तुमच्या व्यावसायिक करिअरला उर्जा देण्यासाठी इलेक्ट्रीकल क्षेत्रातील व्यवसायाचे पर्याय निवडणे आता फायद्याचे ठरणार आहे. चला तर मग अशा कोणत्या electrical business ideas आहेत ज्या व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगल्या आहेत त्यांचा शोध घेऊया.
1. जनरेटर भाड्याने देणे Generator rental
छोट्या मोठ्या कार्यक्रमात ज्यावेळी लाईट जाते त्यावेळी जनरेटरचा वापर केला जातो. हे जनरेटर डीझेल वर चालतात. जनरेटर विकत घेणे हे सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखे नसते. त्यामुळे अनेक व्यावसायिक जनरेटर व्यवसाय करण्याच्या उद्देशाने विकत घेतात व ते भाड्याने देतात. एका तासासाठी जनरेटरला १ ते 2 हजार भाडे मिळते.
2. स्पीकर साउंड भाड्याने देणे Speaker sound rental
लग्न असेल, रिसेप्शन असेल, वाढदिवस असेल किंवा बारसे असेल अशा अनेक मंगलवेळी स्पीकर साउंड, माईकची गरज असते. या व्यवसायात फक्त एकदाच या इलेक्ट्रीकल वस्तू खरेदी करायच्या आणि त्या भाड्याने द्यायच्या. एका इव्हेंटसाठी 5 ते 10 हजार भाडे मिळते.
3. इलेक्ट्रील शॉप सुरु करणे Starting an electrical shop
आज प्रत्येक घरात विजेचे ब्लब, वायर, स्वीच आणि घरगुती इलेक्ट्रील वस्तू जसे इस्त्री, पंखा, मिक्सर अशा विविध वस्तूंचा वापर होतो. या दैनंदिन गरजेच्या इलेक्ट्रील वस्तू असल्यामुळे यांची गरज दररोज असते. या इलेक्ट्रील वस्तूंच्या विक्रीवर मार्जिन देखील चांगले मिळते. या शॉपमध्ये इलेक्ट्रील वस्तू विक्रीबरोबर इलेक्ट्रील वस्तूंच्या दुरुस्तीची कामे सुद्धा करता येतात.
4. एलईडी ब्लब तयार करणे Making an LED bulb
मार्केटमध्ये एलईडी ब्लब हा सर्वात स्वस्त व कमी वीज लागणारा बल्ब आला आहे. यापूर्वी मार्केटमध्ये 60 वॉट ते 100 वॉट पर्यंतचे ब्लब वापरले जात असत.
यापूर्वी अशा 60 वॉट ते 100 वॉट बल्बला लागणारा विजेचा खर्च देखील खूप मोठा होता. फिलिपस, विप्रो, पॅनासॉनिक, बजाज अशा अनेक कंपन्यांचे ब्लब तुम्हाला आज पाहायला मिळतील.
बर्याच कंपन्या एलईडी बल्ब तयार करून चांगली कमाई देखील करत आहेत. काही ठिकाणी तर लोकल कंपन्यांनी सुद्धा एलईडी ब्लब विक्रीत आपले नाव मार्केट मध्ये तयार केले आहे.
आता तुम्ही म्हणाल कि मार्केटमध्ये बर्याच मोठ मोठ्या कंपन्यांचे एलईडी बल्ब आहेत तर आमचा बल्ब कसा विकला जाणारा,
आता तुमच्यासमोर हा प्रश्न उभा राहिला असेल कि हा व्यवसाय सुरू कसा करायचा तर तुमच्या माहितीसाठी सांगतो एलईडी ब्लब बनवणारी मार्केटमध्ये मशीन मिळते आणि बल्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य देखील मिळते,
ते खरेदी करून तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. प्रशिक्षणाच म्हणाल तर जी कंपनी तुम्हाला ही मशीन देईल त्या कंपनीचा प्रतिनिधी तुम्हाला बल्ब तयार करण्याचे व ब्लबला लागणारे होलसेल साहित्य कुठे मिळेल याची सविस्तर माहिती देईल.
5. सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल करणे Installing a CCTV camera
दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे बँका, कार्यालय, दुकाने यांच्या परिसरात चोरी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात. कोणत्याही टेक्निकल शिक्षण संस्थेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल करण्याचे ट्रेनिंग दिले जाते.
6. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन Electric charging station
इलेक्ट्रिक बाइकचे मार्केट सध्या खूप ग्रो करत आहे. इलेक्ट्रिक बाइकमध्ये बॅटरी इंस्टॉल असल्यामुळे वेळोवेळी बॅटरी चार्ज करावी लागते. परंतु देशाच्या बऱ्याच ठिकाणी चार्जिंग स्टेशनची कमतरता भासत आहे आपण सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभा करू शकता.
7. इन्वर्टर इन्स्टॉल करणे inverter installation
वीज प्रवाह खंडित झाल्यास इन्वर्टर चालू करून वीज प्रवाह पुन्हा चालू केला जातो. ज्या भागात विजेची गैरसोय आहे वीज प्रवाह सतत खंडित होतो, अशा भागांमध्ये इन्वर्टरला खूप मागणी आहे. दुकाने, कार्यालये मध्ये इन्व्हर्टर जास्त प्रमाणात बसवले जातात.
8. इलेक्ट्रिक कुंपण इन्स्टॉल करणे Installing an electric fence
इलेक्ट्रिक कुंपण फळबागा, शेती यांची जंगली प्राण्यांपासून चोरांपासून नासाडी होऊ नये, चोरी होऊ नये म्हणून इलेक्ट्रिक फेन्स बसवली जाते. गोडाऊन सभोवती मालमत्तेची चोरी होऊ नये, कोणतीही जीवित हानी होऊ नये याकरिता इलेक्ट्रिक कुंपणे लावली जातात. तुमच्या परिसरात हे काम चालू करता येईल सुरुवातीला तुम्हाला या कामाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल.
9. इलेक्ट्रिकल मेंटेनन्स सेवा Electrical maintenance services
मोठ्या इमारती, अपार्टमेंट, कमर्शियल बिल्डिंग, कॉम्प्लेक्स यांना इलेक्ट्रिक मेंटेनन्स सेवा पुरवता येईल. यामध्ये विज गेल्यास तांत्रिक दुरुस्ती करून वीज प्रवाह चालू करणे. फ्युज गेल्यास फ्युज बसवणे, विजेचे ब्लब बसवणे या इलेक्ट्रिक सेवा पुरवू शकता.
10. इलेक्ट्रिकल उपकरणे भाड्याने देणे Electrical equipment rental
ड्रिल मशीन व इतर इलेक्ट्रिक साहित्य भाड्याने देणे. छोट्या व्यावसायिकांना इलेक्ट्रिक वस्तू भाड्याने देऊन त्यांच्याकडून दिवसाचे किंवा तासाचे भाडे वसूल करता येते. वस्तू खराब झाल्यास अतिरिक्त चार्ज करू शकता. असे बरेच गरजेचे इलेक्ट्रिक साहित्य आहे ते सर्वसामान्य व्यक्तींना किंवा व्यवसायिकांना किरकोळ कामासाठी खरेदी करणे परवडत नाही. मग असे ग्राहक किंवा व्यावसायिक इलेक्ट्रिक वस्तू भाड्याने आणतात व काम झाल्यास परत करतात.
11. पाण्याची मोटर दुरुस्त करणे water pump repairing
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्या जवळ मोटार दुरूस्ती व वायडिंगचे ज्ञान असावे लागणार आहे त्यासाठी तुम्ही आयटीआय मधील मोटार वायडिंगचा कोर्स देखील करू शकता. किंवा आसपासच्या मोटार दुरुस्त करणार्या मिस्त्री कडे देखील याचे प्रशिक्षण घेऊ शकता.
शेतीसाठी लागणार्या विद्युत पंपाची शेतकर्यांना फार गरज असते, ती खराब झाल्यास ती लवकर दुरुस्त करून घ्यावी लागते कारण शेतीमध्ये पिकांना पाणी देणे ही सर्वात महत्वाची बाब असल्यामुळे शेतकरी कोणत्याही परिस्थितीत पाण्याची मोटार दुरुस्त करून घेतो.
Conclusion (निष्कर्ष)
इलेक्ट्रिकल क्षेत्रात सध्या खूप प्रगती होत चालली आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रात नव नवीन संशोधन होत चालले आहे. अनेक मानव उपयोगी इलेक्ट्रिकल उपकरणे बाजारात येत आहेत. इलेक्ट्रीकल वस्तूंची विक्री व त्यामध्ये होणारी बिघाड दुरुस्ती करणे हे मोठे व्यवसाय क्षेत्र ठरत आहे. व्यवसायाच्या अनेक नव्या संधीसाठी हे क्षेत्र नक्कीच उत्तम ठरेल.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.