करोडोंच साम्राज्य उभा करणारे 5 marathi businessman, जाणून घ्या त्यांचा उद्योजक प्रवास

उद्योजक म्हटलं कि आपल्या समोर धीरुबाई अंबानी, रतन टाटा, बाबा कल्याणी आणि हणमंत गायकवाड अशा उद्योजकांची नावे समोर येतात. पण मित्रांनो तुम्हाला हे माहीत आहे का आपल्या महाराष्ट्रात असे अनेक marathi businessman आहेत जे फार कमी लोकांना माहिती आहेत परंतु त्यांचा टर्नओवर लाखोंच्या घरात आहे.

आज आपण अशा उदयोजंकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थतीमधून शून्यातून आपले विश्व निर्माण केले आहे.

धनंजय नरवडे (the owner of sai brand) 

engineering ची शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले धनंजय नरवडे आज करोडोंचा व्यवसाय करत आहेत. धनंजय नरवडे हे clothing चा व्यवसाय करतात. त्यांच्या आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर 26 शाखा कार्यरत आहेत. या 26 शाखांमधून ते आज वर्षाला करोडो रूपयांचा turnover करत आहेत.

धंनंजय नरवडे हे मूळचे लाखेवाडीचे रहिवासी आहेत. अनेक ठिकाणी अनेकवेळा अपयश आल्यामुळे हा मुलगा आपल्या आयुष्यात काही करू शकत नाही हे त्यांच्या आई बाबांनी मनाशी ठरवले होते.

नातेवाईक तर हा आता संपला हा आपल्या आयुष्यात काहीच करू शकत नाही अस म्हणत होते. पण म्हणतात ना केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे, या उक्तीप्रमाणे त्यांनी करून दाखवले.

अक्षरशा ते अपयश आल्यामुळे आणि लोकांच्या टोमन्यांमुळे इतके खचून गेले होते कि ते डोंगरावर जाऊन एकांतात रडत असत. पण त्यांनी पुन्हा जिद्द उराशी बाळगून आपले काम चालू ठेवले. काम कधी बंद केले नाही.

दिनेश मांगले (हिंदवी ग्रुप)   

दिनेश मांगले यांनी Real estate मध्ये 2800 ते 3000 यूनिट विकले आणि त्यातून 1400 कोटींचा व्यवसाय उभा केला. त्यांच्या या हिंदवी ग्रुपची brand ambassador अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे.

दिनेश मांगले यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील छोट्याश्या खेडेगावात झाला. आर्थिक परिस्थिति बिकट, वडिलांना दारूचे व्यसन, बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी जमीन सर्व जमीन विकली.

नोकरीत मन लागत नाही म्हणून एका कंपनीत पैसे गुंतवले व ती कंपनी देखील फसवी निघाली. त्यानंतर आईचा मृत्यू झाला. संकटातून अडचणीतून हिमतीने बाहेर पडत, कोणाचाही आधार नसताना या वाघाने यशस्वी उद्योजक होऊन दाखवले.

लग्नाला एक महिना अवकाश असताना, या महाशयांनी स्वत:ची दूध डेअरी उभा करण्याचं धाडस केल. तो उद्योग त्यांचा थोडे दिवस यशस्वी झाला. डेअरीतून त्यांनी थोडेफार पैसे ही कमावले व स्वत:च लग्न केल.

त्यांना डेअरी या धंद्यात देखील नुकसान सोसावे लागले परंतु पुढे ते रीयलइस्टेटमध्ये उतरले आणि शेवटी याच व्यवसायात स्थिर झाले.

सचिन कदम (vegetable import exporter) 

महाराष्ट्र राज्यातील चिपळूणचे रहिवासी उद्योजक सचिन कदम हे सध्या लंडनच्या आंतरराष्ट्रीय मार्केटवर भाजीपाल्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यापार करत आहेत.

सचिन कदम हे गेली 21 वर्षे लंडनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रावर आपल्या भारत देशातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला import करत आहेत आणि इम्पोर्ट केलेला भाजीपाला लंडनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रातून विविध देशांमध्ये export करत आहेत.

चिपळूणमध्ये राहणारे सचिन कदम हे एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व असून देखील ते आज इतक्या उंचीवर येऊन पोहचले आहेत, कि आश्चर्य म्हणजे ते स्वत: वेळ पडल्यास गोडावून मध्ये भाजीपाल्याचे प्लॅस्टिक कैरेट उचलण्याचे, भाजीपाल्याचे वजन करण्याचे काम करतात.

म्हणजे पहा आज मराठी माणूस परदेशात सुद्धा छोट्या छोट्या कामाची लाज बाळगत नाही, हे आश्चर्य करण्याइतके आहे. ते एका आठवड्याला जवळ जवळ 50 टन इतका भाजीपाला वेगवेगळ्या देशात एक्सपोर्ट करतात.  

प्रकाश पाटील (printing packging 50 कोटींचा व्यवसाय)

प्रकाश पाटील हे नाव तुम्ही कदाचित ऐकले नसेल परंतु कोल्हापूर मधील एका खेड्यातील व्यक्तिमत्व इतके प्रखर होईल, हे कोणालाच मान्य होणारे नव्हते परंतु त्यांनी ते करून दाखवले. प्रकाश पाटील यांच्या बर्‍याच मुलाखती तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील.

प्रकाश पाटील यांचा मुंबई याठिकाणी printing packging चा व्यवसाय आहे. ते यातून वर्षाला लाखोंचा turnover करतात. 

कोल्हापूरमध्ये एका छोट्याशा गावात जन्मलेले ग्रामीण भागात वाढलेले प्रकाश पाटील पुढे जाऊन 50 कोटींचा व्यवसाय उभा करतील हे कोणालाही विश्वास बसण्यासारखे नव्हते.

परंतु त्यांनी ते करून दाखवले. प्रकाश पाटील यांचा जीवन प्रवास खूप खडतर असा आहे. दहावीत 3 वेळा नापास, लग्न जमलेले परंतु लग्नापूर्वी होणारा साखरपुडा मोडला कारण नोकरी नाही उद्योगाचे वेड आहे म्हणून. जीवनात इतक्या अडचणी येऊन देखील त्यांनी हार मानली नाही.

ते शेवटी मुंबईला निघून गेले. पडेल ते काम केले आणि त्यांनी मुंबई या ठिकाणी 50 कोटींचा व्यवसाय करणारी कंपनी कष्टाने आणि हिमतीने स्वत:च्या पायावर उभा केली.

सोमनाथ शेलार (हॉटेल व्यवसायिक)  

सोमनाथ शेलार एक शेतकरी कुटुंबातील युवक आज स्वत:च्या हॉटेल व्यवसायातून हजारो लोकांच्या हाताला काम धंदा देत आहेत. दिवसाला 160 रुपयाचा धंदा होणारा त्यांचा हॉटेल व्यवसाय आज करोडोंच्या घरात कमाई करत आहे.

सुरूवातीला त्यांनी परिस्थितिवर मात करण्यासाठी काही ठिकाणी नोकरी केली परंतु नोकरीतील मानसिक त्रासामुळे त्यांनी त्या सर्व नोकर्‍या सोडून दिल्या आणि हॉटेल व्यवसायात उतरले.

शिक्षणाने पदवीधर असणारा मुलगा हॉटेलमध्ये भांडी घासत आहे म्हणून लोक त्यांची खिल्ली उडवत असत. लोक त्यांना तू इतका शिकला आहेस मग कुठेतरी जॉब का करत नाही असे म्हणत असत.

पण सोमनाथ शेलार यांना या व्यवसायात चांगले उत्पन्न मिळत होते, ते या हिणवणार्‍या लोकांसोबत शेअर करू शकत नव्हते. आज त्यांच्या हॉटेलव्यवसायाच्या मुख्य शहरांमध्ये 55 ते 60 शाखा कार्यरत आहेत, त्यातील त्यांच्या काही होमब्रांचेस आहेत.

Leave a Comment