🛍️ ई-कॉमर्स व्यवसाय कसा सुरू करावा ? / Amazon, Flipkart, Meesho साठी काही खास टिप्स.

आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाला स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करून पैसे कमवायची इच्छा आहे. पण अनेकजण हेच विचारात राहतात की “कुठून सुरू करायचं?”, “काय-काय लागू शकते?”, “मोठी गुंतवणूक नसेल तर शक्य होईल का?” जर तुम्ही सुद्धा ई-कॉमर्स बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे मोठं बजेट नाही, तर ही पोस्ट आम्ही तुमच्यासाठी खास तयार केली आहे.
या लेखात आपण अगदी काही ज्ञान नसलेल्या व्यक्तीलाही ऑनलाइन व्यवसाय सुरू करता यावा यासाठी आवश्यक माहिती पाहणार आहोत. कुठून सुरुवात करायची, कोणता प्रॉडक्ट विकायचा, कशी रणनीती वापरायची, आणि एकदा सुरू केल्यानंतर ऑर्डर्स कशा वाढवायच्या हे सगळं स्पष्टपणे दिले आहे.
सर्वात आधी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे “आपण कोणता प्रॉडक्ट विकणार आहोत?”याच निर्णयावर तुमच्या संपूर्ण बिझनेसचा पाया उभा आहे.
🛍️ टिप 1: योग्य प्रॉडक्ट निवडण्यावर लक्ष केंद्रित करा. (Focus on the Right Product Selection)
ऑनलाइन ई-कॉमर्स बिझनेस सुरू करताना पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमका कोणता प्रॉडक्ट विकायचा हे ठरवणे आहे.शूज, घड्याळं, टी-शर्ट्स की खाण्यापिण्याच्या वस्तू विकायच्या? सुरुवातीला अनेकांना याच प्रश्नाचं उत्तर बुचकळ्यात टाकते, कारण बहुतांश नवीन सेलर्सना काहीच अनुभव नसतो आणि सुरुवातीला कोणता प्रॉडक्ट चालेल हे ओळखणे फार अवघड आहे.
👉 म्हणूनच सुरुवात करताना एकच नाही, तर अनेक प्रॉडक्ट्स (Multiple Products) लिस्ट करायला पाहिजे. हे प्रॉडक्ट्स स्वस्त पण दर्जेदार असावेत. म्हणजे तुम्हाला कमी जोखमीमध्ये अनुभव मिळून जाईल आणि तुम्ही मार्केट कसे काम करते हे समजू शकाल.
🏷️ टिप 2: जेनरिक प्रॉडक्ट्सपासून सुरुवात करा. (Start with Generic Products)
सुरुवातीला स्वतःचा खूप मोठा ब्रँड तयार करण्याची घाई करू नका.Generic products म्हणजे नॉन-ब्रँडेड वस्तू, ज्या कुणीही विकू शकतो, त्या तुम्ही विकू शकता. उदा. जर तुम्ही Amazon वर प्रॉडक्ट लिस्ट करत असाल, आणि ब्रँड नेम विचारलं गेलं, तर तिथे तुम्ही “Generic” लिहू शकता.
हे करण्यासाठी तुम्हाला एक छोटं परमिशन घ्यावं लागतं ते म्हणजे GTIN Exemption (Global Trade Item Number Exemption). हे Amazon वरून अगदी सहज मिळतं. तुम्हाला फक्त प्रॉडक्टचे फोटोज अपलोड करून Amazon ला दाखवायचे असतात की हा प्रॉडक्ट तुमच्याकडे उपलब्ध आहे.
जर हे कसं करायचं हे माहित नसेल, तर YouTube वर “How to take GTIN Exemption on Amazon” असा सर्च करा, तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील,त्यातून मार्गदर्शन घेऊन तुम्ही करू शकता.
📦 टिप 3: प्रॉडक्ट सेलिंग आणि प्रोसेसिंग शिकून घ्या. (Learn the Selling Process Practically)
Generic प्रॉडक्ट्स विकताना तुम्ही संपूर्ण ई-कॉमर्स सिस्टिम समजू शकता:
- प्रॉडक्ट लिस्ट कसा करायचा?
- पेमेंट कसा मिळतो ?
- ग्राहक रिटर्न्स कसे हाताळायचे ?
- ऑर्डर प्रोसेस झाल्यानंतर पिकअप एजंटला
- प्रॉडक्ट कसा द्यायचा असतो.
या सर्व गोष्टी प्रॅक्टिकली शिकणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला ट्रेडमार्क, ब्रँड नेम, लोगो या गोष्टींचा विचार करू नका. एकदा तुम्हाला मार्केटची सवय झाली की, नंतर ब्रँड तयार करण्यासाठी सगळा जोर लावा.
📦 टिप 4: Low-cost inventory
महत्त्वाची गोष्ट समजून घ्या: सुरुवातीला भरपूर स्टॉक घेऊ नका; अनेक वेळा लोक 50, 100, 200, 500 प्रॉडक्ट स्टॉक घेऊन बसतात आणि नंतर ते विकले जात नाही.
- एक्सपेरिमेंटचा दृष्टिकोन ठेवा: सुरुवातीच्या काळात तुम्हाला कोणता प्रॉडक्ट विकेल हे माहीत नसतं, म्हणून काही प्रमाणात प्रयोग करावे लागतील.
- लो-कोस्ट इन्व्हेंटरी घ्या: जास्त गुंतवणूक न करता, कमी किमतीची इन्व्हेंटरी आणा ज्यावर खर्च कमी येतो.
- वेरिएंट्स कमी असलेली उत्पादने निवडा: जे प्रॉडक्ट अनेक साईझ/डिझाइन/वेरिएंट मागतात (उदा. कुर्ती), अशा वस्तू सुरुवातीला टाळा, कारण त्यासाठी अनेक साईझ आणि डिजाइन्स ठेवावे लागतात.
- लॉजिकल विचार करा: जर एखाद्या प्रॉडक्टसाठी खूप प्रकार आणि साईझेस आवश्यक असतील तर ते प्रॉडक्ट सुरुवातीला घेणे योग्य नाही.
- सुरुवातीला साधे प्रॉडक्ट विका: अशा वस्तू विका ज्यांना कमी वेरिएशनची गरज असते,त्यामुळे स्टॉक मॅनेजमेंट सोपे राहते आणि एक्सपेरिमेंटचा खर्च कमी येतो.
5) Product Listing / उत्पादनाची आकर्षक लिस्टिंग कशी करावी?
पहिली गोष्ट लक्षात ठेवा: तुमचा प्रॉडक्ट जितका चांगला दिसेल तितकाच तो विकला जाईल. ई-कॉमर्समध्ये “जे दिसतं तेच विकतं” ही गोष्ट पूर्णपणे अंतिम सत्य आहे.
1) फोटोग्राफीची क्वालिटी:
- साध्या मोबाइलने घेतलेले कमी कॉलिटी किंवा अस्पष्ट फोटो वापरू नका.
- प्रॉडक्टचे हाय-क्वालिटी फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज काढायला पाहिजे.
- वेगवेगळ्या अँगल्समधून स्वच्छ, ब्राइट फोटो घ्या जे प्रॉडक्टची ओळख नक्कीच वाढवतील.
2) लिस्टिंग ऑप्टिमायझेशन:
- प्रॉडक्ट लिस्ट करताना त्याचे शीर्षक (Title), डिस्क्रिप्शन (Description) आणि बुलेट पॉइंट्स (Features) व्यवस्थित लिहिले पाहिजे.
- बुलेट पॉइंट्समध्ये प्रॉडक्टचे मुख्य फायदे आणि वैशिष्ट्ये स्पष्टपणे नमूद करा.
3) अपूर्ण माहिती टाळा:
- फक्त नाव आणि किंमत लिहून सोडू नका.
- खरेदीदाराला प्रॉडक्टची संपूर्ण माहिती, वापर, फायदे आणि मटेरियल तपशील देयला विसरू नका.
4) व्यावसायिक लूक ठेवा:
- प्रॉडक्टची लिस्टिंग जितकी प्रोफेशनल दिसेल, तितका खरेदीदाराचा विश्वास वाढत जातो.
- आकर्षक आणि व्यवस्थित पद्धतीने लिहिलेली लिस्टिंग म्हणजे विक्री वाढवण्याचं सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे.
6) Avoid Sponsored Ads / सुरुवातीला स्पॉन्सर्ड जाहिरातींवर पैसे खर्च करू नका:
अनेक नवीन सेलर्स जेव्हा Amazon, Flipkart किंवा इतर मार्केटप्लेसवर सुरूवात करतात, तेव्हा त्यांना फ्रीमध्ये काही Sponsored Ads Credits मिळतात (उदा. ₹2000–₹4000).
ह्याच ऑफरमुळे ते लगेच जाहिरातींवर पैसे गुंतवायला सुरुवात करतात, हीच त्यांची सगळ्यात पहिली चूक ठरते.
1) फ्री क्रेडिटचा चुकीचा वापर:
- सुरुवातीच्या टप्प्यावर योग्य स्ट्रॅटेजी नसल्यामुळे जाहिरातींवर पैसे खर्च होतात पण ऑर्डर फारच कमी मिळू शकतात.
- परिणामी पैसा वाया जातो आणि मनात येतं की “ई-कॉमर्समध्ये काही फायदा नाही.”
2) नवशिक्यांची सामान्य भावना:
- जाहिरातींमध्ये नुकसान झाल्यानंतर अनेकजण विचार करतात की हा एक “लॉसचा बिझनेस” आहे.
- पण वास्तव हे आहे की हजारो सेलर्स मोठा व्यवसाय करत आहेत, कारण त्यांनी योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने ads वापरल्या आहेत.
3) योग्य पद्धत:
- सुरुवातीच्या टप्प्यावर जाहिरातींमध्ये पैसे गुंतवू नका.
- आधी प्रॉडक्ट, लिस्टिंग आणि कस्टमर अनुभव सुधारण्यावर लक्ष असायला पाहिजे.
- एकदा नैसर्गिक (organic) ऑर्डर्स येऊ लागल्यावरच पेड जाहिराती तुम्ही देऊ शकता.
4) धडा लक्षात ठेवा:
- “बिझनेसची सुरुवात म्हणजे पैसे वाचवून अनुभव मिळवणे आहे.”
- अनुभवाशिवाय जाहिरातींमध्ये गुंतवणूक म्हणजे आगीत पैसे टाकल्यासारखं आहे.
7) Opt-in Promotions / ऑर्गॅनिक प्रमोशन्समधून विक्री वाढवा.
प्रमोशन्स म्हणजे काय ?
प्रमोशन्स म्हणजे मार्केटप्लेसवर उपलब्ध असलेल्या डील्स किंवा ऑफर्स आहे.
उदाहरणार्थ: “₹1000 च्या प्रॉडक्ट्सवर ₹50 डिस्काऊंट,” “कूपन कोड लागू करा आणि बचत मिळवा,” किंवा “कॉम्बो ऑफरमध्ये खरेदी करा.”
1) ऑर्गॅनिक डील्स तयार करा:
- सुरुवातीला पेड ads वापरण्याऐवजी, स्वतःच्या प्रॉडक्टसाठी ऑर्गॅनिक प्रमोशन्स तयार करा.
- यामुळे तुमच्या उत्पादनांची विजिबिलिटी (Visibility) नैसर्गिकरीत्या वाढते आणि ग्राहकांचा विश्वासही चांगला निर्माण होतो.
2) मार्केटप्लेसवरील पर्याय:
- Amazon आणि Flipkart सारख्या सर्व प्लॅटफॉर्मवर प्रमोशन क्रिएट करण्याचे फीचर्स दिलेले असतात.
- त्यात तुम्ही कूपन्स, कॉम्बोज, सवलती किंवा फ्री शिपिंग ऑफर्स लावून देऊ शकता.
फायदे:
- ऑर्गॅनिक प्रमोशन्समुळे तुमच्या प्रॉडक्ट्सवर ट्रॅफिक येयला लागेल.
- खरेदीदारांना एक चांगली ऑफर मिळाल्यामुळे ऑर्डर येण्याची शक्यता जास्त असते.
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला जाहिरातींसारखा अतिरिक्त खर्च करायची गरज पडत नाही.
- स्मार्ट मूव्ह:
सुरुवातीच्या टप्प्यात कमी खर्चात मोठा सेल्स मिळवायचा असेल, तर प्रमोशन्स हा भारी पर्याय आहे.
8) Organic Reviews / ग्राहकांकडून नैसर्गिक रिव्ह्यू मिळवा.
1) रिव्ह्यू मिळवण्यावर फोकस करा:
- ई-कॉमर्स व्यवसायात प्रॉडक्ट विकण्याइतकंच महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांचे चांगले रिव्ह्यू मिळवणे.
- चांगले रिव्ह्यू म्हणजे तुमच्या ब्रँडवरील विश्वास वाढवणारा घटक होय.
2) गैरकायदेशीर पद्धती टाळा:
- कधीही “फाईव्ह स्टार रिव्ह्यू द्या, ₹50 कॅशबॅक मिळेल” अशा प्रकारे ग्राहकांना बोलून फसवू नका.
- Amazon आणि Flipkart च्या पॉलिसीनुसार हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्यामुळे तुमचं अकाउंट कायमस्वरूपी सस्पेंड होऊ शकतं.
3) सोप्या आणि कायदेशीर पद्धतीने रिव्ह्यू मिळवा:
- प्रॉडक्टसोबत एक छोटं थँक यू कार्ड ठेऊ शकता.
कार्डवर “Thank you for purchasing” असा छोटा संदेश आणि तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स देऊन ठेवा. - ग्राहकांना पुढील खरेदीसाठी प्रोत्साहित करा, पण रिव्ह्यू देण्यासाठी बिलकुल सांगू नका.
4) लहान गिफ्टचा वापर करा:
- ₹10 च्या आत काही लहान वस्तू (उदा. सॉक्सचा जोड, किचन, हँडकरचीफ, इ.) पॅकेजमध्ये ठेवा.
- हे ग्राहकाला आनंद देईल आणि तुमचा ब्रँड त्यांच्या लक्षात राहील.
5) नियम लक्षात ठेवा:
- ग्राहकाला रिव्ह्यू देण्यासाठी थेट विनंती करणं हे मार्केटप्लेसच्या नियमांचं उल्लंघन करते.
- म्हणून फोर्सिंग टाळा आणि फक्त चांगला अनुभव देण्यासाठी काम करत राहा.
9) Fulfilment Centre (फुलफिलमेंट सेंटरमध्ये प्रॉडक्ट पाठवणे)
रिव्ह्यू मिळाल्यानंतर आता पुढचं महत्त्वाचं पाऊल म्हणजे तुमचे प्रॉडक्ट्स अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या फुलफिलमेंट सेंटर (FBA warehouses) मध्ये पाठवणे. जेव्हा तुमच्या प्रॉडक्टवर चांगले रिव्ह्यू येतात, तेव्हा त्या प्रॉडक्टची विजिबिलिटी वाढते आणि त्यामुळे ऑर्डर्स वाढण्याची शक्यता जास्त होते.
तुमच्या राज्यात ज्या ठिकाणी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचे वेअरहाऊस उपलब्ध आहेत, तिथे तुमची मालाची शिपमेंट पाठवा. हे केल्यावर तुमच्या उत्पादनांना “Prime” किंवा “Fast Delivery” सारखे टॅग मिळत असतात, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो आणि सेल्स झपाट्याने वाढतात.
💡 टीप: चांगले रिव्ह्यू असलेले आणि मार्केटमध्ये डिमांड असलेले प्रॉडक्ट्स जर तुम्ही FBA मध्ये पाठवले, तर तुमचे ऑर्डर्स अगदी वेगाने वाढतील.
म्हणूनच, फुलफिलमेंट सेंटरमध्ये प्रॉडक्ट पाठवणे हा ई-कॉमर्स बिझनेस वाढवण्याचा अत्यंत महत्त्वाचा पण सोपा टप्पा आहे.
10) Trademark (ट्रेडमार्क नोंदणी आणि ब्रँडिंगची सुरुवात)
जेव्हा तुम्ही तुमचा निश (Niche) आणि यशस्वी प्रॉडक्ट ठरवता , म्हणजे जो प्रॉडक्ट चांगला विकला जातो, वजनाने हलका आहे, आणि शिपिंग खर्च कमी येतो, तेव्हा पुढची महत्त्वाची स्टेप असते ट्रेडमार्क नोंदवणे.
तुम्ही सुरुवातीला जेनरिक प्रॉडक्ट्स विकून मार्केट समजून घेतलेत. आता वेळ आली आहे स्वतःचा ब्रँड तयार करण्याची. या टप्प्यावर तुम्ही स्वतःच्या प्रॉडक्टसाठी एक युनिक नाव (Brand Name) ठरवा आणि त्या नावाचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून घ्या.
🔹 ट्रेडमार्क प्रक्रिया:
- ब्रँड नेम निवडा – तुमच्या प्रॉडक्टशी सुसंगत आणि लक्षात राहील असं ब्रँडचे नाव निवडा.
- गूगल / यूट्यूबवर माहिती शोधा – ट्रेडमार्क अर्ज कसा करायचा ? यासाठी तुम्हाला अनेक सर्व्हिस प्रोव्हायडर ऑनलाइन भेटून जातील.
- ट्रेडमार्क अर्ज करा – त्यासाठी साधारण ₹5000 ते ₹7000 पर्यंत खर्च येऊ शकतो.
- ट्रेडमार्क प्रतीक्षा काळ –ट्रेडमार्कसाठी एकदा अर्ज केल्यानंतर त्यास मंजुरी मिळण्यासाठी काही महिने लागू शकतात.
- TM आणि ® वापरा – अर्ज केल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्रँडच्या नावाबरोबर ™ (TM) लिहू शकता, आणि रजिस्ट्रेशन झाल्यावर ® (R) चिन्ह वापरू शकता.
एकदा तुमचा ट्रेडमार्क मंजूर झाला की तुमचा ब्रँड अधिकृतपणे तुमचाच होतो. त्यामुळे इतर कोणी त्या नावाने प्रॉडक्ट विक्री करू शकत नाही, आणि तुमचा ब्रँड वैध आणि प्रामाणिक ओळख निर्माण करेल.
11) E-commerce Website (स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट तयार करा)
ट्रेडमार्क घेतल्यानंतर तुमच्या व्यवसायातला पुढचा मोठा टप्पा म्हणजे स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट बनवणे आहे.
सुरुवातीच्या काळात तुम्ही Amazon, Flipkart सारख्या मार्केटप्लेसवर प्रॉडक्ट सेल करून चांगला अनुभव मिळवला असेल, पण आता वेळ आली आहे स्वतःचा ब्रँड अजून पुढे नेण्याची आपल्या नावाने, आपल्या वेबसाइटवरून स्वतः विक्री करून सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याची.
🔹 स्वतःची वेबसाइट का तयार करावी?
- पूर्ण नियंत्रण (Full Control): मार्केटप्लेसवर तुमचे प्रॉडक्ट्स त्यांच्या ई-कॉमर्स वेबसाईटच्या नियमांनुसार विकले जातात. पण स्वतःच्या वेबसाइटवर सर्व पॉलिसी, रिटर्न नियम, प्राइसिंग आणि डिस्काउंट्स तुम्ही स्वतः ठरवू शकता.
- कमी खर्च आणि जास्त नफा (More Profit):तुमच्या वेबसाइटवरून विक्री झाल्यास तुम्हाला कमीशन किंवा रेफरल फी देण्याची काही एक गरज राहत नाही. त्यामुळे नफा संपूर्ण तुमच्याकडे येणार आहे.
- ब्रँडिंग आणि विश्वास (Brand Trust):जेव्हा ग्राहकांना तुमची वेबसाइट, सोशल मीडिया पेजेस आणि ब्रँड व्यवस्थित दिसतो, तेव्हा ते तुमच्या ब्रँडवर विश्वास ठेवतात.
तुमच्या वेबसाइटवर “Available on Amazon / Flipkart” सारखा हेडर टाकल्याने विश्वासार्हता आणखी वाढते. - सोशल मीडिया इंटिग्रेशन (Social Media Integration):फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि पिंटरेस्टवर तुमच्या प्रॉडक्ट्सची माहिती आणि व्हिडिओ नियमित शेअर करा.
सर्व प्लॅटफॉर्मवर एकसारखी ब्रँड ओळख ठेवल्याने एकत्रित चांगली ओळख निर्माण होते.
🔹 पुढील महत्वाचे टप्पे:
- डोमेन नेम निवडा – तुमच्या ब्रँडशी जुळणारे नाव निवडा.
- वेबसाइट बिल्ड करा – WordPress, Shopify, किंवा Wix वापरून प्रोफेशनल वेबसाइट तयार करा.
- पॉलिसीज ठरवा – Return, Shipping आणि Privacy Policies स्पष्ट लिहा.
पेमेंट गेटवे जोडा – Razorpay, PayU, किंवा Cashfree सारखे पर्याय ग्राहकांना द्या.
सुरुवातीला ग्राहक Amazon किंवा Flipkart वरून खरेदी करतील, पण हळूहळू तुमच्या वेबसाइटकडे वळतील आणि तेव्हाच तुमचा खरा नफा वाढू लागणार आहे.
12) Paid Advertisement (पेड अॅडव्हर्टायझमेंटद्वारे व्यवसाय वाढवा)
जेव्हा तुमचा ब्रँड तयार होतो आणि वेबसाइट, सोशल मीडिया, आणि मार्केटप्लेसवर तुमची ओळख निर्माण होते, तेव्हा पुढचा महत्वाचा टप्पा असतो पेड अॅडव्हर्टायझमेंटमध्ये पैसे गुंतवणूक करणे होय.
🔹 पेड अॅड्स का गरजेच्या आहेत?
1) दृश्यमानता वाढवतात (Boost Visibility):
- Amazon, Flipkart सारख्या मार्केटप्लेसवर स्पॉन्सर्ड अॅड्स चालवल्याने तुमचे प्रॉडक्ट्स अधिक लोकांपर्यंत पोहोचतात.
- चांगली अॅडव्हर्टायझमेंट स्ट्रॅटेजी तुमचा व्यवसाय झपाट्याने वाढवू शकते.
2) मार्केटमध्ये स्पर्धा टिकवते (Stay Competitive):
- आजच्या स्पर्धात्मक बाजारात फक्त ऑर्गॅनिक पद्धतीने सेल पुरेसा नाही.
- स्पॉन्सर्ड अॅड्स तुमचा प्रॉडक्ट फ्रंट पेजवर आणतात, ज्यामुळे विक्रीच्या संधी आणखी पटीने वाढतात.
3) अधिक इनसाइट्स मिळतात (Get Valuable Insights):
- पेड अॅड्सद्वारे तुम्ही कोणत्या प्रॉडक्टवर जास्त क्लिक्स येतात, कोणत्या लोकेशनमध्ये डिमांड आहे, हे समजू सर्व माहिती करू शकता.
4) गुंतवणुकीची गरज (Investment Required)
- सुरुवातीला तुम्हाला थोडं इन्वेस्टमेंट करावं लागेल, पण योग्य टार्गेटिंग आणि डेटा अनॅलिसिस केल्यास त्याचा फायदा अधिक होईल.
- Amazon किंवा Flipkart च्या स्पॉन्सर्ड अॅड्स वापरून तुम्ही तुमच्या बेस्टसेलर प्रॉडक्ट्सचा प्रमोशन करू शकता.
5) नव्या सेलर्ससाठी सल्ला (For New Sellers)
- जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर नसाल, तरीही चिंता करू नका.
- तुम्ही मॅन्युफॅक्चरर्सशी टायअप करून स्वतःचा ब्रँड तयार करू शकता.
- प्रॉडक्ट कोणीतरी दुसरा बनवेल, पण विक्री तुमच्या ब्रँडने होत राहील.
सुरुवातीला पेड अॅड्स थोड्या खर्चिक वाटतील, पण एकदा तुमचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये ओळखले गेले की त्याचा परिणाम दीर्घकाळ राहणार आहे.
जर तुम्ही ठरवलं आहे की “मला स्वतःचा ई-कॉमर्स ब्रँड तयार करायचाच आहे”, तर थोडी गुंतवणूक आणि योग्य मार्केटिंगने तुम्ही नक्कीच 100% यशस्वी होऊ शकता.
Final Words :-
थॅंक यू सो मच मित्रांनो 🙏 ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल मनापासून आभार!
💬 तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचा प्रत्येक कमेंट मला पुढे आणखी चांगले कंटेंट बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असते.
📦 ई-कॉमर्स, बिझनेस आणि ब्रँड बिल्डिंगवर अजून अशाच उपयुक्त पोस्ट्स लवकरच घेऊन येणार आहे.