नोकरी करावी का व्यवसाय
खरतर व्यवसाय करावा का बिजनेस हे सर्वस्वी तुमची आर्थिक परिस्थती व तुमच्याकडे असलेले कौशल्य, जिद्द, चिकाटी, आणि कष्ट करण्याची तयारी या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. जर तुमची आर्थिक तंगी चालू असेल, घरातील बिले थकली असतील, दवाखाना खर्च चालू असेल तर तुम्हाला नोकरी करण्या शिवाय पर्याय नसतो.
आणि ज्या तरुणांनाकडे अगोदरच खूप सारा पैसा आहे, किंवा वडील सरकारी नोकरीत आहेत, आई नोकरी करत असेल, शेती खूप असेल तर तुम्ही कोणताही विचार न करता आरामात व्यवसाय करू शकता.
नोकरी करावी कि व्यवसाय करावा हा प्रश्न सर्व तरुण वयाच्या मुलांच्या डोक्यात येतो. परंतु कधी कधी आपण व्यवसायात यशस्वी होईल का नाही याची भीती मनात सलत असते.
काही तरुणांना नोकरीत खूप सुरूक्षितता वाटते. कारण नोकरीत मिळणारा पगार हा हक्काचं असतो.
ऑफिसमध्ये काम असो किंवा नसो तुमचा पगार 1 ते 7 तारखेच्या आत होणार हे ठरलेले असते. त्यामुळे नोकरी ही बर्याच तरुणांना सुरूक्षित वाटते.
नोकरीतील सुरूक्षा कि धंद्यातील स्वातंत्र्य
नोकरी किंवा बिजनेस करण्यापूर्वी तुम्ही स्वत:च आत्मपरिक्षण करण खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुमच्याकडे कोणते स्किल आहे, तुम्हाला काय येत, तुमचे शिक्षण किती आहे या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे.
या सर्व गोष्टींवरून तुम्ही कोणत्या नोकरीसाठी अर्ज करायचा हे ठरवू शकता.
आणि जर व्यवसाय करायचा म्हटलं तर तुमचा घर खर्च निघण्याकरिता तुमच्याकडे दूसरा इन्कमचा मार्ग असणे फार गरजेचा आहे.
कारण कोणत्याही व्यवसायात लगेच पैसे मिळत नाहीत. यानंतर दूसरा विषय म्हणजे व्यवसाय करताना तो व्यवसाय चांगला चाले पर्यंत तुमच्याकडे थोडाफार भांडवल असणे गरजेचे आहे.
म्हणजे सुरूवातीचे काही महीने दुकानाचे भाडे भरणे असेल, वीज भरणे असेल, दुकानाची जाहिरात करणे असेल, मालाची खरेदी विक्री असेल इत्यादि गोष्टींवर खर्च करण्यासाठी तुमच्याकडे राखीव पैसा असावा लागतो. तरच तुम्ही व्यवसायात स्वातंत्र्य मिळवू शकता.
जॉब किंवा व्यवसायाकडे माणूस का वळतो
नोकरी किंवा व्यवसाय करण्याची बरीच कारणे असतात, काही लोक आपला उदरनिर्वाह व्हावा याकरिता नोकरी किंवा धंदा करतात, तर काही विद्यार्थी शिक्षण घेत आपला पॉकेट मनी यावा या करिता नोकरी करतात.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या वैयक्तिक जबाबदार्या असतात तसेच काही कौटुंबिक जबाबदार्या देखील असतात त्या पूर्ण करण्यासाठी माणूस काम धंदा करत असतो.
काहीजण घरातील चूल पेटती राहावी, मुला बाळांचा शिक्षणाचा खर्च असेल किंवा दवाखान्याचा खर्च असेल अशा असंख्य कारणासाठी माणूस कामधंदा करतो असतो.
व्यवसाय का करावा
आता या प्रश्नाचे उत्तर जर द्यायचे झाले तर ते प्रत्येक व्यक्ति नुसार वेगवेगळे असू शकते. काहीजण म्हणतील नोकरी मिळत नाही म्हणून व्यवसाय करायचा तर काहीजण म्हणतील नोकरी करण्यात इंटरेस्ट नाही म्हणून व्यवसाय करायचा. ही सर्व उत्तरे तुम्हाला व्यक्तिनुसार वेगवेगळी पाहायला मिळतील.
व्यवसाय करण्याचे फायदे
व्यवसाय करण्यातून खालील फायदे मिळतात
- स्वत:चे मालक स्वता बनता
- आर्थिक स्वातंत्र्य मिळते.
- समाजात उद्योजक म्हणून दर्जा मिळतो.
- खूप सारा पैसा मिळतो, समाजाची सेवा होते.
- पॅसिव उत्पन्न मिळते.
- कामावर वेळेचे बंधन नसते.
- ग्राहकाशिवाय इतर कोणीही तुम्हाला प्रश्न विचारणार नसत.
- धंध्यात तुम्हाला तुमच्या सर्व शारीरिक क्षमता व बौद्धिक क्षमतेनिशी काम करता येते.
- सामाजिक संस्था असतील किंवा सरकार असेल यांच्याकडून वेळोवेळी पुरस्कार मिळतात.
- समाजात सन्मान व प्रतिष्ठा मिळते.
- लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो.
व्यवसाय कसा करावा
व्यवसाय करण्यापूर्वी तुम्ही स्वत:ला काय करायला आवडत, स्वत:ची कोणत्या क्षेत्रात आवड आहे हे विचारात घ्यायला हव. नाहीतर बाजूचा हा व्यवसाय करतोय किंवा तो व्यवसाय करतोय म्हणून मला हा व्यवसाय करायचा आहे, हे संपूर्ण चुकीचे आहे.
इतर लोक करत असलेले व्यवसाय तुम्ही देखील करू शकता परंतु ते एका अटीवर जर तुमच्याकडे त्यांचा व्यवसाय शिकण्याची जिद्द असेल, अनुभव घ्यायची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही त्यांचा व्यवसाय सुरू करू शकता.
व्यवसाय हा जगावेगळा करायचा असेल म्हणजे तो व्यवसाय मार्केटमध्ये कोणीच करत नसेल आणि तुम्ही तो व्यवसाय करू पाहत असाल तर ते तुमच्यासाठी रिस्की ठरू शकते.
कारण त्या व्यवसायाबद्दल येणारे यश अपयश, चढ उतार याबद्दल फारच कमी लोकांना याची माहिती असते. त्यामुळे अशा नवीन व्यवसायाबद्दल फारच कमी माहिती तुम्हाला मिळू शकते.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी खालील दोन गोष्टींचा विचार करण गरजेचं आहे
1. passion
2. interst
तुम्ही कोणत्या व्यवसाय कल्पनेने भारावून गेलात किंवा तुमची आवड कशात आहे, हे तुम्ही अगोदर विचारात घेतले पाहिजे, आणि मगच व्यवसायाकडे पाऊल उचलल पाहिजे.
यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे लोकांना तुम्ही कोणती सेवा किंवा कोणती वस्तु देऊ शकता ज्या बदल्यात लोक तुम्हाला पैसे देतील. जर तुम्ही तुमच्या वस्तूच्या माध्यमातून किंवा सेवेच्या माध्यमातून लोकांचे प्रॉब्लेम्स सोडवण्यास सक्षम बनला कि लोक तुम्हाला पैसे द्यायला तयार होतील.
व्यवसाय करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्यात
तुमच्यामध्ये रिस्क घेण्याची तयारी असायला हवी, कोणत्याही परिस्थितित डगमगायचे नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे.
तुम्ही ज्या क्षेत्रात व्यवसाय करत आहात त्या क्षेत्रातील दररोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावता आली पाहिजे.
जर तुम्हाला नोकरी करण्याची वेळ पडली आणि तुम्हाला तर व्यवसाय करायचा आहे तर नोकरी निवडताना अशी निवडा जी तुमच्या व्यवसायाशी संबधित असेल.
म्हणजे तुम्हाला त्या नोकरीतून थोडाफार पैसा ही मिळेल आणि व्यवसायाशी संबधित ज्ञान ही मिळेल.
ज्यांना आयुष्यात फक्त पैसा हवा आहे ते व्यवसायात कधीच जास्त काळ टिकू शकत नाहीत. त्यामुळे तुमचं ध्येय फक्त पैसा मिळवण नसून, ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तु मिळवून देण, हे असायला हव.
बिजनेस करत असताना नेहमी अशा लोकांना फॉलो करा कि जे व्यवसायाशी संबधित आहेत. अशा लोकांना फॉलो करा जे व्यवसायात यशस्वी झाले आहेत. जे शांत, सयंमी स्वभावाचे अभ्यासू आणि अनुभवी आहेत.
निष्कर्ष (Conclusion)
व्यवसाय का करावा हा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर वरती दिलेले व्यवसाय करण्याचे फायदे यांचा अभ्यास करून तुम्ही या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकता.
जर तुमच्याकडे कौशल्य असेल आणि तुमचे मन आतून तुम्हाला व्यवसाय करण्यास प्रवृत करत असेल तर तुम्ही व्यवसायच केला पाहिजे. किती ही नोकर्या केल्या तरी समाधान नसेल तर तुम्ही फक्त व्यवसाय करण्यासाठी जन्मला आहात हे लक्षात असू द्या.