व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे काय

प्रशासनाद्वारे नेतृत्व केले गेलेले नियोजन, धोरणे यांची अंमलबजावणी करण्याच काम व्यवस्थापन करत असते. व्यवस्थापन हा व्यवसायातील कामगारांना संघटित करण्याचा उत्तम मार्ग आहे.

व्यवस्थापनाकडून कंपनीची उद्दिष्टे, ध्येये गाठण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच व्यवस्थापन हे कंपनीत कमिशन बेसिसवर व पगारावर काम करणार्‍या कामगारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

व्यवस्थापनाची व्याख्या काय आहे (the definition of the management)

1. व्यवस्थापन ही एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे इतरांकडून अपेक्षित काम करून घेतले जाते.

2. व्यवस्थापन घटकाकडे असे कौशल्य असते ज्याच्या मदतीने तो इतरांकडून अपेक्षित काम करून घेतो. त्या कामाचा फायदा तो कंपनीचे ध्येये मिळवण्यासाठी करून घेतो.

व्यवस्थापनाची प्रक्रिया

व्यवस्थापनाची प्रक्रिया ही खालील पाच घटकांतून जाते.

नियोजन करणे

कोणतेही काम करण्यापूर्वि एक नियोजन केले जाते. उदाहरणार्थ जर एखाद्या शाळेची सहल जाणार असेल तर ती सहल कोणत्या ठिकाणी जाणार आहे, कोणत्या दिवशी आणि किती वाजता जाणार आहे हे ठरवले जाते, त्यानंतर त्या ठिकाणी बसने जायचे आहे, ट्रेननी जायचे आहे कि विमानाने जायचे आहे हे निश्चित केले जाते.

सहलीसाठी खर्च किती येईल, त्याच बरोबर कोणत्या वस्तु सोबत हव्यात या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. अगदी याच प्रमाणे व्यवस्थापनामध्ये नियोजन या घटकाची भूमिका असते.

व्यवसाय व्यवस्थापनामध्ये देखील एखादे व्यावसायिक कार्य करण्यापूर्वि नियोजन केले जाते आणि त्यानंतरच पुढची प्रक्रिया केली जाते.

छोट्या व्यवसायांना त्यांचे स्वत:चे प्लॅन्स असतात त्यानुसार ते त्या प्लॅन्सवर काम करतात. मोठ्या व्यवसायांना मोठे प्लॅन्स असतात जसे sales plan (विक्री नियोजन), marketing plans (जाहिरात नियोजन) आणि production plans (उत्पादन नियोजन) इत्यादि होय.

संघटन करणे

संघटन म्हणजे systematic पद्धतीने गोष्टींना अरेंज करणे होय. संघटन या शब्दाचा अर्थ आपण उदाहरण देऊन समजून घेऊया.

समजा तुमच्या कॉलेजमध्ये नृत्य स्पर्धांच आयोजन केले आहे तर अशा कार्यक्रमात कार्यक्रम आयोजक असतो, पाहुणे असतात, अँकर असतो, व्यवस्थापक असतो, कार्यकर्ते असतात, स्पर्धेमध्ये भाग घेणारे स्पर्धक असतात, डेकोरेशन करणारे लोक असतात अशा अनेक लोकांचा समूह कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडतो असतो, त्यांच्यामध्ये एक teamwork असते. या टीमवर्कला अशा लोकांच्या समूहाला आपण संघटन म्हणू शकतो.

कंपनीमध्ये एक संघटन तयार केले जाते ज्यामध्ये व्यवस्थापक कोण असेल, वरिष्ठ अधिकारी कोण असतील, कनिष्ठ अधिकारी कोण असतील, ऑफिस स्टाफ किती असायला हवा, एका व्यवस्थापकाच्या हाताखाली किती लोक असतील हे सर्व संघटनामध्ये निश्चित केले जाते.

थोडक्यात सांगायचे झाले तर organise मध्ये फॉर्मल रिलेशनशिप तयार होते ज्यामध्ये कोण मॅनेजर असेल, कोण ordinator असेल, कोण subordinator असेल, manager असेल, कोण empolyee असतील तर कोण मध्यस्थानी असेल तर कोण उच्चस्थानी असेल हे सर्व निश्चित केले जाते.

संघटनमध्ये प्रत्येकजण स्वत:ची जबाबदारी पार पाडत असतो. यामध्ये कामगार आणि अधिकारी संस्थात्मक ध्येये पूर्ण करण्यासाठी आपली कामे, आपले कार्य व जबाबदार्‍या पार पाडत असतात.

कामगारांची भरती

staffing एक अशी प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत प्रशिक्षित, शिक्षित, कामगारांची भरती करणे, त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्य गुणांना विकसित करणे, त्यांच्या कामाच्या बदल्यात त्यांना बोनस, बक्षिसे आणि पुरस्कार जाहीर करणे इत्यादि कामे staffing अंतर्गत केली जातात.

व्यवस्थापनामध्ये कामगारांची भरती हा अतिशय महत्वाचा भाग असतो. कामगार हा व्यवस्थापनामधला प्रत्यक्ष कार्य करणारा घटक असतो. जर कामगारच नसतील तर कितीही चांगले नियोजन केले कितीही नवीन धोरणे आखली तरी त्याची प्रत्यक्ष अमंलबाजावणी करायला कामगार आवश्यक असतात.

कोणत्याही कंपनीच्या व्यवस्थापनाला त्यांचे अपेक्षित परिणाम मिळवण्याकरिता प्रशिक्षित कामगारांची आवश्यकता असते. त्यासाठी व्यवस्थापन वेळोवेळी त्यांच्या ऑफिस स्टाफला, प्रॉडक्शन स्टाफला, मार्केटिंग स्टाफला आणि सेल्स स्टाफला प्रशिक्षण देते.

कामाचा ताण वाढल्यास गरजेनुसार कामगारांची भरती करणे, गरजेपेक्षा जास्त कामगार झाल्यास नोकर कपात करणे, योग्य कामासाठी योग्य कामगारांची निवड करणे इत्यादि कामे व्यवस्थापन वेळोवेळी करत असते.

Leave a Comment