घर बसल्या काम पाहिजे असेल तर करा हे छोटे 8 व्यवसाय, पैसे घ्यायचे कळणार नाहीत

मेहंदी काढणे ही जर तुमची आवड असेल तर तुम्ही तुमच्या या कलेचे व्यवसायात रूपांतर करू शकता. लग्न सराई मध्ये तर तुमची इतकी कमाई होईल की तुम्ही विचार देखील करू शकणार नाही.

एका नवरीच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी जवळ जवळ 4 ते 5 हजार रुपये चार्ज घेतला जातो.

तसेच नवरी सोबत इतर करवल्या, नातेवाईक हे देखील त्यांच्या हातावर तुमच्याकडून मेहंदी काढून घेणे पसंत करतात. तसेच इतर सण, कार्यक्रमाच्या वेळी देखील मेहंदी डिझायनरला खूप मागणी असते.

जर तुमच्याकडे मेहंदी काढण्याचे कौशल्य नसेल तरी देखील तुम्ही मेहंदी डिझायनचा कोर्स करून हा बिजनेस सुरू करू शकता.

आज महिलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंगबेरंगी ब्लाऊज, नक्षीकाम केलेले ब्लाऊज, लटकण लावलेले ब्लाऊज यांची मोठी क्रेझ आहे.

साडी म्हटलं की ब्लाऊज आलाच, आणि तुम्हाला तर माहीतच आहे कि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साडीला किती महत्व आहे ते, प्रत्येक सणाला साडी गिफ्ट म्हणून मिळतेच.

मग ती माहेर कडून मिळू देत अथवा सासर कडून साडी तर ठरलेलीच असते. त्यामुळे अलीकडे ब्लाऊज मार्केट इतके वाढले आहे कि गल्ली गल्लीत आज लेडीज टेलर तुम्हाला पाहायला मिळतील.

आणि हो नुसता साधा ब्लाऊज जरी शिवायचा झाला तरी 150 ते 200 रुपये चार्ज घेतला जातो, आणि फॅशनचा ब्लाऊज जर शिवायचा असेल तर त्याचा चार्ज जवळ जवळ 350 ते 400 रुपये इतका आहे.

मूर्ति तयार करण्याचा बिजनेस हा एक सदाबहार बिजनेस आहे. आजकाल तुम्ही घरोघरी पाहत असाल प्रत्येकाच्या घरी एक तरी मूर्ति पाहायला मिळेल मग ती कृष्णाची असू द्या, गणपतीची असुदया, शंकराची असू द्या, शिवाजी महाराजांची असू द्या अथवा गौतम बुद्धांची असू द्या.

मूर्ति तर प्रत्येकाच्या घरात हमखास सापडेल. सध्या मार्केटमध्ये मूर्ति बनवण्याचे क्लास देखील घेतले जातात. तसेच मूर्तिचे तयार साचे देखील उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला मूर्ति तयार करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.

थोडेसे प्रशिक्षण घेतले कि झाले तुम्ही नंतर सहज मूर्ति बनवू शकता व ती ऑनलाइन मार्केटवर किंवा ऑफलाइन दुकानात विकू शकता.

मातीच्या भांड्यांना इतर धातूंच्या भांड्याच्या तुलनेत मागणी देखील मोठी आहे. छोटे मोठे हॉटेल्स, घरगुती खानावळ, चहा दुकान, चायनीज सेंटर किंवा घरांमध्ये मातीच्या भांड्यांचा खूप वापर वाढला आहे.

मातीची भांडी म्हणाल तर त्यामध्ये चहा कप असेल, चायनीज बाउल असेल, थाळी सेट असेल, मातीचे ग्लास असतील, मातीचे मटके असेल विविध आयटम तुम्हाला पाहायला मिळतील.

जर तुम्हाला मातीपासून विविध आकाराच्या वस्तु तयार करण्याचा छंद असेल तर तुम्ही देखील या व्यवसायात उतरु शकता व आपला मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय करू शकता.

प्रशिक्षणाच म्हणाल तर मातीची भांडी तयार करण्याचे प्रशिक्षण देणार्‍या अनेक संस्था आहेत. अशा संस्थेमध्ये प्रवेश मिळवून तुम्ही सुद्धा फार थोड्या कलावधीत या कलेत निपुण होऊ शकता.

तुम्ही जर महिला असाल तर तुमच्यासाठी हे काम खूप सोपे आहे. तुम्ही तुमच्या घरचे सर्व काम करून हा छोटा व्यवसाय करू शकता.

यासाठी तुम्हाला भांडवल काहीच लागणार नाही, फक्त सुई आणि रेशमी धागा आणि काळा धागा लागेल, मंगळसूत्रामध्ये विणले जाणारे काचेचे काळे व सोनेरी मणी लागतील.

तुम्हाला तर माहीतच आहे महिला प्रत्येक सणाला स्वत:ला व घरातील मुलींना काही न काही सोन्याचे दागिने विकत घेत असतात, छोट्या मुलांना गळ्यातील बदाम असेल चैन असेल असे सर्व काही दागिने त्या खरेदी करत असतात.

मग असे सोन्याचे दागिने त्यांना घरी विणता येत नाहीत मग त्या जवळच्या मंगळसूत्र गाठवणार्‍या महिलांकडे जातात आणि दागिने बनवून घेतात.

एक मंगळसूत्र विणायचे असेल तर त्या जवळ पास 70 ते 90 रुपये चार्ज घेतात.

जर दिवसाला त्या 5 ते 10 मंगळसूत्र तयार करत असतील तर त्यांची दिवसाची कमाई 10 गुणिले 90 रुपये तर 900 रुपये त्या दिवसाकाठी कमवतात.

काम खूप छोटे आहे पण पैसे या कामात भरपूर मिळतात. तर मग विचार कसला करताय तुम्हाला जर आवड असेल या कामाची तर आजच सुरू करा हा व्यवसाय.

ज्वेलरी कोणाला आवडत नाही, खासकरून महिलांना ज्वेलरी खूप आवडते. त्यामुळे ज्वेलरीचे मार्केट इतके आहे कि सांगूच नका.

बाजारात ज्वेलरी तयार करण्याचे साहित्य होलसेल दरात सहज मिळते, त्यामुळे ज्वेलरी तयार करणे खूप सोपे आहे.

जसे काचेचे मणी, पेण्ड्ल्स, लव लॉकेट, चैन, सोनेरी धागे, लॉकेटचे लॉक असे सर्व साहित्य जे ज्वेलरी तयार करण्यासाठी आवश्यक आहे ते सर्व साहित्य तुम्हाला किलोच्या भावाने विकत मिळते. त्यामुळे तुम्ही अगदी सहज घरच्या घरी ज्वेलरी आयटम तयार करू शकता.

ज्यामध्ये कानातले, नाकातले, गळ्यातले, लहान मुलींचे हार, गळयातली चैन असे आयटम तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता.

ज्यावेळी तुम्ही या कामात परिपूर्ण व्हाल तेव्हा सणासुदीला व इतर दिवशी तुमच्या घरी महिला व लहान मुलींची रांग लागेल.

कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण मी अशा काही महिला पाहिल्या आहेत ज्या घरातून साड्या विकतात. त्यांच कुठेही दुकान नाही. त्या फक्त होलसेलर कडून कमी दरात साड्या आणतात.

काही महिला तर त्यांच्या नवर्‍याला सूरत मार्केट, मुंबई मार्केट मधून अगदी 50 ते 100 रुपयाला मिळणारी एक साडी अशा कितीतरी साड्या आणायला लावतात.

काही महिला ऑनलाइन ऑर्डर देऊन घरपोच मागवतात. आणि त्याच साड्या त्या महिला एक साडी 100 रुपयाची 200 ते 300 रुपयाला विकतात.

म्हणजे तुम्हीच पहा किती प्रॉफिट आहे ते या बिजनेस मध्ये. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरूवातीला 5 ते 10 हजार रुपये साड्या खरेदीसाठी गुंतवायला लागणार आहेत.

तुमच्या आसपास राहणार्‍या महिलांच्या पसंती नुसार तुम्ही साड्यांचे कलेक्शन तयार ठेऊ शकता.

सूरत मार्केट नव्हे तर आजकाल कुठेही निमशहरी भागात तुम्हाला होलसेल रेट मध्ये साड्या विकत मिळतील. फक्त घरात थोडीशी जागा रिकामी करून एक रॅक लावून त्यावर साड्या स्टोअर करता येतात.

तुम्हाला तर माहितीच आहे कि आपल्या देशात दररोज कितीतरी लहान मुलांचा, मुलींचा जन्म होतो ते. जर तुम्ही एका चांगल्या भरपूर लोकसंख्या असलेल्या गावात राहत असाल तर तुमच्यासाठी हा छोटा व्यवसाय चांगली कमाई करून देऊ शकतो.

ज्यावेळी आपल्या नातेवाईकांच्या किंवा शेजार्‍यांच्या घरी एक लहान मूल जन्माला येत त्यावेळी त्याला पाहायला जाताना एक ड्रेस घेऊन जावा लागतो अशी रीत आहे. आणि हा लहान मुलांचा ड्रेस 100 रुपये पासून 500 रूपये पर्यंत मिळतो.

असा ड्रेस विकत घेण्यासाठी महिला जवळच्या शहरात न जाता आपल्या गावातील दुकानातूनच विकत घेतात. कारण गावातून विकत घेतल्यामुळे त्यांचा वेळ देखील वाचतो व जाण्या येण्याचा खर्च देखील वाचतो.

त्यामुळे त्या चार रुपये जास्त देऊन का होईना त्यांच्या आवडीचा ड्रेस विकत घेतात व त्या लहान मुलाला भेटायला जातात. तुम्हाला देखील तुमच्या या व्यवसायात चांगली व्हारायटी ठेवायची आहे, आणि दर सुद्धा योग्य आकारावे लागतील.

लहान मुलांच्या कपड्यासोबत तुम्ही लहान मुलांचे सॉक्स, शूज, लहान मुलींची मुलांची चप्पल, असे इतर आवश्यक साहित्य देखील विकू शकता.

घर बसल्या जर काम करायचे असेल तर स्वत:मध्ये एखादे कौशल्य तुम्हाला निर्माण करावे लागेल. तरच तुम्ही घरबसल्या काम करू शकता.

जर तुमच्याकडे कला नसेल तर तुम्ही अकुशल कामगार असल्याचे गृहीत धरले जाते त्यामुळे तुम्हाला ओबड धोबड कामे करावी लागतात.

यासाठी काहीतरी प्रशिक्षण घेऊन तुम्ही घरच्या घरीच रोजगार उपलब्ध व्हावा याकरता कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.

Leave a Comment