हे 6 Packging Business करून जीवनात आर्थिक स्थेर्ये मिळवता येईल, प्रचंड मागणी असणारे पॅकिंग व्यवसाय

आज मार्केटमध्ये अनेक महिला घरगुती पॅकिंग व्यवसाय करून महिना चांगली कमाई करत आहेत. त्यामुळे गूगलवर माझ्या जवळच्या घरून पॅकिंगचे काम संपर्क क्रमांक शोधत बसण्यापेक्षा आजच सुरू करा हे ७ घरगुती पॅकिंग व्यवसाय ज्यामधून तुम्ही स्वत:चा एक छोटा व्यवसाय सुरू करू शकता.

या ठिकाणी अशाच काही निवडक पॅकिंग व्यवसायाच्या कल्पना आम्ही सुचवल्या आहेत, नक्कीच त्या तुमच्यासारख्या होतकरू पुरुष व महिलांसाठी उपयोगी ठरतील.

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये सर्वात जास्त खाद्य पदार्थ हे बेसन पिठापासून बनवले जातात. मग ते बेसनचे लाडू असतील, बेसन पिठापासून बनवलेले भजी, वडा असेल किंवा शेव, चकली असेल असे अनेक पदार्थ आहेत जे बेसन पिठापासून बनवले जातात.

बेसन पीठाला प्रत्येक घरात व प्रत्येक हॉटेलमध्ये मोठी मागणी असते. जवळ जवळ हॉटेल मधील सर्व पदार्थ हे बेसन पिठापासून बनवले जातात.

बेसन पिठाची मागणी पाहता तुम्ही स्वत: घरात बेसन पिठाचे 100, 250, 500 आणि 1000 ग्रामचे पॅकेट पॅक करून स्वत:च्या घरामधून विकू शकता किंवा बाजारात स्टॉल लावून आरामात विकू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला होलसेल दरात हरभरे विकत आणावे लागतील. जवळच्या पिठाच्या गिरणीतून दळून त्याचे वजन काट्यावर वजन करून 100 ते 1000 ग्राममध्ये पॅक करावे लागतील.

पॅकिंगसाठी तुम्हाला काही पॅकिंगचे पॅकेटस आणि एक विजेवर चालणारी पॅकिंग मशीन सुद्धा लागेल ती तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन दुकानात सहज मिळून जाईल.  

तुम्ही छोट्या किराणा दुकानात, मोठ्या किराणा सुपर मार्केटमध्ये 5 रुपये ते 10 रुपयाला मिळणारे मिरचीपूड, हळद, लवंग, वेलची आणि जिरे पॅकिंग केलेले पॅकेट नक्की विकत घेतले असतील.

दुकानातील दुकानदार होलसेल दरात खडा मसाला विकत आणून ते अशा प्रकारच्या छोट्या छोट्या पॅकेटमध्ये पॅक करून दुकानात विक्रीस ठेवतात.

होलसेल दरात खडा मसाला त्यांना खूप स्वस्त मिळतो समजा त्यांना एका पॅकेटमागे दोन रुपये मिळत असतील तर दिवसाला 100 पॅकेटस विक्री मागे त्यांना 200 रुपये नफा मिळतो.

सुपर मार्केटमध्ये सुद्धा आपणास असे पॅक केलेले पॅकट्स पाहायला मिळतात. म्हणजे या व्यवसायातून एक महिला स्वत:चे घर बघत महिना सहा हजार रुपये कमाई करू शकते.

काजू बदाम मोठ्या वजनात विकत घेणे हे सर्वसामान्य ग्राहकांना परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक काजू बदाम आणि मनुके यांची २० ग्राम, ५० ग्राम आणि १०० ग्राम वजनातील पॅकेटस विकत घेतात.

जवळच्या किराणा दुकानात किंवा होलसेल किराणा मार्केटमध्ये २० ग्राम, ५० ग्राम, १०० ग्राम वजनाची काजू बदाम पॅकेटस सहज मिळून जातात.

काजू बदाम विकणारे होलसेलर सुद्धा बाजारात भरपूर आहेत. त्यांच्याकडून ५०० ते ७०० रुपये १ किलो किमतीच्या दरम्यान काजू बदाम विकत मिळतात ते २० ग्राम ५० ग्राम, १०० ग्राम, ५०० ग्रामच्या पॅकेटस मध्ये विकता येतात. अशा पॅकेटवर तुम्ही स्वत:च्या गृह उद्योगाच्या नावाचे लेबल लावू शकता.

समजा १ किलो काजू ५०० रुपयाला विकत मिळाले तर १ किलो मध्ये ५० ग्रामची २० पॅकेट तयार होतात. एका ५० ग्राम पॅकेटची किमंत जर तुम्ही ६० रुपये लावली तर २० पॅकेटचे १२०० रुपये होतात, म्हणजे १ किलो मागे तुम्हाला ६०० रुपये मिळतात.

आजकाल चमचमीत खाणे कोणाला आवडत नाही. महिला पुरुष असो अथवा लहान मुले सर्वांना बटाटा चिप्स, केळी चिप्स खूप आवडतात.

चिप्स बनवणे हा व्यवसाय करायला खूप सोपा आहे. बाजारात बटाटा चिप्स बनवणारे कट्टर मशीन सहज उपलब्ध होते.

या चिप्स बनवणार्‍या मशीन मधून चिप्स तयार करून ते उन्हात काही तास वाळवावेत. त्यानंतर ते खाण्याच्या तेलात तळून हव्या त्या वजनात प्लॅस्टिक पाउच मध्ये पॅक करावेत. तळलेल्या बटाटा, केळी चिप्सला रेडिमेड मसाला लावून ते आणखी रुचकर बनवता येतात.

लहान मुलांमध्ये candy, gems ची खूप क्रेझ आहे. छोट्या जनरल स्टोर पासून अगदी मेडिकल स्टोर मध्ये देखील आपणास फ्रूट बॉल, जेम्स, आणि कँडी छोट्या छोट्या पाउच मध्ये, प्लॅस्टिक बोट्टलमध्ये पाहायला मिळते.

लहान मुले आणि शाळेतील मुले मुली फ्रूट बॉल, जेम्स, आणि कँडी शाळेच्या ब्रेकमध्ये खूप खातात.

जास्तकरून शाळेच्या समोर असलेल्या दुकानात फ्रूट बॉल, जेम्स, आणि कँडी पाहायला मिळते, याचे कारण शाळेतील मुले ब्रेकमध्ये याचा आस्वाद घेतात.

बाजारात फ्रूट बॉल, जेम्स, आणि कँडी चे अनेक व्होलसेलर विक्रेते आहेत.

तुम्हाला जेम्स, आणि कँडी किलोच्या भावाने विकत मिळेल. तुम्ही अगदी घरच्या घरी हा व्यवसाय सुरू करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त एक कैची, प्लॅस्टिक rapper, आणि सील करणारी मशीन गरजेची आहे.

प्लॅस्टिक राप्पर कट करून त्याचे छोटे छोटे पाउच तयार करायचे आहेत. तयार केलेल्या छोट्या पाउचमध्ये फ्रूट बॉल, जेम्स, आणि कँडी भरून ती छापडीवर स्टेप्लरने स्टेपल करून लावायची आहे.

हे तयार केलेले छोटे छोटे पाउच तुम्ही शाळेसमोर, बाजारात आणि किराणा दुकानात विकायला ठेवू शकता. तुम्ही पॅकिंगसाठी छोट्या प्लॅस्टिक बोटलचा देखील वापर करू शकता.

रोजच्या जेवणात मटकी, मूगडाळ, हरभरा, चवळी आणि वाटाणा अशा अनेक कडधान्यांचा भरपूर वापर होतो. अशी कडधान्ये आपणास बाजारात १०० ग्राम, २५० ग्राम, ५०० ग्राम आणि १ किलोच्या पॅकमध्ये बघायला मिळतात.

सर्वसामान्य ग्राहक हे २५० ग्राममधील कडधान्य सर्वात जास्त विकत घेतात मग ती मुगडाळ असेल, मटकी असेल अथवा वाटाणा असेल. किराणा दुकानात देखील अशी पाकिटे  बघायला मिळतात.

अशा पाकीटांवर किमंतीचे स्टीकर देखील लावलेले असतात. हा व्यवसाय कोणीही करू शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी होलसेल दरात कडधान्य विकत घ्यायचे आहे.

तुम्ही तुमच्या आसपासच्या परिसरातील शेतकर्‍यांकडून मटकी, मूगडाळ, हरभरा, चवळी आणि वाटाणा कडधान्ये विकत घेऊ शकता. पाहिजे त्या वजनात पॅक करून आठवडी बाजारात विकू शकता.

तुम्हाला जर घरच्या घरी खाण्याचे सामान पॅक करून बाजारात विकायचे असेल तर खूप कमी साहित्य यासाठी लागणार आहे. आणि हे साहित्य विकत घ्यायला भांडवल देखील खूप कमी लागणार आहे.

१. heat sealing machine: ही मशीन प्लॅस्टिक पाउच पॅक करण्यासाठी वापरली जाते. ही मशीन तुम्हाला ऑनलाइन ९०० ते ९५० रुपये पर्यंत सहज भेटून जाते.

२. कैची: प्लॅस्टिकचे पाउच कट करण्यासाठी वापरली जाते. नॉर्मल कैची तुम्हाला दुकानात ५० ते १०० रुपयाला मिळते.

. प्लॅस्टिक rapper: मार्केटमध्ये २०० ते ३०० रुपयाला मिळतो. या प्लॅस्टिक कागदाचे मोजमाप करून कैचीने ते कट करून घ्यावे लागतात. आणि नंतर ते सीलिंगमशीन मधून सील करायचे असतात.

४. प्लॅस्टिक बोट्टल/बरण्या: जर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट प्लॅस्टिक बोट्टलमध्ये, काचेच्या बरणीमध्ये भरून विकणार असाल तर तुम्हाला अशा बोट्टल आणि बरण्या विकत घ्याव्या लागतील. प्लॅस्टिकच्या दुकानात अशा बरण्यांचा सेट खूप स्वस्त मिळतो.

५. स्टेप्लर: स्टेप्लर तुम्हाला प्लॅस्टिक पाउच खाकी रंगाच्या पुष्ठ्यावर स्टेप्लर करून लावायचे असतात.

६. cardboard sheets (छापडी): कार्डबोर्ड शीट रद्दीवाल्याकडे सहज उपलब्ध होते. ती हव्या त्या आकारात व साइजमध्ये कट करून त्यावर पाउच स्टेपल करता येतात.

वरती आपण कोणत्या वस्तु पॅकिंग करायच्या ते पाहिले परंतु त्या वस्तूंचे मार्केटिंग कुठे करायचे, त्या सर्व वस्तु कुठे विकायच्या हे मात्र पाहिले नाही तर हे सर्व खालील मुद्यांच्या आधारे स्पष्ट केले गेले आहे.

तुमचे जर स्वत:चे अगोदर किराणा दुकान असेल तर तुमच्याकडे ग्राहकांची कमी नाही तुम्ही तुमच्या किराणा दुकानात असे पॅकेटस विकू शकता.

जर तुमचे किराणा दुकान नसेल तर तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या आसपासच्या किराणा दुकानात जाऊन तुमच्या वस्तूंची दुकानदाराला माहिती द्यावी लागेल.

तुम्ही अशा किराणा दुकानदारांना देखील पॅकेटस विकू शकता पुढे तो रीटेल ग्राहकांना विकून त्याचे मार्जिन काढून घेईल.

तुमची पॅकेटस विकण्याची ही एक दुसरी पद्धत आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या आसपासच्या गावात कोणत्या दिवशी बाजार भरतो याची यादी काढावी लागेल. त्यानंतर प्रत्येक गावाच्या बाजारात जाऊन टेबल खुर्ची मांडून तुमची पॅकेटस विकायची आहेत.

हे सर्व तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे, जितकी जास्त तुम्ही तुमच्या वस्तूंची जाहिरात कराल तितके अधिक ग्राहक तुमच्याकडे येतील.

समजा तुम्ही दररोज १०० पॅकेटस विकले आणि एका पॅकेटची किंमत जर १० रुपये असेल तर तुमची दिवसाची उलाढाल १००० रुपये होते. लक्षात असू द्या जितके जास्त पॅकेट विकले जातील तेवढी जास्त पैशाची उलाढाल होऊ शकते.

पॅकिंग व्यवसाय हे नेहमीच महिला व पुरुषांसाठी फायद्याचे ठरतात, कारण या व्यवसायात कष्ट फार कमी लागते.

ज्या महिला घरी बसून आहेत किंवा काही महिलांना लहान मुले घरी असल्यामुळे बाहेर कुठे जॉब करता येत नाही अशा महिला पॅकिंग व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करू शकतात.

तर मग कोणताही विचार न करता वरती दिलेले पॅकिंग व्यवसाय कल्पनांचा नक्की विचार करा.

Leave a Comment