंग डंटिंग

जुन्या गाड्यांना रंग देण्याचे काम करणे, गाड्यांचे वॉशिंग करून रंग देणे.

11. आयटी डीटीपी वर्क

आयटी क्षेत्राशी संबधित कामे करणे, डीटीपीची कामे करणे.

12. प्रिंटिंग वर्क

डिजिटल बॅनर प्रिंट करणे, टीशर्ट प्रिंटिंग करणे, जाहिरात छापणे आणि लग्न पत्रिका तयार करणे.

13. टेलरिंग

महिला पुरुष व लहान मुलांची कपडे शिलाई करणे. कंपन्यांच्या कामगारांच्या ड्रेसच्या ऑर्डर घेणे, शाळेच्या मुलांचे ड्रेसच्या ऑर्डर घेणे.  

14. ग्लास वर्क

काचेच्या शोभेच्या वस्तु तयार करणे, खिडक्यांना ग्लास बसवणे व होम डिझायनिंगमध्ये वापरल्या जाणार्‍या ग्लासचे काम करणे.

15. साफसफाई, पेंटिंग

घर, बिल्डिंगला, अपार्टमेंटला रंग देण्याचे काम घेणे, हाऊसकीपिंगची कामे घेणे, इतर सार्वजनिक ठिकाणी साफसफाईचे काम घेणे, सरकारी व खाजगी शाळांना रंग देण्याचे साफसफाईचे काम घेणे.

1. प्रथम उमेदवाराला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्हा उद्योग केंद्रातील महाव्यवस्थापकांकडे अर्ज सादर करायचा आहे. 

2. उमेदवारांना अर्थसहाय्य हे राष्ट्रीयकृत बँकाकडून दिले जाते.

3. अर्ज तपासून झाल्यानंतर अर्ज जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी राष्ट्रीयकृत बँकाकडे पाठवतात. 

जर तुम्ही एक उद्योजक असाल, जर तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल किंवा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करू पाहत असाल तर तुमच्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र म्हणजे district industrial center बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

जिल्हा उद्योग केंद्र हे एक असे जिल्हास्तरीय कार्यालय/समिति आहे जी अशा युवकांसाठी काम करते ज्यांना स्वत:चा उद्योग तर सुरू करायचा आहे परंतु पुरेसे भांडवल नसल्यामुळे ते व्यवसाय सुरु करू शकत नाहीत.

देशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती व्हावी, अनेक तरुणांच्या हाताला काम मिळावे, या हेतूने जिल्हा उद्योग केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

जर सरकार एका तरुणाला नोकरी देणार असेल तर त्यातून फक्त त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो परंतु जर एक उद्योजक निर्माण झाला तर तो असंख्य हातांना काम देऊ शकतो.

उद्योगातून अनेक रोजगार उपलब्ध होऊ शकतात, हे सरकारने जाणले आहे त्यामुळे सरकार जिल्हा उद्योग केंद्रासारखे उपक्रम जिल्हा स्तरावर राबवण्यास तत्पर आहे.

सरकारने तरुणांना नोकरी सोबत उद्योगांच्या संधि उपलब्ध करून दिल्या तर जास्तीत जास्त नोकर्‍या उपलब्ध होतील असे सरकारचे धोरण आहे.

जिल्हा उद्योग केंद्रातून बरचेसे उद्योग करता येतात. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग यूनिट सुरू करू शकता, अथवा कोणत्याही क्षेत्रातील सर्विस सुरू करू शकता.

जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन तुम्ही तुमच्या आवडीच्या उद्योगासाठी अर्ज करू शकता.

आम्ही या पोस्टमध्ये अपलोड केलेली माहिती नक्कीच तुमच्या उद्योगांसाठी उपयोगी ठरेल अशी आशा आहे. तरुणांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या उपक्रमाचा फायदा घेता येईल.

FAQ

जिल्हा उद्योग केंद्राची कामे काय आहेत?

जिल्हा उद्योग केंद्र जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सेवा उद्योग व उत्पादक उद्योगांसाठी कर्ज पुरवठा करते.

डीआयसी म्हणजे काय?

डीआयसी म्हणजे District Industries Centre, जिल्हा उद्योग केंद्र होय. जिल्हा उद्योग केंद्र जिल्ह्यातील तरुणांना सेवा उद्योग व उत्पादक उद्योगांसाठी कर्ज पुरवठा करते.

डीआयसी कर्जासाठी कोण पात्र आहे?

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षे पूर्ण असावे. व्यक्ती भारताचा नागरिक असावा. शिक्षण कमीत कमी ८ वी पास असावे.

Spread the love

Leave a Comment