साडी व्यवसाय कसा करावा | साडी सेंटर व्यवसाय कसा टाकायचा

भारत हा एक असा एकमेव देश आहे, ज्या देशात साडीचे मोठ मोठे होलसेलर आहेत. साडीचे मार्केट वाढते मार्केट आहे. दरवर्षी देशात करोडो साड्यांची विक्री होते.

प्रत्येक सणाला कार्यक्रमाला वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या महिला वापरतात. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या प्रत्येक शहरातून निवडल्या जातात. साड्यांना सतत मागणी असल्यामुळे साडी सेंटर व्यवसाय, साडी व्यवसाय महिलांना महिलांना चांगला फायद्याचा ठरणार आहे.

साडी हा व्यवसाय कधीही न थांबणारा व्यवसाय आहे. म्हणून खास लेडीजच्या आवडीचा व्यवसाय कसा करायचा ते जाणून घेऊया.

साडी विक्रीसाठी दुकान लागेल का?

काही गरज नाही. सुरुवातीला तुमच्या घरातून साडी व्यवसाय चालू करता येईल. घरची सर्व कामे करत ग्राहक हंडले करता येतात.

समजा तुम्ही किचनमध्ये स्वयंपाक करत आहात. तर थोडा वेळ गस बंद करून किंवा गसची फ्लेम कमी करून ग्राहकांना साड्या दाखवू शकता. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत साडी घरातून विकता येते.

दुकान टाकायची काहीच गरज पडणार नाही. ज्यावेळी व्यवसाय वाढेल किंवा घरात माल ठेवण्यास जागा पुरेसी नसेल तर छोटंस कमी भाड्याच दुकान चालू करायला काहीच हरकत नाही.    

साड्यांची व्हरायटी कोणती असावी?

हे पहा आपणास साड्या विकण्यासाठी घ्यायच्या असताना आपण त्याच साड्या निवडाव्यात जे ग्राहक मागतात. ज्या ग्राहकांना साड्या आवडीतल त्याच साड्या खरेदी करायच्या आहेत.

आपल्या साड्यांच्या कलेक्शन मध्ये प्रत्येक साडी असायला हवी.  जुन्या बायकांच्या आवडत्या साड्या, कॉलेज तरुणींच्या आवडत्या साड्या, नवीन लग्न  झालेल्या मुलींच्या आवडत्या साड्या तसेच नवीन ट्रेंडमध्ये असलेल्या साड्या असा संग्रह  असायला हवा.

साडी व्यवसायात मिळणारे मार्जिन

साडीचा होलसेल व्यवसाय करणार असाल तर सुरुवातीला 30 टक्के मार्जिन आरामात मिळवता येईल. साडीचा रिटेल व्यवसाय करताना प्रत्येक साडी विक्रीवर पन्नास ते शंभर टक्के मार्जिन कमवता येते.

कोणत्या साडीवर किती मार्जिन काढायचे हे साडीच्या सुतावर कापडावर अवलंबून राहते. प्रीमियम साडी वर चांगले मार्जिन कमवता येते.

साडीचे प्रकार शोधून काढणे

साडी व्यवसायात उतरण्यापूर्वीची ही सर्वात पहिली स्टेप आहे. साडीचे प्रकार, साडीचे सूत कापड समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सीजनमध्ये कोणत्या साड्या विकल्या जातात, कोणत्या साडीचे कापड महाग असते व कोणत्या साडीचे कापड सर्वात जास्त वापरले जाते, हे सर्व बारकावे साडी व्यवसाया पडण्यापूर्वी माहित असावेत.

साडी व्यवसायाला नाव द्या

साडीचा व्यवसाय चालू करण्यापूर्वी एक चांगले नाव साडीच्या व्यवसायासाठी निश्चित करा. उद्या हेच नाव तुम्ही तुमच्या दुकानाला देऊ शकता.

तुम्ही विकत असलेल्या साडीच्या लेबलवर नाव प्रिंट करता येऊ शकते. त्यासाठी साडी व्यवसाय चालू करण्यापूर्वी एक चांगले नाव शोधून ठेवा.

साडी व्यवसायातील मोठे होलसेलर

साडी व्यवसायासाठी कमी दरात साडी पुरवणारे होलसेलर पुढीलप्रमाणे आहेत.

अजमेरा फॅशन सुरत, ज्योत क्रिएशन कलकत्ता, अंकलेश्वर सिल्क मिल्क सुरत.

किती हजाराच्या साड्या विकत घ्याव्यात

सुरुवातीला कमीत कमी दहा ते वीस हजार रुपये खर्च करून निवडक साड्या ऑर्डर कराव्यात.

साड्या कशा विकाव्यात

तुमचा साडी विकण्याचा व्यवसाय सोसायटीतील महिलांना माहिती होईल. तसेच तुमच्या नातेवाईकांना देखील माहिती पडेल.

हळूहळू तुमच्या ओळखीच्या सर्व महिला तुमच्याकडे येऊन साड्या विकत घेतील. 300 ची साडी चारशे रुपयाला, पाचशे रुपयाला विकता येऊ शकते. प्रत्येक साडीमागे शंभर ते तीनशे रुपये कमवता येतील.

साड्या कशा मागवाव्यात

प्रत्येक होलसेलर आपल्या साड्या ऑफलाइन तसेच ऑनलाईन विकतात. ऑनलाईन ऑर्डर करताना ग्राहकांना साड्या कुरिअरने पाठवल्या जातात.

ऑनलाईन साड्या मागवणे खूप सोपे आहे. तुम्हाला प्रत्यक्ष मुंबई, सुरतच्या गोडाऊनला जाण्याची गरज नाही.

साडी होलसेलरच्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप करून आपल्या निवडीच्या साड्या पसंत कराव्यात व पेमेंट करून ऑर्डर द्यावी. दोन ते चार दिवसात माल घरपोच येतो.

Conclusion (निष्कर्ष)

तुम्ही जर अशा एका व्यवसाय संधीच्या शोधात असाल ज्यातून तुम्ही प्रत्येक product विक्रीवर चांगले मार्जिन मिळवू इच्छिता तर साडी व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. अगदी कोणत्याही वयाची महिला आपले हातातले काम करत साडी व्यवसाय यशस्वीपणे करू शकते.

Spread the love

Leave a Comment