12 Online Business Ideas in Marathi प्रत्येकजण सहज करू शकतो

विद्यार्थी, गृहिणी किंवा नोकरदार यांना मोकळ्या वेळेत कोणत्याही गुंतवणुकीशिवाय करता येणारे Online Business Ideas in Marathi मध्ये. ज्या लोकांना एक यशस्वी ऑनलाइन उद्योजक (entrepreneur) बनवतील.

Online business ideas in marathi without investment

आजच्या इंटरनेटच्या युगात online business एक व्यवसाय न राहता, लोकांसाठी यशस्वी उद्योजकतेचा मार्ग बनला आहे. खाली आम्ही शून्य गुंतवणुकीत करता येणाऱ्या ऑनलाइन व्यवसाय (online business ideas in Marathi without investment) कल्पना दिल्या आहेत. तुम्ही त्या तुमच्या कौशल्यानुसार निवडू शकता.

1. Logo Design  

प्रत्येक ऑनलाइन व ऑफलाइन बिजनेसची ओळख हा त्या बिजनेसचा logo असतो.

अनेक व्यावसायिक आपल्या कंपनीच्या वस्तूंची ओळख मार्केटमध्ये ग्राहकांना व्हावी यासाठी कंपनीच्या वस्तूंवर कंपनीचा लोगो छापून घेतात.

कंपनीच्या मार्केटिंग करिता लोगो फार महत्वाचा असतो. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या, छोटे मोठे व्यावसायिक logo design करणार्‍या designer कडून लोगो बनवून घेतात.

सध्या अनेक ब्लॉगर, यूट्यूबर, ऑनलाइन टीचर, छोटे गृह उद्योग चालवणारे व्यावसायिक चांगली रक्कम मोजून designer कडून लोगो बनवून घेत आहेत.

मित्रांनो तुम्ही Fiverr सारख्या site वर स्वत:चे account उघडून logo design ची सर्विस देऊ शकता. किंवा सोशल मीडिया वर बिजनेस पेज तयार करून लोगो designing ची सर्विस देऊ शकता.

Fiverr वर तुम्हाला लोगो designing च्या भरपूर orders मिळतील. स्वत:चे छोटे ऑफिस टाकून सुद्धा हा बिजनेस करता येतो.

2. Affiliate Marketing

अफ्फिलियट मार्केटिंग सध्या खुप ट्रेंडिंगला आहे. अफ्फिलियट मार्केटिंग म्हणजे कोणत्याही थर्ड पार्टी कंपनीचे प्रॉडक्टस किंवा सेवा वेबसाइट, यूट्यूब चॅनल, फेसबूक, किंवा इनस्टाग्राम पेजवर लोकांना रेफर करणे व ते प्रॉडक्टस किंवा सेवा तुम्ही शेअर केलेल्या लिंकवर क्लिक करून लोकांनी खरेदी केल्यास कंपनी तुम्हाला त्याबदल्यात टक्केवारी मध्ये कमिशन देते.

अफ्फिलियट मार्केटिंग करण्यासाठी कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही. अफ्फिलियट मार्केटिंग बद्दल थोडेसे बेसिक ज्ञान घेतल्यास affiliate मार्केटिंग सहजपणे करता येते.

अफ्फिलियट मार्केटिंग शिकण्यासाठी ऑनलाइन अनेक कोर्स उपलब्ध आहेत. तुम्हा त्या कोर्ससचा आधार घेऊन अफ्फिलियट मार्केटिंग करू शकता.

3. YouTuber

यूट्यूब तर आपणा सर्वांच्याच परिचयाचे आहे.  दिवसेंदिवस यूट्यूबवर चॅनेल बनवणार्‍या लोकांची संख्या वाढतच चालली आहे.

आजकाल जो तो यूट्यूब वर स्वतचा lifestyle, cooking, education, व travel vlog चा चॅनल काढून स्वत:ची ओळख तयार करू लागला आहे. व विडियो वर येणार्‍या जाहिरातीच्या माध्यमातून earning करू लागला आहे.

मित्रांनो तुम्ही जर विद्यार्थी किंवा नोकरदार असाल तर तुम्ही तुमच्या आवडत्या विषया संबधित विडियो तयार करून यूट्यूबवर अपलोड करू शकता.

यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा बिजनेस वाढवता येतो.  लोकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येते. स्वत:जवळ असेलेले ज्ञान लोकांसोबत शेअर करता येते.

4. Online coaching

सध्या मार्केटमध्ये Online coaching खूप ट्रेंडिंगला आहे. YouTube, facebook, Zoom App व डिजिटल कोर्ससच्या माध्यमातून अनेक शिक्षक स्व: त पर्फेक्ट असलेल्या विषयाचे धडे विद्यार्थ्यांना देत आहेत.

त्याबदल्यात ते विद्यार्थ्यांकडून चांगली ऑनलाइन फी वसूल करत आहेत. मित्रांनो तुम्ही सुद्धा हा बिजनेस अगदी सहज स्टार्ट करता येऊ शकता.

ऑनलाइन टिचिंग सुरू करण्यासाठी तुमच्याजवळ कोणतीही डिग्री असणे आवश्यक नाही. फक्त तुम्ही जो विषय शिकवणार आहात त्याविषयात तुमचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.

Online coaching सुरू करून तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकता. तसेच YouTube व Facebook वर तुमचे कंटेंट monetize करून जाहिरातीच्या माध्यमातून कमाई सुद्धा करू शकता.

5. Social Media Influencer

सोशल मीडिया म्हणजे असे ऑनलाइन सोशल प्लॅटफॉर्म ज्यावर विचारांची देवाण घेवाण केली जाते.

सोशल मीडिया म्हणजे असे माध्यम ज्याठिकाणी अनेक लोक एकत्र येऊन आपल्या आयडियाज शेअर करतात.

Influencer म्हणजे असे क्रिएटर ज्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवरस असतात जे कंपनीच्या वस्तूंची जाहिरात आपल्या बिजनेस पेज/फॅन पेज वर करतात व त्या बदल्यात त्या प्रॉडक्टच्या कंपनीकडून मोठी रक्कम वसूल करतात.

मित्रांनो मार्केटमध्ये असे अनेक बिजनेस आहेत जे अशा लोकांचा शोध घेतात ज्यांचे इनस्टाग्राम, फेसबूक व यूट्यूब वर हजारो followers आहेत.

जर कंपनी आरोग्य संबधित प्रॉडक्ट तयार करत असेल तर कंपनी health संबधित पोस्ट करणार्‍या क्रिएटरचा शोध घेते, जर कंपनी technology संबधित असेल तर कंपनी technology संबधित पेज असणार्‍या क्रिएटरचा शोध घेते.

कंपन्या अशा creator लोकांना त्यांच्या कंपनीच्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यास मोठी रक्कम देतात. त्याबदल्यात creator त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात त्यांच्या सोशल पेजवर करतात.

मित्रांनो तुम्ही सुद्धा एक यशस्वी Social media influencer बनू शकता. त्यासाठी तुम्हाला इनस्टाग्रामवर स्वत:चे बिजनेस पेज तयार करावे लागेल,

किंवा यूट्यूबवर एक चॅनल काढावा लागेल व एक टॉपिक सिलेक्ट करून त्याच टॉपिक संबंधित पोस्ट कराव्या लागतील म्हणजे तुम्हाला टार्गेटेड followers मिळतील.

sponsorship देणार्‍या कंपनीला सुद्धा टार्गेटेड ग्राहक हवे असतात.

6. Content Writing Services

ब्लॉगिंगमध्ये कंटेंट रायटींगला खूप महत्व आहे. आज जगभरात असंख्य ब्लॉगर आहेत ज्यांना त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यासाठी लेख लिहून हवा असतो.

तो लेख कमीतकमी 500 ते 1000 शब्दात लिहून हवा असतो. जितका जास्त शब्दात लेख लिहून हवा असतो तितके जास्त पैसे लेख लिहणार्‍याला द्यावे लागतात.

मित्रांनो तुम्ही सुद्धा Fiverr.com वर content writing services देऊन चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही हिंदी, मराठी व इंग्लिश अशा अनेक भाषेत लेख लिहण्याचे काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला Fivverr.com वर एक Gig तयार करावे लागेल.

तुम्ही कोणत्या भाषेत लिखाण काम करणार आहात, कोणत्या विषयावर लिहणार आहात, चार्जस काय असतील ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या Gig वर अपलोड करावी लागेल.

एकदा Gig तयार झाले कि क्लाईंटच्या orders आपोआप यायला लागतील.

तुम्ही व्हाटसप्प, फेसबूक, इनस्टाग्राम व इतर सोशल प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुमच्या सर्विसेस बद्दल लोकांना माहिती देवू शकता व जास्तीत जास्त क्लाईंट मिळवू शकता.

7. Translation services

मित्रांनो जगभरात असे अनेक क्लाईंट आहेत ज्यांना लेख, आर्टिकल दुसर्‍या भाषेत भाषांतर करून हवा असतो.

असे अनेक क्लाईंट असतात जे त्यांचे लेखन Fiverr सारख्या साइटवर जाऊन Translation services देणार्‍या व्यक्तीकडून त्यांना हव्या त्या भाषेत भाषांतर करून घेतात. त्याबदल्यात ते त्यांना पैसे देतात.

मित्रांनो तुम्हाला जर language translation चे ऑनलाइन काम करायचे असेल तर तुम्ही सुद्धा Fiverr.com वर जाऊन language translation सेलर खाते उघडू शकता,

व English to Hindi, English to Marathi, किंवा Marathi to English, Hindi to English, Hindi to Marathi, या भाषेत भाषांतर करण्याची सेवा देऊ शकता.

भाषांतरासाठी तुम्ही Google translate या ऑनलाइन टुलचा उपयोग करू शकता.

Online business ideas from home in Marathi

स्वतःच्या home मधून करता येणारे online business मराठीत.

1. Share Market

शेअर मार्केट सुद्धा एक ऑनलाइन बिजनेस मध्येच मोडते.  शेअर मार्केट मधून आजपर्यंत हजारो लोकांनी खूप पैसा कमावला आहे.

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिग करणारे लोक दिवसाला 1 हजार ते 2 हजार अगदी सहज कमवतात. तुम्ही शेअर मार्केटमध्ये long-term साठी सुद्धा गुंतवणूक करू शकता व चांगला परतावा मिळवू शकता.  

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिग करणे म्हणजे स्वत:चे Demat अकाऊंट उघडून कंपनीचे शेअर्स खरेदी करणे व त्या शेअर्सचा भाव वाढल्यानंतर ते शेअर्स विकून टाकणे व चांगला नफा मिळवणे.

मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे.

कारण शेअर मार्केटमध्ये पैसा मिळतो सुद्धा आणि पैसा डुबतो सुद्धा. शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करताना ते चांगल्या प्रोग्रेस करणार्‍या कंपनीचे खरेदी करावे लागतात.

एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीचा study करावा लागतो.

2. Online Travel Agency

ऑनलाइन ट्रॅवल एजन्सि हा घरबसल्या करण्यासारखा एक बेस्ट बिजनेस आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करावी लागत नाही.

तुम्हाला स्वत:ची ट्रॅवल एजन्सि सुरू करण्यासाठी एजन्सिला एक पर्फेक्ट नाव द्यावे लागेल,  ट्रेड लायसेंस घ्यावे लागेल,  स्वत:चे बँक अकाऊंट उघडावे लागेल व जीएसटी रजिस्ट्रेशन करावे लागेल.

एक रजिस्टरर्ड ट्रॅवल एजेंट झाल्यानंतर तुम्हाला मार्केटमधील मोठ्या ट्रॅवल एजन्सिशी संपर्क करून त्यांच्याशी commission संबधित बोलणी करून त्यांचे Traveling Packages सेल करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला मोठ्या ट्रॅवल एजन्सि सोबत काम करायचे आहे.

ज्यावेळी तुम्ही संबधित ट्रॅवल एजन्सिचे Traveling Packages मार्केटमध्ये सेल कराल तेव्हा ती एजन्सि तुम्हाला त्याबदल्यात commission पे करेल.

सोशल मीडिया,  यूट्यूब,  इनस्टाग्रामवर किंवा ऑनलाइन ऑफलाइन जाहिरात करून तुम्ही Traveling Packages सेल करू शकता.

3. Website Flipping Business

हा एक असा ऑनलाइन बिजनेस आहे ज्यामध्ये अनेक प्रो ब्लॉगर वेगवेगळ्या टॉपिक वर वेबसाइट बनवून Flippa सारख्या वेबसाइटवर विकतात व यातून चांगला income कमवतात.

या बिजनेसमध्ये तुम्हाला स्वत:चा informative किंवा affiliate websites बनवायच्या असतात. ज्यावेळी त्या websites गूगल वर रॅंक होतात व monthly बेसिस वर चांगला ads income, affiliate income मिळवायला लागतात तेव्हा त्या वेबसाइटस Flippa.com वर जाऊन मंथली इन्कम च्या 10 पट जास्त किमतीत विकल्या जातात.

4. Domain Flipping Business  

डोमेन फ्लिपिंग बिजनेस म्हणजे GoDaddy, Namecheap सारख्या sites वर जाऊन .com .in .net  डोमेन नेम आपल्या नावे रजिस्टर करून ठेवणे व ते ज्या site वर रजिस्टर केले आहे त्याच site वर विक्रीसाठी लिस्ट करणे.

डोमेन फ्लिपिंग करून महिन्याला हजारो रुपये कमवता येतात. त्यासाठी तुम्हाला डोमेन नेम म्हणजे काय, अर्थपूर्ण डोमेन नेम कसे निवडायचे.

डोमेन नेम ऑनलाइन कसे रजिस्टर केले जाते,  ते विक्रीसाठी ऑनलाइन कसे लिस्ट करायचे याबद्दल ज्ञान असणे गरजेचे आहे.

यूट्यूब वर तुम्हाला या बद्दल भरपूर tutorials  सापडतील ज्याद्वारे तुम्ही domain flipping business कसा केला जातो याबद्दल पूर्ण माहिती मिळेल.

5. Print-on-demand store

मित्रांनो हा एक शून्य गुंतवणूक बिजनेस आहे जो सुरू करायला तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करावी लागत नाही.

Print-on-demand म्हणजे gents t-shirt, lady’s t-shirt, वर स्वत: तयार केलेली डिजाइन प्रिंट करून ती कस्टमरला विकणे.

ती डिजाइन text मध्ये किंवा image मध्ये असू शकते. आता तुम्ही म्हणाला कि यासाठी t-shirt, printer विकत घ्यावे लागतील का.

तर अजिबात नाही तर तुम्हाला सर्वात अगोदर Print-on-demand store सुरू करण्यासाठी खाली तीन स्टेस्प दिल्या आहेत.

सर्वात अगोदर तुम्हाला Canva.com या साइटवर जाऊन डिझाईन तयार करावी लागेल व तयार केलली डिझाईन png फॉरमॅटमध्ये बॅकग्राऊंड काढून डाऊनलोड करून घ्यावी लागेल.

यानंतर Printify.com या साइटवर जाऊन एक खाते उघडावे. व बेस्ट सेलर t-shirt ची निवड करून त्यावर download केलेल्या डिझाईनच्या मदतीने t-shirt डिजाइन करून घ्यावा.

त्यानंतर डिजाइन केलेले t-shirt चे फोटो डाऊनलोड करावेत.

यानंतर तुम्हाला Etsy.com या वेबसाइटवर जाऊन स्वत:चे सेलर अकाऊंट उघडावे लागेल. तुम्ही काय विकणार आहात याची डिटेल्स भरून घ्यावी व डाऊनलोड केलेले t-shirt चे फोटो अपलोड करून विक्रीसाठी लिस्ट करावेत.

यानंतर तुम्हाला तुम्ही ETSY वर तयार केलेले store, Printify अकाऊंट शी कनेक्ट करून घ्यावे लागेल.

चला तर आता थोडक्यात पूर्ण बिजनेस समजून घेऊया. सर्वात अगोदर तुम्हाला Canva वर तयार केलेले text, किंवा image मध्ये असलेले डिजाइन Printify या साइटवर जाऊन ब्लॅंक t-shirt वर पेस्ट करायचे आहेत त्यानंतर डिजाइन केलेले t-shirt चे फोटो डाऊनलोड करून घ्यावे व ETSY.COM वर एक स्टोर तयार करून त्याठिकाणी t-shirt चे फोटो अपलोड करून विक्रीस लिस्ट करावेत.

तुम्ही डिजाइन केलेले t-shirt ज्यावेळी ETSY.COM वरुन खरेदी केले जातील तेव्हा ती ऑर्डर Printify कडे जाते व Printify ब्लॅंक t-shirt वर तुमचे डिजाइन प्रिंट करून ज्या ग्राहकाने ऑर्डर केले आहे त्याच्या अॅड्रेस वर स्वत: पाठवते.

तुमच्या डिजाइनस सेल झाल्यानंतर तुमचे कमिशन ETSY.COM तुमच्या अकाऊंट वर पाठवते.

यामध्ये तुम्हाला फक्त t-shirt साठी text मध्ये डिजाइन तयार करायचे आहे. बाकीचा सर्व बिजनेस ETSY.COM आणि Printify या साइटस हॅंडल करतात. तुम्हाला इतर काहीही काम करायचे नाही.

Wrapping Up

मित्रांनो वर नमूद केलेल्या Online Business Ideas in Marathi मधील आयडियाज वर काम करण्यापूर्वी संबंधित ऑनलाइन आयडियाज वर अधिक ज्ञान मिळवा.

सुरूवातीला कमाईच्या पाठीमागे न लागता स्वत: skill शिका, ऑनलाइन काम कसे केले जाते याबद्दल यूट्यूब वरुन माहिती मिळवा आणि मग तुमच्या आवडती ऑनलाइन बिजनेस idea निवडा.

कोणताही बिजनेस सुरू करण्यापूर्वी त्या बिजनेस संबधित परिपूर्ण माहिती घेतल्यास बिजनेस फेल होण्याचे चांसेस फार कमी राहतात व यश सुद्धा लवकर मिळते.

मित्रांनो वर नमूद केलेल्या ऑनलाइन बिजनेस आयडियाज वर काम करण्यासाठी तुमच्याजवळ फक्त एक लॅपटॉप असणे गरजेचे आहे.

Leave a Comment