काय आहे direct selling business, एक नवीन इंडस्ट्री सगळीकडे वेगाने पसरतेय

direct selling ही एक अशी मार्केटिंगची प्रक्रिया आहे ज्यामध्ये स्वत: प्रॉडक्ट बनवणार्‍या कंपनीचे प्रॉडक्टस प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहचवले जातात, या प्रक्रियेमध्ये कोणत्याही थर्ड पार्टी कंपनीचा सहभाग नसतो. थोडक्यात समजायचे झाल्यास कंपनी आपली उत्पादने प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहचवते.

जो पैसा मॅन्युफॅक्चरर कंपनीला उत्पादनांच्या जाहिरातीसाठी मोठ मोठे सेलेब्रेटी, मीडिया यांवर खर्च करावा लागतो तो पैसा जाहिरातीसाठी न खर्च करता त्या पैशाची बचत करून प्रत्यक्ष ग्राहकांमध्ये वाटणे होय.

direct selling कसे काम करते हे जाणून घेण्याअगोदर आपणास traditional sellling ची प्रक्रिया कशी आहे हे समजून घेतले पाहिजे.

समजा आपणास cello कंपनीचा पेन विकत घ्यायचा आहे तर तो आपण retailer कडे जाऊन विकत घेतो. retailer तो पेन wholsaler कडून विकत घेतो आणि wholslaer हा distributor कडून विकत घेतो आणि distributor हा manufucturre कडून विकत घेत असतो.

म्हणजे पेनची किंमत retailer कडे 10 रुपये असेल तर retailer ला तो पेन 8 रुपयाला विकत मिळतो, wholslaer ला 7 रुपयाला मिळतो, distributor ला 6 रुपयाला मिळतो, तर कंपनीला तो पेन तयार करायला फक्त 4 रुपये खर्च येतो. आणि उरलेले 2 रुपये कंपनी त्या पेनची जाहिरात करण्यासाठी जाहिरात माध्यमांवर खर्च करते.

आता cello कंपनीचा अमुक पेन मार्केटमध्ये आला आहे हे आपणास कसे माहीत झाले तर ते आपणास जाहिरातीच्या माध्यमातून जसे टीव्ही वर चालणारी जाहिरात, वर्तमान पत्रामध्ये दिलेली जाहिरात या माध्यमांद्वारे माहीत होते.

मॅन्युफॅक्चरर कंपनीला आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी जाहिरात करणार्‍या एजन्सि, सेलेब्रिटी इत्यादींना पैसा द्यावा लागतो.

डायरेक्ट सेल्लिंगच्या प्रक्रियेमध्ये distributor, wholsaler, retailer, जाहिरात माध्यमे येत नाहीत तर कंपनी यांच्यावर होणारा पैसा बचत करून ग्राहकांमध्ये वाटते.

तर आपणास मी सांगू इच्छितो की direct selling ही एक अशी एकमेव इंडस्ट्री आहे ज्यामध्ये यश मिळवण्यासाठी, काम करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता विचारली जात नाही. अगदी कोणीही कोणत्याही वयाची व्यक्ति या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करून यश मिळवू शकते.

Direct Selling मध्ये कंपनीdistributor, wholsaler, retailer यांना बाजूला ठेवून प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहचवते व जाहिरात माध्यमांवर होणारा खर्च वाचवून तो पैसा प्रत्यक्ष ग्राहकांमध्ये वाटते.

नेटवर्क मार्केटिंग हा डायरेक्ट सेल्लिंगचा एक पार्ट आहे. नेटवर्क मार्केटिंग मध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना ग्राहकांनी वापरलेल्या उत्पादंनांची जाहिरात केल्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना कंपनीची उत्पादने वापरण्यास सुचवल्याबद्दल payouts/पैसे देते.

अशामुळे कंपनी आणि ग्राहक हे दोन्ही फायद्यात राहतात. कंपनीच्या उत्पादंनांची विक्री होते व ग्राहकाचे उत्पन्न देखील वाढते.

आज पूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगात नेटवर्क मार्केटिंग सर्वात मोठी इंडस्ट्री आहे.

हा बिजनेस करत असताना तुमच्या मध्ये सकारात्मकता येते. तुमचे संभाषण कौशल्य सुधारते. तुमचे संभाषण कौशल्य सुधारल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमची प्रतिष्ठा, ओळख तुमचे नेटवर्क वाढते.

या बिजनेसमध्ये आल्यानंतर तुम्ही वेळ मॅनेज करायला शिकता. जसे सकाळी लवकर उठणे, वेळेवर नाश्ता करणे, कधी कोणाला भेटायचं आहे, कधी कोणासोबत मीटिंग करायची आहे. स्वत:साठी किती वेळ द्यायचा आहे. दिवसभरात काम किती करायचं आहे. वेळेचे मॅनेजमेंट करायला शिकल्यामुळे तुमची सर्व कामे वेळेवर होतात.

हा बिजनेस करत असताना तुमची कपड्यांची निवड पूर्ण बदलून जाते. तुम्ही अगदी फॉर्मल तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभतील अशी कपडे वापरणे पसंत करता. म्हणजे इतर लोकांच्या तुलनेत डायरेक्ट सेलिंग बिजनेस करणार्‍या लोकांचा पेहराव हा वेगळा असतो, अगदी प्रॉफेश्नल असतो. या बिजनेसमध्ये तुमच्याकडे ड्रेसिंग सेन्स येतो.

डायरेक्ट सेल्लिंग बिजनेस पूर्ण जगात पसरला आहे. विकसित राष्ट्रांमध्ये प्रत्येकजण डायरेक्ट सेल्लिंग बिजनेस करतो. विदेशामध्ये या बिजनेसला प्राधान्य दिले जाते परंतु आपल्या देशात या बिजनेसबद्दल लोक इतके नकारात्मक का आहे हे आपण पाहूया.

आपल्या देशातील लोकांची अशी धारणा आहे कि हा बिजनेस एक फसवण्याचा धंदा आहे. आणि जे लोक हे काम करतात ते रिकामटेकडे असतात त्यामुळे हा बिजनेस फक्त मोकळ्या लोकांचा आहे.

हे लोक अशामुळे म्हणतात कि त्यांना या बिजनेसबद्दल पुरेसे ज्ञान नाही त्यामुळे ते असे बोलतात. जे लोक या बिजनेसला नावे ठेवतात त्या लोकांना प्रत्यक्षात डायरेक्ट सेल्लिंग काय आहे हे मुळात माहीत नसते.

खरतर कोणत्याही बिजनेसला सुरूवातीला एका नकारात्मक स्तरातून जावे लागते, आणि जस जसे लोकांना याबद्दल माहिती होत जाईल तस तसे लोक या बिजनेसचे महत्व नक्की जाणतील.

एखादा व्यक्ति तुमच्याशी जोडला जातो कि नाही किंवा कंपनीच्या वस्तु खरेदी करतो कि नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे, कि तुम्ही त्या व्यक्तिला किती प्रभावित केले आहे.

जर तुम्ही त्याला प्रभावित करण्यास असक्षम राहिला असाल तर तो नक्कीच तुमच्याबद्दल आणि कंपनीबद्दल नकारात्मक विचार करेल.  

लोकांना जर तुमच्याकडे जॉइन करायचे असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर त्यांना स्वत:ची कथा सांगावी लागणार आहे.

तुम्ही स्वत: या बिजनेसमध्ये कसे मोठे झाला तुम्ही कोणत्या परिस्थितीतून बाहेर आलात आणि यातून कसे यश मिळवले हे तुम्हाला त्यांना सांगावे लागणार आहे.

जर तुम्ही काहीच बोलणार नसाल तर तो व्यक्ति तुमच्याशी कधीच जोडला जाऊ शकत नाही. तुम्ही जी यशाची कथा लोकांना सांगणार आहात त्या कथेत दम असायला हवा, तरच लोक तुमच्या सोबत येण्याचा विचार करतील.

ज्या ज्या वेळी असे लोक तुम्हाला भेटतील जे नकारात्मक आहेत अशा व्यक्तींना तुमच्या व तुमच्या सहकार्‍याच्या यशाच्या कथा सांगायच्या आहेत, असे केल्याने लोक थोडेसे का होईना सकारात्मक विचार करायला लागतील.

Leave a Comment