दररोज ताजा आणी बक्कळ पैसा कमवून देणारे ८ फिरते व्यवसाय

फिरते व्यवसाय ही एक अशी व्यवसायाची कॅटेगरी आहे ज्यामध्ये रोज ताजा पैसा तर मिळतोच परंतु यात तुम्हाला व्यवसायासाठी कोणताही गाळा किंवा दुकान भाड्याने घ्यावे लागत नाही.

फक्त एक दोन चाकी गाडी किंवा चार चाकी गाडा किंवा सायकल वर सुद्धा तुम्ही हे फिरते व्यवसाय आरामात करू शकता. मित्रांनो कोणताही व्यवसाय हा कमी किंवा मोठा नसतो. कारण व्यवसाय हा व्यवसायच असतो.

जो माणूस लाज सोडून काम करतो ना तोच आयुष्यात पुढे जातो. आणि जो लाज बाळगून राहतो तो त्याच्या आयुष्यात कधीच पुढे जात नाही त्यामुळे फिरते व्यवसाय हे लाज सोडूनच करावे लागतात.

हा काय म्हणेल तो काय म्हणेल याचा विचार न करता आपण आपल्या आयुष्यात कसे पुढे जाऊ आपण कसे एक यशस्वी उद्योजक होऊ याकडे लक्ष दिले पाहिजे.

चला तर मग जास्त विचार न करता फिरते व्यवसायांची यादी पाहूया.

सध्याच्या काळातील एक चांगला व्यवसाय म्हटलं की कुरीयर कंपनी मध्ये डेलिवेरी बॉयचे काम करणे होय यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे भांडवल लावावे लागणार नाही, तुमच्याकडे फक्त एक दुचाकी व स्मार्ट फोन असला म्हणजे झाल.

यामध्ये तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल्ल टाइम काम देखील करू शकता. पगार बेसिस किंवा कमिशन बेसिस वर देखील काम करू शकता.

तुमच्याकडे असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत. जर तुम्ही कमिशन बेसिस वर काम करणार असाल तर कुरीयर कंपनी तुम्हाला एका पार्सल डेलिवेरी मागे १५ रुपये देते.

आणि जर तुमची पगारावर काम करण्याची इच्छा असेल तर कंपनी तुम्हाला महिन्याला १५ हजार रुपये पगार देते शिवाय प्रत्येक किलोमीटर रुनिंग मागे ३ रुपये देते. शिवाय तुमचा पीएफ देखील जमा होतो.

हे खूप सोपे काम आहे, तुम्हाला तुमच्या आसपास असणार्‍या फ्लिपकार्ट, अमेजोन, देल्हिवेरी, ईकोम पैकी एखाद्या कुरीयर कंपनीचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांच्याकडे जॉयनिंगचा फॉर्म भरून लागेल. आज फॉर्म भरला की उद्यापासून तुमचे काम चालू होते.

जुनी पुस्तके, जुन्या वह्या, जुने वर्तमानपत्रे गोळा करणे हा एक उत्तम फिरता व्यवसाय आहे. या व्यवसायातून देखील तुम्ही चांगली कमाई करू शकता.

तुम्हाला लोकांच्या घरी जाऊन रद्दी गोळा करायची आहे आणि ती डायरेक्ट बॉक्स बनवणार्‍या कंपनीला विकायची आहे.

तुम्ही साठवलेली रद्दी विकायला तुम्हाला कंपनीत जावे लागणार नाही तर तुम्ही गोळा केलेली रद्दी डायरेक्ट कंपनीची गाडी घरी येऊन तुमच्याकडून विकत घेऊन जाणार आहे. तुमच्या रद्दीचे जितके वजन होईल तितके वजनानुसार व दरानुसार पैसे तुम्हाला मिळतील.

हा व्यवसाय करण्यापूर्वि तुम्हाला थोडे विचित्र वाटेल परंतु या व्यवसायासारखा पैसा तुम्हाला कोणत्याच धंद्यात पाहायला मिळणार नाही. पत्रा, लोखंड, प्लॅस्टिक यांपासून विविध जीवनाउपयोगी वस्तु बनवल्या जातात. त्यामुळे या धातुनां मोठ मोठय कंपन्यामध्ये खूप मागणी आहे.

आपल्याकडे सापडणारे तुटलेले, वापरात नसलेले जुने लोखंड विकत घेऊन ते रीसायकल करण्यासाठी पुन्हा कंपनीत पाठवले जाते.

आपल्या भागात भंगार गोळा करणारे भंगारवाले लोकांच्या घरून 25 रुपये किलोने जुने भंगार विकत घेतात आणि तेच भंगार पुढे कंपनीला 60 रुपये किलोने विकतात. म्हणजे गुंतवणुकीवर दुप्पट नफा मिळवतात.

तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही इतके भंगार गोळा करणारे लोक पुढे गेले आहेत, सायकलवर फिरणारे भंगारवाले आता चारचाकी गाडी घेऊन भंगार गोळा करत आहेत, तसेच त्यांनी स्वत:चे बंगले देखील बांधले आहेत.

खुर्ची प्रत्येक घरात आढळते. घरात येणार्‍या पाहुण्यांना बसायला खुर्ची दिली जाते. टीव्ही पाहताना, मुलांना अभ्यास करण्यासाठी, किंवा इतर वस्तु ठेवण्यासाठी खुर्चीचा वापर केला जातो, त्यामुळे खुर्च्यांना सर्व घरात खूप मागणी असते.

चाकण एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी, शिरवळ एमआयडीसी किंवा बारामती एमआयडीसी मध्ये तुम्हाला डायरेक्ट खुर्च्या तयार करणार्‍या कंपनी मधून होलसेल रेटमध्ये खुर्च्या मिळतील त्या तुम्हाला डझनमध्ये खरेदी करून ठेवायच्या आहेत.

अशा खुर्च्या डायरेक्ट कंपनीमधुन विकत घेतल्यास खूप स्वस्त मिळतात. खुर्च्या खरेदी केल्यानंतर त्या तुम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक खुर्ची मागे खरेदी किमतीच्या वर १०० ते २०० वाढवून विकू शकता.

जर तुमच्या दिवसाला १० खुर्च्या विकल्या गेल्या तर एका खुर्ची मागे १०० रुपये जरी मिळाले तरी तुमची दिवसाची कमाई १००० रुपये होईल.

तुम्हाला असे एक ही घर सापडणार नाही ज्या घरात तुम्हाला घोंगडी, चादर किंवा चटई दिसणार नाही. प्रत्येक घरात चटई, चादरचा उपयोग केला जातो.

तसेच घोंगडी ही ग्रामीण भागातील घरांमध्ये पाहायला मिळते. थंडीच्या दिवसात चटई, चादर व घोंगडी खूप विकली जाते. या वस्तूंच्या विक्रीवर मार्जिन सुद्धा चांगले मिळते.

दुचाकी गाडीवर चटई, चादरचा गट्ठा मागे बांधून गावो गावी घरोघरी जाऊन विकून चांगले पैसे मिळवता येतील. एक चादर जर १०० रुपयाला मिळत असेल तर ती ग्राहकांना १५० रुपयाला विकायची म्हणजे चांगली कमाई होईल.

घरी असल्यावर गृहिणी जास्त करून मॅक्सी वापरतात. मॅक्सी ही गृहीणींचा आवडता पोशाख आहे. घरातील धुनी भांडी असुदया, स्वायनपक असू द्या, किंवा इतर कोणतेही काम असू द्या अशी सर्वप्रकारची कामे करताना बायका जास्तकरून मॅक्सी वापरतात.

तुम्हाला आपल्या समाजात अशा काही बायका मिळतील ज्या जर महिन्याला नवीन मॅक्सी विकत घेतात. हा व्यवसाय करणे खूप सोपे आहे तुम्हाला होलसेल दरात कापड विक्रेत्याकडून मॅक्सी आणायची आहे.

त्यानंतर त्यावर तुमचे मार्जिन अधिक करून दुचाकी वर लोकांच्या घरी जाऊन विकायची आहे. मॅक्सी वाला दिसला रे दिसला की बायकांची मॅक्सी खरेदी साठी प्रचंड गर्दी होते.

उन्हाळ्यामध्ये जांभूळे आणि करवंद फळे खूप खाल्ली जातात. ही दोन्ही फळे खूप दुर्मिळ असल्यामुळे यांना चांगली किंमत मिळते. शहरमध्ये तर जांभूळ 200 ते 300 रुपये किलो दराने विकली जातात तर करवंद 300 ते 400 रुपये किलो दराने विकली जातात.

तुम्ही तुमच्या गाडीवर ही दोन्ही फळे लोड करून शहरात, खेड्यापाड्यात विक्री करू शकता. यात जास्त काही खर्च येत नाही फक्त माल मंडई मधून विकत घ्यायचा आणि गाडीवर लादून तुमच्या दरात विकायचा आहे.

सुगी मध्ये धान्य साठवण्यासाठी बारदाणे व पोत्यांचा वापर सरार्स केला जातो. त्यामुळे सुगीत पोती मार्केटमध्ये मिळत नाहीत आणि जरी ती मिळाली तरी ती खूप महाग मिळतात.

अशावेळी तुम्ही ओतार्‍याकडून किंवा इंडिया मार्ट वरुन ती ऑनलाइन ऑर्डर करू शकता व टू व्हीलर वर मागे बांधून शेतीच्या बांधवार जाऊन सेल करू शकता.

आजकाल मोठ मोठ्या कंपन्या आपल्या कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी जाहिरात पत्रक वाटण्याचे काम, जाहिरात पोस्टर्स लावण्याचे काम कॉंट्रॅक्ट वर देतात.

तसेच खाजगी वीज पुरवणार्‍या  कंपन्या आपल्या ग्राहकांची वीज बिले वाटण्यासाठी, ग्राहकांना वीज बिले घरोघरी देण्यासाठी कॉंट्रॅक्ट देतात.

त्यामुळे तुम्ही अशा कंपनीतील अधिकार्‍यांशी संपर्क साधून वीजे बिले व जाहिरात पत्रक वाटण्याचे काम घेऊ शकता. तुमच्या परिसरात काम करणारे वायरमन यांना तुम्ही संपर्क साधून त्यांच्याकडे लाइट बिले वाटण्याचे काम आहे का ते विचारु शकता व तुमचे काम लगेच चालू करू शकता.

तुम्ही वेगवेगळ्या दुकानात बर्‍याच वेळा गेला असाल त्यावेळी तुम्ही पिग्मि एजेंटना पिग्मि गोळा करताना म्हणजे बचत निधि गोळा करताना बर्‍याच वेळा पाहिले असेल.

मग तुम्ही विचार करा त्यांना दररोज किती पैसे मिळत असतील तर तुमच्या माहितीकरता सांगतो पतसंस्था, सहकारी बँका, पिग्मि एजेंटना शंभर रुपये मागे 2.5 टक्के कमिशन देतात.

जर त्यांनी दररोज 10 हजार रुपये गोळा केले आणि ते बँकेत जमा केले तर त्यांना दररोज 10 हजार रूपये कलेक्शन मागे 250 रुपये मिळतील. पिग्मि गोळा करणे हा एक पार्ट टाइम व्यवसाय आहे.

तुम्ही हा व्यवसाय दररोज संध्याकाळी 4 च्या पुढे चालू करू शकता आणि संध्याकाळी 6 वाजता बंद करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला फक्त दोन तास द्यायचे आहेत.

फिरता व्यवसाय हा रोज ताजा पैसा कमवून देणारा व्यवसाय असला तरी तो लाज सोडून करावा लागतो, यात चिकाटी आणि मेहनत देखील लागते त्याचबरोबर तुमचे संभाषण कौशल्य देखील उत्तम असायला हवे.

वरती दिलेले फिरते व्यवसाय नक्कीच तुमचे उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण करतील अशी आशा आहे.

Leave a Comment