विपणन या शब्दाला इंग्रजीत marketing असे म्हणतात. आजच्या दुनियेत तुम्हाला मार्केटिंग प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल. व्यवसाय चालो अथवा न चालो मार्केटिंग तर करावेच लागते.
मग ते वर्तमान पत्र असू द्या, टीव्ही असू द्या अथवा डिजिटल फ्लेक्स असू द्या अशा सर्व ठिकाणी तुम्हाला कोणत्या न कोणत्या वस्तूंची जाहिरात केलेली पाहायला मिळते.
विपणन म्हणजे काय
1. विपणन या संकल्पनेत सेवा, वस्तु, यांची निर्मिती करणे आणि त्यांची विशिष्ट किमंत निर्धारित करून त्यांचा प्रसार करणे होय.
2. मार्केटिंग ही एक प्रमोशनल टेकनिक आहे ज्याच्या मदतीने कंपनी आपल्या वस्तु टार्गेट केलेल्या वेगवेगळ्या ग्राहकांना विकते.
3. मार्केटिंग म्हणजे ग्राहकांच्या गरजा ओळखणे त्या समजून घेणे, आणि त्यानुसार त्यावर काम करून ग्राहकांना त्यांच्या उपयोगी वस्तु किंवा गरजेच्या सेवा पुरवणे होय.
मार्केटिंगचे प्रकार
1. print advertisment: यामध्ये डिजिटल बॅनर, जाहिरात पत्रिका, यांचा वापर करून कंपनीच्या वस्तु प्रमोट केल्या जातात.
2. digital marketing: यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म जसे सोशल मीडिया, आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने वस्तूंची जाहिरात केली जाते.
3. news papar marketing: या प्रकारात वर्तमानपत्रांचा वापर कंपनीच्या वस्तु, सेवा यांची जाहिरात करण्याकरिता केला जातो. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात छापली जाते, आकर्षक चित्रे व प्रभावी शब्दांचा वापर केला जातो.
4. colloboration: सोशल मीडिया जसे इनस्टाग्राम, फेसबूक, यूट्यूब यांवर अॅक्टिव असणार्या influencer लोकांना तुमच्या कंपनीच्या वस्तु प्रमोट करायला लावणे. मग ते प्रमोशन रील द्वारे, व्हीडियोच्या माध्यमातून, अथवा कंटेंटच्या माध्यमातून केले जाते.
परिणामकारक मार्केटिंग कसे केले जाते
प्रभावी मार्केटिंग करण्यासाठी स्ट्रॉंग advertisement करावी लागते. जास्तीत जास्त व टार्गेटेड ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला तुमचे ग्राहक कोणते आहेत ते ओळखता आले पाहिजे.
मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, ग्राहकांचा वयोगट कोणता टार्गेट करायचा आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून जाहिरात तयार करावी. जाहिरातीमध्ये तुमच्या व्यवसायाशी संबधित शब्दांचा वापर करावा.
विपणननाचे फायदे
improved efficinecy मार्केट रिसर्च केल्यामुळे ग्राहकांचा feedback समजतो. यामुळे वस्तु व सेवा अधिक सोयिस्कर व सुधारित करता येतात.
जर कंपनीच्या वस्तूंमध्ये दोष असेल किंवा वस्तूंमध्ये गुणवत्ता नसेल तर ग्राहकांच्या feedback मुळे वस्तूंच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करता येते.
cost effective ग्राहकांना परवडेल या किमतीत वस्तु उपलब्ध करून देता येतात.
competitive edge
मार्केटमध्ये अनेक स्पर्धक असतात जे आपण मॅन्युफॅक्चर केलेल्या वस्तु ते देखील मॅन्युफॅक्चर करतात. मार्केटिंग रिसर्चमुळे आपले स्पर्धक कोण आहेत, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंमध्ये किती गुणवत्ता आहे, त्या वस्तूंच्या किमती किती आहेत या सर्व गोष्टींचे विश्लेषण करता येते.
Build strategies
बाजारात आपल्या वस्तु इतर कंपनीच्या तुलनेत अधिक कशा विक्री होतील, मार्केटमध्ये आपली उत्पादने विक्रीचा उच्चांक कसा गाठतील त्याकरिता कोणत्या पद्धती व कौशल्याचा वापर करावा लागेल हे समजते.
improved communication
मार्केट रिसर्च करत असताना ग्राहकांशी संपर्क साधता येतो, त्यांच्या समस्या, त्यांच्या सूचना समजून घेता येतात. ग्राहकांचा feedback नोंदवल्यामुळे वस्तूंमधील त्रुटि समजतात.
निष्कर्षांचे विश्लेषण करणे आणि अहवाल देणे
या प्रक्रियेमध्ये मार्केटिंग रिसर्च करताना मिळालेल्या माहितीचे (डाटा) परीक्षण केले जाते, मिळालेला डाटा क्लीन केला जातो. निष्कर्षाचे विश्लेषण केल्यामुळे तुमच्यासमोर एक स्पष्टता येते.
तसेच ही स्पष्टता आल्यामुळे कंपनीने कोणत्या सुधारणा करायला हव्यात, मग ती किमंत असेल, ऑफर असेल अथवा वस्तूंची गुणवत्ता असेल याबाबतीत योग्य निर्णय घेता येतो. कोणत्या समस्येमुळे विक्री कमी झाली आणि त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात हे स्पष्ट होते.
कृती करणे
या प्रोसेसमध्ये मार्केटिंग रिसर्च दरम्यान जी काही माहिती मिळाली आहे, जो काही निष्कर्ष मिळाला आहे, त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी केली जाते. प्रत्यक्ष कृती केल्याने ग्राहक समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात. स्पर्धेत टिकण्यासाठी योग्य ती अमलबजावणी केली जाते.
marketing research कसे करावे (विपणनाची व्याप्ती)
कोणत्याही व्यवसायात मार्केटिंग रिसर्च खूप महत्वाचे असते. जगातील सर्वच उत्पादक मार्केटिंग रिसर्च करतात.
समस्या शोधणे
मार्केट रिसर्चची प्रक्रिया कंपनीला भेडसावणार्या समस्या शोधण्यापासून सुरू होते, सुरूवातीला ही समस्या कोणती आहे हे लक्षात येत नाही.
परंतु या भेडसावणार्या समस्येची लक्षणे मात्र जाणवतात. खोलवर रिसर्च केल्यानंतर ही समस्या समोर येते, परंतु यामध्ये कंपनीचा खूप सारा पैसा, वेळ आणि मेहनत वाया जाते.
समस्येचा शोध लागल्यानंतर मार्केट रिसर्च कर्त्याला पुढे कोणत्या पद्धती वापरायच्या तसेच research activities सेट करताना पुढे खूप फायदा होतो.
थोडक्यात सांगायचे झाले तर उत्पादने मार्केटमध्ये विक्री करताना, उत्पादनांची जाहिरात करताना कोणत्या समस्या उद्भवत आहेत त्यांचा शोध घेणे आणि त्यावर उपाय योजना करणे.
संशोधन योजना विकसित करणे
यामध्ये एक संशोधन योजना विकसित केली जाते. संशोधन करण्यासाठी एक प्लान तयार केला जातो, आणि त्यानुसार रिसर्च केले जाते.
या प्लॅनमध्ये एक roadmap विकसित केला जातो ज्याद्वारे उद्योगासंबधित उद्भवणारे महत्वाचे प्रश्न ओळखणे, उपयोगी माहिती मिळवण्यासाठी योग्य पद्धतीचा स्वीकार करणे किंवा पद्धत निवडणे.
रिसर्च कण्ड्क्ट करणे
ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पद्धतीशीरपणे डेटा गोळा करणे, विश्लेषण करणे आणि त्याचा अर्थ लावणे ही कामे केली जातात.