केवळ मोबाइल फोन आणि इंटरनेट कनेक्शन च्या मदतीने तुम्ही तुमचा dropshipping बिजनेस सुरू करू शकता.
पूर्ण जगात हा बिजनेस सध्या ट्रेंडिंगला आहे. dropshipping बिजनेस मध्ये तुम्हाला प्रॉडक्टस मॅन्युफॅक्चर करावे लागत नाहीत, स्टोअर करावे लागत नाहीत, तुम्हाला कोणतेही दुकान भाड्याने घ्यावे लागत नाही, पैसे खर्च करावे लागत नाहीत तुम्हाला फक्त तुमचा वेळ देऊन हा dropshipping बिजनेस सुरू करता येतो.
Dropshipping business म्हणजे काय?
सोप्या भाषेत समजायच झाल तर dropshipping business हा एक असा बिजनेस आहे ज्यामध्ये तुम्ही इतर ठिकाणाहून वस्तु मागवता त्या वस्तूंवर आपले मार्जिन अॅड करता आणि त्या वस्तु डायरेक्ट ग्राहकाच्या अॅड्रेसवर पोहचवता.
Dropshipping business मोडेल कसे काम करते?
या बिजनेस मध्ये तुम्ही तुमची वेबसाइट तयार करता किंवा सोशल मीडियावर फेसबूक पेज/इनस्टा पेज तयार करता. या ठिकाणी तुम्ही वेबसाइटवर, सोशल पेजवर सप्लायरकडून वस्तूंची माहिती, इमेज्स मागवून वेबसाइटवर लिस्ट करता. या मध्ये प्रत्येक वस्तु मागे तुम्हाला तुमचे मार्जिन अॅड करायचे असते उदाहरणार्थ जर तुम्हाला सप्लायरकडून एक शूज जोडी 500 रुपयाला मिळत असेल तर तुम्ही त्यावर 100 किंवा 200 रुपये मार्जिन अॅड करू शकता.
या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमच्या सेल्स पेज/वेबसाइटची मार्केटिंग करायची असते. जास्तीत जास्त लोकांना वेबसाइटवर/पेज वर आणावे लागते.
तुम्हाला तुमच्या सोशल पेज वर/वेबसाइट वर लोकांकडून ऑर्डर आल्यास तुम्हाला ती ऑर्डर डायरेक्ट सप्लायरकडे पास करायची असते.
यामध्ये वस्तु तुम्हाला अगोदर विकत घ्याव्या लागत नाहीत तर तुमच्याकडे आलेली ऑर्डर ग्राहकाच्या पत्त्यासह सप्लायरकडे द्यायची आहे. सप्लायर तुमच्या ग्राहकांची ऑर्डर स्वत: शिप करेल आणि तुमचे कमिशन तुम्हाला देईल.
आपल्या जवळ कोणतेही सामान न ठेवता सामान विकणे म्हणजे ड्रॉपशिप्पिंग होय.
सध्या इंडियातच नव्हे तर पूर्ण जगात हा बिजनेस ट्रेंडवर आहे. यामध्ये तुम्ही महिना 10 हजार ते 5 लाख रुपये पर्यंत कमाई करू शकता. हा बिजनेस सुरू करण्यासाठी कोणतीही पात्रता लागत नाही, वय लागत नाही कोणतीही व्यक्ति हा व्यवसाय करू शकते.
Dropshipping करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म कोणते आहेत?
1. वेबसाइट: ड्रॉपशिपिंगसाठी तुम्ही जे प्रॉडक्टस वापरणार आहात ते प्रॉडक्टस तुम्ही तुमची स्वत:ची वेबसाइट तयार करून त्यावर लिस्ट करू शकता.
2. फेसबूक पेज: तुम्ही फेसबूकवर बिजनेस पेज तयार करून त्या पेजवर प्रॉडक्टस ची माहिती, इमेज पोस्ट करू शकता.
3. इनस्टापेज: इनस्टाग्राम वर सुद्धा तुम्हाला प्रॉडक्टसची मार्केटिंग रील्सद्वारे करता येते.
4. व्हाट्सअप ग्रुप: तुम्ही तुमच्या मोबाइलवर व्हाट्सअप ग्रुप किंवा लोकांची कम्यूनिटी तयार करून प्रॉडक्टसची माहिती, किंमत, इमेज पोस्ट करू शकता.
5. shopify store: ड्रॉपशिपिंगसाठी shopify वर ऑनलाइन स्टोर क्रिएट करून dropshiping करता येते.
असे अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहात ज्यावर तुम्ही तुमचे अकाऊंट उघडून मार्केटमध्ये येणार्या नवीन वस्तूंची जाहिरात करू शकता, लोकांशी संपर्क साधू शकता. तुमचे जितके जास्त फॉलोवरस असतील तितक्या जास्त ordres तुमच्याकडे येण्याची शक्यता असते.
तुम्हाला सतत सोशल प्लॅटफॉर्म वर अपडेट राहावे लागेल. तुमच्या व्यवसाय कॅटेगरीच्या संबधित येणार्या नवीन वस्तूंची माहिती ग्रुप मधील लोकांना इमेज, विडियो शेअर करून द्यावी लागेल.
ड्रॉपशिपिंगसाठी सप्लायर कसे शोधाल?
आज मार्केटमध्ये हजारो सप्लायर आहेत जे वेगवेगळ्या कॅटेगरीची उत्पादने dropshiping साठी, reselling साठी लोकांना पुरवतात.
इंडिया मार्ट वर तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीची उत्पादने विकणारे सप्लायर मिळतील.
मुंबई, पुणे, सूरत अशा मोठ मोठ्या शहरात अनेक सप्लायर आहेत जे साडी, खेळणी, मोबाइल अकसेसरीज, किचन अकसेसरीज, होम डेकोर, कॉस्मेटिक्स, ज्वेलरी अशा विविध क्षेत्रात डील करतात.
तुम्हाला यूट्यूब व गूगल वर अशा अनेक सप्लायरचे संपर्क क्रमांक, पत्ता मिळेल तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वस्तूंची माहिती, होलसेल किमंत, शिप्पिंग चार्जेस, प्रॉडक्ट डेलिवेरी टाइम या बाबत अधिक माहिती घेऊ शकता.
Dropshipping मध्ये प्रॉडक्टस वर किती मार्जिन जोडले केले पाहिजे?
समजा तुम्हाला सप्लायरकडून एक जेंट्स शूज जोडी 1000 हजार रुपयाला मिळत असेल तर तुम्ही त्या शूज जोडीवर 200 ते 500 रुपये एकस्ट्रा मार्जिन अॅड करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक शूज जोडीवर 200 ते 500 रुपये कमिशन मिळेल यामध्ये तुम्ही तुमचा जाहिरातीचा खर्च व तुमचे कमिशन काढून घेऊ शकता.
वस्तूंवर मार्जिन असे अॅड करावे की ज्यामधून तुमचा जाहिरातीचा खर्च निघून तुमचे कमिशन शिल्लक राहील.
Dropshipping मध्ये मार्केटिंगचे महत्व
तुमच्या सोशल अकाऊंटवर ordres आल्या की त्या ordres तुम्हाला सप्लायरकडे पोहचवायच्या असतात, सप्लायर त्या वस्तु स्वत पॅक करून ग्राहकांच्या पत्त्यावर पोहचवतो. या प्रोसेस मध्ये तुम्हाला इतर कोणतेही काम करावे लागत नाही, तुम्हाला फक्त ग्राहक आणून द्यायचे असतात.
हे तर आता आपण समजून घेतले परंतु या सर्व प्रोसेसमध्ये तुमची भूमिका फक्त मार्केटिंग करणे असते. तुम्ही किती प्रभावीपणे वस्तूंची जाहिरात करून ग्राहकांना वस्तु खरेदी करायला लावता यावर तुमचा बिजनेस अवलंबून असतो.
तुमचे प्रेझेंटेशन कौशल्य, संभाषण कौशल्य, इतके प्रभावी असायला हवे कि ग्राहक तुम्ही लिस्ट केलेली उत्पादने विकत घेण्यास उत्सुक झाला पाहिजे.
या ड्रॉपशिपिंग बिजनेसमध्ये सर्व खेळ मार्केटिंगचा आहे. तुम्हाला वस्तूंची मार्केटिंग उत्तमरित्या करता आली पाहिजे.
Dropshipper म्हणजे काय?
तुमच्या orders ग्राहकापर्यंत पोहचवणार्या retailer, wholsaler किंवा supplier ला dropshipper असे म्हटले जाते. तुमच्या ऑनलाइन स्टोअरशी जोडलेला supplier हा ड्रॉपशिपर असतो.
एक उत्तम supplier, wholsaler कसा निवडावा?
मित्रांनो अलीकडे प्रत्येकजण आपल्या गरजेच्या वस्तु ऑनलाइन मागवताना आपणास पाहायला मिळते. परंतु कधी कधी आपण असे सुद्धा ऐकले असेल की अमुक व्यक्तीने मोबाइल ऑनलाइन ऑर्डर केला आणि त्याला बॉक्समध्ये साबण निघाला. कधी कधी खराब, वापरलेल्या वस्तु देखील ग्राहकांना मिळतात, त्यामुळे कंपनीचे नाव खराब होते. या बिजनेसमध्ये supplier हा चांगला निवडला जावा, जो दर्जेदार क्वालिटीचे सामान तुमच्या ग्राहकांना देईल.
वस्तूंची गुणवत्ता हाच प्रत्येक बिजनेसचा आत्मा असतो त्यामुळे supplier असा निवडा कि जो कोणतीही फसवा फसवी न करता चांगल्या दर्जाच्या वस्तु पुरवेल.
ड्रॉपशिपिंग मध्ये यश मिळवण्याचे सूत्र
ड्रॉपशिपिंग मध्ये सर्वात महत्वाच्या या चोर गोष्टी असतात त्या म्हणजे वस्तु, वेबसाइट, जाहिरात आणि नफा इत्यादि होय. ज्यावेळी तुम्ही या चार गोष्टींवर जोर द्याल त्यावेळी तुम्ही ड्रॉपशिपिंग मध्ये लवकर यशस्वी व्हाल.
या चार गोष्टी ऐकमेकांशी जोडलेल्या आहेत यातील एकावर जरी तुम्ही काम करायचे कमी केले तरी तुमचा ड्रॉपशिपिंग बिजनेस लवकर फेल जाऊ शकतो.
त्यासाठी तुम्हाला ड्रॉपशिपिंग मध्ये अशा वस्तूंची निवड करायची आहे जेणेकरून सहजा सहजी तरी ती वस्तु इतर ठिकाणी उपलब्ध नसली पाहिजे.
ड्रॉपशिपिंग मध्ये तुम्ही अशी वस्तु विकायला हवी ज्या वस्तूंची लोकांना खूप गरज आहे. जी वस्तु पाहिल्यानंतर लोकांनी लगेच खरेदी करायला हवी.
ड्रॉपशिपिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम एका कॅटेगरी वर काम करायचे आहे. जर तुमची कॅटेगरी ही कापड असेल तर तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोर वर फक्त ड्रेस, टॉप, क्लोथिंग, टी-शर्ट अशा वस्तु तुम्हाला सेल करायच्या आहेत.
ड्रॉपशिपिंग मध्ये वस्तूंच्या किमंत कशा ठरवाल
या बिजनेसमध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या ऑनलाइन वस्तूंच्या किमंती ह्या योग्य दरात ठेवाव्या लागतील.
कारण तुम्ही सेल करत असलेल्या वस्तूंच्या किमंती ह्या इतक्या ही जास्त नसाव्यात कि ग्राहक वस्तूंची किमंत पाहिल्यावर विचारात पडेल.
त्यासाठी मार्केटमध्ये अगोदर त्या वस्तूंच्या किती किमंती आहेत ह्या तपासाव्या व त्यानंतर तुम्ही सेल करत असलेल्या वस्तूंची किमंत निर्धारित करावी.
Conclusion (निष्कर्ष)
dropshipping काय आहे, ते कसे काम करते, इंडिया मध्ये dropshipping कसे केले जाते, तसेच dropshipping मध्ये किती पैसे व किती स्कोप आहे हे वरील माहीतीच्या आधारे तुमच्या लक्षात आले असेलच.
मार्केटमध्ये प्रत्येक तरुण enterpurenur च्या तोंडात फक्त तुम्हाला dropshipping हा एकच शब्द तुम्हाला ऐकायला मिळेल, इतके dropshipping मध्ये तरुणांना पोटेंशल वाटत आहे. आम्ही वरील लेखामध्ये शक्य तितकी ड्रॉपशिप्पिंग बद्दल माहिती दिली आहे.